(व्रुत्त पंचचामर... एक लघु आणि एक गुरु या क्रमाने ...अक्षरे योजली आहेत, पहिलाच प्रयत्न आहे.)
मला कशास भेटती ? तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा
तुझ्या परीच वागती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा.....
पुसू कश्या तुझ्या स्मृती ? स्मरू तरी किती पुन्हा?
मला पुसून टाकती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा
जरी तुझ्या सवेच मी ! तुझ्याच आसपास मी
उगाच वाट पाहती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा.......
अजून चंद्र चांदण्या ! तुला मलाच शोधती
बनून स्वप्न जागती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा
जुना रदीफ़ काफिया ! मुशायरा नवा पुन्हा
तशा नवीन भेटती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा.......
जिवंत मी ! असा कसा? मरून संपलो तरी ?
अजून श्वास पाळती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा........
मयुरेश साने ........दि..१६-ओक्ट-10
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1961
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिशय सुरेख!! शब्दच
सुंदर कविता.. पुसू कश्या
साने भाउ मस्त जमलि आहे
सुंदर कविता! मस्तच जमली आहे!
वा! आवडली!
आई ग! बरच प्रभुत्व दिसतय
जरी तुझ्या सवेच मी ! तुझ्याच
पुसू कश्या तुझ्या स्मृती ?
पुसू कश्या तुझ्या स्मृती ?
आभार आभार आभार
व्वा !!! सुन्दर कविता
मला कशास भेटती ? तुझ्या खुणा
क्या बात