✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

स्मशानानुभव - एक

आ
आळश्यांचा राजा यांनी
Tue, 11/30/2010 - 00:07  ·  लेख
लेख
त्या दिवशी अमावस्या होती. सलग तीन दिवस निर्जळी उपासाचा तिसरा दिवस. आजची स्मशानसाधना अतिशय महत्त्वाची. दीक्षा घेऊन दहा वर्षे झाली. अजून तरी गुरुकृपेने साधना कधी चुकलेली नव्हती. पण आज जरा बिकटच प्रसंग होता. गेले दोन महिने सतत फिरतीवर होतो. मला दिलेल्या अंचलातल्या गावांमध्ये शाळांची काय अवस्था आहे याचा सर्व्हे जवळजवळ पूर्ण होत आला होता. आचार्य त्रिनेत्रानंदांच्या निवासी शाळेची इमारत जवळजवळ उभी रहात आली होती. गावागावात फिरुन माणसं आणि मुलं गोळा करण्याचं काम फारशा अडचणींविना पार पडत होतं. अमावस्या-पौर्णिमेला एखाद्या ठिकाणी तरी एखाद्या देवळात किंवा संघ बंधूकडे मुक्काम पडलेला असायचा. तिथले स्मशान जवळ करणे अवघड नसायचे. कुणीतरी संघ बंधू वाट दाखवायला मिळेच. संध्याकाळी आंघोळ करुन ताजेतवाने व्हायचे, कीर्तन करायचे, कुणी मंडळी भेटायला आली तर त्यांच्याशी गुरुचर्चा करायची, आणि अंधार पडल्यावर ध्यान लाऊन बसायचे. अर्ध्या रात्री साधनेची उपकरणे घेऊन स्मशानाची वाट चालू लागायची. पण त्या दिवशी मात्र रात्र होत आली तरी मी रेल्वेतच होतो. अनपेक्षितपणे वेळेचे सगळेच गणित सकाळपासून कोलमडले होते. रात्रीचे नऊ वाजत आले होते. कसली परीक्षा घेताय असे गुरुंना मनाशी विचारत मी सरळ आल्या स्टेशनला खाली उतरलो. स्टेशन छोटेच होते. लखनौच्या जरा अलीकडले स्टेशन होते. त्या रात्रीची साधना याच ठिकाणी व्हायची होती असे मला वाटून गेले. स्मशानाचा पत्ता शोधण्याच्या कामाला लागलो. एका नवख्या दीक्षिताने एकदा विचारले होते, दादा, अनोळखी गावात स्मशान कसे शोधता? लोक संशय घेत नाहीत? मी त्याला हसून उत्तर दिले होते, तू हाच प्रश्न एखाद्या दारुड्याला विचार: अनोळखी गावात गुत्ता कसा शोधतोस! अर्ध्या एक तासाने मला माझा वाटाड्या मिळाला. हो नाही करत मला रस्ता दाखवायला तो कसाबसा तयार झाला. मात्र त्याने मला सावधगिरीची सूचना दिली – त्या स्मशानात एक सिद्ध अविद्या तांत्रिक साधना करण्यासाठी अधूनमधून येत असे. गुरुंना माझी आज खरेच परीक्षा घ्यायची आहे असे मला वाटून गेले. भरीस भर म्हणून आजची अमावस्या सिद्धी प्राप्त करण्यासाठी सुयोग्य वेळ होती. माझे लर्नेड फ्रेंड आज नक्कीच स्मशानात असणार हे मी ताडले. माझ्या अनुत्सुक वाटाड्याला बोलण्यात गुंतवत माझा कार्यभाग उरकायच्या मागे लागलो. गाव मागे पडले आणि अंधार दाट झाला. या प्रदेशातील स्पंदने मला स्पष्ट जाणवू लागली. कोणे एके काळी नक्कीच हे एक तंत्रपीठ असणार. माझा वाटाड्या मित्र मात्र पुरता भ्याला होता. दबल्या आवाजात त्याने मला सांगितले हे असेच सरळ पुढे गेले की स्मशान सुरु होते. एवढे बोलून तिथून सटकायचा त्याचा विचार असावा. पण बोलण्याच्या नादात आम्ही तिथवर पोचलोच होतो. अचानक ती भयाण शांतता कापत एक आरोळी ऐकू आली – तिथेच थांब! (अपूर्ण)
  • स्मशानानुभव - दोन
  • स्मशानानुभव - तीन

Book traversal links for स्मशानानुभव - एक

  • स्मशानानुभव - दोन ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7964 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

कथा रंगणार निश्चित!!!

यकु
Tue, 11/30/2010 - 00:23 नवीन
येऊ द्या.. येऊ द्या.. (स्मशानात धुनी पेटवून चिलीम पिणारा) यशवंत
  • Log in or register to post comments

पुढे?? काय झालं?

प्राजु
Tue, 11/30/2010 - 00:33 नवीन
पुढे?? काय झालं?
  • Log in or register to post comments

जरा मोठे भाग लिहा कि आ.

रेवती
Tue, 11/30/2010 - 00:36 नवीन
जरा मोठे भाग लिहा कि आ. रा. हे लेखन उत्सुकता वाढवणारे आहे.
  • Log in or register to post comments

असंच म्हणते ...पुढील

पुष्करिणी
Tue, 11/30/2010 - 00:44 नवीन
असंच म्हणते ...पुढील भागांच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

च्यायला...

श्रावण मोडक
Tue, 11/30/2010 - 00:38 नवीन
च्यायला... प्रांत रस्ता चुकला की काय! ;­) की ­आता ­एकदम ­'खाकी'त ­शिरलाय? ;­) लेखन ­उत्सुकता वा­ढव­णारे ­आहे. प­ण ­भाग ­छोटा ­झाला. ­वाट पाहतोय...
  • Log in or register to post comments

वाचतोय.

नगरीनिरंजन
Tue, 11/30/2010 - 06:27 नवीन
वाचतोय.
  • Log in or register to post comments

मी पण वाचतेय.

शिल्पा ब
Tue, 11/30/2010 - 08:12 नवीन
मी पण वाचतेय.
  • Log in or register to post comments

जरा तुमच ( नायकाच ) वर्णन पण

स्पंदना
Tue, 11/30/2010 - 08:17 नवीन
जरा तुमच ( नायकाच ) वर्णन पण येउ दे . कुठ कफनी, दाढी? आत्ता पासुनच भिती वाटतेय. जरा वरच्या हेडलायनीत अन क्रमशः मधल अंतर वाढवा राव! किती ताणायच ते? लवकर लवकर सांगा.
  • Log in or register to post comments

वा!

ईन्टरफेल
Tue, 11/30/2010 - 09:17 नवीन
वाटच पहात होतो अशा लेखाची लवकर येउ ध्या वो पडले भाग
  • Log in or register to post comments

मस्त सुरुवात

बद्दु
Tue, 11/30/2010 - 11:15 नवीन
लवकर येउ द्या पुढचे भाग
  • Log in or register to post comments

वाचत

sneharani
Tue, 11/30/2010 - 11:20 नवीन
वाचत आहे, छोटा भाग झालाय पण मस्त रंगलाय. लिहा पटापट.
  • Log in or register to post comments

उत्तम

लॉरी टांगटूंगकर
Tue, 11/30/2010 - 11:38 नवीन
वाट बघतोय
  • Log in or register to post comments

मोठा

आनंदयात्री
Tue, 11/30/2010 - 11:40 नवीन
मोठा तुकडा पाडा की मालक. अजून धनंजय पण वाचून पुरा व्हायचाय ;)
  • Log in or register to post comments

पुढे?

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 11/30/2010 - 12:14 नवीन
पुढे?
  • Log in or register to post comments

हा भाग तर सुरु होण्याच्या

विवेक मोडक
Tue, 11/30/2010 - 13:31 नवीन
हा भाग तर सुरु होण्याच्या आधीच संपला की! पुढे काय???
  • Log in or register to post comments

पूढला भाग मोठा लिहिणे...

अवलिया
Tue, 11/30/2010 - 13:50 नवीन
पूढला भाग मोठा लिहिणे... वाटल्यास पंचमकार साधना करुन या आणि मग लिहा !!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा