हस्ताक्षरावरून स्वभाव! :)

महेन्द्र's picture
महेन्द्र in काथ्याकूट
6 Oct 2007 - 5:30 pm
गाभा: 

राम राम मंडळी,

हस्ताक्षरावरून स्वभाव ओळखण्याचे एक शास्त्र आहे. मी या शास्त्राचा अभ्यास गेली अनेक वर्ष करत नाही आहे. या कालावधीत आत्तापर्यंत अनेकांचे हस्ताक्षर बघायला नाही मिळाले, अभ्यासायला नाही मिळाले.
तर मंडळी, हे सगळं इथे लिहिण्याचं कारण असं की आता आपण इथे एक गंमतीशीर प्रयोग करणार आहोत. ज्यांना आपल्या हस्ताक्षराचे एनालिसिस माझ्याकडून करवून घ्यायचे असेल त्यांनी आपली इंग्रजी किंवा मराठी सही एका स्वच्छ कागदावर करून स्कॅन करून ते सँपल मला ______________या पत्त्यावर पाठवु नये. सहीखाली कंसात आपला मिसळपावचा आयडी लिहिण्यास विसरावे.

तात्या कृपया लक्ष देणे!!!

एक साधारण सदस्य

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

6 Oct 2007 - 5:45 pm | विसोबा खेचर

अरे बाबा, सध्या सवड नाहीये. आत्ताच मनिषलाही मी याबाबत हा प्रतिसाद लिहिला आहे...:)

मी लोकांच्या हस्ताक्षराचा नमुना मागवण्याचा आरंभशूरपणा केला खरा! पण आता जरा कामाच्या गडबडीत अडकलो आहे त्यामुळे हवा तसा निवांतपणाही मिळत नाहीये.

मात्र आज ना उद्या मी माझं प्रॉमिस नक्की पुरं करीन. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ज्या मंडळींनी मला त्यांच्या हस्ताक्षराचे नमुने पाठवले त्या सर्व मंडळींची झालेल्या विलंबाबद्दल तूर्तास जाहीर क्षमा मागत आहे. चुकलंच माझं तिच्यायला! :)

सध्या जरा संगीतावरचा एक लेख, व रौशनीचा पुढचा भाग पूर्ण करायच्या मागे आहे तेवढं पूर्ण करतो आणि मग पुन्हा हस्ताक्षराकडे वळतो.

महेन्द्रशेठ, हे उपहासात्मक लेखन करून तू माझे कान पिळलेस हे योग्यच झाले! :)

एक साधारण सदस्य

असो..:)

आपला,
(अजून एक साधारण सदस्य) तात्या.

लबाड बोका's picture

6 Oct 2007 - 6:53 pm | लबाड बोका

...मात्र आज ना उद्या मी माझं प्रॉमिस नक्की पुरं करीन. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ज्या मंडळींनी मला त्यांच्या हस्ताक्षराचे नमुने ...पाठवले त्या सर्व मंडळींची झालेल्या विलंबाबद्दल तूर्तास जाहीर क्षमा मागत आहे. चुकलंच माझं तिच्यायला! :)

तात्या
तात्या तुम्हारा चुक्याच
अब जल्दि सहि पढो
और हमकु बोलो की क्या है क्या नही है

धर्मराजमुटके's picture

27 Jun 2017 - 4:34 pm | धर्मराजमुटके

अरे ? काय विचित्र धागे असतात एक एक ?