एक संवाद

लेखक: विजुभाऊ जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
पती पत्नींच्या तक्रारीचे धागे वाचून एक संवाद आठवला पति-आज काय करणार आहेस जेवणात? पत्नी- तुम्ही सांगा फर्माइश. काय खायचा मुड आहे ते "फारशी काही भूक नाही. आमटी अन भात बनव फक्कडसा . आई करायची तशी चिंच गुळाची" ' काल तर केला होती तसली आमटी अन भात' ' मग पोळी अन बटाट्याची भाजी बनव काचर्‍यांची ' ' अहो मुलाना नाही आवडत नुसती पोळी भाजी ' ' मग वांगे भात बनव सोबत?' ' वांगी भात ? वातूळ होते ' ' भाकरी अन पिठले?' ' पिठले रात्री खात नाहीत' ' ठीक आहे मग बाहेरच जाउयात ?' ' रोज रोज काय खायचे बाहेर. शिवाय मुलाना सकाळची शाळा आहे.. ' ' इडली सांबार?' ' अगोदर नाही का सांगायचे, निदान इडलीचे पीठ तरी भिजवले असते ' ' मॅगी असेल तरी चालेल. मी वाटाणे सोलतो झकास होईल बघ. मस्त अन लाईट' ' मॅगी ??? तुम्हीच नन्तर अर्ध्या रात्री डबे शोधत बसता. भूक लागली म्हणून ' मग काय करतेस?' ' तुम्ही सांगा ना... ' ( नवरोबा; कपाळावर ठ्या...प करून हात मारल्याची स्मायली ड्रॉइंग रूम मध्ये शोधतात.....) ( बायको ;कन्फ्यूज झाल्याची स्मायली पिठाच्या डब्यातून बाहेर काढते......)

धुमकेतू यांनी 28/12/2010 - 17:53 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

अशा प्रकारचे संभाषण लांबवायचे नसेल तर एक हुकमी वाक्य टाकायचे " काहीही कर गं , तुझ्या हाताला अप्रतिम चव आहे :)" फक्त काळजी एवढीच घ्या की रात्री डबे शोधताना आवाज होऊ देऊ नका ! :) ही ही ही ही

चिंतामणी यांनी 28/12/2010 - 18:04 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

घरोघरी मातीच्या चुली.

धमाल मुलगा यांनी 28/12/2010 - 18:10 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

उत्तरः तूच ठरव. मी चाललोय मित्रांना भेटायला..खाणं-'पिणं' बाहेरच होईल. :P (टीपः हे उत्तर स्वतःच्या जबाबदारीवर देणे. फटके पडल्यास बोंबलत आमचेकडे येऊ नये.)

धुमकेतू यांनी 28/12/2010 - 18:13 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by धमाल मुलगा

Permalink

धमु , फटके न पडता तु असे उत्तर जर तु तुझ्या बायकोला देऊ शकत असशील तर खरच तु खूप नशीबवान आहेस !!!!! :)

आमचे जहाँपनाह (तिर्थरुप) आणि अम्मीहुजूर जेव्हा इकडं येतात आणि नेमका मी एखाद्या दिवशी 'टाकीला' गेलो असेन तर परत आल्यावर पार्किंगमधून फोन केला की कारभारीण हळुच दार उघडून घरात घेते आणि शांतपणे झोपवते. तशी गुणाची आहे हो माझी होम मिनिष्टर. :)

धुमकेतू यांनी 28/12/2010 - 18:38 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by धमाल मुलगा

Permalink

आमच्या कडे अशा प्रसंगी "गडाचे दरवाजे बंद झाल्याचा" खलिता हमखास येतो !!!! नशिबाचे खेळ ...चालायचेच ....

धुमकेतू यांनी 29/12/2010 - 11:05 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by धमाल मुलगा

Permalink

अशा प्रसंगी " तहाच्या अटी आणि शर्ती " मान्य करून घेऊन आणि वदवून घेऊन आमच्या युवराणी चोर वाटेने प्रवेश देतात !!! :)

मुलूखावेगळी यांनी 28/12/2010 - 18:29 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

कदाचित तुम्ही खिचडी (जमल्यास कढी+ पापड)कर असे म्हणाले असता तर प्रश्न मिटला असता नेक्स्ट टाइम ट्राय करुन बघा खिचडी आवडत असेल तर ;).

गणेशा यांनी 28/12/2010 - 18:43 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

आवडले

निनाद मुक्काम … यांनी 29/12/2010 - 10:36 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

चल हॉटेलात जाऊ नाही तर होम दिलेवरी मागवू काहीतरी .रोज रोज स्वयंपाक करून दमत असशील ना ?( आणि रोज रोज भांडी घासून मला देखील कंटाळा येतो )

निनाद मुक्काम … यांनी 29/12/2010 - 10:40 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

चल आज दोघे मिळून स्वयंपाक करूया .(मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा ) ताटाखालचा ........मुकाम पोस्ट

विजुभाऊ यांनी 29/12/2010 - 10:37 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

तीची बहुधा तीच अपेक्षा असते. पण तीने ते केले तर पतीमहोदय बहुतेक टोमणे मार्तील म्हणून तीला त्याच्याकडून वदवून घ्यायचे असते. जय खीचडी ,कढी ,पापड, अमसुलाचे सार, लिम्बाचे लोणचे

दिपक यांनी 29/12/2010 - 11:14 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

चिऊ आणि काऊ ती - किती उशीर? तो - उशीर? मी वेळेवरच आलोय. माझ्या वेळेवर. ती - मग तुझी वेळ सांगायची की मला. मीही त्याच वेळेवर आले असते. तो - बरं. ती - फक्त बरं? तो - आता बरं म्हटलं तरी प्रॉब्लेम? मी जर सांगितलं असतं की ट्रॅफिक खूप होता, किंवा बस उशिरा आली, किंवा बॉसने सोडलाच नाही, तरीही तुला पटलं नसतं. हो की नाही? म्हणून बरं म्हणालो. ती - कसला अनरोमँटिक आहेस रे तू? तो - म्हणजे कसा? ती - माझ्या मैत्रिणीचा बॉय फ़्रेंड उशीरा आला ना पाच मिनिटं जरी तरी तिच्यासाठी चॉकलेट्स आणि फुलं आणतो. तो - डोकं फिरलंय त्याचं? ती - त्याचं की तुझं? तो - त्याचंच. चॉकलेटं खाऊन दात खराब होतात इतकी साधी गोष्ट कळू नये त्याला? ती - हो रे बाबा. चॉकलेटं खाऊन दात खराब होतात आणि फुलं देऊन काय खराब होतं? तो - नाही. ती - मग? दोन वर्ष झाली आपण भेटतोय, पण तू मला एकदाही फुलं देऊ नयेस? अगदीच हा आहेस तू. तो - हा? मी? अरे चांगला फुलांचा गुच्छ घ्यायचा तर किमान पंचवीस रुपये लागणार. ती - इ.... असा कसा रे तू? पंचवीस रुपयात हल्ली एखादं फुल येतं, गुच्छ नाही. तो - हो का? मी सकाळी देवाची फुलांची पुडी आणायला जातो ती पांच रुपयांना पडते. म्हटलं गुच्छ साधारण पांच पट असेल म्हणजे पंचवीस रुपये. ती - अरे देवा तो - आणि मी तुला फुलं देणार त्याचा तू दोन मिनिटं वास घेणार, जमलंच तर एखादं फूल डोक्यात घालणार आणि मग त्यांचं आयुष्य संपणार. म्हणजे सगळे पैसे फुकट. त्यापेक्षा आपण एखाद्या हॉटेलात जाऊ, एक साधा डोसा अर्धा अर्धा खाऊ. तेवढाच आपल्या डेव्हलपमेंटला हातभार. ती - बरं तो - असं काय गं चिऊ. चिडतेस काय? ती - मग काय? मलाही असं वाटतं की माझ्या बॉयफ्रेंडने रोमँटिक वागावं. तो - अगं मला जमत नाही ना. तू मला सांग, पार्काला पंचवीस फेऱ्या मार, मारीन. सिंहगड दिवसात दोन वेळ चढून उतर. उतरीन. पण हे फुलं बिलं मला सांगू नकोस हां. ती - बरं जा पार्काला पंचवीस फेऱ्या मार. तो - आता? ती - हं आता. तो - बरं जातो. ती - ए काऊ थांब रे. तो - एकदा म्हणते फेऱ्या मार एकदा म्हणते थांब. ती - हं. तू ना गाढव आहेस. मी गंमत गेली रे. तो - बरं तू गाढवी आहेस. अशी गाढवासारखी गंमत कशी केलीस. मला वाटलं आता खरंच पंचवीस फेऱ्या. ती - काऊ तू मला खूप आवडतोस. तो - मला माहितेय. ती - काव्या! तुला किती वेळा सांगितलं, मी तू मला आवडतोस असं म्हटलं की तूही तसंच म्हणायचं. तो - बरं. ती - अरे आता म्हण. तो - चिऊ तू मला खूप..... शी! हे असं कृत्रिम वाटतं. असं काय सतत आवडतेस आवडतेस करायचं? तुला माहितेय की तूच मला आवडतेस आणि आणखी कुणी नाही, मग पुन्हा पुन्हा का बोलायला लावतेस. ती - असं काय रे काऊ. म्हण ना रे. तो - बरं. ती - ... तो - चिऊ तू मला खूप खूप आवडतेस. इतकी की मला ते तुला कसं सांगावं हेच सुचत नाही. म्हणून मी तुला पुन्हा पुन्हा हे सांगत नाही. आता सुचलंच आहे तर ऐकून घे. ती - ऐकलं. काऊ, तूही मला खूप आवडतोस. तो - चल आता फुलांचे पंचवीस रुपये वाचले त्याचा डोसा खाऊया. ती - चल.
साभार- कोहम्?‌

एकंच नंबर संवाद :) अगदी जवळचा वाटणारा. धन्यवाद दिपक :) -(म्हसालाढॉसा प्रेमी) काऊ

वा वा... काय लिहीलय! स्वगतः आम्हाला अशी चिऊ मिळू दे. आणि आमचाही तिच्याशी असा संवाद होऊ दे ना रे देवा :)

हा..हा.... म्हणजे हा सार्वत्रिक प्रश्न आहे तर.... आणि मला वाटत होतं इतके दिवस.... आपलंच नशीब खराब्...म्हणून असलं अनरोमँटिक ध्यान मिळालंय... (माझ्या काऊ ची) चिऊ

विजुभाऊ यांनी 29/12/2010 - 11:33 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

स्वगतः आम्हाला अशी चिऊ मिळू दे. आणि आमचाही तिच्याशी असा संवाद होऊ दे ना रे देवा तीच चिऊ नन्तर अरे ऐकलस का....तांदळाचे दाणी संपलेत घेऊन ये. असे म्हणते किंवा ....तुम्हाला बरोबर बाहेर पार्टीला जायच.... तुम्ही बाहेरच्या खोलीतून बोलावता. चिउ....चिउ.... दार उघड ती म्हणते " थांब माझ्या गालाला पावडर लाऊ दे" तुम्ही बाहेरच्या खोलीतून थोड्यावेळाने पुन्हा बोलावता. चिउ....चिउ.... दार उघड ती म्हणते " थांब माझ्या ओठाला लिपस्टीक लाउ दे" तुम्ही बाहेरच्या खोलीतून थोड्यावेळाने पुन्हा बोलावता. चिउ....चिउ.... दार उघड ती म्हणते "थांबा माझ्या डोळ्याना लायनर लावू दे" तुमचे घर तुमच्या घामाच्या धारानी वाहून जायच्या बेतात असते. चिउ आपली मग्न असते स्वतःच्याय आरशात

=)) =)) =)) =)) विजुवाउ एकदम फुल्ल फार्ममधे ? विजुभाऊंचा हा संवाच वाचुन णोस्टॅल्जिक झालो :) थोडी गंमत : बाकी विजुभाउ एकदा त्यांच्या चिउ वर चिडले होते म्हणे .. का तर .. विजुकाऊ म्हणाले = चिउ चिउ दार उघड चुऊ म्हणे = थांब माझ्या केसाला कंग्वा करु दे ..

>>विजुभाउ एकदम फुल्ल फार्ममधे ? +१, हेच म्हणतो. थोडक्यात नेम चुकला, नायतर आमचे विजुभाऊ दुसरे 'व.पु.काळे'च व्हायचे. - छोटा डॉन

टारझन यांनी 29/12/2010 - 11:47 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by छोटा डॉन

Permalink

बरं झालं नेम चुकला गड्या .. नाय तर विजुभाउ दुसरे 'सुकाळे' झाले असते तर काय घेतलं असतं ?

वापरातल्या पिवळट पडलेल्या काळपट बनियनसारखंच असलेलं कोमट मध्यमवर्गीय वास्तव किती सहजतेनं मांडलंत! भारावलोय मी आपल्या ह्या लेखनानं.

विजुभाऊ यांनी 29/12/2010 - 14:59 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

वापरातल्या पिवळट पडलेल्या काळपट बनियनसारखंच असलेलं कोमट मध्यमवर्गीय वास्तव किती सहजतेनं मांडलंत! भारावलोय मी आपल्या ह्या लेखनानं. नवर्‍याच्या पिवळ्या पडलेल्या गंजीफ्रॉक ची पर्वा न करता जी त्याच्या कुशीत शिरते तीच त्याची वहीदा:- व. पु. ती : अरे तुझा बनीयन किती पिवळा दिस्तोय. तो: अग बाहेरचा रस्त्यावर स्ट्रीट लाइटच्या दिव्यामुळे तसे दिसतय. ती: कळतात बरे मला टोमणे. तो : ( मनातल्या मनात) या असल्या वेळी बायकोला टोमणे मारायचे नसतात हे प्रत्येक विवाहीत पुरुषाला अनुभवाने माहीत असते ( उघड) टोमणे कशाला मारू.... त्या दिव्याच्या सोनेरी उजेडात बघ सगळे घर सोनेरी दिसतय. आपल्याकडे सोने नसले म्हणून काय झाले. मने तर सोन्यासारखी निख्खळ आहेत. बघ्ना तुझ्या चेहेर्‍यावरून सोनेरी आनन्द झळझळून वहातोय ती: हम्म.....