✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लुटा लुत्फ शब्दांचा

य
यकु यांनी
Wed, 12/01/2010 - 16:42  ·  लेख
लेख
काही अभंग/ कवने, गाणी, आपल्याला सदासर्वकाळ आवडत असतात. नुसती ऐकली तरी आपल्याला शांत करून, वेगळ्याच जगात घेऊन जाऊन डोळ्यांतून अश्रू काढण्याची, कधीकधी तर भलतं सेंटीमेंटल करून ढसाढसा रडवण्याची ताकद या गाण्यांमध्ये असते. ही गाणी मग प्रेमगीतं असतील, अभंग असतील, भावगीतं असतील, गझलेची एखादी ओळ असेल की एखादी कविता की एखाद्या लेखकांना मन आकाशा एवढं मोठं करून लिहीलेल्या ओळी असतील. कितीही पत्थरदिल माणूस झाला तरी अशी गाणी, अभंग, कवनं, उतारे प्रत्येकाचे असतातच. उदा. अवलिया यांनी ज्ञानेश्वरीतील ओवीबद्दल केलेले आजचे सुंदर प्रकटन. कुणी सांगतं, कुणी सांगत नाही. कृपया तुमच्या अशा दर्दभर्‍या जागा/ गाणी सांगा आणि त्यांचा लुत्फ सर्वांना लुटू द्या. सुरूवात मी करतो. बाबामहाराज सातारकरांच्या आवाजातील संत तुकारामांच्या "गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी, हे तो देणे तुमचे देवा घ्यावी अखंडीत सेवा, अंगी प्रेमाचे भरते नेघे उतार सरते, तुका म्हणे वाणी प्रेम अमृताची खाणी" ऐकले की डोळे मिटले जाऊन पापण्यांत पाणी येतेच.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3774 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

आकाशी या झेप घे रे पाखरा..

गवि
Wed, 12/01/2010 - 16:58 नवीन
आकाशी या झेप घे रे पाखरा..
  • Log in or register to post comments

निघालो घेऊन दत्ताची पालखी..

Pearl
Wed, 12/01/2010 - 17:01 नवीन
निघालो घेऊन दत्ताची पालखी.. आम्ही भाग्यवंत आनंद निधान...
  • Log in or register to post comments

आमचे अतिशय आवडते गाणे व श्री.

परिकथेतील राजकुमार
Wed, 12/01/2010 - 17:02 नवीन
आमचे अतिशय आवडते गाणे व श्री. फटू ह्यांचे त्यावरील सुंदर विवेचन मिसळपाव वर वाचता येईल.
  • Log in or register to post comments

=)) =)) =)) =))

यकु
Wed, 12/01/2010 - 17:03 नवीन
=)) =)) =)) =)) =)) खपलो!!! ठार वाहून गेलो त्या नळाच्या पाण्यात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

तारे जमीन पर, ब्रेथलेस-शंकर

डावखुरा
Wed, 12/01/2010 - 18:08 नवीन
तारे जमीन पर, ब्रेथलेस-शंकर महादेवन., अवघे गर्जे पंढरपुर,,, बाजेरे रे मुरलिया, कस्तुरी तिलकम्, आरंभी वंदिन, भारत हमको जान से प्यारा है.. तु ही रे,, तु गेली तेव्हा.. तु तेव्हा तशी... वंदे मातरम्...
  • Log in or register to post comments

कस्तुरी तिलकम्

गुंडोपंत
Mon, 01/24/2011 - 05:54 नवीन
||कस्तुरी तिलकम् ललाट पटले वक्षःस्थले कौस्तुभम्|| पंडीतजींच का? मलाही फार आवडते ते! मला एकुणच त्यांची सगळीच संस्कृत भजने फार आवडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डावखुरा

अभंग : हाची नेम आता, न फिरे

स्वानन्द
Wed, 12/01/2010 - 20:47 नवीन
अभंग : हाची नेम आता, न फिरे माघारी
  • Log in or register to post comments

माझी आजी म्हणते कधी कधी "उमा

नगरीनिरंजन
Wed, 12/01/2010 - 21:20 नवीन
माझी आजी म्हणते कधी कधी "उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर". म्हणताना स्वतःही रडते आणि ऐकणार्‍यालाही रडवते.
  • Log in or register to post comments

मी पहील्यांदा हे गाणं आज

शुचि
Wed, 12/01/2010 - 22:57 नवीन
मी पहील्यांदा हे गाणं आज ऐकलं. खरच फार करुण आणि जीवघेणं आहे. नगरीनिरंजन आपली आभारी आहे इतकं सुरेख गाणं इथे उधृत केल्याबद्दल. तसेच यश्वंत यांनी हा धागा काढला म्हणून ते कळलं त्यांची देखील आभारी आहे. - मानभंग हाचि झाला मंडपी आहेर । उमा म्हणे, यज्ञी माझे जळाले माहेर ।। माहेरीच्या सोहळ्यात, नाहि निमंत्रिले जामात । चहू दिशी चालू होते संपदेचे थेर ।। लक्ष्मीचे जमले दास, पुसे कोण वैराग्यास । लेक पोटीचीही झाली कोप-यात केर ।। आई-बाप, बंधु-बहिणी, दारिद्र्यात नसते कोणी । दीन दानतीचे सारे धनाचे कुबेर ।। दक्षसुता जळली मेली, नवे रूप आता ल्याली । पित्याघरी झाला ऐसा, दिव्य पाहुणेर ।। परत सासु-याशी जाता, तोंड कसे दावू नाथा । बोल ईश्वराचे झाले सत्य की अखेर ।। प्राणनाथ करिती वास, स्वर्गतुल्य तो कैलास । नाचतात सिद्धी तेथे, धरूनिया फेर ।।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

मनामधील गाणी

kamalakant samant
गुरुवार, 12/02/2010 - 10:37 नवीन
काही गाणी कवीमुळे तर काही गाणी गायकामुळे कायमची मनात घर करतात. स॑त साहित्य वगळता मनात ठसलेली काही गाणी. भा.रा.ता॑बे-मावळत्या दिनकरा,मधु मागशी माझ्या,जन पळभर्,डोळे हे जुल्मी गडे,नववधु प्रिया मी, कळा ज्या लागल्या जीवा,तिन्ही सा॑जा सखे,निजल्या तान्ह्यावरी इत्यादि. माणिक वर्मा-इथेच आणि या बा॑धावर्,चा॑दण्या रात्रीतले ते,तुझा नी माझा एकपणा,त्या चित्तचोरट्याला, तुझ्या मनात कुणितरी लपल, र॑ग रेखा घेउनि, इत्यादि. मालती पा॑डे-कशी रे तुला भेटू,त्या तिथे पलिकडे,या कातरवेळी,लपविलास तू हिरवा चाफा इत्यादि. भरपूर मोठी यादी होइल.आठवली तेवढी लिहिली.
  • Log in or register to post comments

माझं अत्यंत आवडतं

मनिम्याऊ
Sun, 01/23/2011 - 21:11 नवीन
माझं अत्यंत आवडतं गाणं... दिल्ली ६ सिनेमातलं अर्झियां सारी मै, चेहरे पे लिख के लाया हुं तुमसे क्या मांगु मै, तुम खुद ही समझ लो... या मौला... मौला मौला मौला मेरे मौला मौला मौला मौला मेरे मौला मौला मौला मौला मौला दरारें दरारें है माथे पे मौला मरम्मत मुकद्दर की कर दो मौला... तेरे दर पे झुका हुं, मीटा हुं बना हुं मरम्मत मुकद्दर की कर दो मौला... जो भी तेरे दर आया, झुकने जो सर आया मस्तींयाँ पिये सब को झुमता नझर आया प्यास लेके आया था, दरिया वो भर लाया नूर की बारिश मे भिगतासा तर् आया मौला मौला मौला मेरे मौला इक खुशबू आती थी मैं भटकता जाता था रेश्मी सी माया थी और मै तकता जाता था.. जब तेरी गली आया, सच तभी नज़र आया, मुझमें ही वो खुशबू थी, जिसे तुने मिलवाया.. मौला मौला मौला मेरे मौला टूट के बिखरना मुझको ज़रूर आता है, वरना इबादत वाला सरुर आता है, सजदे मे रहने दो, अब कहीं नही जाऊंगा, अब जो तुमने ठुकराया, तो सँवर ना पाऊंगा... मौला मौला मौला मेरे मौला सर उठा के मैने तो कितनी ख्वाहिशें की थी कितने ख्वाब देखे थे, कितनी कोशिशें की थी जब तु रुबरू आया... जब तु रुबरू आया, नजरें ना मिला पाया.. सर झुका के इक पल में मैंने क्या नहीं पाया...!! मौला... मौला मौला मौला मेरे मौला मौला मौला मौला मेरे मौला मौला मौला मौला मौला मोरा पिया घर आया.. मोरा पिया घर आया.. मौला मौला मौला मेरे मौला मौला मौला मौला मौला
  • Log in or register to post comments

कुठल्याही अनिवासी भारतीयाचे

निनाद मुक्काम …
Sun, 01/23/2011 - 23:46 नवीन
कुठल्याही अनिवासी भारतीयाचे भावविश्व दर्शविणारे गाणे म्हणजे मे जहा राहू मे काही भी राहू तेरी याद साथ हे गाणे http://www.youtube.com/watch?v=tsxFWUW6YJI
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा