Skip to main content

एक सोपे कोडे (हॉटेल आणि मंदी)

एक सोपे कोडे (हॉटेल आणि मंदी)

Published on 19/01/2011 - 04:53 प्रकाशित मुखपृष्ठ
सध्याच्या मंदीमध्ये एका गावाची पार वाट लागली आहे. गावातील प्रत्येक व्यावसायिक उधारीच्या बोज्याखाली आहे. सुदैवाने त्या गावात शहरातून एक धनाढ्य सावकार येतो. सावकाराला गाव आवडते. तो तिथे एक दिवस राहण्याचा निर्णय घेतो आणि गावातील एका हॉटेलात जातो. हॉटेलात खोली उपलब्ध असते. खोलीच्या भाड्याचे १,००० रु. मालकाला देऊन तो खोली पाहण्यासाठी वरच्या मजल्यावर जातो. हॉटेल मालकाची त्याच्या किराणा दुकानदाराकडे १,००० रु. ची उधारी असते. त्यामुळे तो धावतच त्याच्याकडे जावून ती उधारी चुकती करतो. किराणा दुकानदार धावत त्याच्या होलसेल विक्रेत्याकडे जातो आणि त्याची १,००० रु. ची उधारी चुकती करतो. होलसेल विक्रेता धावत शेतकऱ्याकडे जातो आणि त्याची धान्यासाठीची १,००० रु. ची उधारी चुकती करतो. शेतकरी धावत ट्रक मालकाकडे जातो आणि त्याची माल वाह्ण्यासाठीची १,००० ची उधारी चुकती करतो. ट्रक मालक धावत हॉटेल मालकाकडे येतो आणि त्याला १,००० रु. देतो. काही महिन्यांपूर्वी ट्रक मालकाचा एक मित्र त्या हॉटेल मध्ये उधारीवर राहून गेलेला असतो. तेवढ्या वेळात, सावकार खोली पाहून खाली येतो. त्याला काही खोली आवडत नाही आणि त्यामुळे तो तेथे न राहण्याचे ठरवतो. हॉटेल मालक त्याला इमाने इतबारे त्याचे १,००० रु परत देतो. आता या सगळ्या व्यवहारात कोणीही नवीन पैसे कमावले / खर्चले नाहीत. तरीदेखील सर्व जणांनी आपापली उधारी चुकवली. हे कसे घडले का यात काही मेख आहे ? सध्याच्या जागतिक मंदीवर हा उपाय असू शकतो का ? अवांतर: गावामध्ये हे पाचच व्यावसायिक आहेत आणि गावाची अर्थव्यवस्था self-contained आहे असं गृहीत धरू शकता.

याद्या 3870
प्रतिक्रिया 17

"हॉटेल मालक त्याला इमाने इतबारे त्याचे १,००० रु परत देतो .." हे १,००० रु. मालकाच्या खिशातून गेले ना ..

In reply to by शेखर काळे

नाही. सावकाराने हॉटेल मालकाला १,००० रु. दिले होते पण सावकार हॉटेलात न राहता निघून गेला. त्यामुळे हॉटेल मालकाने सावकाराला कोणतीच "सर्विस" विकली नाही.

पण सावकाराने ट्रक ड्रायव्हरच्या मित्राला जी सेवा विकली त्याचे मूल्य त्याच्या पदरात नाही पडलं आहे! सावकाराचा तोटा आहे यात. . . वेल त्याची १००० रुपयांची उधारी तर चुकती झाली आहे म्हणा

In reply to by शुचि

तुम्हाला हॉटेल मालक म्हणायचे आहे असे गृहीत धरून: तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्याची उधारी चुकती झाली - म्हणजेच त्याला १,००० रु. मिळाले.

In reply to by निकित

खेड्यात २००० रुपये पाहीजेत मित्राने गफला केल्याने आजच्या घडीला १००० च आहेत. खरं पाहता हॉटेल मालकाकडे १००० आणि सावकाराकडे १००० पाहीजेत

हं खरच ... सावकाराला खोली बघायचे १,००० रु. लागले ...

गंमत आहे खरी. येथे अर्थात गोलाकार उधारीचे चक्र असल्यामुळे आश्चर्यकारक असे काहीच नाही. जर दोघेच जण असते, समजा - अभय आणि आशा. अभयचे आशाला १००० रु देणे आहे, आणि आशाचे अभयला १००० रु देणे आहे. ते दोघे एकमेकांना उधारी "माफ" करतील, तर आपल्याला काही आश्चर्य वाटणार नाही. पण खरे तर ही "माफी" नाही. उधारीच्या बदल्यात उधारीचा सौदा आहे. आता तिघे जण आहेत, समजा - अभय, आशा आणि इब्राम. अभयचे आशाला १००० रु देणे आहे, आशाचे इब्रामला १००० रु देणे आहे, आणि इब्रामचे अभयला १००० रु देणे आहे. असे चक्र आहे, हे तिघांना माहीत असले, तर ते सगळे एकमेकांची उधारी "माफ" करतील. या कोड्यात फक्त चक्र इतके मोठे केले आहे, की आपल्याला पटते, हे चक्र कोणालाच ठाऊक असणार नाही. अर्थात येथे तो धनाढ्य व्यापारी यायची काहीच गरज नव्हती. हॉटेलमालकाने किराणा दुकानदाराला प्रतिज्ञापत्र (प्रॉमिसरी नोटचे खत) दिले असते, आणि त्याला सांगितले असते, "बघ हे पत्र तू कोणाला दिलेस तर त्याच्या हाती मी पैसे चुकते करीन." ("आय प्रॉमिस टु पे द बेअरर..." असे प्रतिज्ञापत्र असते.) मग हे पत्र किराणावाल्याने होलसेलरला दिले असते - "बघा साहेब - हे पैसे माझ्याकडून वसूल करण्याऐवजी हॉटेलमालकाकडून घ्या..." मग चक्राकार गतीने प्रतिज्ञापत्र हॉटेलमालकाकडे आले असते. आणि हॉटेलमालकाने "स्वतःला पैसे देण्याची प्रतिज्ञा" केली असे होईल. अर्थात तो ते पत्र फाडून टाकेल :-) - - - उधारचक्र एकमेकांना माफ केल्याने मंदी सुधारणार नाही. एक तर या मंदीमध्ये उधारीचे चक्र नाही. येथे काही लोकांना फक्त देणे आहे, आणि काही लोकांना फक्त येणे आहे. - - - या प्रकारची एक गमतीदार लघुकथा वाचलेली आहे, पण लेखकाचे नाव आठवत नाही :-( त्या कथेत "शेटजी" हा एक वेड लागलेला माणूस असतो. आणि तो पैसे न देता उधारीवर गावात काही विकत घेतो - २०,००० रुपयांचे. मग विक्रेता येणार्‍या पैशांच्या खुशीत ३०,००० रुपयांची वस्तू उधारीवर घेतो, असे करत करत बर्‍याच महागा-महागाच्या वस्तू खरेदी-विक्री केल्या जातात. गावात "पैसा खेळतो आहे" असे वातावरण तयार होते. मग "पीक कोणी विकत घेणार नाही" म्हणून स्वस्थ बसलेले शेतकरी पिके काढू लागतात... म्हणजे उधारीच्या काल्पनिक पैशांबरोबर अन्नासारखा खरा मालही उत्पन्न होऊ लागतो... मग तो "शेठजी" वेडा म्हणून इस्पितळातले लोक पकडून नेतात, तरी काही मोठे नुकसान होत नाही. कारण पूर्वी हताश असलेल्या गावात आता खरोखरीचा माल उत्पन्न करण्याचे चैतन्य सळसळते आहे.

In reply to by धनंजय

तुम्ही म्हणता ती कथा आहे: "a Man who saved Pumpelsdrop" शाळेत की कॉलेजात टेक्स्टबुकात होती. गूगल केल्यास अजूनही मिळेल. प्रचंड मंदी असलेल्या पम्पल्स्ड्रॉप गावात एका शोरूममधली एकही कार विक्री झालेली नसताना तिथे येऊन एक भारी कार आपण घेणार, असं एक अनोळखी मनुष्य नुसता डिक्लेअर करुन जातो. मग शोरूमचा मालक खूष होऊन आपल्या बायकोला बरेच दिवस हवा असलेला मिंक कोट घेऊन घरी जातो. खूप दिवसांनी मिंक कोटाची विक्री झालेला कपडे दुकानदार आणि काही खरेदी करतो. आणि एकूण गावात तेजीचा उत्साह दिसू लागतो. दुसर्‍या दिवशी तो मनुष्य कार बुक करायला (पेमेंट करायला येतच नाही) पण तरीही एकूण बाजारात आलेल्या तेजीमुळे आता व्यापार्‍याला ती कार इन्व्हेंटरीत ठेवणं परवडेल असं वाटतं. थिओरिटिकल कथा आहे पण इंटरेस्टिंग.

In reply to by गवि

तुम्ही म्हणता ती कथा आहे: "a Man who saved Pumpelsdrop"
+१ कोड्याच्या पहिल्या दोन ओळी वाचल्या वाचल्या पहिल्यांदा ह्या कथेचीच आठवण झाली. भवतेक 'टर्नर' नावाच्या लेखकाची आहे. ह्या कथेवर एक नितांत सुंदर चित्रपट देखील निघाला होता.

एथे सर्वांच्या ऊधार्‍या चूकल्या नाहीयेत. ट्रक मालकाचा मित्र ट्रक मालकाला १००० रूपये देणे लागतो. थोडक्यात १००० ची ऊधारी होटेलवाल्याकडून ट्रक मालकाकडे ट्रान्सफर झाली.

In reply to by आत्मशून्य

ही मेख राहिली होती कोड्यात. त्यामुळे तुमचे उत्तर एका अर्थाने बरोबर आहे. पण ट्रक मालकाच्या मित्राऐवजी ट्रकमालकच हॉटेलात राहिला होता असे समजा. त्यमुळे त्याने हॉटेल मालकाला १,००० रु. देवून स्वतःचीच उधारी चुकविली. गोंधळाबद्दल क्षमस्व !

In reply to by निकित

वाटत नाही कारण जर सावकाराने हॉटेल मालकाला दीलेले पैसे हे कर्ज अथवा ऊधारी मानली तर जेव्हा ते परत घ्यायची वेळ येइल तेव्हा त्यावर व्याज वसूल केले जाइल. थोडक्यात १००० रू चे जेव्हडे व्याज होते तेव्हडा खर्च्/नूकसान हा त्या सावकाराला केवळ खोली बघायला झाला असे म्हणता येइल.म्हणजेच येथे ज्याने पैसा बाजारात आणला त्याचाच तोटा झाला असे दीसते म्हणून हा मंदीवर ऊपाय ठरत नाही. पण जर त पैसे व्याजासहीत वसूल झाले तर मात्र ही मात्रा लागू पडेल. अर्थातच ह्यासाठी त्या गावातील अर्थकारणाचे इतर बरेच घटक तपासून अशी पावले ऊचलावी लागतील.

इंग्रजीतुन मराठीत कोडं आणताना त्याला बरंच सोवळं - शुद्ध भाषेत सभ्य केल्याचं जाणवलं, आणि डोळे पाणावले.- हॉटेल आणि मंदी या वरुन एका वेगळ्या कोड्याची कल्पना आली होती. असो, असे उधारी धंदे करुन अर्थव्यवस्था सुधारत नसते. " आता या सगळ्या व्यवहारात कोणीही नवीन पैसे कमावले / खर्चले नाहीत. तरीदेखील सर्व जणांनी आपापली उधारी चुकवली." - हे कसे, सुरुवातीचा हॉटेलवाला सोडला तर बाकी सगळ्यांनीच पॅसे कमावले , म्हणजे उधारी वसुल केली आणि सुरुवातीचा सावकार सोडला तर सर्वांनीच पॅसे खर्च केले - उधारी चुकती केली. असो हे माझं मत आहे. बाकी हे पहिल्यांदा जालावर वाचलं तेंव्हा जाम मजा आली होति. हर्षद. @आत्मशुन्य - प्रतिसाद क्रमश: करण्याची कल्पना आवडली.

This is puzzle and story referred by 'Gagan vihari' is nothing but simple example of keynesian Economics. The land loard in the puzzle is government who is trying to push start the economic activity by spending money. as economy gains momentum govt takes out the spent money. the said money in the puzzile is within the economy but only locked in the receivables cycles and due to risk averse nature of private business there is no new spending. This is currently seen in every economy and the spending is seen in the various forms its called Quantitive Easing,(lending to banks and corporates directly or infusing capital) Stimulus spending or tax cuts , adjusting monetary policy (interest Rates) etc.

हा हा !!!! मस्त कोडे. असो... हॉटेलमालकाचे १००० रु. बुडले आहेत कारण ट्रकचालकाने उधारी चुकवली पण हॉटेलमालकाच्या हाती लागले नाहीत रुपये.

In reply to by बबलु

हा हा !!!! मस्त उत्तर. असो... बबलू शेट, कोडे परत वाचा ना राव. त्याला सुरुवातीलाच पैसे मिळाले आहेत आणि त्याने ते खर्च पण केले की. त्याचे १००० रु. कसे बुडले ते नाही कळले. ....वि.मे.