केकलेस !
च्यायला आज मिपा बर जो येतो तो केकच्या पा.कृ. टाकतोय! गणपाशेटने रचिला पाया स्वाती झालिसे कळस .. अर्र चुकलं.. गणपाशेटने रचिला बेस आणि स्वाती झालीसे क्रीम अशी अवस्था झाली आहे. हे सगळं कमी म्हणून कोणीतरी एगलेस केक आणि (गव्हाचं) पिठलेस केकची मागणी करतंय!!! आणि ते आव्हान मिपावरची शेफमंडळी अहमहमिकेने उचलतात काय! ..
शेवटी आम्ही पण ठरवलं की ह्या सगळ्या केकाटण्यात आपला पण सहभाग असलाच पाहिजे! अर्थात ज्या माणसाला चहाचं आधण ठेवता येत नाही अशा म्या पामराने मिपावरच्या दिग्गज बल्लवांच्यां (आणि बल्लविणींच्या) लायनीत उभं राहायचं म्हणजे फक्त अशक्य!
पण तरीही या केकांच्या गलबल्यात आपलीही एक वाटी साखर पडावी म्हणून हे धारिष्ट दाखवतो आहे!
तर.. तुम्ही आत्तापर्यंत एगलेस केक च्या असंख्य रेशिप्या वाचल्या आणी ट्राय केल्या असतील.. म्हणून मग आता सादर आहे केकलेस्स एग!
साधनः
१. एक बरी अशी नाकी डोळी नीटस वयात आलेली कोंबडी
२. एक त्यातल्यात्यात हँडसम कोंबडा (कोंबडा कोंबडी एकमेकांना पसंत पडतील हे बघून घ्या).. इतर केकच्या रेशिप्यांमधे "फेटणे" ही अतिशय महत्वाची कृती आहे त्याचप्रमाणे इथे कोंबड्याचा चांगला मोठा "फेटा" महत्वाचा आहे.
कृती:
१. कोंबडा ब कोंबडीला एकांत मिळावा म्हणून त्यांना हनिमूनला सिमल्याला पाठवा.. हे शक्य नसेल तर निदान त्यांना घराच्या बाहेर एक आडोसा करून द्या.
२. आडोश्यामध्ये मऊ उबदार असं आंथरून टाकायला विसरू नका. मुसत्या गार लादीवर कोंबडीने अंड दिल्यास अंड फुटण्याचा संभव आहे!
३. कों आणि कों ना सांद्र संगीत आणी मंत सुगंध आवडत असेल तर त्याची सोय करा.
४. दररोज सकाळी त्या दोघांची आस्थेने विचारपूस करा. तसेच कुठे कोंबडीची प्रोग्रेस कुठपर्यंत आहे ह्याचा अंदाज घ्या.. पण हे करताना कोंबडीला अनकंफर्टेबल वाटणार नाही याची काळजी घ्या.
५. काही दिवसांतच कोंबडी ताजी पांढरी शुभ्र अंडी एखद्या कोपर्यात उबवत बसलेली दिसेल..
६. वरचीच कृती वापरून तुम्ही बदकांची अंडी सुद्धा बनवू शकता. (फक्त कोंबड कोंबडीच्या जागी बदक आणि बदकीण आणा.. त्यातलं बदक कोण आनी बदकीण कोण याची शहानिशा करून घ्या)..
तर आता मिपा संकेता प्रमाणे प्रत्येक पाकृमधे फोटो देणे आवश्यक असल्यामुळे हा डायरेक तयार पदार्थाचा फोटू हाजीर है!.
सो, नक्की ट्राय करणार ना ? :-)
ढिस्क्लेमरः जर खूप प्रयत्न करूनही अंडी मिळत नसतील तर लेखक जबाबदार नाही.. (आम्ही फक्त ऑफिसमधल्या खुर्च्या उबवतो.)

याद्या
4529
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
काय गऽऽ बाई! कोण कसले धागे
पण ही पाकृ "अपसाईड डाऊन "
In reply to काय गऽऽ बाई! कोण कसले धागे by रेवती
ह ह पुवा! अनामिक
हा!हा!हा! अंड्यासाठी एक
हीच पाकृ आमच्याकडे मात्र थोडी
तुमि दोघेहि अच्रत बव्ल्त
In reply to हीच पाकृ आमच्याकडे मात्र थोडी by Nile
कोडे
हा हा हा
पाकृ !!
अग आई ग! काय मान दाखवतय
सोडा ? चांगली कल्पना..
In reply to अग आई ग! काय मान दाखवतय by स्पंदना
फेटणे हे चांगले झाले असेल तर
पूरेवाट
हा हा हा
कोबडी आणि कोम्बड्याचे बरीच
प्रासंगिक विनोद
पाकॄ. भारी आहे .. पण ती