मोमो, एक खास तिबेटीयन पाकृ आहे. तिबेटसह हा खाद्यप्रकार संपुर्ण ईशान्य भारत, नेपाळ व हल्ली मुंबई, पुण्यासारख्या शहरात देखील झपाट्याने प्रसिद्ध होत आहे.
मी ह्या पाकृ मधे चिकन वापरले असले तरी तुम्ही त्या जागी पोर्क, बीफ, मटण किंवा हे पुर्णपणे शाकाहारी देखील बनवु शकता.
साहित्यः
चिकन खिमा - ५०० ग्रॅम
मैदा - २ वाटी
कांदा - १ वाटी बारीक चिरलेला
कोबी - १/२ वाटी
कांद्याची पात - १/२ वाटी
ढोबळी मिरची - १/४ वाटी
आले, लसुण - २ चमचे बारीक चिरुन
काळी मिरी पावडर - १ चमचा
सोया सॉस - १/२ चमचा
व्हिनेगर- १/२ चमचा
मिठ चवीनुसार
कृति :
१. मैदा थोडे मिठ टाकुन पोळीच्या कणिक प्रमाणे मळुन घ्यावा.
२. चिकन खिमा स्वच्छ धुवुन १५-२० मिनिटे निथळत ठेवावा.
३. कांदा, कांद्याची पात, कोबी, ढोबळी मिरची, आले, लसुण हे सर्व बारीक चिरुन घ्यावे.
४. कढईत तेल गरम झाल्यावर आले, लसुण टाकुन परतुन घ्यावे.
५. आले, लसुण परतल्यावर कांदा टाकुन परतावा.
६. त्या मधे कोबी, ढोबळी मिरची टाकुन परतावे.
७. थोडा वेळ परतल्यावर त्यात चिकन खिमा टाकुन चांगले परतुन घ्यावे.
८. खिमा थोडा शिजल्यावर व चिकनला सुटलेले पाणी पुर्णपणे आटल्यावर त्यात सोया सॉस, व्हिनेगर व काळी मिरी पावडर टाकुन मिक्स करावे.
९. चवीप्रमाणे मिठ व चिरलेली कांद्याची पात टाकुन निट हलवावे. हे तयार झालेले सारण ताटली मधे काढुन थोडा वेळ थंड होउ द्यावे.
१०. मैदाच्या बनवलेल्या कणके मधुन एक छोटा गोळा घेउन त्याची छोटी पुरी लाटुन घ्यावी.
११. करंजीला सारण भरतो, त्या प्रमाणे वरील गार झालेले चिकनचे सारण भरावे.
१२. फोटो मधे दाखवल्याप्रमाणे जर चुन्या घालता येत असतील तर त्या घालाव्यात किंवा त्याला तुम्ही मोदकां सारखा आकार देउ शकता. तेही न जमल्यास करंजी सारखा आकार द्यावा.
१३. हे मोमो तुम्ही deep fry किंवा मोदकां प्रमाणे उकडुन घेउ शकता.
१४. हे मोमो शेजवॉन सॉस सोबत गरम serve करावे.
टिप:
१. मोमो करताना तुम्ही मैद्या एवजी गव्हाचे पीठ वापरु शकता. खाली दिलेल्या फोटो मधे मी गव्हाचे पीठ वापरल्यामुळे त्याचा रंग brown आला आहे.
२. शाकाहारींसाठी ह्या सारणा मधे चिकनच्या जागी मश्रुम, sweet corn वापरु शकतील.
वाचन संख्या
14335
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
वेगळाच प्रकार
डंपलिंगमधे आणि मोमो मधे फार
In reply to वेगळाच प्रकार by लवंगी
म्म्म्म्म्म्म्म्म
हो, बरोबर आहे. dumplings चाच
sorry. मी इथे चुकुन dumplings
In reply to हो, बरोबर आहे. dumplings चाच by Mrunalini
छान पदार्थ
+१
In reply to छान पदार्थ by सहज
मस्त !
काय सुरेख दिसत आहेत मोमो!
ताटात कुंकवाचा ठिपका ठेवल्या
इतका कुटाना करण्यापेक्षा
मोमो बनवायला खूपच सोपे आहेत..
शाकाहारी बनवायचे झाल्यास
तुम्ही त्यात चिकन ऐवजी
In reply to शाकाहारी बनवायचे झाल्यास by पिवळा डांबिस
पनीरचा खिमा पण वापरता येईल.
In reply to तुम्ही त्यात चिकन ऐवजी by Mrunalini
मस्त आहेत
छान दिसतायत.
छान दिसतायत. अगदी निगुतीने
डम्प्लिंग हे चायनिज असतात
"वोह क्या ड्म्प्लिंग्ज बनाये
In reply to डम्प्लिंग हे चायनिज असतात by प्राजु
चिकन पॉट्स्टीकर!!
एकदा एका हाटेलातील वेटरने
बापरे
खरे आहे
In reply to बापरे by गुंडोपंत
:)
In reply to खरे आहे by बेसनलाडू
आज कणकेचे मोमोज / डंपलिंग्स
हाहाहाहा.. अगं जास्त करायचे
In reply to आज कणकेचे मोमोज / डंपलिंग्स by पिलीयन रायडर
त्या चुण्या कशा घालायच्या हे
मलाही सांगा. ते दिसतं फार
In reply to त्या चुण्या कशा घालायच्या हे by आदूबाळ
पावसात गरम गरम वाफाळलेले