स्त्री ची आज पर्यंतची प्रतिमा : एक साधकबाधक चर्चा
णमस्कार्स ल्लोक्स ,
आज चित्राताई चा स्त्रीमुक्ती वरचा एक सुंदर लेख वाचला. लेखाचं वैशिष्ट्य असं होतं की तो संतुलित होता, त्यात टिआरपीसाठी प्रक्षोभक असं काही नव्हतं , आणि मुख्य म्हणजे ते अतिशयोक्तिपुर्ण किंवा तिखटमिठ लावलेलं नसल्याने तुमच्या आमच्या पहाण्यातलं होतं . पण त्यावरचे काही काही प्रतिसाद पाहुन आमची अंमळ करमणुक झाली हा भाग निराळा :) ते प्रतिसाद जर खरे ठरले तर किती लग्न टिकतील ह्यावर देखिल शंका उत्पण्ण होते. नशिब आपलं की ह्या सगळ्या चर्चा फक्त वांझोट्याच असतात आणि कोणी हुशार इथले प्रतिसाद वाचुन त्याच्यावर अंमल करत नाही ( नसावा , कारण मिपामुळे काही झाल्याचं अजुन ऐकिवात नाही )
हं तर आमच्या चर्चेचा मुद्दा असा आहे की आजवर स्त्रीला लै दडपलं गेलं , तिच्यावर घोर , कृर आणि निर्दयी , अमानुश , पाषवी ( अजुन काय असेल ते ) प्रकारचे खुप अन्याय झालेले आहेत. आणि आजवर बहुतांश स्त्रीया भयंकर पिडीत् आहेत असे निष्कर्ष त्या प्रतिसादांतुन निघालेत. पण आपण बर्याचदा पहातो की उपहासाने का होईना कधीकधी फॅक्ट्स बाहेर पडतातंच . पुष्कळदा नवरोबांवर त्यांच्या डॉमिनेटींग बायकांची असणारी हुकुमत , नवरोबा अगदी पायातले ( की ताटाखालचे जे काय असेल ते ) मांजर आहे , त्याला बिचार्याला बायको समोर तोंड उघडण्याची हिम्मत / परवाणगी नाही . बायको चं नाव ऐकताच त्याला हिवाळ्यात घाम फुटतो किंवा अजुन जे काही असेल ते . ह्या प्रकारचे विनोद आपण टीव्हीवर , मिपावर , रेडिओ वर , हसरी सकाळ मधे किंवा आजचा विनोद मधे वाचतो पहातो . ह्यात काही तथ्य्य आहे का ? पाल चुकचुकण्याचे कारण असे की मिसळपावरील महिला मंडळ हे स्वत:च्या अस्तित्वासाठी , हक्कांसाठी आणि विचारांसाठी एकदम स्वतंत्र आहे ( नक्की खरं काय दिखावा काय ते त्याच जाणोत ) असे दिसते , त्यामुळे आजची स्त्रीची प्रतिमा म्हातारीच्या जाडभिंगाच्या चष्म्यातुन दिसते तशी आहे का ? हे बायका डॉमिनेट आहेत दाखवणारे किस्से मी अगदी बालपणापासुन ऐकत आलो आहे त्यामुळे ही काही अलिकडचीच गोष्ट आहे असे म्हणता येणार नाही.
तुम्हाला काय वाटते ? स्त्रीया डॉमिनेटिंग असतात की नाही ? नवरोबाला खेळणं बणवतात की नाही ? नवरोबांना बायकोच्या विचारांनीच धडकी भरते की नाही ? एक साधकबाधक चर्चा अपेक्षित आहे. :)
टिप : जास्त सिरियसली घेऊ नका. रक्तदाब वाल्यांनी चर्चेपासुन दुर रहावे ;)
(साधकबाधक चर्चा प्रेमी) टारझन चर्चील
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जाऊ दे!
कोणाची?
विनोदाचा प्रयत्न चांगला आहे, पण...
धन्यवाद श्री पंगा-जी आपल्या
सध्या किति टन हुरुप जमा
स्त्रीया डॉमिनेटिंग असतात की
स्त्रीचं डॉमिनेशन माहेरच्या