तंदुर चिकन
बर्याच जणांचा मार्गशिर्ष महिना सुटला असणार म्हणून दाबुन ठेवलेली रेसिपी आज वर आणत आहे.
लागणारे जिन्नस:
चिकन लेग पिस गरजे नुसार लागतील तेवढे.
मॅरीनेड करण्या साठी :
घट्ट दही (अंदाजे दोन लेग पिस साठी १ चमचा)
लिंबु रस
आल, लसुण, पुदीना पेस्ट
मिठ
लाल तिखट
गरम मसाला
रंग हवा असल्यास तंदुर कलर किंवा कश्मिरी मिरची पावडर.
तळण्यासाठी
बटर किंवा तेल
सजावटीसाठी
कांद्याच्या रिंग, कोथिंबीर, लिंबाच्या फोडी.
क्रमवार पाककृती:
चिकन लेग पिस ला दोन्ही बाजुनी सुरीने तिन चार तिरक्या चिरा पाडा.
मॅरीनेड करण्याचे साहित्य चिकनला लावा व तिन ते चार तास मुरत ठेवा (फ्रिजमध्ये सकाळी ठेउन संध्याकाळी केले तरी चालेल).
मुरल्यावर तेल लावलेल्या काचेच्या ट्रे मध्ये किंवा मायक्रोवेव्ह नॉनस्टीक तव्या मध्ये पिसेस ठेवा. वरुन पातळ केलेले बटर सोडा.
ट्रे हाय रॅकवर ठेवा. कॉम्बीनेशन (मायक्रोवेव्ह पॉवर ५०% + कन्व्हेक्शन २१० डिग्री) वर ८-१० मिनिटे चिकन ब्राउन होईपर्यंत ठेवा. ट्रे बाहेर काढा.
सुरीने टोचुन पाहा. शिजलेले असेलच मग पिसेस उलटे करुन दुसर्या ट्रे मध्ये ठेवा कारण चिकनचे पाणी ट्रेमध्ये साठलेले असते. जर दुसरा ट्रे नसेल तर ते पाणी काढुन टाका. पिसेस उलटे करुन वरुन परत बटर सोडा. पॅन हाय रॅक वर ठेवा व ६-७ मिनीटे वरुन ब्राउन होईपर्यंत ग्रिल करा. झाली तयार तंदुरी.
जर पेशन्स असतील तर आता पिसेस डिश मध्ये काढा. वरुन कोथिंबीर घाला, कांद्याच्या रिंग्ज व लिंबाच्या फोडी बरोबर सर्व्ह करा.
ह्या फोटो चा फडशा पाडावासा वाटतो की नाही ?
अधिक टिपा:
वरिल रेसिपी मायक्रोवेव्ह मधिल आहे. जर मावे नसेल तुम्ही निखार्यावर किंवा तव्यात तेल टाकुन फ्राय करु शकतात.
मॅरीनेड करताना कसुरी मेथिही टाकता येते.
वाचने
12887
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
सोल्लिड हा !मस्त आहे
(विषय दिलेला नाही)
अल्लाऽऽऽऽऽ जीव घेतला!
(विषय दिलेला नाही)
लहान पोरांसारखे लाळेरे
In reply to लहान पोरांसारखे लाळेरे by गवि
लाळेरे बांधण्याची वेळ आली..
सगळ्यांनी वाटून घ्या एक एक
In reply to सगळ्यांनी वाटून घ्या एक एक by जागु
कै संबंध जागू? मी कधीच सगळे
मग आता सगळे तुझ्या मागे
जागुतैची पाकृ म्हणुन उघडून
In reply to जागुतैची पाकृ म्हणुन उघडून by परिकथेतील राजकुमार
+१ शाकाहारी
+१ शाकाहारी प्रेषक पर्नल नेने
सहीच!
छान
कसे कसे कसे
काय बोलु? शब्दच संपले !!
भन्नाट!!! जागु लय भारी पाकृ.
In reply to भन्नाट!!! जागु लय भारी पाकृ. by प्राजु
तो मी नव्हेच...
सोपे आणि मस्त. काही
मस्त ग जागु....
मस्त
युनिव्हर्सल निशेध..
शाकाहारींनी वांग्याची,
भन्नाट
एक नंबर