✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नदीवर धुणे धुणार्या बायका !!

प — प्रकाश१११, Wed, 12/08/2010 - 09:04
कितीतरी बायका नदीवर धुणे धुवायला बादल्या भरून भरून यायच्या गप्पा मारीत धूत बसायच्या तो काळच तसा होता सासुरवाशिणीचा अड्डा जमायला तेवढाच निव्वळ क्षण होता ...! घरच्या सुख दुखाचे रडगाणे गायला नदीकाठ किती मस्त होता तो नदीकाठ सुंदर सुरेख होता अगदी बहरून जायचा ह्या सुंदर फुलांनी कशी बांधीव नदी होती छान पायर्या पायार्या होत्या पायर्यावर कपडे आपटत बसायच्या ह्या सासुरवाशिणी ...!! डबल बी साबणाचा मस्त फेस वाहत राहायचा बघायला बरे नि बरे वाटायचे त्याचा गंध आसमंतात फिरायचा एखादे लवथवते तारुण्य डोळे खेचून घ्यायचे नागासारखा साबणाचा फेस नदीवर तरंगताना किती छान वाटायचे ...!! डोळे त्या पाण्यात हरवून जायचे त्या थंड थंड हवेत मन विरघळून जायचे कधी दिवाळीच्या दरम्यान गणिताचा पेपर देऊन नदीवरच्या सांडव्यावरून जायचो तेह्वा बायका मस्त धुणे धूत बसायच्या माझ्या गणिताच्या पेपरमध्ये सगळा फेस नि फेस असायचा प्रमेय नि रायडर मला नागासारखा वाटायचा माझे दुख एवढे मोठे नि ह्या आपल्या कपडे आपटीत बसायच्या गणितापेक्षा ह्यांचे दुख मोठे असेल काहो ? ह्या मला नेहमी सुखादुखाच्या पार दिसायच्या कितीतरी बायका नदीवर धुणे धुवायला . बादल्या भरून भरून नि कपडे धूत बसायच्या माझा गणिताचा पेपर ...!! नि ह्याचे चुबुक चुबुक धुणे कसे सोपे असते जगणे ...... नि कसे अवघड होऊन जाते जगणे .. कुणास ठाऊक काय खरे नि काय खोटे .....????

प्रतिक्रिया द्या
4114 वाचन

💬 प्रतिसाद (11)

मस्त ! मला आधी वाटले ती मागे

अवलिया
Wed, 12/08/2010 - 11:14 नवीन
मस्त ! मला आधी वाटले ती मागे एक बहुचर्चित जाहिरात आली होती दूरचित्रवाणीवर त्यासंबंधी काही आहे की काय !
  • Log in or register to post comments

:) ये तो बडा टॉईंग है

टारझन
Wed, 12/08/2010 - 11:30 नवीन
अमुल माचो .. आय मीन अमुल वाह्यात इन्सान ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

करेक्ट !

अवलिया
Wed, 12/08/2010 - 11:30 नवीन
करेक्ट !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

'वाह्यात इन्सान' चुक

नरेशकुमार
Wed, 12/08/2010 - 11:52 नवीन
'वाह्यात इन्सान' चुक आहे 'वाहीय्यात इन्सान' असे पाहिजे. -------------------------------------------------------- वाह्यात कसं ते लाह्यात बोल्ल्या वानि वाटत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

कोणती हो नाना?

वेताळ
Wed, 12/08/2010 - 11:24 नवीन
त्या जाहिरातीबद्दल लिहा जरा.
  • Log in or register to post comments

माझा मित्र नाशिकला होता

प्रकाश१११
Wed, 12/08/2010 - 11:39 नवीन
माझा मित्र नाशिकला होता त्याच्या लहानपणीच्या काही घटना तो खूप रंगवून सांगतो नाशिकचा गोदावरी घाटावर अशा बायका खूप म्हणजे दररोज धुणे धुवाव्यास यायच्या. मित्र एकदा असाच गणिताचा पेपर देऊन आला .मोठा कठीण पेपर होता . नि ह्या बायका काही सोयर न सुतक .आपल्या मस्त धुणे धुतात .त्यचे त्याला वाईट वाटले. त्यावरून ही कल्पना . आवडली खूप आभार .माझ्या मित्राचेपण !!
  • Log in or register to post comments

छान, लिहिताय! पु.ले.शु.

पियुशा
Wed, 12/08/2010 - 11:46 नवीन
छान, लिहिताय! पु.ले.शु.
  • Log in or register to post comments

नोस्ताल्जिया ठीक आहे, पण...

योगप्रभू
Wed, 12/08/2010 - 13:23 नवीन
माफ करा मित्रांनो, नदीवर धुणे धुणार्‍या बायका, हे चित्र माझ्याही मनात रुतून बसलेले असले तरी आज विचार करताना जाणवते, की पुढील काळात अशी चित्रे न दिसलेलीच बरी. नदीवर कपडे, जनावरे, वाहने धुणे, नदीच्या पाण्यात सांडपाणी व रासायनिक प्रदूषक घटक सोडणे, कुंभमेळे, मूर्ती विसर्जन हे जितक्या लवकर बंद होईल तेवढा भविष्यकाळ पुढच्या पिढ्यांसाठी सुरक्षित होईल. कारण यापुढच्या काळात आपले गोड्या पाण्याचे साठे कसोशीने जतन करणे हा अस्तित्वाचा प्रश्न बनणार आहे. आम्ही बनारसला गेलो होतो. तेव्हा होडीतून जाताना शहारे येणारे दृश्य बघितले. मनकर्णिका घाटावर चितेत अर्धवट जळालेले मुडदे ओढून काढून सरळ गंगेच्या पाण्यात टाकून द्यायचे. हे वाहात आलेले मुडदे आमच्या होडीला धडकत असत. भाजलेल्या वांग्यासारखे दिसणारे ते देह बघून उमासे यायला लागायचे. नावाडी सांगे, की मोक्ष मिळावा म्हणून हे मुडदे गंगेत सोडले जातात, पण बारकाईने चौकशी केल्यावर धक्कादायक सत्य समजले. काशीतील डोंब आणि पंडे दोघेही लोभी आहेत. श्रीमंत आणि भरपूर पैसे देतील त्यांच्याच नातलगांच्या मुडद्यांचे चितेत पूर्ण दहन करतात. गरीबांचे मुडदे अर्धवट जाळतात आणि सरळ गंगेत फेकून देतात. गंगा नदी केवळ ह्रषिकेशजवळच स्वच्छ आहे. हरीद्वारपासून ती प्रदूषित व्हायला सुरवात होते ती अगदी गंगासागरपर्यंत. कानपूरला तर चामड्याच्या कारखान्यांतील कातडी कमावून झाल्यावर वापरलेले प्रदूषित पाणी थेट गंगेत सोडले आहे. ज्या महानदीवर उत्तर भारतातील ४० कोटी लोक अवलंबून आहेत तिची ही दशा. महाराष्ट्रातील नद्यांबाबत तर काय बोलणार? स्थिती समोरच दिसते आहे.
  • Log in or register to post comments

योग प्रभुजी - आपले विचार

प्रकाश१११
Wed, 12/08/2010 - 13:40 नवीन
योग प्रभुजी - आपले विचार अगदी खूप बरोबर आहेत. अगदी मननीय आहेत एकदम मान्य . मित्रा हे जे लिहिले आहे तो काळ तसा खूप जुना आहे . आत्ता कोणी नदीवर धुणे धुण्यास जातपण नाहीत. आत्ता आपण म्हणता तसे मी ज्या किंवा माझ्या मनात जी नदी होती ती आत्ता बघवत नाही अशी घाण घाण झालेली आहे .पूर्वीचे माझ्या मित्राने हे वर्णन केले ती नदी खूप सुंदर सुंदर होती . नाशिकची गोदावरी नदी .ते चित्र डोळ्यासमोर होते .त्याचे हे वर्णन .आपल्याला जुने आठवले .बरे वाटले असे कसे म्हणू ?तरीही आभार.मनापासून !!
  • Log in or register to post comments

नदीवरच्या बायका

दिपक
Wed, 12/08/2010 - 13:53 नवीन
शिर्षक वाचुन रारंगढांग मधला हा पॅरा आठवला..
"मुंडु? हे काय प्रकरण आहे?" "दॅट्स इट! ह्या वर्णनाबरोबर उत्सुकता जागी झाली पाहिजे. हा काय पदार्थ आहे? पहायचा? ऐकायचा? खायचा कि अनुभवायचा? पुटु तुला खायला इथे मिळाला पण मुंडु साठि तुला केरळलाच गेलं पाहिजे. mundu has made Keral the land of beauties!" मिनू हवेत तरंगल्यागत बोलू लागला. त्याचे पाय जमिनीवरुन सुटले होते हे खरं, पण ते केरळच्या आठवणीमुळे कि त्यानं नुकत्याच रिकाम्या केलेल्या रमच्या चवथ्या ग्लासमुळे, विश्वनाथला समजेना. "सुकुमारन नायर.... ह्या विशुला सांग... what is mundu..? mundu in chirikal!" "नाहि. मी चिरीकलला कधी गेलो नाहि." "अरेरे सुकू, मग तु कसला केरळचा? फुकट फुकट घालवलस तू आजवरचं आयुष्य! दोस्ता ग्लास भर जरा....ह्या चिरीकलीच्या आठवणीनं नशा आला, त्यात थोडि इथली रम मिसळु दे. चिरीकल....एक छोटसं खेडं. समुद्रकिनारी वसलेलं! तिथल्या मोपला मुली. संध्याकाळाची वेळ. नदिवरुन परतत आहेत. कमरेवर भरलेली घागर....अंगात लांब हातांचा ब्लाऊज. चिटाच्या कापडाचा, मोठ्या डिझाइनचा. डोक्यावर सफेद रुमाल आणि खाली लुंगी...केरळच्या भाषेत ’मुंडू’!" विश्वनाथ थक्क झाला. मुंडू म्हणजे लुंगी हे त्याला कल्पनेतही वाटलं नव्हतं. केरळच्या खेड्यात हरवलेला मिनू पुढं सांगु लागला, "ह्या लुंगीच्या दोन्हि कडा समोर आलेल्या. ह्या कडा चालताना उघड्या पडतात; कधी कधी पाय पुढं लुंगी मागुन येते. हात कमरेवरची घागर सावरण्यात गुंतलेले. कधी जोराचं वार येतं. लुंगी उडते, गोरे गोरे पाय, नाजुक पण भरलेल्या पोटर्‍या....असच जोरदार वारं येईल तर... नजरेत सगळी उत्सुकता दाटते. पण दोस्त. झंझावात आला तरी मुंडू तिथच. वर सरकतच नाहि. This far & no further! म्हणुनच त्या मुंडूच आकर्षण कधी कमी होत नाहि. मिनी मॉड स्कर्ट आले आणि गेले...पण मुंडू तो मुंडूच!" बोलता बोलता मिनू विश्वनाथ जवळ आला. खांद्यावर हात ठेवत त्यानं विचारलं, "विशू, दोस्त, चल येतोस केरळला?"
:-)
  • Log in or register to post comments

छान वर्णन .. आणि आपला

गणेशा
Wed, 12/08/2010 - 14:07 नवीन
छान वर्णन .. आणि आपला गणिताच्या पेपर्चे दु:ख मोठे की या सासुरवासीन बायकांचे जे गप्पाटपा टाकत मस्त धुणे धुत आहेत .. हा पडलेला प्रश्न ही खुप आवडला .. असे अनेक प्रश्न मला ही बर्याचदा पडायचे ..
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा