✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कामापुरता नर

ड
डॉ.श्रीराम दिवटे यांनी
Fri, 02/11/2011 - 13:28  ·  लेख
लेख
एखादं मधमाशांचं पोळं भरात आलं की त्या झाडाखाली जमिनीवर काही मधमाशा मृतावस्थेत आढळतात. त्या नर माशा असतात. नरांचं काम संपलं की राणीमाशी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवते. किंवा सरळ त्यांना रक्षक माशांकडून मारले जाते. ती मात्र आपली अंडी उबवण्यातच धन्यता मानते. किती हा विरोधाभास! म्हणजे ज्या नरांमुळे आपल्या उदरी नवी पिढी जन्म घेणार आहे, त्या पित्यांनाच यमसदनास पाठविण्याचा हेतू काय? कोळ्याच्या मादीने आपलं अंडं उराशी बाळगून कोळीष्टक विणलं की त्यात गुरफटला जातो तो अंडे फलित केलेला नरच. तिच्या लेखी त्याचं ‘काम’ संपलेलं असतं. तसा तो देहयष्टीनं तिच्यापुढे लिंबू टिंबूच असतो म्हणा. तिने हल्लाबोल केल्यावर तो प्रतिकार करूच शकत नाही. जिच्याशी समागम झाला तीच त्याची वैरीण होते, भक्षक होते. त्या अल्प बळाच्या कोळ्याला काही सेकंदात गट्टम करून टाकते. खरे तर त्या नराचा जन्मच फक्त फलन कार्यासाठी झालेला असतो. त्याचे आयुष्य एखादी मादी भेटली की काही क्षणांचेच उरते. ते माहीत असूनही तो नर निसर्ग नियमानुसार तिच्याशी रत होऊन केवळ वंश वृद्धीसाठीसाठी बलिदान देतो. वाघ, चित्ता, बिबट्या यांच्या माद्या पंधरा ते वीस वर्षे जगतात, नर मात्र फार फार तर पाच ते दहा वर्षेच तगू शकतात. एकदा का पिल्ले झाली की माद्यांच्या दृष्टीने नर अडगळ बनून राहतात. मग त्या आपल्या बछड्यांना, छाव्यांना वाढवण्यातच मश्गुल होतात. पोरांच्या बापाने खाल्लं आहे की नाही, शिकार त्याच्या वाट्याला येतेय की नाही याची त्यांना काळजी नसते. परिणामी नरांची अन्नान्नदशा होते. ते भटकत राहतात. नरांचे ‘उमेदीचे’ वय गेले की त्यांना कोणतीच मादी पुसत नाही. मग मात्र त्यांची उपासमार होऊन ते मृत्युपंथाला लागतात. वरील उदाहरणे काय दर्शवितात? माद्यांचा आपमतलबीपणा, स्वतःचा स्वार्थ, मी अन् माझी पिलावळ, आत्मोन्नती, अहंभाव किंवा नराला दुय्यम ठरवण्याची आंतरिक प्रेरणा. आपण भले, आपले पोटाचे गोळे भले अन् आपली जिंदगी भली. हीच ती आत्मसंतुष्टता. नराचे तिकडे काहीही वाईट झाले तरी आपण कशाचेच देणे घेणे लागत नाहीत अशी माद्यांची एकंदर पद्धत दिसून येते. मनुष्य प्राण्याच्या बाबतीत असे घडते का? नर केवळ ‘कामा’पुरताच वापरला जातो का? उत्तर नक्कीच होय येऊ शकते. परंतु त्या ‘कामा’चा इथे अर्थार्थी फारसा संबंध आढळत नाही. इथे मुले बाळे झाल्यावर चित्तरकथा घडतांना दिसते. इथे वेगळ्याच कामासाठी नराचा उपयोग करून घेतला जातो. एकदा का मुले झाली की नराच्या पाठीमागे शुक्लकाष्ठ लागतेच, लावले जाते, काही नर आपोआप ते जोखड अंगावर वागविण्याचे स्वीकारतात. पुढील काही प्रश्न उपस्थित केल्यास भयंकर उत्तर मिळू शकते... ‘हे नाही, ते नाही, हे संपलं आहे, ते संपलं आहे, घरात हेच हवे , तेच हवे’, असे भांडून त्या नराला वेळोवेळी बाहेर पिटाळले जाते का? ‘पाय दाबून दे, डोके चेपून दे, कंबर शेकून दे, पोट खूप दुखतेय चोळून दे’, अशा अटी घालून त्याचा ‘मूड’ घालवला जातो का? किंवा मग अमूक तमूक मिळेपर्यंत ‘जवळ’ यायचे नाही असे प्रेमळपणे(?) धमकावून त्याची संयम परीक्षा घेतली जाते? ‘मुलं झाली की दोघांत अंतर पडतं, ती तिच्या मूल संवर्धनाच्या कार्यात व्यग्र होते तर तो त्याच्या बिझनेसमध्ये अधिक लक्ष घालू लागतो.’ ही वाक्ये दोहरून नक्की काय साध्य करायचे असते? स्त्री-पुरुष समानता म्हणजे काय समजायचं? स्त्रियांची मनमानी की पुरुषांविरुध्द रचलेले षडयंत्र? स्त्री-मुक्ती चळवळीची उद्दिष्ट्ये कुणाच्या फायद्याची ठरतात? मान्य आहे अबलेला आजवर फार सोसावं लागलंय. पुरुषी वर्चस्वाचं जोखड तिनं आजवर पेललं आहे. आज ती जाचक बंधन ती झुगारु पाहतेय ही स्तुत्य गोष्ट जरूर आहेच. तिलाही तिचं विश्व मनासारखं जगू द्यायलाच पाहिजे. परंतु हा सूड ठरता काम नये. स्त्रीचं स्वातंत्र्य म्हणजे पुरुषाला तुरुंगवास नसावा. तिलाही मन आहे, भावना आहेत. म्हणजे तिनं वाट्टेल तसे वागावे का? तिनं तिचं अवकाश प्राप्त करणं म्हणजे नरावर मादीचा वरचढपणा ठरतो काय? किंवा उपरोक्त काही सत्य घटनांचा बारीक निरीक्षणांती योग्य अन्वयार्थ लावून आद्य मानवाने निसर्गातील नराची कामापुरती गोष्ट ध्यानात घेतली असेल का? आपल्याला तसे काही भोगावे लागू नये यासाठीच त्याने पुरुष प्रधानता जाणून बुजून प्रसृत केली असावी का? असे असेल तर स्त्रीच्या नैसर्गिक स्वभावातील ज्वालामुखी आत्ता या घडीला धुमसून उफाळला असेल का? पूर्वी पतीला परमेश्वर मानणाऱ्या स्त्रिया आता पुरुषाला नोकरासारखे वागवून घेतांना का आढळतात? यामागे तिने दमन केलेली उपरोक्त माद्यांचीच नैसर्गिक प्रेरणा असू शकते का? काही कळायला मार्ग नाही... ("भिन्नावतरण" मधून..)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11355 वाचन

💬 प्रतिसाद (68)

प्रतिक्रिया

म्हणजे बायकांनी घरातली कामं

शिल्पा ब
Fri, 02/11/2011 - 23:36 नवीन
म्हणजे बायकांनी घरातली कामं करायची, बाहेरची करायची, हापिसात जायचं, पोरं काढायची अन सांभाळायची, नवर्याच्या घरातल्या लोकांना सांभाळून घ्यायचं आणि हा टग्या मात्र हापिसात पाट्या टाकून जसं काय जग जिंकून आलाय या अविर्भावात घरात वागणार? केली जरा कामं तर काय भोकं पडणारेत का? आणि स्वताच्याच घरत मदत करणार ना? वर तोंड करून अशे लेख / प्रतिक्रिया लिहिणार!!!
  • Log in or register to post comments

एकांगी प्रतिसाद

आजानुकर्ण
Fri, 02/11/2011 - 23:52 नवीन
पूर्णपणे एकांगी प्रतिसादाचा चपखल नमुना. सामान्यतः ज्या घरातल्या बायका हापिसात जातात त्या घरात घरकामाला बाया असतात असे वाटते. त्यामुळे घरातली नक्की कोणती कामे बायका करतात हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक बायकांची हापिसातली नोकरी ही जोडधंदा स्वरूपातली असते. बहुतेक नोकऱ्यांमध्ये (भेदभावपूर्वक प्राधान्य देणारे जाचक नियम व अटी यांमुळे) धोकादायक स्वरुपाची, किंवा अधिक ताण निर्माण करणारी कामे बायकांना दिली जात नाहीत. हापिसात उशीरापर्यंत राबणारे बहुदा पुरूषच असतात. अनेक हापिसात बायकाच गवार, मेथी वगैरे निवडताना दिसतात. त्यामुळे पुरूष हापिसात पाट्या टाकतात याला काही आधार नसावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

पूर्णपणे एकांगी प्रतिसादाचा

शिल्पा ब
Fri, 02/11/2011 - 23:54 नवीन
पूर्णपणे एकांगी प्रतिसादाचा चपखल नमुना....लेख सोडला तर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

पाशवी

पैसा
Sat, 02/12/2011 - 00:02 नवीन
शि बै! अगदीच पाशवी प्रतिसाद! (मला एक शंका आहे, अजूनपर्यंत युयुत्सु नी या धाग्यावर काही अमूल्य भर घातली नाही. ते दुसर्‍या कोणत्या डु आयडीने तर लिहित नाहीत ना?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

एखादं महाभारतातलं नाव घेऊन तर

शिल्पा ब
Sat, 02/12/2011 - 00:04 नवीन
एखादं महाभारतातलं नाव घेऊन तर नाही ना वावरत ते? आजकाल काय सांगता येतंय!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अनेक हापिसात बायकाच गवार,

रेवती
Sat, 02/12/2011 - 03:24 नवीन
अनेक हापिसात बायकाच गवार, मेथी वगैरे निवडताना दिसतात हम्म... वेळ मिळताच बायकांनीही हापिसाशेजारच्या टपरीवर जाऊन चहा, सिगरेटींचे राऊंडस मारावेत. काहीकाही बायका तर लंच टाईमला बिले भरणे, पत्रं लिहिणे, सामानाच्या याद्या यामध्ये वेळ वाया घालवतात. नवर्‍याच्या शर्टाचे तुटलेले बटण असो वा पाळणाघरातून उचलायचे मूल असो.....कसल्या फालतू काळज्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

अजाणुकर्ण आणि रेवती शी सहमत.

टारझन
Sat, 02/12/2011 - 09:05 नवीन
अजाणुकर्ण आणि रेवती शी सहमत. प्रतिसादांमुळे ज्ञाणात मोलाची भर पडली ... अजुन येऊन द्यात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

तसे करतातच

आजानुकर्ण
Sat, 02/12/2011 - 09:40 नवीन
वेळ मिळताच बायकांनीही हापिसाशेजारच्या टपरीवर जाऊन चहा, सिगरेटींचे राऊंडस मारावेत.
पुण्यात अनेक बायका नियमितपणे हे करताना दिसतात. त्यामुळे केवळ पुरूषच पाट्या टाकत आहेत आणि त्यामुळे घरकाम करणे ही पुरूषांचीच जबाबदारी आहे असा काही प्रतिसादकांचा दावा चुकीचा आहे. बिले भरणे वगैरे कामे तर माझ्या माहितीत पुरुष कामगारच करतात. बहुतेक वेळा पैसेही त्यांचेच असतात ;). माझ्या तीनचार कंपन्यांमधील मित्रांशी या विषयावर माझी नियमित चर्चा होते. बहुतेक सर्व कंपन्यांमध्ये उच्च व्यवस्थापनाकडून अनौपचारिक सूचना आल्या होत्या की स्त्री कर्मचार्‍यांना संध्याकाळी सात नंतर कार्यालयात थांबवू नये. थांबवल्यास त्यांना घरी पोचवण्याची जबाबदारी त्यांच्या सुपरवायझरची आहे. त्यामुळे झक मारत पुरूष कामगारांनाच सर्व वेळा उशीरापर्यंत थांबावे लागते. मात्र कामात भेदभाव केला तरी पगारामध्ये असा भेदभाव करून चालत नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

उशीरा थांबले तर ते फुकटात

शिल्पा ब
Sat, 02/12/2011 - 09:49 नवीन
उशीरा थांबले तर ते फुकटात का? आणि <<केवळ पुरूषच पाट्या टाकत आहेत आणि त्यामुळे घरकाम करणे ही पुरूषांचीच जबाबदारी आहे असा काही प्रतिसादकांचा दावा चुकीचा आहे. याचा अर्थच समजला नाही...कोणी असा दावा केलाय जरा दाखवुन द्या बरं..बाकी हापिसात बायकांना त्यांचे घरकाम पूर्ण करण्याचा पगार मिळतो हे पाहून अंमळ असूया जाहली..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

होय

आजानुकर्ण
Sat, 02/12/2011 - 10:09 नवीन
उशीरा थांबले तर ते फुकटात का?
उशीरा थांबण्याचे वेगळे पैसे मिळत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

स्त्री कर्मचार्‍यांना

रेवती
Sat, 02/12/2011 - 19:54 नवीन
स्त्री कर्मचार्‍यांना संध्याकाळी सात नंतर खरंतर ही वेळ का आली. उशिरापर्यंत काम करत थांबलेल्या स्त्रियांवर स्रियांनीच अत्याचार केले म्हणून का? आणि घरी जावून टिव्हीसमोर बसून राहणार्‍या किती? हापिसात निवडलेली गवार, मेथी धुवायची आणि फोडणीला टाकायची. घरी गेल्यावर आराम बसून राहणार्‍या बायकांची संख्या अजूनही कमीच आहे. म्हणूनच अश्या चार स्त्रियांची बरीच चर्चा होते. नविनच प्रकार आहे हा आपल्या समाजासाठी. त्याऐवजी हापिसात निवडलेली भाजी फोडणीला टाकणे, मुलांचे अभ्यास घेणे, दुसर्‍या दिवशीची तयारी, नेहमी वाजणार्‍या फोनला उत्तरे देणे हे करताना दिसली तर फारसे वेगळेपण जाणवणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

आमच्या ओळखीची आहे अशी एक बाई

धनंजय
Sat, 02/12/2011 - 03:46 नवीन
सारखे स्वतःसाठी आणि मुलांसाठी लोकांच्या घरी धुण्याभांड्याचे काम करत असते. बिचारा गलितगात्र नवरा "दारूची आणखी एक बाटली आण" असे सांगतो, तर हिडीसफिडीस करते. अजून नवर्‍याला हाणामारी करण्याइतपत शक्ती आहे, म्हणून बिचारा तगून राहिला आहे. पण ती शक्ती गेली, तर काय होणार बिचार्‍याचे. मधुशालेला पारखा होऊन तृषार्त नवरा मरून जाईल बिचारा. माहितीपटामधल्या मधमाशासारखा...
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 02/12/2011 - 10:07 नवीन
Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

+१

कवितानागेश
Sat, 02/12/2011 - 18:41 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

पण ती शक्ती गेली, तर काय

रेवती
Sat, 02/12/2011 - 19:48 नवीन
पण ती शक्ती गेली, तर काय होणार बिचार्‍याचे नै तर काय!;) छान प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

शेवट

अडगळ
Sat, 02/12/2011 - 09:18 नवीन
काही कळायला मार्ग नाही... ("भिन्नावतरण" मधून..)>> लेखाचा शेवट काळजाला हात घालणारा आहे. - नराधम
  • Log in or register to post comments

नराधम (नर + अधम) हा समास

अप्पा जोगळेकर
Sat, 02/12/2011 - 21:18 नवीन
नराधम (नर + अधम) हा समास म्हणजे नरांना सिंगल औट करण्याचा प्रकार आहे.
  • Log in or register to post comments

फारच चर्चा झाली या

डॉ.श्रीराम दिवटे
Sun, 02/13/2011 - 09:27 नवीन
फारच चर्चा झाली या विषयावर.. आता पुरे..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा