Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गणेशा on Tue, 02/01/2011 - 13:07
खरे तर हा वॅलेंटाईन भेट प्रवास गद्य म्हणुन लिहायला घ्यायचा असे ठरवले होते तेंव्हा, पण संपुर्ण गद्य आपोआप च पद्य म्हणुनच लिहिले गेले, त्या प्रवासातील एक कविता छान वाटली म्हणुन येथे देत आहे, बाकीचे गद्य विभागातच लिहित आहे. (प्रसंग गावाकडे गेलेल्याची आठवण येत असतानाचे संभाषण) सखी :
आठवतं का तुला पारंब्यांच्या विळख्यात वड उभा असलेला पारावरच्या पोराला कवेत घेवू पाहणारा
प्रियकर : आठवतं मला तेंव्हा तुझ्या बटांचं मोहक उडणं वार्‍याच्या मंद झुळुकेनं प्रेमाचे गीत गाणं सखी :
कातरवेळी आकाशाने रंगीत पदर सोडलेला नदीच्या काठावर सूर्य नाजुक निजलेला
प्रियकर : हलक्याच मिठीत ओढणीचा तोल ढळलेला स्पर्शाच्या मोहक संगतीत देह चैतन्यात नाहलेला सखी :
मंद चंद्राचा कवडसा अंगणात प्राजक्त ओला गोठ्यातून घुंगराची किणकिण आवाज मायेचा लाभलेला
प्रियकर : गंधाने फ़ुललेल्या रात्री तारकांचा पहारा अंधाराच्या मिठीत गहिर्‍या निशब्दतेचा सडा सांडलेला -- शब्दमेघ

Submitted by अवलिया on Tue, 02/01/2011 - 13:14

Permalink

सखी मुलायम ओठांनी चुंबिलेस

सखी मुलायम ओठांनी चुंबिलेस तु ओठांना जसे उतरले दव पहाटवारा वाहतांना प्रियकर मिटलेले डोळे तुझे उर माझा धपापला हलकेच पाहिले मी चोरुन तुझ्या चेहर्‍याला सखी नेहमीची तुझी खोड चोरुनी पाहतोस मला सांग मग त्यावेळेस तु का माघारी फिरला प्रियकर काय सांगू तुला आता तुझा बाप दूर दिसला त्याने मागल्या वेळी भर बाजारी बडवला
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Tue, 02/01/2011 - 13:21

In reply to सखी मुलायम ओठांनी चुंबिलेस by अवलिया

Permalink

खुपच सुंदर ! खुप खुप आवडले

खुपच सुंदर ! खुप खुप आवडले .. इतक्या कमी वेळात इतके सुंदर काव्य .. लाजवाब ...
  • Log in or register to post comments

Submitted by कच्ची कैरी on Tue, 02/01/2011 - 13:44

Permalink

मस्तच!

ह्या विकांतला गावी गेला होतात तेव्हा सुचली वाटतं,असो कविता एकदम फूल टू फट्याक आहे . आणि अवलिया तुस्सी भी छा गये ,निचोडके रख दिया!वा मस्तच!
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Tue, 02/01/2011 - 14:14

In reply to मस्तच! by कच्ची कैरी

Permalink

नाहि .. तेंव्हा नाही सुचली हो

नाहि .. तेंव्हा नाही सुचली हो .. फट्याक शब्द आवडला
  • Log in or register to post comments

Submitted by sneharani on Tue, 02/01/2011 - 13:47

Permalink

मस्त

दोन्हीही कविता मस्त! :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश१११ on Tue, 02/01/2011 - 18:36

Permalink

गणेशा -मस्त फोर .. !!सिक्ष

गणेशा -मस्त फोर .. !!सिक्ष नाही लिहिता येत ...
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Tue, 02/01/2011 - 18:51

In reply to गणेशा -मस्त फोर .. !!सिक्ष by प्रकाश१११

Permalink

'k' आणि 's' प्रेस केल्यावर

'k' आणि 's' प्रेस केल्यावर 'क्स' तयार होतो आणि 'k' 'S' 'h' प्रेस केल्यावर 'क्ष' होतो. धन्यवाद ..
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on गुरुवार, 02/03/2011 - 05:31

In reply to 'k' आणि 's' प्रेस केल्यावर by गणेशा

Permalink

एक्स अक्षराने पण क्ष होतो.

एक्स अक्षराने पण क्ष होतो.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 1906 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com