कापल्या गेल्यांवरी तर मदार होती
तोतयांची, फक्त शस्त्रे दुधार होती
समजले नाही मने करपली कशाने ?
सूर्य होता माजला की दुपार होती....
नाचली होतीस तू थयथया कशाला ?
हाक प्रेमाची जराशी... चिकार होती
उतरली ज्यांच्या मनातुन कधीच नाती
माणसांची त्या वयेही उतार होती
'जीवही देईन प्रेमात आज माझा'
मी म्हणालो फक्त, ...पण ती तयार होती
तापल्यावरी उरे आर्द्रता कशाने ?
साधनेला वेदनेची किनार होती
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1371
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
समजले नाही मने करपली कशाने
कविता सहज कधी नव्हे ते
ळः)
In reply to कविता सहज कधी नव्हे ते by मुलूखावेगळी
समजले नाही मने करपली कशाने
तुफ्फान आहे गझल.
धन्यवाद!