✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अंतर्धान अस्तित्व माझे ...

ग — गणेशा, Fri, 12/24/2010 - 16:27
जीवणाच्या भावगर्दित मेहमान अस्तित्व माझे बसू कसा पंक्तीत तुमच्या, बदनाम अस्तित्व माझे निसर्गाच्या चक्रात अडकले सूर्य,चंद्र,तारे भावनांच्या बाजारात, बंदिवान अस्तित्व माझे घायाळ नजर शोधती, ओळखीच्या खानाखुना आसवांच्या गावात, गुमनाम अस्तित्व माझे माणसांच्या कल्लोळात हरविले मनाचे स्वैर बंध भासांच्या ताटव्यात, सुनसान अस्तित्व माझे सुगंधाच्या मायाजाळात अडकली फ़ुलपाखरे झुगारले नभाला असे, बेगुमान अस्तित्व माझे रात्रीस, सांजवेळी साद घालतो जख्मी सूर्य झाकोळले अंधारात, दीपमान अस्तित्व माझे छप्परविरहीत घरट्यात उभ्या असंख्य भिंती नभांकणात विखुरले, बेभान अस्तित्व माझे स्वरविरहीत शब्दांचे उठते निशब्द काहूर विचारांच्या भोवर्‍यात अंतर्धान अस्तित्व माझे -------- शब्दमेघ

प्रतिक्रिया द्या
895 वाचन

💬 प्रतिसाद (1)

निसर्गाच्या चक्रात अडकले

प्रकाश१११
Fri, 12/24/2010 - 16:54 नवीन
निसर्गाच्या चक्रात अडकले सूर्य,चंद्र,तारे भावनांच्या बाजारात, बंदिवान अस्तित्व माझे घायाळ नजर शोधती, ओळखीच्या खानाखुना आसवांच्या गावात, गुमनाम अस्तित्व माझे अगदी छान नि मस्त . खूप प्रतिक्रिया मिळतील. द्धो !! धो !!!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा