आरक्षण!

अजिंक्य's picture
अजिंक्य in काथ्याकूट
2 May 2008 - 11:22 am
गाभा: 

आरक्षण!
अतिशय ज्वलंत विषय!!
तसं आरक्षण सर्वच ठिकाणी पाहावयास मिळतं.
पण माझा रोख(?) आहे, तो शैक्षणिक आरक्षणावर.....

माझा स्वतःचा अनुभव सांगतो : माझी ऍडमिशन झाली तेव्हा, माझा मित्र (जो ओबीसी आहे) त्याचीही ऍडमिशन झाली.
त्याला माझ्यापेक्षा कमी गुण असूनही, त्याला युनिव्हर्सिटी मध्ये जागा मिळाली, पण मला मिळू शकली नाही.
माझा मित्रावर राग अजिबात नाही. अजूनही आम्ही दोघे चांगले मित्र आहोत.
पण, हे कितपत योग्य आहे?

शैक्षणिक बाबतीत, प्रवेशाच्या वेळी, गुण हाच निकष मानला जावा असं मला वाटतं.
आरक्षण असायला काहीच हरकत नाही. पण त्याला काहीतरी मर्यादा असावी.

आरक्षण हे मुख्य शिक्षण पूर्ण करण्यासाठी असावं. उच्च शिक्षण घेताना फक्त गुणांचाच विचार व्हावा.
नाहीतर मग, आरक्षण देण्यामागचा मूळ हेतू बाजूलाच राहील आणि अजिबात गुणवत्ता नसलेले लोक
जागा बळकावून बसतील.

कदाचित माझा सूर थोडा वरच्या पट्टीतला असेल, पण .......
मला नाही वाटत माझा मुद्दा चुकीचा आहे.
यावर इतरांची मते आणि विचार जाणून घ्यायला आवडेल.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

2 May 2008 - 11:26 am | विसोबा खेचर

उच्च शिक्षण घेताना फक्त गुणांचाच विचार व्हावा.
नाहीतर मग, आरक्षण देण्यामागचा मूळ हेतू बाजूलाच राहील आणि अजिबात गुणवत्ता नसलेले लोक
जागा बळकावून बसतील.

अजिंक्यराव, मी आपल्याशी सहमत आहे...

आपला,
(अनारक्षित) तात्या.

अजिंक्य's picture

2 May 2008 - 11:40 am | अजिंक्य

तात्या, तुमची खरोखर कमाल आहे!

आत्ता थोड्याश्या वेळा आधी मी आपले विचार "मांडले" होते!
एवढ्यात तुम्ही उत्तरही दिलंत!
असो. अनुकूल प्रतिक्रियेबाबत मनापासून धन्यवाद.
मी इतरही अनेक "सो कॉल्ड" मराठी साईट्स पाहिल्या आहेत, पण
मिपा ची मजा त्यात नाही!
मला वाटलं होतं की मुळात माझे लेखन दिसायलाच खूप वेळ लागेल्.....मअअअअअग त्यानंतर प्रतिक्रिया!

पर ह्यो मामला लईच "फाष्ट" दिसतोय की!!
थँकू, थँकू!!

विसोबा खेचर's picture

2 May 2008 - 11:49 am | विसोबा खेचर

मला वाटलं होतं की मुळात माझे लेखन दिसायलाच खूप वेळ लागेल्.....मअअअअअग त्यानंतर प्रतिक्रिया!

हा हा हा! :)

आपला,
(प्रशासकीय अनुमतीतला!) तात्या.

प्रमेय's picture

20 Jan 2009 - 4:07 am | प्रमेय

सर्वसाधारणपणे फक्त जातीवर आरक्षण मिळत नाही, त्यासाठी पात्रता (आर्थिकद्रुष्ट्या कमी :जी प्रत्येक जाती/आरक्षण प्रकारानुसार बदलते) दाखवावी लागते.
ठराविक मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असणारे, केवळ पोट-जात/वर्गप्रकार बदलून (म्हणजे ह्या ह्या उपनियमाऐवजी अ-ब-क पोटनियम/दुरुस्तीनुसार) तेच आरक्षण नव्या नियमाने मिळवतात आणि उरलेल्या इतर सर्व हुशार मुला-मुलींचे नुकसान करतात. (हेही शक्य आहे बरंका! काय हे नियम आणि पोट नियम. एकदा हे संविधान वाचलेच पाहिजे! ) हीच ती चूक आहे ज्याला सर्वजण 'बळकावून बसणे' या अर्थी वापरतात.

या बाबत जेव्हा सर्वोच्य न्यायलय चौकशी करते तेव्हा राजकारण पुढे करुन याला दाबून टाकतात. गेल्यावेळी जेव्हा आरक्षणाची मुदत संपली आणी परत आरक्षण हवे की नको सर्व्हे झाले तेव्हा वेगळे काय घडले?

या बाबतीत फक्त एकाची(च) चूक आहे जो म्हणजे तो विद्यार्थी वर्ग आणी त्याचे पालक जे हा सर्व प्रकार करून मोकळे होतात आणी नंतर कसे मी पप्पू/छमीला प्रवेश मिळवून दिला याचे गुणगान गातात! हा सर्व प्रकार मी स्वतः पाहिला/ऐकला आहे!

असो! ज्याने त्याने कसे वागायचे/ठरवायचे स्वात्रंत्र या घटनेने दिले आहेत; आणी जो समाज नियम पाळायची शिस्त (छोटा-मोठा सर्व वर्ग!) स्वता:ला लावून घेत नाही तो जास्त काळ टिकू शकत नाही याची उदाहरणे या जगात खूप आहेत!

ज्या व्यक्तीला या वागण्याचे प्राय:चित्त होईल तो इतरांना सावध करेल, बेशलाक अशा माणसांची या भारताला जास्त गरज आहे!

विनायक पाचलग's picture

21 Jan 2009 - 10:25 pm | विनायक पाचलग

सहमत
असाच अनुभव मला एन. टी.एस या परिक्षेवेली आला होता
आपला,
(अनरक्षित) विनायक
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले

प्राजु's picture

2 May 2008 - 11:42 am | प्राजु

हा जाहीरपणे वाद होईल असाच विषय आहे. पण तरीही मी तुमच्याशी सहमत आहे. तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अजिंक्य's picture

2 May 2008 - 11:52 am | अजिंक्य

खरे म्हणजे, या विषयावर वाद व्हावा अशीच माझी इच्छा आहे.
आत्तापर्यंत, माझ्या विचारांशी सहमत असणारे लोकच मला भेटले आहेत.
दुसरी बाजू सुद्धा समोर येणे आवश्यक आहे.
वाद जरी नाही, तरी सांगोपांग चर्चा झाली तर चांगलेच आहे.
तरीही, धन्यवाद प्राजुताई!
(प्राजुताई चालेल का?)

धमाल मुलगा's picture

2 May 2008 - 11:59 am | धमाल मुलगा

अजिंक्य,
सहमत आहे आपल्या मताशी.
मुळात आरक्षणच नको, आणि ठेवायचेच तर ते आर्थिक निकषांवर असावे, असा माझा वैयक्तिक सुर आहे.

ह्या विषयावर आजपर्यंत बराच धूराळा उडाला आहे.
एक आठवलं,
कोणत्याश्या न्यूज-चॅनलवर आरक्षण हवं की नको च गुर्‍हाळ चालू होतं....एका सन्मानिय महोदयांनी "अमेरिकेतसुध्दा आरक्षण आहे..काळ्या लोकांसाठी!" असं निदर्शनाला आणून दिलं...पण "ते आरक्षण गुणवत्तेशी तडजोड करत नाही...जर एक काळा आणि गोरा असे दोन जण ९०% गुण मिळवून एकाच जागेसाठी अर्ज करत असतील, तर हे आरक्षण वापरलं जातं....उगाच काळा आहे म्हणून द्या ५०% वाल्याला, असं आपल्याकडच्यासारखं नसतं" असं सांगितल्यावर हे महोदय 'पिळवणूक, जातीची उतरंड, उच्चवर्णियांची मक्तेदारी' असा टिपिकल गळेकाढूपणा करुन उत्तर द्यायचं टाळते झाले.

अजिंक्यभाऊ, तुम्ही आम्ही ह्यावर बोलून फार तर फार वादावादीचे प्रसंग येतील...त्या हलकट राजकारणी माकडांच्या हाती जोपर्यंत जातींचं कोलित आहे, तोपर्यंत देशाची गुणवत्ता सर्वार्थाने सुधारणं केवळ अ...श...क्य !!!!

सहज मिपावर असलेले जुने लेखन बघत असतांना हा विषय आढळला. मी याच विषयावर दुसरीकडे एक चर्चा आरक्षण... एक वेगळा विचार या नावाने टाकली होती. त्याच विषयाशी निगडीत विषय येथे बघून राहवले नाही म्हणून प्रतिसाद टाकला.

आजानुकर्ण's picture

2 May 2008 - 12:05 pm | आजानुकर्ण

पेमेंट सीटच्या रुपातले आरक्षण

अतिशय ज्वलंत विषय!!
तसं हे पैशेवाल्यांसाठीचे आरक्षण सर्वच ठिकाणी पाहावयास मिळतं.
पण माझा रोख(?) आहे, तो शैक्षणिक आरक्षणावर.....

माझा स्वतःचा अनुभव सांगतो : माझी ऍडमिशन झाली तेव्हा, माझा मित्र (जो ओबीसी नाही) त्याचीही पेमेंट सीटवर ऍडमिशन झाली. बापाच्या पैशाचा मुलाच्या ऍडमिशनसाठी फायदा होणे योग्य आहे का?
त्याला माझ्यापेक्षा कमी गुण असूनही, त्याला युनिव्हर्सिटी मध्ये जागा मिळाली, पण मला मिळू शकली नाही.
माझा मित्रावर राग अजिबात नाही. अजूनही आम्ही दोघे चांगले मित्र आहोत.
पण, हे कितपत योग्य आहे?

शैक्षणिक बाबतीत, प्रवेशाच्या वेळी, गुण हाच निकष मानला जावा असं मला वाटतं.
आरक्षण असायला काहीच हरकत नाही. पण त्याला काहीतरी मर्यादा असावी.

आरक्षण हे मुख्य शिक्षण पूर्ण करण्यासाठी असावं. उच्च शिक्षण घेताना फक्त गुणांचाच विचार व्हावा.
नाहीतर मग, आरक्षण देण्यामागचा मूळ हेतू बाजूलाच राहील आणि अजिबात गुणवत्ता नसलेले लोक
जागा बळकावून बसतील.

कदाचित माझा सूर थोडा वरच्या पट्टीतला असेल, पण .......
मला नाही वाटत माझा मुद्दा चुकीचा आहे.
यावर इतरांची मते आणि विचार जाणून घ्यायला आवडेल

आपला,
(गरीब) आजानुकर्ण

अजिंक्य's picture

2 May 2008 - 4:22 pm | अजिंक्य

आजानुकर्ण, आपले विचार जवळजवळ तंतोतंत जुळतात!!
(इतके, की आपल्या लेखांमधली वाक्येदेखील जुळतात!!)

पेंमेंट सीट हा सुद्धा वादाचाच मुद्दा आहे. त्याबाबतही विचार होणे आवश्यक.
टीप: जरी आपण मुद्दा योग्य मांडला असला, तरीही
माझीच वाक्यं वापरण्याचा "प्रकार" थोडा विचित्र वाटला. थोडा वेळ मीही गोंधळलोच होतो.
पर चलता है!!

सर्वसाक्षी's picture

19 Jan 2009 - 10:02 pm | सर्वसाक्षी

हे आय आय टी, एन आय टी, यु. डी. सी. टी.....मध्ये नसते.

पण जातीय आरक्षण मात्र असते.

पेमेंट सीट हे शिक्षण सम्राटांचे चराऊ कुरण आहे. मुळात त्यांनी समाजशिक्षणासाठी संस्था उघडलेल्या नसून नोटा छापण्यासाठी उघडलेल्या आहेत आणि त्या खाजगी असल्याने ते स्वतःचे नियम लागु करू शकतात. त्यातल्या त्यात फायदा म्हणजे शे पन्नास गुणवत्ता नसलेल्या पण पैसे असलेल्या मुलांमुळे काही मुलांना गुणवत्तेवर शिक्षणासाठी प्रवेश मिळु शकतो!

असो.

मदनबाण's picture

2 May 2008 - 12:09 pm | मदनबाण

शैक्षणिक आरक्षणावर..... पण कशाला? मग गुणवत्ता यादी काय चाटायची ?????
शिक्षणामधे गुणत्ता हाच निकष हवा !!!!!

अजिबात गुणवत्ता नसलेले लोक
जागा बळकावून बसतील.

तात्या मला तर वाटत की गुणवत्ता नसलेले लोक अगोदरच जागा बळकावून बसले आहेत.....
आपल्या देशातील लोक जाती शिवाय राजकारण करु शकतील काय?
बर्‍याच वेळा पेपरात किंवा बातम्यां मधे वाचायला मिळते:-- दलित स्त्रीचा बलात्कार झाला....(दलित हा महत्वाचा मुद्दा)
जिथ स्त्रीच्या अब्रुला सुद्दा जात आहे आपल्या देशात..... त्या देशाचा विकास तो काय होणार?
ती स्त्री आहे ते महत्वाच नाही पण ती दलित आहे हे महत्वाच !!!!! शेवटी बलात्कार होतो तिच्या मनाचा आणि शरीराचा व विचार केला जातो तो फक्त तिच्या जातीचा व्वा रे दुनिया व्वा !!!!!

(हे भारतमाते तुझ्या पोटी जन्माला आलेला खरच भाग्यवान असतो काय?) या गहन विचारात पडलेला.....
मदनबाण

मुक्त / विनामूल्य / समाज-प्रायोजीत-चलीत / अमर्याद / वय-लिंग-पार्श्वभूमी-निरपेक्ष शिक्षण व्यवस्था असावी अशा मताचा मी आहे.
तथापी, आरक्षणाचा वा अनारक्षणाचा विरोध मी करीत नाही, कारण पदवी मिळवणे म्हणजे - ज्ञान मिळवणे नाही आणि नोकरी मिळवणे म्हणजे - काम करून दाखवणे / स्वतःच्या वा मालकांच्या उद्योगांस लाभ करून देणे नाही.
प्रतिभावंतास ऍडमिशन वा पदवी थोपवू शकत नाही.

व्यंकट

शरुबाबा's picture

2 May 2008 - 2:43 pm | शरुबाबा

१) सकाळ बद्दल एक पुस्तिका बाजारात आली आहे.हे व्रुत्तपत्र ब्राम्ह्णणांनी कासे ताब्यात घेतले आहे,या बद्दल त्यांची मते त्यांनी मांदली आहेत्,पण हे करताना महापुरुषांची उगाचच बदनामी केली आहे,असे मला वाटते,ज्या पुणे करांनी ती वाचली असेल त्यांनी मत मांडावे.हे लिखाण अत्यंत जातीयवादी आहे.

२) आरक्षण!
अतिशय ज्वलंत विषय!!
तसं आरक्षण सर्वच ठिकाणी पाहावयास मिळतं.
पण माझा रोख(?) आहे, तो शैक्षणिक आरक्षणावर.....
माझा स्वतःचा अनुभव सांगतो : माझी ऍडमिशन झाली तेव्हा, माझा मित्र (जो ओबीसी आहे) त्याचीही ऍडमिशन झाली.
.
.
.

वरिल दोन्हि विषय अतिशय ज्वलंत विषय आहेत . आपण येथे मिपावर येतो , आवडीने सर्व साहित्य वाचतो आणि त्यवर मनापासून मोकळ्या ढाकळ्या प्रतिक्रिया देतो .

जर अशे जातीवाचक विषय टाळले तर चांगले होइल असे वाट्ते .

अजिंक्य's picture

2 May 2008 - 4:53 pm | अजिंक्य

शरुबाबा,
काहीतरी गैरसमज झालेला दिसतो.
मला कोणत्याही जातीविरोधात बोलायचे नाही.
जातिवाचक वाद उठवण्याचा तर अजिबात हेतू नाही.

जर अशे जातीवाचक विषय टाळले तर चांगले होइल असे वाट्ते .

मिपावर चर्चा करताना, हा विषय जातिवाचक, तो अ-जातिवाचक असे म्हणून कसे चालेल?
विषय जरी जातिवाचक वाटत असला, तरी त्यामागची भूमिका समजून घेणे आवश्यक आहे.
हा विषय जातीशी संबंधित आहे खरा, पण रोख जातीवर नसून, आरक्षणावर आहे, जो की पूर्णपणे वेगळा विषय आहे.

आणि जर जातिवाचक विषयावर चर्चा केलीच नाही, तर तो विषय मांडलाच जाणार नाही.
चर्चा आवश्यकच आहे. पण चर्चेमध्ये मन निर्मळ असणे जास्त आवश्यक आहे.
हे मी तुम्हाला उद्देशून म्हणत नाही, तर हे कोणालाही लागू होते.

(मी नवा सभासद आहे. चूकभूल द्यावी-घ्यावी.)
आपला नम्र - अजिंक्य.

विकि's picture

4 May 2008 - 1:51 pm | विकि

अजिंक्य पक्का जातीयवादी दिसतोय. त्याचा जाहीर निषेध करायला हवा.

शरुबाबा's picture

2 May 2008 - 5:00 pm | शरुबाबा

हा विषय जातीशी संबंधित आहे खरा, पण रोख जातीवर नसून, आरक्षणावर आहे, जो की पूर्णपणे वेगळा विषय आहे.

अजिंक्यभाऊ, तुम्ही आम्ही ह्यावर बोलून फार तर फार वादावादीचे प्रसंग येतील...त्या हलकट राजकारणी माकडांच्या हाती जोपर्यंत जातींचं कोलित आहे, तोपर्यंत देशाची गुणवत्ता सर्वार्थाने सुधारणं केवळ अ...श...क्य !!!!

गैरसमज नसावा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Aug 2008 - 3:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

"... तुम्ही आम्ही ह्यावर बोलून फार तर फार वादावादीचे प्रसंग येतील..."
अजिंक्यभौंनी इथे आधीच त्यांची भूमिका मांडली आहे. त्यांनी एकाच बाजूनी लोकांचं मत असल्याचं इथे लिहिलंच आहे. आणि वादावादी होईल, असं म्हणण्यापेक्षा चर्चा होईल असा आशावाद का असू नये? काहीतरी समर्थनार्थ मुद्देही असतील ज्यांना आरक्षण हवंसं वाटतं. ते वर यावेत म्हणून हे काथ्याकूट सुरू केलेलं आहे.

वैयक्तिकरित्या मलातरी यात काहीही जातीयवादी वाटत नाही आणि माझा आरक्षणाला विरोधच आहे. प्राथमिक शिक्षण, रूढार्थाने नाही, समजा १२ वी + काही व्यावसायिक कौशल्यांचं शिक्षण, प्राथमिक किंवा सक्तीचं करावं, ते सर्वांना उपलब्ध करून द्यावं, अगदी फुकटातही आणि नंतर आरक्षणाच्या कुबड्या काढाव्यात या मताची मी आहे.

यमी

गणपा's picture

2 May 2008 - 5:42 pm | गणपा

अजिंक्य, तुझ्या सारखाच माझाही अनुभव आहे.
माझ अस प्रामाणिक मत आहे की मुळात आरक्षण असुच नये, जर ठेवायचच असेल तर ते फक्त शिक्षणा पुरताच मर्यादीत असाव आणि शिक्षणातही आरक्षण हे विद्यार्थ्याच्या आर्थिक परिस्थीती वरच अवलंबून असाव.
धर्मावर आधारीत आरक्षण, मग जाती , पोट-जाती, अस करता करता ओपन ग्रुपच्या मुलांना किती जागा उरतात ? वाइट वाटत, जी मुलं वर्षभर इतकी मेहनत करुन ८० ते ९०% मार्क मिळवतात, आणि मग ऍडमिशनच्या क्षणी ४०-५०% वाली मुल जाती - धर्मावर त्यांचा हक्क हिसकावून घेतात. बरीचशी ४०-५०%वाली मुलं दुसर्‍या वर्षी नापास होऊन स्वतःच वर्ष तर वाया घालवतातच पण हुशार विद्यार्थ्यांचही त्यांना ऍडमिशनपासुन वंचीत ठेवुन अन्याय करतात.

मन घट्ट करुन एकवेळ शैक्षणिक आरक्षण मान्य केल तर परत नोकरीत आणि बढतीच्या वेळी सुद्धा यांना आरक्षण आणि प्राधान्य द्या. ये बात कुछ हजम नही होती.
पण जोपर्यंत आपले नालायक राज्यकर्ते जाती -धर्मावर आधारीत राजकारण सोडत नाहीत तो पर्यंत हे आसच चालणार. सामांन्यांचा कुणीही वाली नाही.
(गांजलेला )गणपा. ~X(

विकि's picture

4 May 2008 - 2:10 pm | विकि

मनूष्य स्वभावानुसार दुसरा पुढे जाताना बघून आपला जळफळात होणे स्वाभाविक आहे. तुम्हाला माहीत नसेल की या अगोदर नोकर्‍यात वरिष्ठ पदावर ठराविक जातीची मक्तेदारी होती. अजूनही आहे त्यामूळे त्या जातींचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला पण मागासलेल्या जातींची काय त्या जाती कश्या पुढे येणार. आधीच जातीयवाद्,जातीयवादी लोक मोठ्या प्रमाणावर.
जर आरक्षण नसते तर मागास प्रवर्ग पुढे यायची प्रक्रीया चालू झालीच नसती.
आपला
कॉ.विकि

गणपा's picture

4 May 2008 - 9:08 pm | गणपा

विकि साहेब,
माझा विरोध आहे तो जातीय आणि धार्मिक आरक्षणाला. आर्थिक दृष्ट्या जे मागासलेले आहेत त्यांना द्याव आरक्षण, तेही फक्त शिक्षणापुरतच. नोकरी, बढतीत हे फाजील लाड नको.
मनूष्य स्वभावानुसार दुसरा पुढे जाताना बघून आपला जळफळात होणे स्वाभाविक आहे.
नक्कीच. जर एखादी व्यक्ती त्याची/तिची लायकी नसताना ही फक्त मागासवर्गीय आहे म्हणुन इतरांचा (लायक लोकांचा) हक्क डालवुन पुढे जात असेल तर जळफळाट होणारच.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही हे आरक्षण काही ठराविक काळापर्यंतच असाव अस म्हंटलय. कारण एकदा का त्या आरक्षणाच्या कुबड्यांची सवय जडली तर त्यांच्या आधाराशिवाय हा समाज वर येऊ शकणार नाही हे त्या माहामानवाने ५०-६० वर्षांपुर्वीच ताडल होत.
(जातीय / धार्मिक आरक्षण विरोधी)
- गणपा.

विकि's picture

4 May 2008 - 11:43 pm | विकि

पुढे जाण्याचा हक्क घटनेने दिलाच आहे. तुला काय वाटत आरक्षणाची अंमलबजावणी अजून पूर्णपणे झालेली आहे?
तुला काय वाटत की मागास जातींच्या लोकांनी पुढे जाऊच नये. कारण यांना आरक्षण मिळाले तर हे लोक आपल्या पुढे जातील ही भीती. अजूनही जातीयवाद शिल्लक आहे.
आरक्षणामूळे मागास जातींचे जीवनमान व गुणवत्ता वाढीस लागत आहे.
म्हणजे कोण अन्नटंचाई आणि माहागाई वाढवतय ते कळेल त्यांना. आयला जरा आम्ही बर खायला लागलो तर लगेच यांच्या पोटात दुखायला लागल. हे तुच लिहीले आहेस ना तसच मागास जातीतील व्यक्ती तुला म्हणाली तर.
आपला
कॉ.विकि

गणपा's picture

7 May 2008 - 4:18 pm | गणपा

स्पष्ट बोलतो, राग नसावा,
माझा विरोध जातीय / धार्मिक आरक्षणाला आहे. मी आर्थिक निकषतेवर आधारीत आरक्षणचा पुरस्कार करतोय. हा माझ मुद्दा तुम्ही सोईस्कररीत्या विसरलात की चुकुन डोळेझाक झाली?
मागास जातींचे लोक मग ते आर्थिक दृष्ट्या मागासलेले असतील तर त्यांना आपोआप आरक्षणचा लाभ मिळेलच ना.
तुला काय वाटत की मागास जातींच्या लोकांनी पुढे जाऊच नये.
मी अस कुठेही म्हटलेलं नाही, उगाच तुमचे विचार माझ्या नावावर खपवु नका.
कारण यांना आरक्षण मिळाले तर हे लोक आपल्या पुढे जातील ही भीती.
कर नाही त्याला डर कशाची. पुढे जायची ओढ आहे मग बुध्धीच्या जोरावर जाना.
तुम्हाला काय अपेक्षीत आहे? इतकी वर्ष सवर्णांनी अत्याचार केले आता आमची पाळी उट्ट काढायची.

आपला
गणप्या.

विकि's picture

8 May 2008 - 12:47 am | विकि

इतका जळफळाट बरा नव्हे. तू माझ्या दूसर्‍या प्रश्नाचे उत्तर नाही दिलेस जो प्रश्न तू स्वतच लिही ला होता. विसरलास वाटते. सवर्णांनी हजारो वर्ष मागास समाजावर अत्याचार केले आहेत आजही थोड्याफार प्रमाणात चालू आहेत. ते कशाला म्हणतील आता आमची पाळी म्हणून आता कुठे मूळ प्रवाहात यायची सूरूवात झाली असताना तुम्ही ओरडू लागले आहात.
त्याच काय असत आधीच तुमच्यासारख्यांच्या मनात हा खालच्या जातीचा असे भरलेले असते. आणी तो आपल्याहून पुढे गेला तर या विचाराने त्याची जात काढायला ही तुम्ही मागेपुढे पहात नाहीत.
इतकी वर्षे जे शिक्षणापासून वंचित होते त्यांना कसले घेऊन बसत आहेस आर्थिक आरक्षण. मागास जातीतील मूठभर लोकांकडे पैसा आला म्हणजे संपूर्ण समाज सुधारला अशी तुझी भलतीच भावना झालेली दिसतेय.
माकप नेहमीच आरक्षणाच्या बाजूने राहीलेला आहे आणि राहणार आहे.
आपला
कॉ.विकि

प्रभाकर पेठकर's picture

2 May 2008 - 6:49 pm | प्रभाकर पेठकर

काही टक्यांचे आरक्षण करण्यापेक्षा मागासवर्गियांसाठी १०० टक्के आरक्षित कॉलेजीस सरकारने सुरू करावीत. अशा कॉलेजचा प्रोफेसरवर्गही मागासवर्गीय आरक्षणातून शिकलेला असावा. त्याने आपल्या लोकांच्या उद्धारासाठी ज्ञानदानाचे कार्य करावे.

तथाकथीत, उच्च वर्णीयांची कॉलेजीस वेगळी असावीत तिथला प्रोफेसरवर्ग उच्चवर्णीय किंवा आरक्षणाचा फायदा न घेता (गुणवत्तेवर) शिकलेला मागासवर्गीय असावा.

इकडच्या विद्यार्थ्यांना तिकडे प्रवेश नाही आणि तिकडच्या विद्यार्थ्यांना इकडे प्रवेश नाही.

आर्थिक दृष्ट्या मागासांनी शिक्षणा नंतर अर्थार्जन करून शिक्षणाचा सर्व खर्च सरकारात जमा करावा.

जातीय आरक्षणातून शिक्षण घेतलेल्यांनी खेडोपाडी शाळा/कॉलेजांमधून (मागासवर्गीय) ज्ञानदान करावे. (कमीतकमी त्यांच्या शिक्षणाच्या कालावधी इतके.)

नो भांडण, नो तंटा, नो मारामार्‍या.

ब्रिटिश टिंग्या's picture

2 May 2008 - 8:52 pm | ब्रिटिश टिंग्या

सहमत!

रम्या's picture

7 May 2008 - 3:55 pm | रम्या

..सहमत!

नितिन थत्ते's picture

21 Jan 2009 - 2:51 pm | नितिन थत्ते

म्हणजे नोकरीसाठी अर्ज आले की 'त्यांना' इंटरव्ह्यूला बोलवायला नको. सहजपणे टाळता येईल. फार कशाला जाहिरातीतच अमुक कॉलेजातील उमेदवारांनी अर्ज करू नये असेही लिहिता येईल.

हासरी's picture

2 May 2008 - 8:13 pm | हासरी

आरक्षणावर सर्व मते मजेदार आहेत. स्वतहाचे इतकी शतके आरक्षण होते त्याच काय? आता का दुखतय. तुमचिच मात्रा आता तुम्च्आवर. जातिवाद बन्द स्वत्।हुन केला नाहीत, आता भोगा फळ. आणि अजुनहि मनातून 'त्यान्ना' आपले मान्लेले नाहीच.

प्रकाश घाटपांडे's picture

3 May 2008 - 2:42 pm | प्रकाश घाटपांडे


आरक्षणावर सर्व मते मजेदार आहेत. स्वतहाचे इतकी शतके आरक्षण होते त्याच काय? आता का दुखतय. तुमचिच मात्रा आता तुम्च्आवर. जातिवाद बन्द स्वत्।हुन केला नाहीत, आता भोगा फळ. आणि अजुनहि मनातून 'त्यान्ना' आपले मान्लेले नाहीच.


ही मात्र प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे. विवेकवादी चळवळीत तसे थेट म्हणता येत नाहि. कारण ते विवेकि नाही. सुड म्हणजे न्याय नव्हे; न्याय म्हणजे सूड नव्हे. पण खरा लढा मात्र आरक्षीत वि. अनारक्षीत असा नाहि. तो आरक्षणा अंतर्गत असलेल्या वेगवेगळ्या प्रवर्गातच आहे. खोटी जातप्रमाण पत्रे जी उघड्कीस येतात ती ' आरक्षणाचा लाभार्थी असलेला पण ज्याचा मलिदा अन्य संवर्गाने घेतल्याने वंचित झालेला' अशांमुळेच. खोटी जात प्रमाण पत्रे ही इतकी आहेत की सर्वांनाच बोगस ठरवणे म्हणजे शासन यंत्रणा अस्तित्वात आहे कि नाही असा प्रश्न उपस्थित करण्यासारखे होते. ही माहिती जातपडताळणी विभागातील आदिवासी समाजातल्या एका सुज्ञ आधिकार्‍याने मला खाजगीत दिली. पण अशा प्रकारांमुळे खर्‍या वंचितांना मात्र खेटे घालावे लागतात.
प्रकाश घाटपांडे

कुंदन's picture

7 May 2008 - 12:44 pm | कुंदन

खोटी जात प्रमाण पत्रे ही इतकी आहेत यासंबंधी.......

http://www.mumbaimirror.com/net/mmpaper.aspx?page=article&sectid=2&conte...

अनिकेत's picture

2 May 2008 - 9:47 pm | अनिकेत

हा चघळून चोथा झालेला विषय आत्ता सुरू करायचे प्रयोजन जर सर्वोच्च न्यायालयाचा नवीन आदेश असेल, तर मला सांगावेसे वाटते की सरकारी उच्च शिक्षणसंस्थात खुल्या-आऱक्षित वर्गातील मुलांतल्या गुणवत्तेत विशेष फरक नसतो.

माझा स्वतःचा अनुभव सांगतो : माझी ऍडमिशन झाली तेव्हा, माझा मित्र (जो ओबीसी आहे) त्याचीही ऍडमिशन झाली.
त्याला माझ्यापेक्षा कमी गुण असूनही, त्याला युनिव्हर्सिटी मध्ये जागा मिळाली, पण मला मिळू शकली नाही.

माझा अनेक ओबीसी मित्रांनी मागील वर्षी आरक्षण नसताना सरकारी उच्च शिक्षणसंस्थात प्रवेश मिळवले आहेत, कालच्या आयआयएम निकालातही खुल्या वर्गातून प्रवेश मिळवणारे अनेक आहेत. उच्च शिक्षणसंस्थातून बाहेर पडताना तुलना करून पहावी. जर आऱक्षणातून आलेले खुल्या वर्गातील मुलांपेक्षा चांगले गुण मिळवत असतील, तर आऱक्षण योग्य म्हणावे लागेल.

धर्मावर आधारीत आरक्षण, मग जाती , पोट-जाती, अस करता करता ओपन ग्रुपच्या मुलांना किती जागा उरतात ? वाइट वाटत, जी मुलं वर्षभर इतकी मेहनत करुन ८० ते ९०% मार्क मिळवतात, आणि मग ऍडमिशनच्या क्षणी ४०-५०% वाली मुल जाती - धर्मावर त्यांचा हक्क हिसकावून घेतात. बरीचशी ४०-५०%वाली मुलं दुसर्‍या वर्षी नापास होऊन स्वतःच वर्ष तर वाया घालवतातच पण हुशार विद्यार्थ्यांचही त्यांना ऍडमिशनपासुन वंचीत ठेवुन अन्याय करतात.

माझ्या बरोबर १२वी ला एक मुलगा होता, पुढे तो आरक्षणावर (एस्-टी) युडीसीटी ला गेला. पण तो २००५ चा युडीसीटी चा टॉपर होता.

जातीयवादी वक्तव्यः जर स्वतःला उच्च जातीचे समजता तर स्वतःच्या हिमतीवर मिळवा प्रवेश. आहेत की ५०% जागा.

(चित्तपावन ब्राम्हण)
अनिकेत.

कुंदन's picture

4 May 2008 - 2:31 pm | कुंदन

आरक्षणाच्या कुबड्या न वापरता मी शिक्षण घेतले. आणि आता परदेशात फ्री लान्सिंग सल्लागार म्हणून काम करीत आहे.
मात्र केवळ जातीने ओबीसी आहे म्हणून तथाकथीत उच्च जातीयांकडून अपमानेचेही बरेच प्रसंग आले.
तरीही टप्प्याने जातीयवादी आरक्षणाची टक्केवारी कमी करून आर्थिक निकषांवर आरक्षण लागू करावे या मताच मी आहे.....

(तथाकथीत उच्च जातीयांकडून अपमानेचेही बरेच प्रसंग पचवून तावून सुलाखून निघालेला)
....कुंदन

विकि's picture

4 May 2008 - 4:12 pm | विकि

तुम्ही आरक्षण नाही घेतलेत म्हणून आरक्षणाला कुबड्या संबोधू नका आज तुम्ही परदेशात असल्याकारणाने तुमच्यासारख्यांनी असे बोलणे अपेक्षीत आहे.
तुम्ही इतर मागास वर्गातील आहात असे लिहीले आहे आणि आता शैक्षणिक तसेच आर्थिक दृष्ट्या पुढारलेले आहात . भारतात न राहता या विषयावर बोलणे बरे नव्हे.
सामान्यतहा कनिष्ठ जाती पैसा मिळू लागल्यावर उच्च जातींचे अनुकरण करू लागतात. असा अनुभव आहे.
आपला
कॉ.विकि

कुंदन's picture

4 May 2008 - 6:24 pm | कुंदन

तुम्ही इतर मागास वर्गातील आहात असे लिहीले आहे आणि आता शैक्षणिक तसेच आर्थिक दृष्ट्या पुढारलेले आहात .

हे आर्थिक दृष्ट्या पुढारलेपण निव्वळ मेहेनत आणि गुणवत्तेच्या जोरावर मिळवलेले आहे. अगदी पालकांचीदेखील मदत न घेता.

सामान्यतहा कनिष्ठ जाती पैसा मिळू लागल्यावर............
आणि योग्य मार्गाने जास्त पैसा कमावून भरपूर कर भरण्यात मला तरी अभिमान वाटतो.

अवांतर : याच पैशातून मागच्या वर्षी एका गरजू होतकरू विद्यार्थ्याची इंजिनियरिंग ची फी भरायला मदत केलेली आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

5 May 2008 - 2:28 pm | प्रकाश घाटपांडे


याच पैशातून मागच्या वर्षी एका गरजू होतकरू विद्यार्थ्याची इंजिनियरिंग ची फी भरायला मदत केलेली आहे.


अशा प्रकारची सामाजिक जाणीव जर वाढत गेली तर नक्कीच सामाजिक दरी अरुंद व्हायला मदत होईल. एक मदतीचा हात एखाद्याचे आयुष्य उजळून टाकू शकतो. तो दुसर्‍याला मदत करेल; दुसरा तिसर्‍याला; तिसरा चौथ्याला. अशी ही साखळी वाढली तर किती प्रश्न सुटतील!
प्रकाश घाटपांडे

प्रकाश घाटपांडे's picture

4 May 2008 - 9:17 pm | प्रकाश घाटपांडे

कुंदनचे तावून सुलाखून निघणे हे एक प्रकारचे अग्निदिव्यच असते. गुणवत्तेत कमी पडलो तर जातीचा आधार घेतला असा आक्षेप येण्याची भीती. त्यामुळे सतत प्रयत्नशील असावे लागते. मागे एकदा वृत्त पत्रात बोर्डात ( दहावी कि बारावी हे आठवत नाही) मागासवर्गीयात कु अमुक अमुक ही पहिली अशी बातमी आली. त्यानंतर तिची प्रतिक्रिया आली ती अशी की ती इतर चारचौघींसारखीच शिकली. राहणीमान आचार विचार हे पण मध्यमवर्गासारखेच. केवळ जन्माधिष्ठीत असलेली जात या निकषावरील कागदपत्रांमुळे तिला मागासवर्गीय हा शिक्का बसला होता. तिने कुठली ही सवलत नाकारली होती. तिला या कुबड्या नको होत्या. तिच्या मते मी जर इतरांसारखीच आहे तर उगीचच मी मागासवर्गीय म्हणून कशाला मिरवु ? त्याऐवजी या सवलती खरोखर मागासवर्गीय असलेल्या घटकांपर्यंत पोचल्या पाहिजेत.
आरक्षणाचा लाभ मिळुन वरती आलेल्या परंतु विवेकवादी विचार करणार्‍या लोकांना विद्रोह केला नाही म्हणून भटाळला अशी दुषणे कायम मिळत असतात. कारण विद्रोह जागृत ठेवणे हे ज्यांच्या फायद्याच असत वा राजनीतीचा भाग असतो त्यांना हे लोक अडथळा वाटतात. शरणकुमार लिंबाळे यांचा "दलित ब्राह्मण" हा कथा संग्रह वाचनीय आहे.
प्रकाश घाटपांडे

कुंदन's picture

5 May 2008 - 11:58 am | कुंदन

धन्यवाद घाटपांडे काका....

कुंदनचे तावून सुलाखून निघणे हे एक प्रकारचे अग्निदिव्यच असते.
एकदा त्या अग्निदिव्यातून जायची सवय लागली की त्याचेही व्यसन लागल्यासारखे होते.

(गुणवत्तेत कमी पडू नये म्हणून सतत प्रयत्नशील असणारा) ..
कुंदन

धमाल मुलगा's picture

5 May 2008 - 12:00 pm | धमाल मुलगा

कुंदनचे तावून सुलाखून निघणे हे एक प्रकारचे अग्निदिव्यच असते.

एकदा त्या अग्निदिव्यातून जायची सवय लागली की त्याचेही व्यसन लागल्यासारखे होते.

सुंदर!!! आवडलं...

मन's picture

2 May 2008 - 9:49 pm | मन

आरक्षणावर आपली भूमिका बनविणे अगदि सोप्पे आहे.
आरक्षण साधारण पणे सापेक्ष मुद्दा आहे.
आधी बघायचं की आपण "कुठल्या " बाजुचे आहोत.
आणि मग दुसर्‍या बाजुला बिंदास""चुक " म्हणुन मोकळे.

शेवटी ज्याचं जळत त्यालाच कळत.

बाकीचे लोक काठावरुन उप्देश सांगायला असतातच....

मित्र हो

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

आरक्षण!
अतिशय ज्वलंत विषय!!
तसं आरक्षण सर्वच ठिकाणी पाहावयास मिळतं.
पण माझा रोख(?) आहे, तो शैक्षणिक आरक्षणावर.....

माझा स्वतःचा अनुभव सांगतो : माझी ऍडमिशन झाली तेव्हा, माझी मैत्रिण (जी महिला आहे) तिचीही ऍडमिशन झाली.
तिला माझ्यापेक्षा कमी गुण असूनही, त्याला युनिव्हर्सिटी मध्ये जागा मिळाली, पण मला मिळू शकली नाही.
माझा मित्रावर राग अजिबात नाही. अजूनही आम्ही दोघे चांगले मित्र आहोत.
पण, हे कितपत योग्य आहे?

शैक्षणिक बाबतीत, प्रवेशाच्या वेळी, गुण हाच निकष मानला जावा असं मला वाटतं.
आरक्षण असायला काहीच हरकत नाही. पण त्याला काहीतरी मर्यादा असावी.

आरक्षण हे मुख्य शिक्षण पूर्ण करण्यासाठी असावं. उच्च शिक्षण घेताना फक्त गुणांचाच विचार व्हावा.
नाहीतर मग, आरक्षण देण्यामागचा मूळ हेतू बाजूलाच राहील आणि अजिबात गुणवत्ता नसलेले लोक
जागा बळकावून बसतील.

कदाचित माझा सूर थोडा वरच्या पट्टीतला असेल, पण .......
मला नाही वाटत माझा मुद्दा चुकीचा आहे.
यावर इतरांची मते आणि विचार जाणून घ्यायला आवडेल.

जाति भेद संपवाल ठीक आहे.
लिंग भेद संपवता येइल का?
महिला आरक्षणाचे काय?

आपलाच गरिब बिच्चारा अनारक्शित दोन खोल्यांच्या घरात जन्मभर
राहुनही ईबीसी न मिळालेला,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

ब्रिटिश टिंग्या's picture

3 May 2008 - 2:37 am | ब्रिटिश टिंग्या

माझी ऍडमिशन झाली तेव्हा, माझी मैत्रिण (जी महिला आहे) तिचीही ऍडमिशन झाली.
अच्छा! आपली मैत्रीण "महिला" आहे तर.....:))
कृ.ह.घ्या.

टिंग्या ;)

अजिंक्य's picture

3 May 2008 - 6:41 pm | अजिंक्य

मनोबा,
कॉपीच करायची होती, तर जरातरी नीट(!) करायची होतीत!

माझी ऍडमिशन झाली तेव्हा, माझी मैत्रिण (जी महिला आहे)..............
माझा मित्रावर राग अजिबात नाही. अजूनही आम्ही दोघे चांगले मित्र आहोत.

नक्की भानगड काय आहे ते कळू शकेल का?
म्हणजे मैत्रीण की मित्र?

पुढच्या वेळी जेव्हा कॉपी करण्याचा प्रयत्न कराल ना, तेव्हा हा सल्ला ध्यानी असू द्या, म्हणजे झाले!

अनिकेत म्हणतोय त्याच्याशी मी पुर्णपणे सहमत आहे.

आपण जशी आरक्षण मिळून गैरफायदा घेणारी ...उदाहरणे दिलित तशीच माझ्या पाहण्यात
आरक्षण मिळाल्याने भले झालेलि अशी उदाहरणे आहेत.
माझ्याच शाळेतला एक विद्यार्थी ,तो गचाळ अशा झोपडपट्टित रहात होता.बाप मजुर होता,
आई ४ घरी धुणे भांडि करायचि.आता ह्याचि जात तर विचारुच नका.(चितपावन/देशस्थ वगैरे तर अजिबातच नव्हता)
हा मुलगा माझ्याच वर्गात होता.तोच सकाळि माझ्या घरी पेपर व दुध टाकायचा.
आम्हाला असलेल्या खाजगी शिकवण्या,पुस्तके,पी.जोग क्लासेस वगैरे सुविधा त्याला तर मुळिच नव्हत्या.
तरिहि ह्या मुलाने अपार कष्ट काढले.
दहावि -बारावीत हा बोर्डात वगैरे आला नाहि,पण उत्तम गुण मिळवून पास झाला.
आरक्षण असल्यानेच त्याला मेडिकल ला प्रवेश मिळाला. आज तो एक प्रख्यात डोक्टर आहे.
आणि माझ्याच बरोबरच्या बाकिच्या उच्चवर्णीय मुलांनि त्याच्या एवढे देखील मार्कस न मिळवता फक्त बापाकडे पैसा आहे
म्हणून पे सीट वर अभियांत्रिकी आणि मेडिकल ला प्रवेश घेतला होता.
आता ह्या उदाहरणात पहिल्याला आरक्षण का असु नये?

आरक्षण असायला हवे का नको असे प्रश्न आम्हाला तरी पडत नाहित.
सामजिक असमतोल दुर करण्यासाठि आरक्षण असावेच.
विरोध फक्त आरक्षणाच्या राजकारणाला असावा.

अबब
(दे.ॠ.ब्रा.)

भडकमकर मास्तर's picture

5 May 2008 - 3:09 am | भडकमकर मास्तर

सामजिक असमतोल दुर करण्यासाठि आरक्षण असावेच.
१.योग्य...सहमत.
२. तुम्ही दिलेल्या उदाहरणासारखेच एक उदाहरण मी अनुभवले आहे.
माझ्याच हॉस्टेलमध्ये राहणारा ( वंचित वर्गातला गरीब) बारावीत माझ्याबरोबर शिकलेला , बाकीचे बरेचसे सारखेच... कमी मार्क असूनही तो बी जे मधून एम बी बी एस झाला... आम्हाला त्याबद्दल आनंदच वाटला, आणि वाटत राहील.... मला खुल्या वर्गात आवश्यक असणार्‍या गुणांपेक्षा कमी गुण मिळाले, ही त्याची चूक मानणे आणि त्याच्याबद्दल मनात अढी बाळगणे मला पटत नाही...( असं मानणारे काही मित्र माझ्यासमोर तसे बोलू लागले की मी लगेच त्यांना टोकत असे आणि म्हणत असे, " मग तुला ग्रुपला ९७ % पाडायला कोणी मनाई केली होती की काय?")
मला ऍडमिशन मिळाली नाही कारण मला मार्क्स कमी मिळाले आणि माझी मेहनत कमी पडली , हे मान्य नसणारे लोक कारणे शोधत राहतात, अशा विद्यार्थ्यांचे पालकही असे मानण्यात पाल्यांना प्रोत्साहन देत राहतात.... हे सर्वस्वी चूक आहे...

नितिन थत्ते's picture

21 Jan 2009 - 3:23 pm | नितिन थत्ते

आरक्षण हवेच.

आजही मनातून जात गेलेली नाहीच. जेथे रिक्रूटमेंट नेटवर्कींग मधून होते तेथे तर जात पाहूनच नेमणूका होतात.
माझ्या माहितीत एकजण तर ऑफीसमध्ये प्यूनसुद्धा शक्यतो ब्राह्मण ठेवतो.

मी इंजिनिअर होताना गेट च्या परीक्षेला बसलो होतो. त्यावेळी मला ७५ व माझ्या मित्राला ५० स्कोअर आला होता. माझ्या मित्राला मागास वर्गीय असल्याने एम टेक ला प्रवेश मिळाला. तेव्हा मी ही काही काळ रागावलो होतो. नंतर आरक्षणाच्या प्रश्नाचा अधिकाधिक विचार करताना मला साक्षात्कार झला की जरी आरक्षण आजिबातच नसते तरी ७६ स्कोअर वर मला प्रवेश मिळालाच नसता. म्हणजे आरक्षणामुळे मला प्रवेश मिळाला नाही ही माझी मूळ समजूतच चुकिची होती.
मला ऍडमिशन मिळाली नाही कारण मला मार्क्स कमी मिळाले आणि माझी मेहनत कमी पडली , हे मान्य नसणारे लोक कारणे शोधत राहतात, अशा विद्यार्थ्यांचे पालकही असे मानण्यात पाल्यांना प्रोत्साहन देत राहतात....

एकदम मान्य.

मन's picture

3 May 2008 - 2:17 am | मन

महिला आरक्षणाचे काय साहेब?
का ईथे तो विषयच नकोय?

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

प्रकाश घाटपांडे's picture

3 May 2008 - 10:19 am | प्रकाश घाटपांडे

आरक्षणाचे तत्व सामाजिक न्यायावर आधारले आहे. संमिश्र समाजात सब घोडे बारा टक्के ( हा वाक्यप्रचार कसा आला ते मात्र माहित नाही) हा न्याय होउ शकत नाही. पळण्याच्या स्पर्धेत सामान्य व खेळाडू यांना समान् संधी , समान नियम लाउन जो पहिला येईल तो सिलेक्ट असे केले तर खेळाडूच पहिला येणार. दोहोंच्या स्टार्टिंग पॉईंट मध्ये फरक केला व बाकी नियम सारखे ठेवले तर न्याय् मिळेल्. तो स्टार्टींग पॉईंट कुठला हाच तर कळीचा मुद्दा आहे. बरेचसे मतभेद हे अंमलबजावणी बाबत आहेत. तत्वाबद्द्ल नाहीत.
जातीव्यवस्था निर्मूलनाच्या दिशेने जाताना या डॉ.यशवंत सुमंत यांच्या २८ एप्रिल २००७ च्या अंकात इथे पूर्वार्ध ९ नं पानावर वाचा व उत्तरार्ध १२ मे २००७ च्या अंकात इथे पान नं ५ वर वाचा. १२ मेच्याच अंकात हरी नरके यांचा "ओबीसी खतरे में" हा लेख पान नं ११ वर वाचा
http://mr.upakram.org/node/1208 येथे या विषयावरील चर्चा पहा.
http://ajachasudharak.blogspot.com/ येथे जात आरक्षण विशेषांकाबाबत माहिती .

प्रकाश घाटपांडे

छोटा डॉन's picture

3 May 2008 - 10:50 am | छोटा डॉन

एक तर हा मुद्दा खुप वेळा चघळला गेला आहे व त्यातून काहीही निष्पन झालेले नाही, तरीपण पुन्हा आपण ही चर्चा सुरु केली आहे त्यामाग आपली तळमळ दिसते. असो.
एकंदर चर्चेचा सुर अस्सा आहे की आरक्षण हे जातीच्या आधारे नसावे पण ते आर्थीक दर्जाच्या आधार दिले जावे ...
जेव्हा आरक्षणाची सुरवात झाली तेव्हा ते जातीच्या आधारे देणे योग्य होते कारण त्या लोकांच्या पिढ्याच्या पिढ्या शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आल्या होत्या व देश स्वतंत्र झाल्यावर त्यांना अचानक ह्या "करियर" च्या जिवघेण्या स्पेर्धेत उतरावे लागले. पिढ्यानं पिढ्या शिक्षणावाचून पंगू असणार्‍या ह्या समाजाला हे आव्हान पेलणे अशक्य होते म्हणून आरक्षणाची तरतूद झाली व ती योग्यच होती. काहे समजूतदार लोकांनी ह्याचा खरच फायदा घेऊन स्वताचा व देशाचा उद्धार करण्याचा प्रयत्न केला तर काहींनी ही आपल्या "बापजाद्यांची देणगी" मानून स्वताला "सरकारचे पाहूणे"समजण्यास सुरवात केली.
मग जातीचे राजकारण करणारे पक्ष आले, मताची पोळी भाजण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा "जतीयवादाची होळी" पेटवली व स्वताची पोळी भाजून घेतलीव सत्तेचा मलिदा चखला.
येवढे सगळे हो सुद्धा ज्यांच्यासाठी हे आरक्षण दिले गेले त्या खेड्यातल्या, तळागाळातल्या जनतेकडे कुनीच लक्ष दिले नाही. त्यांना कुठल्याच सुवीधा मिळाल्या नाहीत, त्यांचा वापर फक्त मोठ्यामोठ्या सभा व मोर्चे काढण्यासाठी झाला. त्यांचा शिक्षण, विकास हा मागासलेलाच राहीला व हे सर्व त्यांना आरक्षण असताना. आता तर आरक्षण रद्द करा अशी मागणी पुढे येऊ लागली आहे मग त्यांनी करायचे काय ? त्यांना काही संधी नाहीच का ? त्यांच्यात आजच्या पुढरलेल्या समाजाबरोबर स्पर्धा करण्याची ताकद आहे का याचा विचार कुणी केला आहे का ? का पुन्हा एकदा त्यांनी दारिद्र्याच्या अंधःकारात खितपत पडायचे ? त्यांचा ह्या असंतोषाचा स्पोट होऊन एक दिवस देशात जातीय दंगली झाल्या तर जबाबदार कोण ? त्यांना असे दूर सारून आपण आपला देह्स पुढे न्हेऊ शकू काय ? मिशन २०-०२ मध्ये त्यांचा काहीच रोल नाही काय ? ह्या आणि अशा अनेक प्रश्नांचा विचार कुनी केला आहे काय ?

आता पुढचा मुद्दा असा की आरक्षण हे "आर्थीक निकषावर" दिले जावे. कोण ठरवणार हे निकष ?
आजच्या घडीला जेथे तलाठ्याला / तहसीलदाराला ५० रुपये दिले की १२००० रुपये वार्षीक उत्पन्न असल्याचा दाखला मिळतो तेथे आपण कसे ठरवणार की कोन आर्थीकदॄष्ट्या मागास आणि प्रगत ? एक वेळ जतीचा दाखला मिळणे अवघड पण हा "उत्पनाचा दाखला" म्हणजे सर्व झूट. बर हे सर्व पडताळून पाहणारी "यंत्रणा " कशी असणार ? तिच्या प्रामाणिकपणाची खात्री कोण देणार ?
का या सर्व प्रश्नांचा विचार न करताच आपण अशा आरक्षणाचे पाऊल उचलणार ?

जनरली अशा प्रश्नांचे उत्तर एवढे लगेच मिळत नाही. त्यासाठी गरज आहे त्या समाजाला विश्वासात घेऊन चर्चा करून काहीतरी तोडग काढण्याची. ज्यांनी आरक्षणाचा गैरफायदा घेतला अशी १०० उदाहरणे दाखवता येतील पण त्यासाठी आपण एका "लायक व्यक्तीवर अन्याय " करणार का ? आपला कायदाच सांगतो की " १०० दोषी सुटले तरी चालतील पण एका निर्दोषाला शिक्षा होउ नये "

देशस्थ ॠग्वेदी ब्राम्हण छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

प्रकाश घाटपांडे's picture

3 May 2008 - 1:30 pm | प्रकाश घाटपांडे

आरक्षण हे प्रवेश, नोकरीत नियुक्ती, बढती या वेळी प्रामुख्याने महत्वाचा रोल करते. येथील चर्चेत सुद्धा प्रवेश हा घटक कळीचा ठरलेला दिसतो. या बाबत आरक्षणाला न्याय्य पर्याय हा राजीव साने यांचा ६/६/२००६ च्या लोकसत्तातील लेख वाचण्यासारखा आहे.
आरक्षणाच्या राजकारणातूनच मला पोलिस बिनतारी विभागातून अकाली स्वेच्छा निवृत्ती घ्यावीशी वाटली. तरी देखील मी हा विद्रोह क्षम्य मानतो. विवेकवादी चळवळीतील टी बी खिलारे हे माझे मित्र आजच्या सुधारक च्या 'जात आरक्षण' विशेषांकाचे अतिथि संपादक आहेत.

प्रकाश घाटपांडे

डॉ.प्रसाद दाढे's picture

3 May 2008 - 2:34 pm | डॉ.प्रसाद दाढे

विरोध फक्त आरक्षणाच्या राजकारणाला असावा.
सहमत

मन's picture

3 May 2008 - 4:42 pm | मन

इथं काहिच (थेट)न बोलता बरीच कमेंट केलिए.
मानलं बुवा ह्यांना.

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

हे जे चर्चेचं गुर्‍हाळ चालू आहे,
त्यातून मलातरी असंच निष्पन्न होतंय की -
१) आरक्षणाला विरोध नसावा, तर त्यामुळे होणार्‍या राजकारणाला असावा.
२) आरक्षण हे फक्त शैक्षणिकच नव्हे, तर अनेक प्रकारचे असू शकते.
त्या सर्वच बाबतीत पहिली अट लागू होते.
३) चर्चा केल्यामुळे आपले विचार मांडता येतात, विचारांची देवाणघेवाण करता येते
आणि त्यात सुधारणा देखील करता येते. एकंदरीत फायदाच होतो.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे
मनापासून विचार करणारे आणि कॉपीबहाद्दर यांचं "क्लासिफिकेशन" करता येतं!

आणखी काही फायदे "आठवल्यास" जरूर सांगावेत.
त्यांचं स्वागतच होईल.

विकि's picture

4 May 2008 - 1:46 pm | विकि

माझा स्वतःचा अनुभव सांगतो : माझी ऍडमिशन झाली तेव्हा, माझा मित्र (जो ओबीसी आहे) त्याचीही ऍडमिशन झाली.
त्याला माझ्यापेक्षा कमी गुण असूनही, त्याला युनिव्हर्सिटी मध्ये जागा मिळाली, पण मला मिळू शकली नाही.
माझा मित्रावर राग अजिबात नाही. अजूनही आम्ही दोघे चांगले मित्र आहोत.
पण, हे कितपत योग्य आहे?

तुला माहीत होते की खुल्या प्रवर्गातून प्रवेश मिळविण्यासाठी जास्त टक्के मिळवावे लागतात. ते तू मिळवायला हवे होते. त्यासाठी आरक्षणावर घसरायची गरज नव्हती. त्यासाठी स्वत:च्या मित्राला कशाला दूषण देतोस. मित्र ही म्हणवतोस आणि त्याची जात ही काढतोस. याला मैत्री म्हणत नाही कळले का. उगाच मैत्री चे नाव बदनाम करू नकोस.
आरक्षण हे मागासलेल्या समाज घटकांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी केले गेलेले आहे . तुमच्या सारख्या लोकांना आरक्षण घेऊन विकास झालेली मूठभर लोकच दिसतात. अजूनही समाजात मागास प्रवर्गातील हातावर पोट घेऊन जगणारा कष्टकरी असा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे की ज्यांना आरक्षण असल्याशिवाय शिक्षण घेणे परवडणारच नाही . त्यांच काय करायचे . आणि शिक्षणात आरक्षण असून हल्ली फायदा काय आहे . त्या त्या जातीजमातीत स्पर्धा वाढू लागली आहे आणि शिक्षण घेतल्यानंतर फायदा काय त्या प्रमाणात सरकारी नोकर्‍या निर्माण होत आहेत का?
आपला
कॉ.विकि

विकि's picture

4 May 2008 - 1:47 pm | विकि

तुला माहीत होते की खुल्या प्रवर्गातून प्रवेश मिळविण्यासाठी जास्त टक्के मिळवावे लागतात. ते तू मिळवायला हवे होते. त्यासाठी आरक्षणावर घसरायची गरज नव्हती. त्यासाठी स्वत:च्या मित्राला कशाला दूषण देतोस. मित्र ही म्हणवतोस आणि त्याची जात ही काढतोस. याला मैत्री म्हणत नाही कळले का. उगाच मैत्री चे नाव बदनाम करू नकोस.
आरक्षण हे मागासलेल्या समाज घटकांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी केले गेलेले आहे . तुमच्या सारख्या लोकांना आरक्षण घेऊन विकास झालेली मूठभर लोकच दिसतात. अजूनही समाजात मागास प्रवर्गातील हातावर पोट घेऊन जगणारा कष्टकरी असा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे की ज्यांना आरक्षण असल्याशिवाय शिक्षण घेणे परवडणारच नाही . त्यांच काय करायचे . आणि शिक्षणात आरक्षण असून हल्ली फायदा काय आहे . त्या त्या जातीजमातीत स्पर्धा वाढू लागली आहे आणि शिक्षण घेतल्यानंतर फायदा काय त्या प्रमाणात सरकारी नोकर्‍या निर्माण होत आहेत का?
आपला
कॉ.विकि

विकि's picture

4 May 2008 - 11:48 pm | विकि

आजकाल लोक इतर मागास वर्गीयांवर पण घसरायला लागली आहेत.आजपर्यंत अ.जाती आणि अ.जमातीवर घसरत होते आता ओ.बी.सी समाजावर .अरे वा आश्चर्य आहे.
आपला
कॉ.विकि

चेतन's picture

5 May 2008 - 11:06 am | चेतन

आश्चर्य
"तुला माहीत होते की खुल्या प्रवर्गातून प्रवेश मिळविण्यासाठी जास्त टक्के मिळवावे लागतात. ते तू मिळवायला हवे होत त्यासाठी आरक्षणावर घसरायची गरज नव्हती"

अरे वा...! काय पण विचार आहेत! हे म्हणजे आरक्षणाचा बचाव करण्यासठी काही पणं कारणं द्यायची

"अजूनही समाजात मागास प्रवर्गातील हातावर पोट घेऊन जगणारा कष्टकरी असा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे की ज्यांना आरक्षण असल्याशिवाय शिक्षण घेणे परवडणारच नाही "

त्यानां खरचं आरक्षणं मिळतं का....? कि जे श्रीमंत आहेत त्यानाचं हे मिळतं सवलतीला विरोध कोणाचाही नाही. गुणवत्तेला डावलण्याला विरोध आहे.

माझे असेहि काही मित्र आहेत ज्यांची परिस्थिती हातावर पोट घेऊन जगणार्यांपेक्षा वेगळी नाही (पण त्यांना आरक्षण नाही....?)

पन्नास वर्षांनंतरही मागास प्रवर्गातील हातावर पोट घेऊन जगणारा कष्टकरी असा वर्ग मोठ्या प्रमाणावर का आहे याचा विचार केलाय का...?

"जिनके घर शिशे के होते है वो दुसरो के घरपर पथ्थर फेका नही करते"

चेतन

विकि's picture

5 May 2008 - 12:10 pm | विकि

चेतन राव काय लिहीले आहेस ते तुला कळले का? तुझ्या मूठभर मित्रांसाठी आरक्षण काढून टाकायचे का? आणि गुणवत्ता ठरवणारे तुम्ही कोण ? म्हणजे तुला अस म्हणायच का की मागास जातीतील लोकांना गुणवत्ताच नसते.
आपला
कॉ.विकि

धमाल मुलगा's picture

5 May 2008 - 12:44 pm | धमाल मुलगा

प्रश्न आरक्षण रद्द करण्याचा नाहीये, तर तो जातीयवादावर आधारीत नसावा असा असावा.

म्हणजे तुला अस म्हणायच का की मागास जातीतील लोकांना गुणवत्ताच नसते.

हा सूर मलातरी कुठं दिसला नाही. फक्त सूर असा आहे, की ज्यांना गुणवत्ता नाही, त्यांना केवळ जातीआधारे आरक्षण मिळाल्याने एकूणात भंपाळं वाजल्याचं दिसतं...

एखादा (की बहुतांश? हा विषय आणि आकडेवारी संशोधनाचा विषय आहे हे नक्की!) ५०-५५ टक्केवाला आरक्षणाच्या आधारे प्रवेश मिळवतो..वर्षांनुवर्षे गोते खातो, बी.ई.च्या शेवटच्या सेम ला ८-८ केट्या घेऊन शेवटच्या सेमचेही विषय सोडवायला बसतो...एक ना धड भाराभार चिंध्या होऊन बसतात. आयुष्यातली महत्वाची वर्षं वाया जातात ते वेगळंच.
आता अशा क्वालीटी नॉर्म्सला सोडून असलेल्या प्रॉडक्ट (प्रोफेशनल कोर्सचा हा विद्यार्थी) कडून परफेक्ट फंक्शनॅलिटीची अपेक्षा करणंच चूकीचं ठरतं

मग होतं काय? बांधलेले रस्ते उडखतात, पूल पडतात, बिल्डिंग्ज कोसळतात...
इंटरव्ह्यू क्लिअर होताना त्रास होतो...झाला तरी शैक्षणिक मार्गक्रमणात बरेच उलटेसुलटे वळसे घेतले गेल्याने कामाचा दर्जा 'ऍट पार' देणं जमत नाही.... (ही वस्तुस्थिती आहे..ज्यांना पटत नसेल त्यांनी कार्पोरेट जगाचा थोडासा अभ्यास करावा)

असे आरक्षण घेऊन पडत-धडपडत शिक्षण पुर्ण केलेल्या बेरोजगारांचा जथ्था होतो...नोकरी न मिळाल्याने शिक्षणाचाही उपयोग नाही...शिक्षणात बराच काळ गेल्याने वाढत चाललेलं वय, त्याबरोबर येणारं नैराश्य ह्यांचा फायदा गर्दीची मनोवृत्ती ओळखणारा एखादा उपटसुंभ घेतो...आणि मग संप-बंद / मोर्चे, दगडफेक इ.इ. प्रकारांनी नैराश्य बाहेर काढण्याचा यत्न सुरु होतो.
ह्याने नुकसान सगळ्यांचेच होते.


अस म्हणायच का की मागास जातीतील लोकांना गुणवत्ताच नसते.

नक्कीच असते. त्याबद्दल वाद नसावा.
पण मग आरक्षण हे गुणवत्तेला धरुन का नसावे? म्हणजे एकाच सीटसाठी २ जणांचे अर्ज आले, त्यातला एक सो-कॉल्ड उच्चवर्णिय आणि दुसरा मागास असेल तर ज्याला जास्त गुण आहेत त्यालाच का प्राधान्य मिळू नये?...आणि आरक्षण यावं ते जर दोघांचे गुण समान असतील (फारतर आपण सापेक्षतेसाठी ५-१०% कमी-जास्त म्हणू) तर ते मागासाच्या फायद्याचे. त्याने गुणवत्ताही टिकवली जाईल..आणि मागासांवर अन्यायही होणार नाही. मागास जातीतील लोकांनाही गुणवत्ता असतेच. मग ही आरक्षणाची (कमी गुणावर प्रवेश) भीक नाही का वाटत त्या गुणवंतांना?

आणि महत्वाची गोष्ट अशी, की मुळात किती मागासवर्गिय मुलभूत शिक्षणाची पायरी ओलांडून पुढे येतात? ज्यांना हे जमत नाही, आरक्षण खरे तर त्यांच्यासाठी आहे...आधीच पोळीवर तूप ओढून गबर झालेल्या आणि भरल्या पोटी उच्चवर्णियांविरोधात गळे काढणार्‍यांसाठी नव्हे! ज्यांना खरोखरच चाड आहे, त्यांनी आधी बहुतांश मागासवर्गिय समाज जो मुलभूत शिक्षणापासूनच वंचित आहे त्यांना मूळ प्रवाहात आणावं...मग उच्च शिक्षणाच्या गोष्टी कराव्यात...तेव्हाच खरं काय ते समोर येइल.

सध्या आरक्षण हे प्रकरण केवळ तुंबड्या भरण्याचं साधन म्हणून वापरलं जातं....राजकारण्यांकडूनही आणि बरेचदा (बरेच सन्माननीय अपवाद वगळता) त्याच्या लाभार्थींकडून केवळ स्वार्थासाठी वापरलं जातं.

बाकी, श्री.पेठकर ह्यांच्या बर्‍याच मतांशी सहमत!

५०-५५ टक्केवाला आरक्षणाच्या आधारे प्रवेश मिळवतो..वर्षांनुवर्षे गोते खातो,
बांधलेले रस्ते उडखतात, पूल पडतात, बिल्डिंग्ज कोसळतात...

माझा आक्षेप पूर्णतः वरच्या मुद्द्यावर आहे.
रस्ते उखडणे, पूल कोसळणे, बिल्डिंग कोसळणे हे काय कमी टक्के मिळालेल्या आणि आरक्षणातून प्रवेश घेतलेल्याचा परिणाम आहे?
रस्ते उखडणे, पूल कोसळणे, बिल्डिंग कोसळणे - यामागे खूप वेगळे राजकारण असते.
कितीतरी खुल्या वर्गातले सुद्धा राजकारण करून नोकर्‍या मिळवतात.
"रस्ते उखडणे, पूल कोसळणे, बिल्डिंग कोसळणे " यात आरक्षण येतेच कुठे? हा तर पूर्णपणे "राजकारणाचा" विषय आहे.
अरे (खुल्या / आरक्षित) ५०% पडलेल्यांना तुम्ही अशा जबाबदारीच्या पदाची नोकरी देताच कशी आणि का?
आणि ९९% किंवा १००% मिळवलेला (खुल्या / आरक्षित) जर लाचखोर निघाला तर ही परिस्थिती उद्भवू शकत नाही काय?

इंटरव्ह्यू क्लिअर होताना त्रास होतो...झाला तरी शैक्षणिक मार्गक्रमणात बरेच उलटेसुलटे वळसे घेतले गेल्याने कामाचा दर्जा 'ऍट पार' देणं जमत नाही

ही तर कोणत्याही कमी मार्क पडलेल्याची स्थिती असेल. आरक्षण घेणार्‍यांचा या मुद्द्याशी प्रत्यक्ष संबंध काय? आरक्षण घेणार्‍या सगळ्यांनाच ५५% पडतात? आणि खुल्या वर्गातील सगळ्यांना ९०% च्या वरच मार्क असतात?
माझ्यामते नाही. त्यातले काही टॉपरसुद्धा असतात. आणि बरेचसे ऍव्हरेज मार्क मिळविणारे आणि काही ५०% वाले आणि काही नापास - खुल्या वर्गात पण हीच परिस्थिती असते.

त्यामुळे चांगल्या नोकरीचा आणि चांगल्या कामगिरीचा निकष गुणवत्तेवर लावावा.
नोकरीतल्या राजकारणाचा संबंध आरक्षणाशी लावू नये.

मनस्वीच्या मतांशी सहमत .

उदाहरण १) खुल्या वर्गातील माझा एक मित्र , अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करायला याने तब्बल ८ वर्षे घेतली. साला याला कॅप जेमिनी सारख्या कंपनीत नोकरी कशी मिळाली हा एक गहन प्रश्ण आहे.

उदाहरण २) माझी पहिली नोकरी,
स्थळ - मुंबई , फोर्टातील एक राष्ट्रीयीकृत बँक.
माझी जबाबदारी : बँकेच्या संगणक प्रणालीची जबाबदारी
बँकेतर्फे ३ जण आमच्या बरोबर दैनंदीन कामकाज करणे जसे की डाटा बॅक अप घेणे आणि तत्सम कामे करणे ( 1st level support ) यासाठी होते. त्यातील एक जण , पारशी : कारण परशांची बँक , दुसरा तथाकथित खुल्या वर्गातील आणि तिसरा आरक्षणातून आलेला. पण कामचुकार पणाच्या बाबतीत म्हणाल तर एकाला झाकावे आणि दुसर्‍याला काढावे , दुसर्‍याला झाकावे आणि तिसर्‍याला काढावे.
थोडक्यात कामचुकार पणाच्या बाबतीत त्याची परस्परांशी स्पर्धाच होती म्हणाना ...
माझ्यामते अशा लोकांना ना धर्म असतो , ना जात असते , ना पंथ. त्यांची जात एकच ती म्हणजे हरामखोर....

रस्ते उखडणे, पूल कोसळणे, बिल्डिंग कोसळणे - यामागे खूप वेगळे राजकारण , भ्रष्टाचार असतो. इथेही अशा लोकांना ना धर्म असतो , ना जात असते , ना पंथ. त्यांची जात एकच ती म्हणजे हरामखोर....

( माझा धर्म : प्रामाणिकपणा )
कुंदन

धमाल मुलगा's picture

7 May 2008 - 3:42 pm | धमाल मुलगा

आपल्या एकूणातच असलेल्या वैचारिक प्रवाहाशी मी सहमत आहे. पण तरीही :

आता अशा क्वालीटी नॉर्म्सला सोडून असलेल्या प्रॉडक्ट (प्रोफेशनल कोर्सचा हा विद्यार्थी) कडून परफेक्ट फंक्शनॅलिटीची अपेक्षा करणंच चूकीचं ठरतं

हा देखील त्या मुद्द्यातला महत्वाचा भाग आहेच.

आता, कमी गुणांवर ओपन कॅटेगरीतल्या मुलांना प्रवेश मिळतो का? उत्तर नाही हेच आहे ना?

रस्ते उखडणे, पूल कोसळणे, बिल्डिंग कोसळणे हे काय कमी टक्के मिळालेल्या आणि आरक्षणातून प्रवेश घेतलेल्याचा परिणाम आहे?
रस्ते उखडणे, पूल कोसळणे, बिल्डिंग कोसळणे - यामागे खूप वेगळे राजकारण असते.

१००% सत्य. मी उदाहरणादाखल काही प्रकार दिले होते..ह्यामध्ये आपण ती उदाहरणं बदलून सरकारी खात्यात काम करताना हिशेबात गल्लत होणे, सर्क्युलर्सचा अर्थही न समजणे, चुकीचा अर्थ काढून त्यावर काम करणे, प्रॉजेक्ट डॉक्युमेंटेशन न समजणे, समजण्यात चुका करणे, प्रॉडक्शन एन्हायर्नमेंटमध्ये गडबड करणे इ.इ. प्रकार घेऊ.

अरे (खुल्या / आरक्षित) ५०% पडलेल्यांना तुम्ही अशा जबाबदारीच्या पदाची नोकरी देताच कशी आणि का?

:) आरक्षण !!! तिथेही आहेच की! (सरकारी कार्यालयं म्हणतोय मी)

आणि ९९% किंवा १००% मिळवलेला (खुल्या / आरक्षित) जर लाचखोर निघाला तर ही परिस्थिती उद्भवू शकत नाही काय?

जर लाचखोर निघाला तर? आहेतच की!

माझा मुद्दा असा आहे, की समजा, एकजण ५०-६० टक्के(नक्की कट-ऑफची कल्पना नाही, क्षमस्व! ) मिळवून मेडिकलला प्रवेश मिळवून डॉक्टर झाला (कसाबसा...कारण आधीच्या प्रतिसादात आहेच...गोते..इ.इ.) तर त्याच्याकडून ज्याला 'पर्फेक्ट ट्रीटमेंट' म्हणतात ती मिळेल काय? इथं प्रश्न मागासवर्गिय / खुल्या गटाचा नाही...कोणीही असेल तो!

ही तर कोणत्याही कमी मार्क पडलेल्याची स्थिती असेल. आरक्षण घेणार्‍यांचा या मुद्द्याशी प्रत्यक्ष संबंध काय? आरक्षण घेणार्‍या सगळ्यांनाच ५५% पडतात? आणि खुल्या वर्गातील सगळ्यांना ९०% च्या वरच मार्क असतात?

नक्कीच नाही...पण खुल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचा पाया मुळातच ७०-८० टक्के मार्कांचा असल्याने आकलनक्षमता जास्त चांगल्या प्रकारे काम करत असल्याने अभ्यासक्रम ५०-५५ वाल्यांइतका जड जात नाही..पर्यायाने विषयातलं ज्ञानही काहीप्रमाणात चांगलं असु शकतं ! "समथिंग गुड इज बेटर दॅन लॉट ऑफ मेस्ड ऑफ!"

त्यातले काही टॉपरसुद्धा असतात.

ते खर्‍या सोन्यासारखे झळाळून उठतातच...त्यांना कुबड्या लागत नाहीत!

आणि बरेचसे ऍव्हरेज मार्क मिळविणारे आणि काही ५०% वाले आणि काही नापास - खुल्या वर्गात पण हीच परिस्थिती असते.

ते न झेपणारे प्रोफेशनल कोर्सेस जागा न मिळाल्याने करु शकतच नाहीत..त्यामुळे साकल्याने विचार करता, सर्वांगिण प्रगतीला मारक असे निर्णय घेण्याची कुवत / अधिकार त्यांना मिळत नाहीत!

त्यामुळे चांगल्या नोकरीचा आणि चांगल्या कामगिरीचा निकष गुणवत्तेवर लावावा.

आणि फक्त गुणवत्तेवरच !!! :) मीही कुठे वेगळं काय सांगितलं?

नोकरीतल्या राजकारणाचा संबंध आरक्षणाशी लावू नये.

राजकारण नव्हे, परिणामांबद्दल बोललो :)

मनस्वी's picture

7 May 2008 - 4:14 pm | मनस्वी

>> राजकारण नव्हे, परिणामांबद्दल बोललो <<
मी तेच म्हटले ना की राजकारणाचा आणि आरक्षणाचा थेट संबंध आहे. कोणीही (खुले / आरक्षित) अपात्र असेल तर परिणाम वाईटच.
आरक्षणाचा आणि परिणामांचा नव्हे.

आणि दैनंदीन जीवनात आपण अनेक उदाहरणे बघतो की शिक्षणात फार मजल मारू न शकलेला सुद्धा नोकरी / व्यवसाय / कौशल्यात यशस्वी होतो, तर बोर्डात वगरे आलेली व्यक्ती (खुली / आरक्षित) अयशस्वी!

मनस्वी's picture

7 May 2008 - 3:10 pm | मनस्वी

.

रम्या's picture

7 May 2008 - 4:44 pm | रम्या

आणि आरक्षण यावं ते जर दोघांचे गुण समान असतील (फारतर आपण सापेक्षतेसाठी ५-१०% कमी-जास्त म्हणू) तर ते मागासाच्या फायद्याचे. त्याने गुणवत्ताही टिकवली जाईल..आणि मागासांवर अन्यायही होणार नाही.

हे पटण्यासारखं आहे खरं!

राजमुद्रा's picture

7 May 2008 - 2:20 pm | राजमुद्रा

फक्त एक करावं लागेल. आरक्षणवाल्यांनी आरक्षणातूनच प्रवेश घ्यायचा. खुल्या गटातून नाही. आहे कबूल? नाही ना........
म्हणजे तुम्हाला दोन्हीकडचं लोणी हवंय, हो ना? आरक्षणाच्या जागा कमी असल्या की तुम्ही येणार खुल्या गटात हो ना? आणि ज्यांच्यासाठी आरक्षण आहे त्यांना मिळतं का आरक्षण? त्यांना माहित तरी आहे का आरक्षण म्हणजे काय?

अवांतरः मला आजपर्यंत आरक्षणाच्या कुबड्या घ्याव्या लागल्या नाहीत, याचा मला अभिमान आहे.

राजमुद्रा :)

रम्या's picture

7 May 2008 - 4:38 pm | रम्या

तुझ्या मूठभर मित्रांसाठी आरक्षण काढून टाकायचे का?
पण झोपडपट्टीत राहून ज्याची आई धूणी भांडी करते तो आरक्षणामुळे डॉक्टर झाला असे विद्यार्थी तरी कुठे ढिगाने आहेत?

चेतन's picture

5 May 2008 - 1:30 pm | चेतन

"मनूष्य स्वभावानुसार दुसरा पुढे जाताना बघून आपला जळफळात होणे स्वाभाविक आहे"

बाकी तुमच्यकडे चार बोटं आहेत हे सोयिस्करपणे विसरा.... (चालायचचं कॉ. म्हणवता ना)

चेतन राव काय लिहीले आहेस ते तुला कळले का?

मला व्यवस्थीत कळ्तयं.पण ज्यांची समजायची इच्छाच नाही त्यंना काय समजणार. असो....

तुझ्या मूठभर मित्रांसाठी आरक्षण काढून टाकायचे का?
हाच प्रश्न स्वतःला विचरून पहा

आणि गुणवत्ता ठरवणारे तुम्ही कोण ?
ती फक्त तुम्हीच ठरवणार का... म्हणजे गुण मिळवणार्याकडे गुणवत्ता नसते?

म्हणजे तुला अस म्हणायच का की मागास जातीतील लोकांना गुणवत्ताच नसते.
हे मी म्हणलेले नाही अथवा कोणिहि म्हणलेले नाही. माझ्या महितिमध्ये असे अनेक गुणवान लोक आहेत.

पणं सत्य हे कटु असतं आणि ते ऐकणार् याच्या इच्छेचा विचार करत नसतं ते असतं त्या स्वरुपात समोर येतं असतं (म्रुत्युंजय)
असो ज्यांचा पुर्वग्रह दुषित आहे त्या कॉ.ना काय समजणारं

चेतन

अजिंक्य's picture

5 May 2008 - 1:55 pm | अजिंक्य

मित्रहो,
शांत व्हा. मला मान्य आहे, की हा अत्यंत ज्वलंत आणि तापलेला विषय आहे.
पण, तरीही त्यावर योग्य ती चर्चा व्हावी हा हेतू होता, आपापसात भांडणे करावयाचा नव्हे.

विकि,
तुझं म्हणणं योग्य आहे. मला हे आधीच माहित होतं की माझ्या साठी ५० % जागा आहेत, आणि मीही त्याच
जागांसाठी प्रयत्न केला. (बाकी माझ्या हातात तेवढंच होतं की!)
पण माझा मुद्दा वेगळाच आहे.
आरक्षण हे मागासलेल्या समाज घटकांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी केले गेलेले आहे .....
आपल्यात मतभेद असतीलही, पण या मुद्द्यावर मात्र मी तुझ्याशी पूर्ण सहमत आहे.
आणि मी तुला निश्चितपणे सांगू शकतो, की माझा कुठल्याही जाती-जमातीवर घसरण्याचा अजिबात हेतू नाही.
आणखी एक गोष्ट, मैत्री बद्दल माझ्या कल्पना स्पष्ट आहेत. मैत्री मध्ये जात येण्याचा प्रश्नच येत नाही. अगदी कबूल.
मी तसं कधीच म्हटलं नाही. म्हणणारही नाही.

'धमाल मुलगा' चा मुद्दा बरोबर आहे.
एखादा (की बहुतांश? हा विषय आणि आकडेवारी संशोधनाचा विषय आहे हे नक्की!) ५०-५५ टक्केवाला आरक्षणाच्या आधारे प्रवेश मिळवतो..वर्षांनुवर्षे गोते खातो,............
.....एक ना धड भाराभार चिंध्या होऊन बसतात. आयुष्यातली महत्वाची वर्षं वाया जातात ते वेगळंच.

जर आरक्षणा चा लाभ मिळणारा आणि एखादा विना-आरक्षण अशा दोघांन समान गुण असतील, तर
आरक्षणाचा मुद्दा यावा. नाहीतर, फक्त गुणांवर आधारित प्रवेश मिळावा.
- अजिंक्य.

विकि's picture

5 May 2008 - 2:44 pm | विकि

तु आपल्या मताशी थोडाफार सहमत झालास त्याबद्दल धन्यवाद.
कॉ.विकि

रम्या's picture

7 May 2008 - 4:53 pm | रम्या

जर आरक्षणा चा लाभ मिळणारा आणि एखादा विना-आरक्षण अशा दोघांन समान गुण असतील, तर
आरक्षणाचा मुद्दा यावा. नाहीतर, फक्त गुणांवर आधारित प्रवेश मिळावा.

या विषयावर कधी फार विचार केला नव्हता. पण हे सर्वात जास्त पटणारे वाटते.

अजिंक्य's picture

5 May 2008 - 2:18 pm | अजिंक्य

आरक्षण ही समस्या नाही, असूच शकत नाही.
कारण, आरक्षण हा समस्या सोडवण्यासाठी काढलेला तोडगा आहे.

खरी समस्या ही आहे की -
१) ज्या लोकांना आरक्षणाची खरी गरज आहे, त्यांच्या ऐवजी ते इतरांनाच मिळते.
कारण, आरक्षित यादीमध्येदेखील गुणांवर आधारित उप-यादी काढतात.
त्यामुळे, ज्यांना आरक्षण मिळते, ते बव्हंशी जास्त गुण मिळवणारे असतात.
(यावरूनच हे सिद्ध होते की, मागास जातीतील विद्यार्थ्यांमधेही गुणवत्ता असतेच.
खरं म्हणजे, तथाकथित उच्चवर्णियांइतकीच असते.)

२) आरक्षणामुळे, बर्‍याच वेळा (सर्व वेळेस नव्हे) गुणवत्ता नसणारी मुले प्रवेश मिळवतात, आणि
इतरांचे, जे गुणवत्तावान असतात(यांत, मागासवर्गीयसुद्धा येतात) ते मागे पडतात.
३) ज्या जागी गुणवत्तेची खर्‍या अर्थाने गरज असते, अशा जागी तर आरक्षणामुळे जास्तच नुकसान होते.

तात्पर्य :- आरक्षणाची गरज तर अजूनही आहेच. पण त्याचा ढाचा बदलणे आवश्यक आहे.

(ताजा कलम :- गुण आणि गुणवत्ता यात, तसं बघायला गेलं तर बराच फरक आहे.
पण आपल्याकडील शिक्षणव्यवस्थेप्रमाणे, गुणांवरूनच गुणवत्तेची पारख केली जाते.
त्यामुळे, गुण आणि गुणवत्ता समानच समजणे आवश्यक आहे.
अर्थात, माझ्या मते, त्यात फरक राहतोच. यासंदर्भात 'विकि'चे म्हणणे बरोबर आहे -
एखाद्याची गुणवत्ता परस्पर गुणांवरून ठरवणे चूक आहे. पण त्यासाठी मूळ शिक्षणव्यवस्थेतच बदल होणे
गरजेचे आहे. अर्थात, तसे आपल्या शिक्षणव्यवस्थेत आणखी बरेच बदल होणे गरजेचे आहे म्हणा!!)
- अजिंक्य.

काय तर म्हणे स्वतःला प्रश्न विचारून पहा. कुठले प्रश्न . मागास जातीतील लोकांकडे गुणवत्त्ता नसते हे तुमच्या लिखाणावरून स्पष्ट होत आहे. आमच्या लिखाणावरून नाही. समजले का?
आपला
कॉ.विकि

प्रकाश घाटपांडे's picture

7 May 2008 - 5:42 pm | प्रकाश घाटपांडे

आरक्षण हा विषय विविधांगी आहे. लिखाणात गोबेल्स तंत्र प्रणालीचा उपयोग करुन विद्रोह जागृत ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने काही स्तरात होत असतो. विवेक जागृत ठेवण्यासाठी स्वतःशी अंतर्गत संघर्ष करावा लागतो. विद्रोह जागृत ठेवण्यासाठी इतरांच्यातील विवेक नष्ट करावा लागतो. मह्तप्रयासाने अनेक विवेकी लोकांनी फुगवलेला प्रबोधनाचा फुगा हा एक विद्रोही टाचणी लावून नष्ट करु शकतो. काही लोक व्यक्तिगत मानापमानाचा बदला घेण्यासाठी संपुर्ण समाजाला वेठीस धरतात. तसे करण्यासाठी साम दाम दंड भेद या नीतीचा वापर ते करत असतात. शाळेतला एक किस्सा आठवतो . पेटवण्यासाठी काही वर्गबंधु याच नितीचा वापर करीत." अयौ बाळ्या . त्यो सक्या लई घान घान श्या देत व्हता तुपल्याला. आपन त नस्त ऐकुन घेतल बॉ." कि बाळ्याचा मित्र असलेल्या सक्याविषयी 'मित्रत्वा'ऐवजी 'शत्रुत्वा'ची भावना तयार झालीच समजा.
तात्पर्य- विद्रोहाचा सकारात्मक वापर हा आत्मपरिक्षणासाठी होतो तर दुरुपयोग हा स्वार्थी लोक आपली पोळी भाजून घेण्यासाठी करतात. यासाठी वाहक म्हणुन अर्थातच तरुणांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. आरक्षणावर मत मतांतरे होत राहतील . पण आपण आपल्या विवेकाचे रक्षण केले पाहिजे.

प्रकाश घाटपांडे

धमाल मुलगा's picture

7 May 2008 - 5:53 pm | धमाल मुलगा

अतिशय संतुलित, वैचारिक आणि अभ्यासपुर्ण अशी प्रतिक्रिया!

प्रकाशराव, हॅट्स ऑफ टू यू!

आरक्षणाच्या बाबतीत दोन्ही बाजूनी (समर्थनिय आणी विरोधी) टोकाचे विचार समाजात हेतुपुर:सर पसरवले जातात. कारण...स्वतःची पोळी भाजुन घेणे!

आपणच ठरवायचं नक्की काय योग्य आणि काय अयोग्य...भावनेच्या भरात नव्हे तर नीट विचार करुन!

प्रकाश घाटपांडे's picture

8 May 2008 - 1:12 pm | प्रकाश घाटपांडे

आजच्या सुधारक चे अतिथी संपादक श्री टी बी खिलारे यांनी मिसळ पाव ला भेट दिली. त्यांचे मते इथे कुणी आजचा सुधारकचा जात आरक्षण विशेषांक वाचलेला दिसत नाही. सदर अंक रु. ७५ ला उपलब्ध आहे. अधिक माहिती साठी इथे पहा
प्रकाश घाटपांडे

विनायक प्रभू's picture

17 Aug 2008 - 2:05 pm | विनायक प्रभू

एक डायालिसिस वर दुसर्याला आण़खी काही. भर्पुर जगा रे बाबानो . अजुन खुप जागा आहेत तुमच्यासाठि आरक्श्णाचे शिंग खुपसायला.
घोडा पळाला. आता कसली चर्चा कर्ताय. आता ह्यात बदल होणे नाही. परिस्थितिला
सामोरे जाय्चे. कडवट्पणा न बाळ्गता. तुमचे दुख्तेय. तुम्चे मलम तुम्ही शोधा की.एका चाकाने दुसर्या चाकाशी दुश्मनी करु नये.
मेल ओपन साठि मलमाचे कोठार
विनायक प्रभु

विनायक प्रभू's picture

17 Aug 2008 - 3:01 pm | विनायक प्रभू

एक डायालिसिस वर तर दुसरा आणखी कशाने. दोन चाकात मारामारी लावुन तुम्ही मोकळे. भरपुर जगा रे बाबानो. अजुन बर्याच जागा शिल्लक आहेत आरक्श्णाचे शिंग घुस्वायला. उदा. सुलभ शॉचालय.
ओपनवाल्यानो- घोडा पळाला. चर्चा करुन उपयोग नाही. आता ह्यात बदल होणे नाही. तुम्चे दुखतय ना? शोधा की मलम. कडवट्पणा न बाळ्ग्ता.
मेल ओपन करिता मलमाचे कोठार,
विनायक प्रभु

खादाड_बोका's picture

18 Aug 2008 - 7:58 am | खादाड_बोका

फक्त ऐकच गोष्ट सांगाविशी वाट्ते कि अमेरिकेत आरक्षण नाही म्हणुन ती ऐक सुपर पॉवर आहे, आणि जो पर्यंत भारतात आरक्षण आहे तो पर्यंत भारत सुद्धा कधीही सुपर पॉवर होऊ शकत नाही. निर्सगात कुठेही आरक्षण नाही, हे सगळ्यांना समजतो, पण ऊमजत नाही.
Survival of the fittest....

शुभान्गी's picture

19 Jan 2009 - 9:57 pm | शुभान्गी

१००% खरे......
तुमच्या मताशी सहमत......

हर्षद आनंदी's picture

18 Aug 2008 - 10:20 am | हर्षद आनंदी

अजिंक्य,

एक उदा-
एक गुजराती मुलगा , अजुन शुभ्-मंगल झालेले नाही..पण जेव्हा त्याची चर्चा होते, तेव्हा उदार मनाने ब्राम्हण समाजातील मुलीसाठी परवानगी दिली जाते. पण इतर समाजाचे नाव जरी घेतले तरी विविध पध्दतीने ब्लॅकमेल केले जाते

आता मला सांगा :
घरातील सुसंस्कृत, सुविद्य, लोक जातीवर अडुन बसतात, हट्ट करतात, मग हा जातियवाद हद्दपार कधी होणार?
मग राजकारणी लोक त्याचे भांडवल करणारच की

जो पर्यंत जातियवाद अस्तित्वात आहे, आरक्षण होणार!! [तो सतत पेटलेला तवा आहे, कोणीही पोळी भाजुन घेणारच की राव]

खरी गरज शिकलेल्यांना शहाणे करण्याची आहे बाकी सर्व आपोआपच येईल.

आरक्षण विषया वरील बर्याच विरोधी प्रतिक्रीया वाचुन वाइट वाटले. बहुतेक जणाना आरक्षण या वीषयावर जास्त माहिती नाही. बहुतेकानी आरक्षणाच्या (त्याना भोगाव्या लागलेल्या) परीणामा विषयी लिहीले आहे.

फक्त शैक्षणीकच नाही तर सर्व प्रकारच्या आरक्षणाची गरज सामाजीक समतोलासाठी निर्माण करण्यासाठी आवश्यक असुन जो समाज इतक्या टोकाच्या सामाजीक असमतोला साठि जबाबदार आहे, त्या समजाला, त्यातील प्रत्येक घटकाला, आरक्षणाचे परीणाम भोगावे लागतील.

माझ्या कॉलेज प्रवेशा वेळी माझ्या भावना तीव्रपणे आरक्षणाच्या विरोधात होत्या, जश्या बर्याच जणानी दिल्या आहेत. त्यावेळी मलाही वाटले होते कि माझी सन्धी / जागा कुणा दुसर्याला, त्याची लायकी नसताना मीळत आहे. पण आज मला पटते की त्यावेळी मीच कमी पडलो होतो.

आज थोड्या त्या विषया वरील वाचन व थोडा विचार केल्यावर मला आरक्षणाची आवश्यकता पटली आहे. आरक्षणाचा मला व माझ्या कुटुम्बाला कधीही फायदा होणार नसुनही मी पुर्ण पणे आरक्षणाच्या बाजुने आहे.

आरक्षणाचा अप्रत्यक्ष फायदा आरक्षण नसलेल्या लोकाना सुद्धा खुप होतो. त्याना नवीन, चन्गल्या सन्धि शोधाव्या लागतात/ मिळतात. त्यान्चिही प्रगती होते. उदा. परदेशी शिक्षण, नोकरी. अथवा स्वदेशातच धन्दा, उद्योग. थोडे मागे पडलेल्याना अधीक कष्ट करण्याची इछया होते.

आणी शेवटी, ज्याची जी लायकी असते, तो तसे जीवन जगतो. (फुटपाथ वरील फेरीवाल्याकडुन खरेदी करणार्याला, फुटपाथ वर चालायला जागा नाही अशी तक्रार करयचा अधीकार नाही. तसेच रस्त्यावर कागद, कचरा, पिचकारी टाकणार्याला परदेशाच्या तुलनेत भारतात कीती घाण आहे असे बोलायचा अधीकार नाही.) - विशयान्तरा पद्दल क्षमस्व.

- नेत्रेश

जर कुणाला वारंवार अभ्यास (वाचन) करुन ९०-१००% गुण मिळाले तर तो हुशार असता तर काँम्प्युटर इंजिनीअरिंग शिकत असलेला तो/ती स्वतःचे प्रोजेक्ट स्वतः तयार करता, कुणा १०-१२ वी शिकलेल्यांकडुन करुन घ्यायला गेला नसता.
माझा स्वतःचा अनुभव एक उच्च वर्णिय मुलगी V.B. चा प्रोजेक्ट शिक्षीकेने सांगीतल्या प्रमाणे पुर्ण केला, परंतू त्यामध्ये शिक्षीकेने मुद्दाम ठेवलेली "डेटाबेस कनेक्टीव्हिटि" करु शकली नव्हती. तिला तिच्या प्रोजेक्ट मधल्या प्रोजे़क्टचा उद्देश विचारला तर त्र सुद्धा तिला माहित नव्हते. असो...

आरक्षण माझ्या मते सुद्धा नको, कारण आरक्षणाचा फायदा ज्यांच्या हातात पैसा व सत्ता आहे तेचे उकळत आहेत. ज्यांना गरज आहे ते आहेत तिथेच राहतात. आरक्षणाचा फी माफिचा फायदा राजकारन्याचे मुल, श्रीमंताचे मुल उपटत आहेत. गरीब तो एस्.सी असो वा ब्राम्हण ह्यांना मिळावयास हवा. मी स्वतः एस्.सी . आहे पण मला मनापासुन वाटते कि आरक्षण पुर्ण बंद करुन फक्त ज्याची शिक्षण घेण्याची ऐपत नाही त्याला सवलत द्यावी.

ए. प्रशांत's picture

19 Jan 2009 - 11:28 am | ए. प्रशांत

आरक्षण हटवा मोहिम राबवा

कालिन्दि मुधोळ्कर's picture

19 Jan 2009 - 12:35 pm | कालिन्दि मुधोळ्कर

मित्रानो,

एक इतिहास.
अनेक शतके उच्च वणीयानी आरक्षण उपभोगले. सामाजिक "ऍडमिशन" मधे कमी गुण असूनही, त्यांना जागा मिळाली, पण इतरांना मिळू शकली नाही.

उच्च वणीयांवर राग अजिबात नाही.
पण, हे कितपत योग्य आहे?

गुण हाच निकष मानला जावा असं मला वाटतं.

कदाचित माझा सूर थोडा वरच्या पट्टीतला असेल, पण .......
मला नाही वाटत माझा मुद्दा चुकीचा आहे.

शुभान्गी's picture

19 Jan 2009 - 9:34 pm | शुभान्गी

अगदी बरोबर....
मला असे वाट्ते आरक्षणची गरजच नाही. अशाने खूप हुशार लोक मागे पडतात.. आरक्षणा साठी जात, आड्नाव बद्ललेले लोक ही आम्ही पाहीली आहेत..... असा भेदभाव असायलाच नको असे वाटते.

"आरक्षण" हे जातीय निकषांवर आधारित न राहता, आर्थिक निकषांवर आधारित असायला हवे.
आजच्या जातिनिहाय समाजव्यवस्थेत, अनारक्षित म्हणुन गणला गेलेला ( की गंडला गेलेला ! :-? ) समाज तोंड दाबुन बुक्क्यांचा मार सहन करत आहे. :( .

आजकाल तर, समाजातील एका मूलत: अनारक्षित प्रवर्गाला, "आरक्षित" करवुन घेण्यासाठी काही (देशद्रोही ! ? !)संघटना म्हणे "आत्मघातकी पथके" ही उभारत आहेत!!!!

कुठवर चालणार हे ?

सर्वसामान्य जनतेला भडकवुन, जातीय दंगली घडवुन आणणे, रस्ते अडवुन दगडफेक करणे, महापुरुषांच्या-संतांच्या मिरवणुकी अडवुन जाळपोळ करणे, ""आमच्या आरक्षणाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर तुम्हाला सुरक्षित राहू देणार नाही"" अश्या धमक्या देणे, इ. इ. इ.

"आरक्षण" तर केवळ एक कारण आहे. धूर्त राजकारणी मात्र त्याचा व्यवस्थित वापर करुन बहुसंख्य लोकांचे मत आपल्या बाजुने वळवण्याच्या प्रयत्नात आहेत. पण यात भरडला जाणार आहे तो "सर्वसामान्य समाज"च. मग भले तो आरक्षित असो किन्वा अनारक्षित!

""जातीय निकषांवर आधारित आरक्षण"" हे ६० वर्षांपूर्वी योग्य होते, असे म्हणता येइल. कारण तेव्हाचा समाज शिक्षणाच्या बाबतीत तितकासा जागरुक नव्हता. "निरक्षरता आणि गरीबी" यांनी ग्रासलेल्या विशिष्ट समाजाला तेव्हा "आरक्षणा"ची खरोखर आवश्यकता होती. त्यामुळे पण ६० वर्षांपासून साक्षरतेसाठी जागृत झालेल्या समाजाला, आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या समजाला.....जर आजही २१व्या शतकात आरक्षणाच्या कुबड्या लागत असतील तर खरोखर शरमेची गोष्ट आहे.
आजच्या घडीला देशात आर्थिकदृष्ट्या मागासलेला आणि तरीही अनारक्षित असलेला समाज बर्‍याच प्रमाणात आहे, आणि तो वाढतो आहे.

कित्येक वर्षांपासुन, "समता आणि प्रेम" या तत्वांचा पुरस्कार करणार्‍या समाजाची "समता" अशावेळी का बरे दिसत नाही? :-?

शिकून , संघटित होउन,(आणि पैसा कमवून) जर पुन्हा पुन्हा आरक्षणासाठीच "संघर्ष" होणार असेल, तर तो समाज केवळ ""शिक्षित"" होईल, पण सुशिक्षित आणि सुसंस्कृत मुळीच नाही.
कारण या समाजात साहजिकच नीतिमत्तेचा अभाव असेल.

पण हे कुठेतरी थाम्बवायलाच पाहिजे. समाजाला स्वार्थी बनण्यापासुन वाचवायला हवे.

त्यामुळेच आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे, जातीय निकषांवर आधारित नको.

जय हिन्द !

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||