एक संवाद
पती पत्नींच्या तक्रारीचे धागे वाचून एक संवाद आठवला
पति-आज काय करणार आहेस जेवणात?
पत्नी- तुम्ही सांगा फर्माइश. काय खायचा मुड आहे ते
"फारशी काही भूक नाही. आमटी अन भात बनव फक्कडसा . आई करायची तशी चिंच गुळाची"
' काल तर केला होती तसली आमटी अन भात'
' मग पोळी अन बटाट्याची भाजी बनव काचर्यांची '
' अहो मुलाना नाही आवडत नुसती पोळी भाजी '
' मग वांगे भात बनव सोबत?'
' वांगी भात ? वातूळ होते '
' भाकरी अन पिठले?'
' पिठले रात्री खात नाहीत'
' ठीक आहे मग बाहेरच जाउयात ?'
' रोज रोज काय खायचे बाहेर. शिवाय मुलाना सकाळची शाळा आहे.. '
' इडली सांबार?'
' अगोदर नाही का सांगायचे, निदान इडलीचे पीठ तरी भिजवले असते '
' मॅगी असेल तरी चालेल. मी वाटाणे सोलतो झकास होईल बघ. मस्त अन लाईट'
' मॅगी ??? तुम्हीच नन्तर अर्ध्या रात्री डबे शोधत बसता. भूक लागली म्हणून
' मग काय करतेस?'
' तुम्ही सांगा ना... '
( नवरोबा; कपाळावर ठ्या...प करून हात मारल्याची स्मायली ड्रॉइंग रूम मध्ये शोधतात.....)
( बायको ;कन्फ्यूज झाल्याची स्मायली पिठाच्या डब्यातून बाहेर काढते......)
वर्गीकरण
अशा प्रकारचे संभाषण लांबवायचे नसेल तर एक हुकमी वाक्य टाकायचे ..
हे हे हे.
खॅ खॅ खॅ!!!
In reply to खॅ खॅ खॅ!!! by धमाल मुलगा
धमु , फटके न पडता तु असे उत्तर जर तु तुझ्या बायकोला देऊ शकत ....
In reply to धमु , फटके न पडता तु असे उत्तर जर तु तुझ्या बायकोला देऊ शकत .... by धुमकेतू
हा हा हा!
In reply to हा हा हा! by धमाल मुलगा
नशिबाचे खेळ ...चालायचेच ....
In reply to नशिबाचे खेळ ...चालायचेच .... by धुमकेतू
बोंबला!
In reply to बोंबला! by धमाल मुलगा
अशा प्रसंगी " तहाच्या अटी आणि शर्ती " मान्य करून घेऊन आणि वदवून
कदाचित तुम्ही खिचडी (जमल्यास
आवडले
चकूल्या कराय्ला सांगा
मुगाची खिचडी, कढी, पापड आणि
चल हॉटेलात जाऊ नाही तर होम
चल आज दोघे मिळून स्वयंपाक
तीची बहुधा तीच अपेक्षा असते.
असा संवाद जास्त आवडतो.. :-)
In reply to असा संवाद जास्त आवडतो.. :-) by दिपक
एकंच नंबर संवाद अगदी
In reply to असा संवाद जास्त आवडतो.. :-) by दिपक
वा वा... काय लिहीलय! स्वगतः
In reply to असा संवाद जास्त आवडतो.. :-) by दिपक
सिंप्ळी वंडरफुळ्ळ!
In reply to असा संवाद जास्त आवडतो.. :-) by दिपक
हा..हा.... म्हणजे हा
स्वगतः आम्हाला अशी चिऊ मिळू
In reply to स्वगतः आम्हाला अशी चिऊ मिळू by विजुभाऊ
=)) =)) =)) =)) विजुवाउ
In reply to =)) =)) =)) =)) विजुवाउ by टारझन
+१
In reply to +१ by छोटा डॉन
बरं झालं नेम चुकला गड्या ..
In reply to स्वगतः आम्हाला अशी चिऊ मिळू by विजुभाऊ
भाऊ भाऊ....
वापरातल्या पिवळट पडलेल्या