✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे.

न
नीलकांत यांनी
Sun, 12/05/2010 - 17:57  ·  लेख
लेख
नमस्कार, मिसळपाव सुरू होऊन तीनाहून अधिक वर्षे झाली आहेत. या दरम्यान अनेक वादळे येऊन गेली. मिसळपावचे स्वरूप मोकळे ढाकळे असावे. लोकांना येथे येणे आणि लिहीने सोपे व्हावे म्हणून कमीत कमी नियम आणि बंधणे ठेवून या संकेतस्थळाची सुरूवात तात्यांनी केली होती. संकेतस्थळाच्या संपुर्ण बांधणीत मी होतो. तेव्हा पासून ते मिसळपावचे सर्व नियंत्रण सांभाळण्यापर्यंत मी मिसळपाव वाढावं आणि अधिकाधिक लोकांना ते आपलं वाटावं म्हणून प्रयत्न करत आलेलो आहे. सुरूवातीच्या काळात मी लिहायचो. मग मिसळपाववर अधिकाधिक सोई उपलब्ध करून देणे आणि नंतर सदस्यांच्या अडचणी सोडवणे यात जास्त वेळ देऊ लागलो. आता गेल्या एप्रिल पासून मिसळपावचा सर्व व्याप मीच सांभाळतो. एप्रिल मध्ये मिसळपाववर अत्यंत गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. त्यातून मिसळपाव सुखरूप बाहेर पडलंय. त्यानंतर काही महिने छान गेले. मात्र पुन्हा दिवाळीच्या आधी काही लोकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केल्याची दिसतेय. आता या वळणावर काही गोष्टी स्पष्टच करायला हव्यात. म्हणून येथे लिहीत आहे. १) मिसळपाव हे मराठीवर प्रेम करणार्‍यांनी मराठीवर प्रेमकरणार्‍यांसाठी आणी ज्यांना मराठीतून अभिव्यक्त होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी सूरू केलेलं संकेतस्थळ आहे. २) मिसळपाववर चालणार्‍या चर्चा, लेख आणि अन्य साहित्य प्रकार हे केवळ आपली मराठीतील अभिव्यक्ती, समान आवड असणार्‍या लोकांशी ओळख आणि छानसं, हलकं- फुलकं, कधी ठसका बसवणारं तर कधी मन हळवं करून देणारं असावं. लेख, प्रतिक्रिया, खरड कशीही असावी मात्र ती इतर कुण्या व्यक्ती, सदस्यं, संपादक यांचा अपमान करणारी, टर उडवणारी असू नये. ३) मिसळपाववर खूप काळापासून वावरतांना असं होणं स्वाभाविक आहे की काही लोकांच्या लेखनाची आवड निर्माण होते, काहींशी मैत्री होते तर काहींचे लेखन आवडत नाही. अश्या वेळी ज्यांच्याशी आपले सूर छान जुळतात त्यांच्याशी जवळीक निर्माण होणे उत्तमच मात्र कुणा एका सदस्यांचे लेखन आपल्याला आवडत नाही किंवा विचार पटत नाही म्हणून त्या धाग्याचे संदर्भ इतरत्र देऊन त्यांचा उपमर्द करू नये. आपल्याला आवडतं त्याला दाद द्यावी नाही आवडत त्यावर त्याच जागी मतभिन्नता व्यक्त करावी. मात्र त्याधाग्यावरून ती चर्चा इतरत्र नेऊ नये. ४)ही सूचना जूण्या जाणत्या लोकांसाठी आहे की नवीन लोक नव्याने जेव्हा लिहायला लागतात तेव्हा बराच संकोच असतो. मराठीत लिहीता येईल की नाही पासून ते यावर लोक काय लिहीतील येथे पर्यंत गोंधळ नवीन लोकांच्या मनात असतो. कदाचीत आपण जेव्हा नव्याने आंतरजालावर लिहीते झालो तेव्हा आपली परिस्थिती सुध्दा अशीच होती. ते आठवून कृपया नवीन लिहीले झालेल्या सदस्यांना पहिल्याच लेखावर भंडावून सोडून त्यांने यापुढे लिहूच नये, असा प्रकार कृपया टाळावा. ५)यापुढे मिसळपाववर अधिकाधिक खेळीमिळीचे वातावरण राहील असा माझा प्रयत्न राहिल. तुम्हा सर्वांचे याकामी सहकार्य मिळावे ही विनंती. गेल्या काळात जरा बिघडलेल्या वातावरणाला जागेवर आणण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागले तरी त्यामागची भावना समजून घ्या. ६)येथे एक बाब आवर्जून सांगाविशी वाटते की मिसळपावच्या संपादक मंडळास संपादनाचे संपुर्ण अधिकार आहेत. त्याबाबत त्यांनी कसलाही खुलासा देणे अपेक्षीत नाही. त्यांच्या बाबत काही अडचण असल्यास ती जाहीर न बोलता सरपंच किंवा नीलकांत या खात्यावर व्यक्तिगत निरोपातूनच कळवणे अपेक्षीत आहे. कुणीही उठसूठ संपादकांना लक्ष केलेले योग्य नाही. यापुढे असा प्रकार कृपया टाळावा. ७)नवीन सदस्यांनी येथे लिहीते व्हावे. मिसळपाव समजून घ्यावे. नवीन मित्र बनवावे. आणि काहीही अडचण आल्यास सरपंच किंवा नीलकांत या खात्यावर व्यक्तिगत निरोप पाठवावे. ८) मिसळपावचे व्यवस्थापन, संपादक मंडळसदस्यं हे सर्व आपली आवड म्हणून मिसळपावसाठी काम करतात. त्यांच्या मुख्य कामातून आवर्जून वेळ काढून ते मिसळपाववर काम करतात. अश्यावेळी एखाद्या कामात झालेली दिरंगाई लक्षात यावी यासाठी हा संदर्भ पुन्हा एकदा लक्षात आणून देत आहे. - (सर्वांचे सहकार्य अपेक्षीत असलेला) नीलकांत
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
125475 वाचन

💬 प्रतिसाद (74)

प्रतिक्रिया

तुमची कार्यपद्धती आवडते.

अरुण मनोहर
Mon, 12/06/2010 - 09:49 नवीन
तुमची कार्यपद्धती आवडते. नेहमी सहकार्याचे आवाहन असते. आणि प्रसंगी कठोर निर्णय देखील घेता. तुमच्या नेतृत्वाखाली मिपाची आणखी भरभराट होवो हीच सदीच्छा.
  • Log in or register to post comments

चांगले आहे.

नीधप
Mon, 12/06/2010 - 10:56 नवीन
तुम्ही तुमचे म्हणणे खूप चांगल्या पद्धतीने मांडलेय. मिपावर लोकांनी लिहीते व्हावे यासाठी जे सगळे अडथळे, विघ्न काढण्याबद्दल तुम्ही म्हणता आहात ते योग्यच. एखाद्याच्या लेखावर मुद्दामून आचरट विडंबने आणि प्रतिसाद देणे हा मिपाचा यूएसपी असल्यासारखे होते बरेच दिवस त्याला आळा बसेल अशी आशा. परंतू लिहीत्याचा स्वतःच्या लिखाणावर अधिकार नसेल तर लिहित्याला का लिहावसं वाटावं इथे? उदाहरणार्थ.. क्ष ने एक लेख/कथा/कविता असं काही मिपावर लिहीले तर त्यामधे बदल करण्याचे त्याला स्वतःला स्वातंत्र्य नाही. पण क्ष ला पूर्णपणे अनोळखी असलेले किंवा क्ष च्या दृष्टीने आगंतुक असलेले इतर १० लोक (अधिकृत आकडा माहित नाही) त्यात हवा तो बदल करू शकतात. हे विचित्र आहे. क्ष च्या लिखाणावर क्ष सोडून इतरांचा अधिकार आहे की काय अशी क्ष ला भिती वाटली तर चुकीचे नाही. तसेच लेखनाची प्रक्रिया ही सततची प्रक्रिया असते. इथे लिहिणारे बरेच जण नवशिके लिहीते असू शकतात. आलेल्या प्रतिक्रियांच्यातून लिखाणात सुधारणा करण्याची गरज वाटू शकते त्यांना. नुसते टायपो नव्हेत तर पुढचा ड्राफ्ट या संदर्भाने सुद्धा. पण असा कुठलाही बदल करण्यासाठी तो लिहिता संपादकांना साकडे घालणार आणि मग ते बदल लिहून तो पाठवणार आणि मग संपादक तो बदल करणार. ही अतिशय अडथळ्याची/ अडचणीची प्रक्रिया आहे. या वेळखाऊ प्रक्रियेला वैतागून अनेक जण इथे लिहिण्याचे टाळू शकतात. मुळात लेखन-प्रतिसाद-पुनर्लेखन अशी बाहेरून किंवा लेखन-चिंतन-पुनर्लेखन अशी लेखकाची वैयक्तिक प्रक्रिया जी आहे त्यातला सहजपणा, स्पॉन्टॅनिटी अश्या कृत्रिम निर्बंधांमुळे अडकते. जे चुकीचे आणि लिहित्यासाठी गोंधळाचे ठरू शकते. तेव्हा स्वतःच्या लिखाणाचे संपादन स्वतःला करता यायला हवे. निदान हे होईतो मी तरी इथे नवीन काही लिखाण टाकणार नाही. (त्याने मिपाला काहीही फरक पडत नाही हे मला पूर्ण माहीत आहे.)
  • Log in or register to post comments

सहमत !

जयंत कुलकर्णी
Tue, 12/07/2010 - 20:35 नवीन
आत्ताच हा धागा वाचला ! मी आपल्या मतांशी सहमत आहे. आणि लिहायचे थांबवले तर कोणाचे काहीही बिघडणार नाही याही मताशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

नीलकांत-जी, धन्यवाद!

सुधीर काळे
Mon, 12/06/2010 - 12:25 नवीन
नीलकांत-जी, धन्यवाद! आपले म्हणणे आपण छान लिहिले आहे. माझ्याकडून नेहमीच सहकार्य मिळेल याची खात्री देतो. वेळात वेळ काढून आपण पूर्वी करत होता तसे लेखन पुन्हा सुरू करावे. दुर्दैवाने मी आपले त्यावेळचे कुठलेच लिखाण वाचलेले नाहीं! एक विनंती: अनेक दृष्ट्या सर्वात सरस असलेले 'गमभन' हे सॉफ्टवेअर एका बाबतीत चांगले नाहीं आणि ते म्हणजे लिहिताना कांहीं ठराविक काळजी घेतली नाहीं तर लि़खाण Garble होते. एव्हांना मला काय केल्यास तसे होते हे कळलेले आहे. आणि दुर्लक्षाने तसे झाल्यास ctrl+z वापरून त्या आपत्तीतून सुटका करून घेऊन पुन्हा मूळ पदावर कसे यायचे हेही कळले आहे, पण मूळ उणीव काढून टाकण्याचा प्रयत्न व्हायला व्हावा. याउलट बरहा हे सॉफ्टवेअर सर्व दृष्ट्या जास्त सरस आहे पण 'माँटेसरी' हा शब्द लिहिला तर तो 'मॉंटेसरी' असा दिसतो. अनुस्वार आहे पण तो off-centre असल्याने नीट दिसत नाहीं. तसेच अवतरण चिन्हेही कमी प्रतीची उठतात. तरी 'गमभन'तील वरील उणीव भरून काढण्याचा प्रयत्न आपण जरूर करावा किंवा करून घ्यावात ही विनंती. शुभेच्छा देऊन इथे थांबतो.
  • Log in or register to post comments

एका हाताने टाळी वाजत नाही हेच

अवलिया
Mon, 12/06/2010 - 13:12 नवीन
एका हाताने टाळी वाजत नाही हेच आणि एवढेच.
  • Log in or register to post comments

भावना पोचल्या ...

योगेश सुदाम शिन्दे
Mon, 12/06/2010 - 18:47 नवीन
भावना पोचल्या नीलकांत राव ...
  • Log in or register to post comments

राजकुमार अगदी चांगल

जागु
Wed, 12/08/2010 - 13:08 नवीन
राजकुमार अगदी चांगल लिहिलयत. निलकांत आमच्याक्डून तुम्हाला सहकार्य आहे. मिपाचा दर्जा चांगला आहे व तो टिकवुन ठेवणे हे जुन्या व नविन मिपाकरांच्या हातात आहे. तेंव्हा मिपावर येताना आपल्या कुटुंबात असल्यासारखे वागा. शेजार्‍याकडे गेल्यासारखे नको.
  • Log in or register to post comments

मिपा खुप छान आहे !

राजवैभव
Fri, 01/08/2016 - 20:06 नवीन
मिपा खुप छान आहे !या करिता खुप खुप धन्यवाद !
  • Log in or register to post comments

मिपावरील स्वाक्षरीची सुविधा

मराठी कथालेखक
Fri, 02/05/2016 - 15:49 नवीन
मिपावरील स्वाक्षरीची सुविधा बंद करण्यात आली आहे का ?
  • Log in or register to post comments

मप॑आ खुपच छान आहे. मराथी

ashok dalvi
Wed, 04/06/2016 - 17:31 नवीन
मप॑आ खुपच छान आहे. मराथी लिह्न्याचा प्रयत्न कर्तोय. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

स्मशानवैराग्य...

कर्नलतपस्वी
Tue, 08/13/2024 - 14:11 नवीन
अधून मधून येत असते. म्हणून लगेच अंगी चिताभस्म फासू नये. For@काॅमी,भागो,कां.ली. आणी इतर सदस्यांना. अनुभवाचे बोल. बम बम भौले, श्रावणमासी हर्ष मानसी असू द्यात.
  • Log in or register to post comments

सदस्यत्व रद्द करण्यासाठी

सुबोध खरे
Tue, 08/13/2024 - 18:18 नवीन
सदस्यत्व रद्द करण्यासाठी विनंती करायची काय आवश्यकता आहे? हे इथल्याच लोकांना आम्ही व्हीओतलो आहोत हे जाहीर करणे आहे. त्याची काहीही गरज नाही इथल्या वितंडवादाला कंटाळून असंख्य सदस्य असेही आताशा मिपावर दिसत नाहीत. बाकी मिपा चालकांना अनेक गोष्टी सांगूनही त्यात सुधारणा न झाल्याने असे झालेले आहे. तेंव्हा हे असच चालायचं हे गृहीत धरा
  • Log in or register to post comments

सदस्यत्व रद्द करण्यासाठी विनंती करायची काय आवश्यकता आहे?

धर्मराजमुटके
Tue, 08/13/2024 - 18:51 नवीन
अनुमोदन. जणू काही आपण खाते उघडायला काही पैसे मोजले आहेत आणि सदस्यत्व रद्द झाल्याने ते व्याजासकट परत मिळतील असे आहे काय ? नाही पटले तर मिपाच्या आद्य संस्थापकांच्या भाषेत चपला घालून चालू पडायचे. हाय काय नाय काय ? सदस्यत्व रद्द करत नाहित म्हणून कुंथत जगायची आवश्यकता नाही. असो. आपल्याला न पटलेल्या गोष्टी जगात सगळीकडे होतच असतात. म्हणून आत्महत्या करणे आणि कंटाळून सदस्यत्व सोडणे हे सारखेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

इथल्या वितंडवादाला कंटाळून असंख्य सदस्य असेही आताशा मिपावर दिसत

मुक्त विहारि
Tue, 08/13/2024 - 21:25 नवीन
इथल्या वितंडवादाला कंटाळून असंख्य सदस्य असेही आताशा मिपावर दिसत नाहीत. ----- असेच असावे.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

दिलीप बिरुटे सर‌ यांना

जावा फुल स्टॅक
Wed, 08/14/2024 - 12:23 नवीन
दिलीप बिरुटे सर‌ यांना विनन्ति आहे कि प्याट्रिक झेड हा आयडी जो रद्द केलेला दिसत आहे तो त्यांनि परत आनावा.
  • Log in or register to post comments

@जावा कोन आहे

कर्नलतपस्वी
Wed, 08/14/2024 - 14:49 नवीन
Ssssssss
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जावा फुल स्टॅक

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Fri, 08/16/2024 - 19:58 नवीन
उंदराला मांजर साक्ष....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जावा फुल स्टॅक

मिसिंग जुने जाणते मिपाकर.

चौथा कोनाडा
Wed, 08/14/2024 - 14:09 नवीन
मिसिंग जुने जाणते मिपाकर. नव्या मिपाकरांनी मिपा हलतं ठेवलं आहे याचं ही समाधान आहे ! मिपाला पर्याय नाही मिपा दा जवाब नहीं
  • Log in or register to post comments

मिसिंग जुने जाणते मिपाकर.

टर्मीनेटर
Wed, 08/14/2024 - 15:46 नवीन
मिसिंग जुने जाणते मिपाकर.
गेले ते गेले... कालाय तस्मै नमः! एक बार चले जाते हैं जो दिन रात सुबह शाम वोह फिर नही आते... तस्मात आता गेलेल्यांची आठवण काढून काही उपयोग नाही, ते ढगात गेले असे समजायचे 😀
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

नवे मिपाकर येत नाहीत.

कंजूस
Wed, 08/14/2024 - 15:59 नवीन
नवे मिपाकर येत नाहीत. जुने मिपाकर फारसे लिहीत नाहीत. काय करणार?
  • Log in or register to post comments

नवे मिपाकर येणार नाहीत असे

टर्मीनेटर
Wed, 08/14/2024 - 16:25 नवीन
नवे मिपाकर येणार नाहीत असे काही नाही पण कमीतकमी मेन बोर्डावरचे वतावरण तरी त्यांना आकर्षीत करणारे असावे! मला कोणाच्या सदस्यनामाचा नामोल्लेख करायचा नाही पण कमीतकमी आपल्या प्रतिसादांत काहितरी तथ्य किंवा सच्चेपणा असावा ही काळजी देखील न घेता निव्वळ द्वेष भावनेतून काही नव्या (आणि मिपाच्या अत्यंत जून्या जाणत्या) सदस्यांकडूनही प्रतिसाद दिले जात असतील तर मग दोष कोणाचा? बाकी गेले ते जाउद्यात, त्यांच्याविषयी काही वाच्यता नको असे वाटते, त्यांना त्यांची जी काही कारणे असतील ती लखलाभ… आले ही बहू… येतीलही ही बहू….
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

प्रोफेश्वर प्रा.डॉ.दिलीप बिरुटे हे खूप चांगले संपादक आहेत

जावा फुल स्टॅक
Fri, 08/16/2024 - 14:10 नवीन
प्रोफेश्वर प्रा.डॉ.दिलीप बिरुटे हे खुप चांगले संपादक आहेत त्यांनी मिसल्पव ही खुप छान प्रकारे धुरा सांभाळी आहे त्याना नम्र विनंति आहे कि प्याट्रीक झेड हा आयडी क्रूपाया परत आणून द्यावा
  • Log in or register to post comments

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Fri, 08/16/2024 - 19:58 नवीन
उंदराला मांजर साक्ष....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जावा फुल स्टॅक

तू भेटशी नव्याने.....

कर्नलतपस्वी
Fri, 08/16/2024 - 17:05 नवीन
नवे मिपाकर येणार नाहीत असे काही नाही नवे नाही आले तरी जे गेलेत तरी पण आहेत ते नव्या आय डी ने पुनर्जन्म घेतलीच की.....
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा