एक सोपे कोडे (हॉटेल आणि मंदी)
सध्याच्या मंदीमध्ये एका गावाची पार वाट लागली आहे. गावातील प्रत्येक व्यावसायिक उधारीच्या बोज्याखाली आहे.
सुदैवाने त्या गावात शहरातून एक धनाढ्य सावकार येतो. सावकाराला गाव आवडते. तो तिथे एक दिवस राहण्याचा निर्णय घेतो आणि गावातील एका हॉटेलात जातो. हॉटेलात खोली उपलब्ध असते. खोलीच्या भाड्याचे १,००० रु. मालकाला देऊन तो खोली पाहण्यासाठी वरच्या मजल्यावर जातो.
हॉटेल मालकाची त्याच्या किराणा दुकानदाराकडे १,००० रु. ची उधारी असते. त्यामुळे तो धावतच त्याच्याकडे जावून ती उधारी चुकती करतो.
किराणा दुकानदार धावत त्याच्या होलसेल विक्रेत्याकडे जातो आणि त्याची १,००० रु. ची उधारी चुकती करतो.
होलसेल विक्रेता धावत शेतकऱ्याकडे जातो आणि त्याची धान्यासाठीची १,००० रु. ची उधारी चुकती करतो.
शेतकरी धावत ट्रक मालकाकडे जातो आणि त्याची माल वाह्ण्यासाठीची १,००० ची उधारी चुकती करतो.
ट्रक मालक धावत हॉटेल मालकाकडे येतो आणि त्याला १,००० रु. देतो. काही महिन्यांपूर्वी ट्रक मालकाचा एक मित्र त्या हॉटेल मध्ये उधारीवर राहून गेलेला असतो.
तेवढ्या वेळात, सावकार खोली पाहून खाली येतो. त्याला काही खोली आवडत नाही आणि त्यामुळे तो तेथे न राहण्याचे ठरवतो. हॉटेल मालक त्याला इमाने इतबारे त्याचे १,००० रु परत देतो.
आता या सगळ्या व्यवहारात कोणीही नवीन पैसे कमावले / खर्चले नाहीत. तरीदेखील सर्व जणांनी आपापली उधारी चुकवली.
हे कसे घडले का यात काही मेख आहे ?
सध्याच्या जागतिक मंदीवर हा उपाय असू शकतो का ?
अवांतर: गावामध्ये हे पाचच व्यावसायिक आहेत आणि गावाची अर्थव्यवस्था self-contained आहे असं गृहीत धरू शकता.
याद्या
3870
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
मालकाचे पैसे गेले ..
नाही
In reply to मालकाचे पैसे गेले .. by शेखर काळे
पण सावकाराने ट्रक
नाही
In reply to पण सावकाराने ट्रक by शुचि
खेड्यात २००० रुपये
In reply to नाही by निकित
सावकार ..
गंमत आहे खरी
Story named "a Man who saved
In reply to गंमत आहे खरी by धनंजय
तुम्ही म्हणता ती कथा आहे: "a
In reply to Story named "a Man who saved by गवि
यात काही मेख आहे ? हो आहे
मेख राहिली होती खरी !
In reply to यात काही मेख आहे ? हो आहे by आत्मशून्य
सध्याच्या जागतिक मंदीवर हा उपाय असू शकतो का ?
In reply to मेख राहिली होती खरी ! by निकित
कोड्याचे शुद्धीकरण
This is puzzle and story
सध्याची अमेरीकन अर्थव्यवस्था
हा हा !!!! मस्त कोडे. असो...
हा हा !!!! मस्त उत्तर. असो...
In reply to हा हा !!!! मस्त कोडे. असो... by बबलु