तंदुर चिकन

जागु's picture
जागु in पाककृती
5 Jan 2011 - 4:14 pm

बर्‍याच जणांचा मार्गशिर्ष महिना सुटला असणार म्हणून दाबुन ठेवलेली रेसिपी आज वर आणत आहे.

लागणारे जिन्नस:
चिकन लेग पिस गरजे नुसार लागतील तेवढे.

मॅरीनेड करण्या साठी :
घट्ट दही (अंदाजे दोन लेग पिस साठी १ चमचा)
लिंबु रस
आल, लसुण, पुदीना पेस्ट
मिठ
लाल तिखट
गरम मसाला

रंग हवा असल्यास तंदुर कलर किंवा कश्मिरी मिरची पावडर.

तळण्यासाठी
बटर किंवा तेल

सजावटीसाठी
कांद्याच्या रिंग, कोथिंबीर, लिंबाच्या फोडी.

क्रमवार पाककृती:
चिकन लेग पिस ला दोन्ही बाजुनी सुरीने तिन चार तिरक्या चिरा पाडा.

मॅरीनेड करण्याचे साहित्य चिकनला लावा व तिन ते चार तास मुरत ठेवा (फ्रिजमध्ये सकाळी ठेउन संध्याकाळी केले तरी चालेल).

मुरल्यावर तेल लावलेल्या काचेच्या ट्रे मध्ये किंवा मायक्रोवेव्ह नॉनस्टीक तव्या मध्ये पिसेस ठेवा. वरुन पातळ केलेले बटर सोडा.

ट्रे हाय रॅकवर ठेवा. कॉम्बीनेशन (मायक्रोवेव्ह पॉवर ५०% + कन्व्हेक्शन २१० डिग्री) वर ८-१० मिनिटे चिकन ब्राउन होईपर्यंत ठेवा. ट्रे बाहेर काढा.

सुरीने टोचुन पाहा. शिजलेले असेलच मग पिसेस उलटे करुन दुसर्‍या ट्रे मध्ये ठेवा कारण चिकनचे पाणी ट्रेमध्ये साठलेले असते. जर दुसरा ट्रे नसेल तर ते पाणी काढुन टाका. पिसेस उलटे करुन वरुन परत बटर सोडा. पॅन हाय रॅक वर ठेवा व ६-७ मिनीटे वरुन ब्राउन होईपर्यंत ग्रिल करा. झाली तयार तंदुरी.

जर पेशन्स असतील तर आता पिसेस डिश मध्ये काढा. वरुन कोथिंबीर घाला, कांद्याच्या रिंग्ज व लिंबाच्या फोडी बरोबर सर्व्ह करा.

ह्या फोटो चा फडशा पाडावासा वाटतो की नाही ?

अधिक टिपा:
वरिल रेसिपी मायक्रोवेव्ह मधिल आहे. जर मावे नसेल तुम्ही निखार्‍यावर किंवा तव्यात तेल टाकुन फ्राय करु शकतात.
मॅरीनेड करताना कसुरी मेथिही टाकता येते.

प्रतिक्रिया

पियुशा's picture

5 Jan 2011 - 4:19 pm | पियुशा

सोल्लिड हा !मस्त आहे !
यम्मि
शाकाहारि बकरि :)

दिपक's picture

5 Jan 2011 - 4:22 pm | दिपक

यशोधरा's picture

5 Jan 2011 - 4:23 pm | यशोधरा

अल्लाऽऽऽऽऽ जीव घेतला! ;)

गणपा's picture

5 Jan 2011 - 4:24 pm | गणपा

लहान पोरांसारखे लाळेरे बांधण्याची वेळ आली..

पुन्हा एकदा छळ..

तरी बरे..सहज मिळू शकेल अशी चीजवस्तू आहे.

नाहीतर काहीतरी अनवट पाकृ दाखवून जीभ खवळवतात आणि ती बाहेर कुठे मिळतही नाही..

(भुकेला) गवि.

खादाड अमिता's picture

5 Jan 2011 - 5:44 pm | खादाड अमिता

+१

आजच चिकन आणायला चाललेली,

अमिता

सगळ्यांनी वाटून घ्या एक एक पिस.

कै संबंध जागू? मी कधीच सगळे ताट उचलून नेले आहे! :D

मग आता सगळे तुझ्या मागे धावतील.

परिकथेतील राजकुमार's picture

5 Jan 2011 - 5:23 pm | परिकथेतील राजकुमार

जागुतैची पाकृ म्हणुन उघडून बघितली.

शाकाहारी

पर्नल नेने मराठे's picture

5 Jan 2011 - 5:27 pm | पर्नल नेने मराठे

+१

शाकाहारी

+१ शाकाहारी
प्रेषक पर्नल नेने मराठे दि. बुध, 05/01/2011 - 17:27.
+१

शाकाहारी


हो शाकाहारी चिकनच घ्यायचे. नाहितरी हल्ली पोल्ट्रीतल्या कोंबड्याना शाकाहारी चिकनफीडच देतात

सहज's picture

5 Jan 2011 - 6:00 pm | सहज

सहीच!!

बाकी आजकालच्या मायक्रोव्हेवमधे तंदूर चिकन, स्ट्यु, फिश, राईस, व्हेज असे रेडीमेड ऑप्शन असतात ते बरे आहे. कुठल्या तापमानाला किती मिनटे वगैरे वगैरे जास्त लक्ष द्यावे लागत नाही.

सुनील's picture

5 Jan 2011 - 6:06 pm | सुनील

अहाहा!!

अर्धवट शिजलेले चिकन आतून फिक्कट गुलाबी दिसते ते पूर्ण पांढरे होईपर्यंत बेक करायचे ना?

पिसेस उलटे करण्यापूर्वी ट्रेमध्ये साठलेले पाणी टाकून का बरे द्यायचे?

स्मिता.'s picture

5 Jan 2011 - 6:20 pm | स्मिता.

कसे कसे कसे पेटले आहेत मिपावर सगळेच!
जागुताई, पाकृ तर खासच... ते फोटो बघून तों पा सु मुळे जास्त बोलणं शक्यच नाही.

अवलिया's picture

5 Jan 2011 - 6:23 pm | अवलिया

काय बोलु? शब्दच संपले !!

भन्नाट!!! जागु लय भारी पाकृ. :)

एक मात्र मान्य करायला हवे. या गणपामुळे मिपावरील सगळ्या सुगरणी आणि बल्लवाचार्य प्रत्येक पाकृच्या तयार डिश चा फोटो न देता.. स्टेप बाय स्टेप फोटो द्यायला लागले आहेत. पाकविश्वात ही क्रांतीच (कवयित्री नव्हे) म्हणावी. ;)

गणपा's picture

5 Jan 2011 - 7:03 pm | गणपा

प्राजु ताई हा पायंडा पाडणारा पामर मी नाही.
ही परंपरा आद्यगुरु पांथस्थांनी चालु केली आहे :)

देवदत्त's picture

5 Jan 2011 - 7:11 pm | देवदत्त

सोपे आणि मस्त.
काही महिन्यांपूर्वी मी तंदूरी चिकनची (आणि इतरही) पाककृती शोधत होतो. पण नाही मिळाली. मग स्वतःच शॉर्टकट काढला.

त्याची माहिती मग माझ्या अनुदिनीवर लिहिली. :)

वेताळ's picture

5 Jan 2011 - 8:01 pm | वेताळ

आजकाल दोन आठवडे झाले चिकनच खात आहे. आता हे रविवारी करुन बघतो.

sneharani's picture

5 Jan 2011 - 8:06 pm | sneharani

जागुताई मस्त पाकृ. अन् आवडती डिशसुध्दा!
:)

पिंगू's picture

5 Jan 2011 - 10:17 pm | पिंगू

युनिव्हर्सल निशेध.. जागुतायच्या ह्या पाककृतीचा तमाम शाकाहारी मिसळप्रेमींकडून निशेध करण्यात येत आहे...

- पक्का शाकाहारी पिंगू

शाकाहारींनी वांग्याची, भोपळ्याची तंदुरी करावी.

सुनील तंदुरी ही ड्राय असते. म्हणून पाणी काढायचे.

चिंतामणी's picture

8 Jan 2011 - 11:35 pm | चिंतामणी

जास्त लिहू शकत नाही कारण जेवण झाल्यावरसुध्दा भूक लागली फोटो बघून.

७वा फोटो एकदम कातील. खल्लास.

(खायला तुझ्याकडेच यावे लागेल.)

लालगरूड's picture

22 Jun 2015 - 1:13 pm | लालगरूड

एक नंबर