✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

"इकडचे" आणि "तिकडचे"..

ग
गवि यांनी
Fri, 12/10/2010 - 14:56  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
21412 वाचन

💬 प्रतिसाद (86)

प्रतिक्रिया

उत्तम चर्चाविषय...

छोटा डॉन
Fri, 12/10/2010 - 15:01 नवीन
उत्तम चर्चाविषय... ह्यावर मी मिभोकाका, अदिती, अवलिया, थत्तेचाचा, परा, तात्या, टारु, शिल्पा, घासकडवी गुर्जी, विजुभाऊ ह्यांचे मत वाचायला उत्सुक आहे. धागा बुकमार्क केला आहेच. :) चर्चा पुढे सरकेल तशी भर घालत जाईन :) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

डाणराव ... आपण नवसंपादक आहात

टारझन
Fri, 12/10/2010 - 15:37 नवीन
डाणराव ... आपण नवसंपादक आहात तसेच जर्मणीला जाऊन आलेला आहात त्या न्यायाने आमचा नेता तुम्ही आहात .. तेंव्हा फटाक्याची वात तुम्हीच पेटवावी , असे सुचवु इच्छितो :) (काय म्हणालात ? फक्त वातंच आहे ? ) बाकी आमच्या अफ्रिकेतल्या नद्या फारंच सुंदर ! पोरी तर त्याहुन सुंदर !! काय त्यांचे छाण छाण स्वभाव आणि केवढं ते विशाल मन !! नाही तर तुमच्या भारतातल्या पोरी .. !! च्छ्या .. संकुचित स्वभाव आणि खडुस मनाच्या ... थोडा भाव दिला की लागल्या लगेच स्वतःला शिला समजायला !! मी अफ्रिकन मी इंडियन मी माणुस मी स्वच्छंदी मी असा असा मी पृथ्वीवरचा ! (च्यायला जमलं की ) - निदान मुक्काम पोष्ठ अफ्रिका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

जेनपती टारझनराव, हेहेहे.

गवि
Fri, 12/10/2010 - 15:43 नवीन
जेनपती टारझनराव, :) हेहेहे. जाम हसवलंत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

छे छे ...

छोटा डॉन
Fri, 12/10/2010 - 15:44 नवीन
छे छे, अहो टारबा आमचा लायकीच नाही बघा अशा विषयावर मत द्यायची. मी आत्ताच आमच्या अ‍ॅडमिनकडुन १०० पानी वही घेतली आहे, टिपणं काढुन घेईन एकेक सुंदर प्रतिसादातुन. असो, श्रीगणेशा तुमच्या प्रतिसादातुनच झाला. १. आफ्रीकन मुली सुंदर, छान छान स्वभावाच्या आणि विशाल मनाच्या असतात हे समजले. पुढे वाचतो आहेच :) अवांतर : 'इकडच्यां'बद्दल नंतर सवडीने ;) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

काय त्यांचे छाण छाण स्वभाव

नरेशकुमार
Fri, 12/10/2010 - 17:01 नवीन
काय त्यांचे छाण छाण स्वभाव आणि केवढं ते विशाल मन !! तुला काय फकस्त इशाल मनच दिस्लं का व्हय रं ? दुरद्रुश्टी नाय लेका तुला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

उत्तम चर्चाविषय... ह्यावर मी

परिकथेतील राजकुमार
Fri, 12/10/2010 - 16:12 नवीन
उत्तम चर्चाविषय... ह्यावर मी मिभोकाका, अदिती, अवलिया, थत्तेचाचा, परा, तात्या, टारु, शिल्पा, घासकडवी गुर्जी, विजुभाऊ ह्यांचे मत वाचायला उत्सुक आहे.
"इकडचे" आणि "तिकडचे" आमचे सर्वच मित्र भिकारचोट आहेत अशी भावना व्यक्त करुन मी आपली रजा घेतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

+१ हेच बोल्तो आणि रजा घेतो.

अवलिया
Fri, 12/10/2010 - 17:20 नवीन
+१ हेच बोल्तो आणि रजा घेतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

आमचे सर्वच मित्र भिकारचोट आहेत

कुंदन
Fri, 12/10/2010 - 17:42 नवीन
परत कधी भांडवल मागा लेकोहो तुम्ही. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

आधी दिलेले मिळाले का?

अवलिया
Fri, 12/10/2010 - 17:44 नवीन
आधी दिलेले मिळाले का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

परत कधी भांडवल मागा लेकोहो

परिकथेतील राजकुमार
Fri, 12/10/2010 - 17:46 नवीन
परत कधी भांडवल मागा लेकोहो तुम्ही.
मागुन मागुन थकलो पण हातात घंटा काही पडले नाही आश्वासनांशिवाय. मग आता आम्ही 'भिकारचोटच' म्हणणार ना? संतप्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

नावांचा क्रम?

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 12/10/2010 - 22:00 नवीन
मिभोकाका, अदिती, अवलिया, हा नावांचा क्रम वाचून हा प्रतिसाद गंभीरतेने घेतल्याचा पस्तावा होत आहे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

आयला मी म्हटलं सध्या

मेघवेडा
Fri, 12/10/2010 - 15:22 नवीन
आयला मी म्हटलं सध्या चाललेल्या खाद्ययात्रेत आणखी एका धाग्याची भर पडली की काय! छान लिहिलंय गवि. डान्यासारखंच म्हणतो. उत्तम चर्चाविषय.
  • Log in or register to post comments

+१

स्पा
Fri, 12/10/2010 - 15:27 नवीन
लेख आवडला शतकी धाग्यासाठी "आगाऊ " शुभेच्चा बाकी पोकोर्ण ( मक्याच्या कणसांचे बर्र का ) घेऊन झाडावर बसलेलो आहे....
  • Log in or register to post comments

मला हल्ली 'को' दिसत नाही रे

टारझन
Fri, 12/10/2010 - 15:53 नवीन
मला हल्ली 'को' दिसत नाही रे ... आणि त्या नंतर पांढरी शाई ... :) घ्या पोकोर्ण घेऊन बसा .. आणि ल्ह्या पांढर्‍या शाईत ! बाकी तुमच्या सहीत कार्यकारी अध्यक्ष च्या आधी "स्वयंघोषित" लिह्याचं राहिलंय ... शुधारणा करणे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

कार्यकारी अध्यक्ष च्या आधी

स्पा
Fri, 12/10/2010 - 16:05 नवीन
कार्यकारी अध्यक्ष च्या आधी "स्वयंघोषित" लिह्याचं राहिलंय ... शुधारणा करणे ! no comments !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

-

इंटरनेटस्नेही
Fri, 12/10/2010 - 16:46 नवीन
-
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

+१

इंटरनेटस्नेही
Fri, 12/10/2010 - 16:14 नवीन
तिकडचे झालेले अनेकजण "भारतीय सिस्टिम" ला सकारण नावं ठेवतात.. करप्शन, पोल्युशन वगैरे मुद्दे जेन्युइनही असतात. +१ या मुद्द्याला.. भारतात बरयाच गोष्टी नाव ठेवण्यासारख्या आहेत, आणि सत्य कधीही लपवु नका, ते खोटेच आहे असे सिद्ध करा असे आपली संस्कृती सांगत देखील नाही. अन्य प्रगत देशांच्या मानाने आपण निदान ५० वर्षे तरी मागे आहोत, आणि ही परिस्थीती सुधरायची तर आपण आधी आपल्यात समस्या आहेत हे मान्य केले पाहिजे.. उगाच खोट्या गैरसमजात रहाण्यापेक्षा वास्तववादी राहिलेलं बरं म्हणजे कधी ना कधी सुधारणा करता येते स्वत: मध्ये. - ऋषिकेशकुमार इंट्या, मुंबई प्रदेश अध्यक्ष, मिसळपाव दुर्लक्षित पँथर. ता. क. : अमेरिकेत 'कणसांचं' पीक सगळ्यात जास्त होतं म्हणतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

>>असं म्हणणार्‍यांमधे

सूड
Fri, 12/10/2010 - 15:57 नवीन
>>असं म्हणणार्‍यांमधे मनापासून दुखावल्याने म्हणणारेही असतात आणि आपल्याला "तिकडे" जाता येत नाही (कर्तबगारीत कमी पडल्याने) याची खंत असलेलेही अनेक असतात. 'कर्तबगारीत कमी पडल्याने' हे खटकलं, बर्‍याचदा केपेबल व्यक्तीसुद्धा वगळल्या जातात. विशेषतः दक्षिण भारतीयांचे आधिक्य असलेल्या, आणि असे लोक 'तिकडे' असलेल्या प्रोजेक्ट्स मध्ये अशा गोष्टी सर्रास घडतात. डोळ्यासमोरची उदाहरणं आहेत म्हणून लिहावंसं वाटलं. असो.
  • Log in or register to post comments

राहून गेलं...

गवि
Fri, 12/10/2010 - 16:06 नवीन
"कर्तबगारीत कमी पडल्याने म्हणा किंवा अन्य काही कारणाने म्हणा" अशी काही उदाहरणादाखल कारणं द्यायची होती.. राहिलं..पण तिथे तसं वाचावं अशी विनंती.. शिवाय एकूण जाऊ न शकणं म्हणजे कर्तबगारीत कमी पडणं अशी जनरल (गैर?!)समजूत आहेच..ती स्वतःची स्वतःशी सुद्धा असू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

+१ अनेक वेळेला कर्तृत्व आणि

llपुण्याचे पेशवेll
Fri, 12/10/2010 - 16:10 नवीन
+१ अनेक वेळेला कर्तृत्व आणि संधी असतानाही म्हातार्‍या आईवडीलांकडे आपल्या पश्चात कोण बघेल या काळजीने थांबलेले लोकही असतात. किंवा काहींना स्वदेश अधिक प्रिय असतो म्हणून 'तिकडे' जाऊनही तिकडे रमत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

..चुकीची दुरुस्ती....चुकीची दुरुस्ती....चुकीची दुरुस्ती..

गवि
Fri, 12/10/2010 - 16:45 नवीन
अनेक वेळेला कर्तृत्व आणि संधी असतानाही म्हातार्‍या आईवडीलांकडे आपल्या पश्चात कोण बघेल या काळजीने थांबलेले लोकही असतात. किंवा काहींना स्वदेश अधिक प्रिय असतो म्हणून 'तिकडे' जाऊनही तिकडे रमत नाहीत. पैकी बोल्ड केलेल्या भागाचा अनुभव आहे. म्हणूनच पुन्हा बोल्डमधे म्हणतो.. "कर्तबगारी नसल्याने" हे "कर्तबगारी नसल्याने किंवा अन्य काही कारणाने असे वाचावे.." केवळ फास्ट लिहिण्यात उथळपणे / चुकीने सुटलेला मुद्दा आहे तो. मजबूरी, स्वतःचा विचारपूर्वक घेतलेला निर्णय अशी अनेक कारणं असू शकतात. अजून एक पैलू.. जे आपल्या म्हातार्‍या आईवडिलांना इथे ठेवून जातात त्यांच्यावर खूप छद्मी दोषारोप होतात. आई वडील कोणी आजारी असले /वारले की "बघा..शेवटच्या क्षणी बापाच्या तोंडात पाणी घालता आलं नाही..डॉलर काय चाटायचेत ?..इ.इ. " या अशा ताशेर्‍यांमधेही एक साठलेला असूयेतून आलेला राग असावा की काय? असा मला संशय आहे. त्यांनाही तिथे छातीवर दगड ठेवावा लागत असेलच की..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

.

स्पा
Fri, 12/10/2010 - 16:05 नवीन
.
  • Log in or register to post comments

छान चर्चा

रणजित चितळे
Fri, 12/10/2010 - 16:25 नवीन
मला वाटते, ऑऊट ऑफ साईट इज ऑऊट ऑफ माईंड ही इंग्रजीतील म्हण यतार्थ आहे. इकडे काय किंवा तिकडे काय - ह्या जगात तोच मनुष्य यशस्वी गणला जातो ज्याला प्रसन्नतेने व आनंदाने जगता आले आहे. आपण इकडचे (प्रसन्नतेने व आनंदाने जगणारे) आहात का तिकडचे (मरगळलेले व दुःखी) आहात. म्हणुनच इकडे राहुन काही तिकडचे आहेत व तिकड राहुन काही इकडचे आहेत.
  • Log in or register to post comments

'असे बर्यान्चदा होतेच' असे

गांधीवादी
Fri, 12/10/2010 - 16:44 नवीन
'असे बर्यान्चदा होतेच' असे म्हणेन. आमच्या कामावर जे कोणी कामानिमित्त अमेरिकेत, ऑस्ट्रेलिया , युरोप येथे जातात त्यातील बरीचशी तिथल्या तिथेच नवीन नोकरी बघून तिथेच कायमस्वरूपी स्थायिक झालेली आहेत. त्यातील बरीच जण चांगली मित्र आहेत (आता होती असे म्हणावे लागेल), गेली त्यानंतर काही महिने gtalk, skype वरून गप्पा व्हायच्या, पण हळू हळू ते सर्व बंद होत गेले. उरले ते केवळ Happy new Year आणि Happy dipawali च्या शुभेच्छा. नंतर त्यांना इथे यावेसे वाटत नाहीत. वर्षातून एकदा का दोनदा त्यांच्या भारतातल्या घरी येतात. तेव्हा भेटण्याचा निरोप ठेवतात. भेटणे होते. नंतर दोन तीन वर्षांनी ते सुद्धा बंद. भारताला नावे ठेवण्यासाठी देखील कोणाशी बोलणे होत नाही. जे गेले, ते गेले. विसरून जायचे. अवांतर : त्यांना बघून इकडे* सुद्धा तिकडचे वेध लागतात. ते आवरणे खूप कठीण जाते. * इकडे म्हणजे नक्की कोण हे सुज्ञास सांगणे न लगे
  • Log in or register to post comments

तुम्ही मांडलेली बरीचसी

Nile
Fri, 12/10/2010 - 16:52 नवीन
तुम्ही मांडलेली बरीचशी निरीक्षणं जेनेरीक नाहीत इतकेच बोलुन थांबतो. -फुल्या फुल्या कुणीकडचा.
  • Log in or register to post comments

म्हणजे: मित्र परदेशी जाणं ही

गवि
Fri, 12/10/2010 - 16:58 नवीन
म्हणजे: मित्र परदेशी जाणं ही "मैत्री " या नात्यांमधली "दुर्घटना" आहे की नाही ? याचं उत्तर तुमच्यामते नाही असं आहे.. बरोबर ना? आणि मुद्दे खूप मांडलेत मी पण मुख्य वाद कम प्रश्नः मित्र परदेशी जाणं ही "मैत्री " या नात्यांमधली "दुर्घटना" आहे की नाही ? यावरच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

आयुष्यभरात ठराविकच मित्र

Nile
Fri, 12/10/2010 - 17:04 नवीन
आयुष्यभरात ठराविकच मित्र असतात का? ते मित्र होण्याच्या आधीच्या मित्रांचं काय झालं? दोन मित्र दुरावले की त्यांचे आयुष्यचं उद्ध्वस्त झाले का? उगाच मैत्री-फित्री, नाते-गोते, दुर्घटना असले इमोशनल शब्द वापरुन मेलोड्रामा करण्यात काय पाँईट आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

धन्यवाद..

गवि
Fri, 12/10/2010 - 17:16 नवीन
आयुष्यभरात ठराविकच मित्र असतात का? ते मित्र होण्याच्या आधीच्या मित्रांचं काय झालं? दोन मित्र दुरावले की त्यांचे आयुष्यचं उद्ध्वस्त झाले का? :) नवे प्रश्न.. नवीन मित्र मिळतात.. नव्या मैत्रिणीही मिळतात.. ("फिर हमारे मुहल्ले में हेमा आयी"..इति मुन्नाभाई.) सर्व होतच राहतं. अगदी मेलेल्या माणसाचीही जागा कोणीतरी घेतं. कायमचं उध्वस्त वगैरे काही होत नाही..सगळं सगळं ठीक. शब्द दुसरे वापरुन मेलोड्रामा (एव्हीएम पिच्चर्स, मड्रास..) टाळता येईल.. पण म्हणजेच कमी मेलोड्रामॅटिक शब्दात समजा मैत्री संपते का ?असं म्हटलं तर : "हो ती बहुतेक वेळा संपते..पण त्याचा मोठा इश्यू करण्याची गरज नाही.." असं आपल्याला म्हणायचंय असं मी समजतो. धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

व्याख्या

Nile
Fri, 12/10/2010 - 17:20 नवीन
मैत्री संपते का ?
मैत्रीची वाख्या करा, म्ह़णजे यावर सविस्तर निष्कर्ष काढता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

व्याख्या ?!

गवि
Fri, 12/10/2010 - 17:32 नवीन
कदाचित मैत्री, प्रेम या "व्याख्या करायच्या" गोष्टी नसून फक्त "करायच्या" गोष्टी असाव्यात असं वाटतं. गहन आहे व्याख्या करण्याचा विषय्..पण करतो एक प्रयत्न.. स्वतःच्या लग्नापूर्वी: ज्यांना भेटायला ठरलेल्या वेळी ठरलेल्या पुलावर, हाटेलात, चौकात तुम्ही कितीही थकलेले असलात तरी पाय ओढत जाता आणि त्यांच्या आणि आपल्या आयुष्यात जे काही चाललंय ते एकमेकांशी आसुसून बोलून बोलून दुखरं तोंड घेऊन पण थकवा घालवून घरी परत येता ते मित्र. लग्नानंतर: ज्यांना पूर्वीसारखं भेटता येत नाही म्हणून सर्वात जास्त वाईट वाटतं पण तरीही एकाच गावात / दुसर्‍या राज्यात / दुसर्‍या देशात / जगात कुठेही राहात असलात तरी एकमेकांशी काहीही शेअर करण्याची तीव्र इच्छा आपल्याला होते ते मित्र. कोणाशीतरी हे (काहीही) शेअर केलं पाहिजे म्हणजे मज्जा/आनंद्/समाधान लाभेल ही तीव्र इच्छा म्हणजे मैत्री.. ती टिकते का हा प्रश्न्.. ती संपण्याला "दुर्घटना" म्हणू किंवा आणखी काही.. इतरांच्या व्याख्या ऐकायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

काँट्रॅडीक्शन

Nile
Fri, 12/10/2010 - 19:13 नवीन
ज्यांना भेटायला ठरलेल्या वेळी ठरलेल्या पुलावर, हाटेलात, चौकात तुम्ही कितीही थकलेले असलात तरी पाय ओढत जाता आणि त्यांच्या आणि आपल्या आयुष्यात जे काही चाललंय ते एकमेकांशी आसुसून बोलून बोलून दुखरं तोंड घेऊन पण थकवा घालवून घरी परत येता ते मित्र. लग्नानंतर: ज्यांना पूर्वीसारखं भेटता येत नाही म्हणून सर्वात जास्त वाईट वाटतं पण तरीही एकाच गावात / दुसर्‍या राज्यात / दुसर्‍या देशात / जगात कुठेही राहात असलात तरी एकमेकांशी काहीही शेअर करण्याची तीव्र इच्छा आपल्याला होते ते मित्र. कोणाशीतरी हे (काहीही) शेअर केलं पाहिजे म्हणजे मज्जा/आनंद्/समाधान लाभेल ही तीव्र इच्छा म्हणजे मैत्री..
तर वरही जी काही उत्कट (फील्मी?) व्याख्या तुम्ही दिली आहे ती खरी मानली तर तुम्हीच स्वतःला काँट्रॅडिक्ट केलंत असं वाटत नाही का तुम्हाला? थोडक्यात जी अतुट असते ती मैत्री असे म्हणता वर फक्त तिकडे गेल्याने मात्र ती तुटली असे म्हणता. मग काय? ती मैत्री नव्हतीच बहुदा? कींवा अतुट मैत्री वगैरे हे सगळे फील्मी विचार आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

ठीक.. Tee phakt vyakhya

गवि
Fri, 12/10/2010 - 19:29 नवीन
ठीक.. Tee phakt vyakhya hoti. अतूट वगैरे मी काही म्हटलं नाहीये. तशी टिकते का नाही आणि इन बोथ केसेस 'का?' असा प्रश्न कुटण्यास उपस्थित केला. पण तुम्ही म्हणता ते योग्य आहे.मल गैरफ़िल्मी बोलता येत नाहीये.त्यामुळे पुढे बोलू शकेनसं वाटत नाही.आपला पॉईंट वेगळा अतएव आवडेश. (फ़िल्मी) गवि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

गवि, दोन प्रकारच्या

रन्गराव
Fri, 12/10/2010 - 18:01 नवीन
गवि, दोन प्रकारच्या लिखानामधून गैरसमज होण्याची शक्यता असते. एक तुम्ही किचकट काही तरी लिहिता किंवा फारच थोड्क्यात लिहिता. आणि दुसरं तुम्ही खूप सोपं करण्याचा प्रयत्न करता. पहिल्यामध्ये काही गोष्टी न समजल्यामुळे गैरसमज होतो. दुसर्यामध्ये सोपं करण्याच्या नादात गैरसमज करून घ्यायला वाव ठेवला जातो. तुमचा लेख दुसर्या प्रकारात मोडला. तुम्ही जो जनरीक शब्द वापरला त्याचा इथला अर्थ "Statistically Significant" असा आहे. पण पंचाइत आहे राव. "जनरीक" म्हंट्ला तर फारच जनरीक होतं ;) आणि "Statistically Significant" म्हंटल की वाचणार्यांची पंचाईत होते. लॉंग स्टोरी शॉर्ट - " एवढ सोपं करूनही गैरसमज होत असतील तर त्याला तुम्ही काहीही करू शकत नाही. प्रत्यक कमेंट मनावर घेवू नका"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हे हे. थँक्स.

गवि
Fri, 12/10/2010 - 18:07 नवीन
चांगलं बोललात, मनावर घेत नाहीये हो..असंच चर्चा करतोय. याच तर त्या कट्ट्यावरच्या दोस्तांशी गप्पा आहेत. :) बादवे.. सरजी....मैं मूळ काथ्याकूटमें "जनरिक" नाही वापर्‍या.."सार्वत्रिक" वापर्‍या...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रन्गराव

गवी ह्यांनी धाग्याची पुन्हा

परिकथेतील राजकुमार
Fri, 12/10/2010 - 18:13 नवीन
गवी ह्यांनी धाग्याची पुन्हा एकदा यशस्वी खरडवही केलेली आहे ;) त्यामुळे त्यांच्या पुढच्या धाग्यावर आम्ही त्यांना एक अतिशय हिणकस प्रतिक्रीयेच्या पुरस्काराने संन्मानित करणार आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

तू गप रे!

धमाल मुलगा
Fri, 12/10/2010 - 18:16 नवीन
हा काथ्याकूट आहे. कथा/ललित वगैरे नाही. जसा इतरांना आपलं मत मांडण्याचा हक्क आहे तसा धागा प्रवर्तकालाही तितकाच आहे की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हा काथ्याकूट आहे. कथा/ललित

परिकथेतील राजकुमार
Fri, 12/10/2010 - 18:20 नवीन
हा काथ्याकूट आहे. कथा/ललित वगैरे नाही. जसा इतरांना आपलं मत मांडण्याचा हक्क आहे तसा धागा प्रवर्तकालाही तितकाच आहे की.
हे असे फसवे उत्तेजन देउन नंतर झाडावार जाउन बसणार्‍या मित्रांचा आम्हाला तिटकारा आहे. उगाच आम्ही वरती 'भिकारचोट' हा शब्द वापरलेला नाही ;) गवी मी तुम्हाला पुरस्कार देणार म्हणजे देणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

धन्यवाद.

धमाल मुलगा
Fri, 12/10/2010 - 18:31 नवीन
आम्हाला मात्र नुसत्या पिंका टाकणार्‍या मित्रांचा मुळीच तिटकारा नाही. असतो एकेकाचा स्वभाव. त्याला सांभाळुन घेतलं तरच मैत्री ना. ;) आम्हाला उगाच 'भिकारचोट' हा शब्द वापरायची गरजच पडली नाही. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

पुरस्काराबद्दल हाबार.

गवि
Fri, 12/10/2010 - 18:21 नवीन
आम्ही पुढचा धागा न टाकता एकदम त्याच्या पुढचा टाकणार आहोत.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

आम्ही पुढचा धागा न टाकता एकदम

परिकथेतील राजकुमार
Fri, 12/10/2010 - 18:22 नवीन
आम्ही पुढचा धागा न टाकता एकदम त्याच्या पुढचा टाकणार आहोत..
त्या धाग्यासाठी तर पेश्शल पुरस्कार आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

चालेल..

गवि
Fri, 12/10/2010 - 18:27 नवीन
स्वतः राजकुमारांनी जातीने या धाग्यावर चार्पाच वेळा उपस्थिती लावून शोभा वाढवली आणि हा माझा धागा सुखाचा केला. त्यामुळे पुढच्या सर्व धाग्यांवर पुरस्कार दिलात तरी "एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे" म्हणत आम्ही शंभर धागे दु:ख सोशीत टाकू. एकशे एकाव्या धाग्यावर मात्र आपली कौतुकाची प्रतिक्रिया येईल या आशेवर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हाण्ण तिच्यायला!

धमाल मुलगा
Fri, 12/10/2010 - 18:32 नवीन
य्ये हुई ना बात! :) ह्याला म्हणतात जिंदादिली. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

>>सरजी....मैं मूळ

रन्गराव
Fri, 12/10/2010 - 18:19 नवीन
>>सरजी....मैं मूळ काथ्याकूटमें "जनरिक" नाही वापर्‍या.."सार्वत्रिक" वापर्‍या...!! येइच पराब्लेम है तेरा, थोडा अवघड करकू लिख त्यो. सबकू सब समज्या त्यो मजा नाय आता! ;) अऐ अगलीबार बागवानीमे लिख त्यो, ऐशा मजा आता मालूम :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

माझ्यामते हा प्रश्न फक्त

कानडाऊ योगेशु
Fri, 12/10/2010 - 17:50 नवीन
माझ्यामते हा प्रश्न फक्त "इकडचे- तिकडचे" ह्या कन्सेप्टशीच संबंधित नसावा. आयुष्यात जसजशी स्थित्यंतरे होत जातात तसतसे मित्र हा गोतावळा फार विरळ होत जातो. लग्नानंतर/जबाबदार्या वाढल्यानंतर एका शहरात असणार्या दोन मित्रांनाही एकमेकांना भेटणे दुरापास्त होऊन जाते. मला आठवतेय शिक्षण संपल्यावर पहीली नोकरी करत असताना जेव्हा कधी पुन्हा सोलापूरला जायचो तेव्हा घरी आल्या आल्या पहीला फोन सोलापूरात त्यावेळी असणार्या मित्रांना करत असे. नंतर मग घरच्यांशी गप्पाटप्पा होत असत.आज जेव्हा जातो तेव्हा क्वचितच फोन करतो. थोडक्यात एकेकाळी असणारी मित्रांची अतोनात गरज आज तितकीशी वाटत नसावी. त्यामुळे केवळ मित्र परदेशी जाणे ह्यापेक्षा प्रत्येकाचे आयुष्य स्वकेंद्रीत होणे ही गोष्टही मैत्रीत आणणारा दुरावा असु शकते.
  • Log in or register to post comments

मस्त.. मी म्हटलेला आणि

गवि
Fri, 12/10/2010 - 17:58 नवीन
मस्त.. मी म्हटलेला आणि उपस्थित केलेला "देश ते परदेश" लेव्हलचा इफेक्ट "गाव ते शहर" मधेही माईल्ड असतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

सध्या सासर्या बरोबर सौना

निनाद मुक्काम …
Fri, 12/10/2010 - 18:24 नवीन
सध्या सासर्या बरोबर सौना बाथला जात आहे .मग अपेयपान वैगैरे सोपस्कार पार पडले कि ह्या विषयावर भले मोठ्ठी प्रतिक्रिया (मनातील भावना )व्यक्त करीन माझ्या मताशी कोणी सहमत असेलच असे नाही कदाचित टीका होईन (टीका होण्यासाठी सुद्धा भाग्य लागते .) पण एक सांगतो मी ६ वर्षापूर्वी जेव्हा परदेशात गेलो लंडनमधील खेड्यातून सुरु झालेला प्रवास मग लंडन /अबू धाबी (ह्यात दुबई आलेच ) मग कलोन /फ्रांक फ्रुट (सध्या ) नवीन वर्षी म्युनिक येथे जाणार आहे .जेव्हा जेव्हा मुंबईत पुण्यात आलो . तेव्हा मला नेहमीच एक सकारात्मक बदल दिसला आहे .उदा आम्ही पदवीधर झालो तेव्हा नोकरी देता का नोकरी (घर देता का कुणी घर ह्या चालीवर ) त्यामुळे स्वप्ने /महत्त्वाकांक्षा ह्यापेक्षा विवंचना जास्त असायची .आजची पदवीधर मूळ नोकरी मिळेस्तोवर कॉल सेंटर / बिपिओ /आणि बरेच ...त्यामुळे हातात पैसा खुळखुळतो त्याचा एक अभिमान तर त्यांच्यात असतो .पण कुठेतरी एक खमकेपणा असतो .(माज हा संयुक्तिक शब्द पण ह्या वयात तो शोभून दिसतो .) ह्याचे कौतुक वाटते .उगवत्या महासत्तेचे भावी वारसदार शोभतात. (उगवती महासत्ता ह्या सदरात आपले २०% मध्यमवर्गीय व मिपा वरील बरेच सदस्य असल्याने वापरत आहे .)कारण हे २० % मध्यमवर्गीय संख्येने कोणत्याही प्रगत राष्ट्रांच्या लोकसंख्ये इतके आहे किंबहुना कितीतरी जास्त आहेत . कारण हॉलंड ह्या देशाची लोकसंख्या मुंबईच्या लोक्संख्येयेवढी आहे .तर भारताचे २०% हे एकूण लोकसंखेच्या ........ बाकी इतर मान्यवरांच्या (असे म्हणण्याची पध्धत आहे )प्रतिक्रिया जाणून घेण्यास उत्सुक आहे . च्याव ( असा निरोप घेताना म्हणायची पध्धत आहे .आमचे भारतातील तरुण चुलते /मावस /आते युवा भावंडे भारतात न चुकता म्हणतात . भारतात बाकी बरिश्ता ची कोल्ड कॉफी व सिसिडीचे सांद्विच हे अमेरिकन स्टार बक्स किंवा इटालियन केफे नेगोला भारी .तर किंगफिशर जगातील एकमेव पंचतारांकित हवाई सेवा हे बिरूढ सार्थ ठरवते .(म्हातार्या आजी बाई हवाई सुंदर्या फक्त एअर इंडियाचा मक्ता नसून बिए / लुफ्तांजा हे सुध्धा स्पर्ध्धेत आहेत .
  • Log in or register to post comments

ह्म्म्म...छान लिहलं आहे,

मदनबाण
Fri, 12/10/2010 - 18:59 नवीन
ह्म्म्म...छान लिहलं आहे, परवाच या विषयावर एका व्यक्तीशी बोलणं झालं व्हतं. परदेशस्थ लोकांच्या भावना जाणुन घ्यायला आवडेल... जाता जाता :--- ही जाहिरात मात्र नक्की पहा. http://www.youtube.com/watch?v=PDqKaMH5fcI आणि हे गाणं (जिंगल) नक्की ऐका...
  • Log in or register to post comments

बर्‍याच अंशी सहमत.

धमाल मुलगा
Fri, 12/10/2010 - 18:29 नवीन
गगनविहारींच्या मतांशी बर्‍याच अंशी सहमत आहे. काथ्याकुटात म्हणलंय तसं होतं खरं. आधी एक शिग्रेट चार जणात फिरवून मारणारे दोस्त, आपल्यातला एखादा परदेशी चाललाय म्हणताना, त्याच्यापेक्षा जास्त खुष होतात. अभिनंदन, पार्ट्या...सगळे सोपस्कार उत्साहात पार पडतात. पुढे नियमित होणारे चॅट्स, मेल्स हळुहळू कमी होत जातात. आणि भेटींअंतीदेखील, पुर्वीसारख्या कट्ट्यावरच्या मनमोकळ्या गप्पांऐवजी थोडंसं अवघडलेपण घेऊनच भेटी होतात. पण मला असं वाटतं, की हे असं होत असावं ते फ्रेम ऑफ रेफरन्समुळं. म्हणजे असं बघा, की समजा तुम्ही आणि मी कुठेतरी भेटलो, तर कदाचित आपण बर्‍याच गप्पा मारु शकू. अगदी नवपरिचितांनी एकमेकांशी बोलायला सुरुवात करतानाच्या हवापाणी-राजकारण-क्रिकेट-नाटक-सिनेमा वगैरेंचे दोघांचे रेफरन्सेस सारखे असतात. त्यावर आपण गप्पा मारायला सुरु करु शकतो आणि पुढे गप्पा रंगत जातात. आता हेच जर तुम्ही परदेशात (कायम वास्तव्य) आहात आणि मी भारतात. तुम्ही बर्‍याच काळानं भेटायला आलात..मस्त आपण मोठ्या हौसेनं भेटलो, गप्पा सुरु केल्या तर त्या तितक्याशा रंगत नाहीत. का? समान धागा असतो तो कट्ट्यावरच्या आठवणी, शाळेतले/कॉलेजातले मास्तर, लाईन मारलेल्या पोरी, सोबत घातलेला दंगा ह्या सगळ्यांच्या आठवणी. पण त्यावर कितीवेळ बोलणार? वर्तमानात आल्यावर समजा, मी तुम्हाला जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या भानगडींबद्दल बोलायला लागलो तर तुम्हाला संदर्भ तितकेसे खोलवर ठाऊक नसल्यानं कंटाळा येणार. तुम्ही तुमच्या गव्हर्नराच्या निवडणुकीच्या गप्पा सांगितल्या तर मला त्यातलं काय डोंबल ठाऊक नसल्यानं मला कटाळा येणार. (राजकारणाचा हा मुद्दा उदाहरणादाखल घेतला आहे.) असंच करता करता दोघांच्या 'फ्रेम ऑफ रेफरन्स' वेगळ्या होऊन गेल्यानं ते तसं वाटत असावं. हे झालं माझ्या अल्पमतीनुसार वाटणारं स्पष्टीकरण. मुळ प्रश्न जो तुम्ही विचारला आहे त्याचं उत्तर माझ्या दृष्टीनं होकारार्थी आहे. त्यामागे कारणं संदर्भ काही असतील, पण 'फायनल आउटकम' काय तर तेच. असं माझं वैयक्तिक मत आहे. नवे मित्र मिळणे हा जो प्रश्न इथे आला, त्याबद्दल मला असं वाटतं, की ती प्रक्रिया तर इकडच्या अन तिकडच्या दोघांकडेही घडतच असते. पण जुनी मैत्री जी कालपर्यंत एव्हढी घट्ट होती ती अशी मुठीत धरलेल्या वाळूसारखी का वाटतेय असा प्रश्न पडणं स्वाभाविक असावं.
  • Log in or register to post comments

>>पण जुनी मैत्री जी कालपर्यंत

रन्गराव
Fri, 12/10/2010 - 18:37 नवीन
>>पण जुनी मैत्री जी कालपर्यंत एव्हढी घट्ट होती ती अशी मुठीत धरलेल्या वाळूसारखी का वाटतेय असा प्रश्न पडणं स्वाभाविक असावं. असा अवघड प्रश्न विचारून पंचाईत करताय राव तुम्ही :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

दुर्दैव

धमाल मुलगा
Fri, 12/10/2010 - 18:44 नवीन
सामोरे जाण्याशिवाय पर्याय काय असतो? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रन्गराव
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा