Skip to main content

एक (दुर्दैवी) फरक.....................

एक (दुर्दैवी) फरक.....................

Published on गुरुवार, 25/11/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
इथे मिपावर नेहमीच महाकाय चीन कसा निर्दयी आहे ह्याच्या चर्चा घडतात. पण हेही वाचा....... दिनांक १५ नोव्हेंबर २०१०, ह्या एकाच दिवशी नियतीने दोन ठिकाणी आपली वक्र नजर टाकली. ठिकाण क्र. एक दिल्ली : नवी दिल्ली - पूर्व दिल्लीत काल इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 66 झाली आहे. शहरातील विविध रुग्णालयांत 130 जखमींवर उपचार करण्यात येत असून, मूळ बातमी ठिकाण क्र. दोन शांघाई : चीनमधील शांघाय शहरात काल एका इमारतीत आग भडकल्याने 53 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, 70 जण गंभीररीत्या भाजले आहेत. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. मूळ बातमी सामान्य माणसे तर दोन्ही ठिकाणी बळी गेली, तर आपण म्हणाल ह्यात फरक काय ? १) भारत : दिल्ली सरकारने मृतांच्या नातेवाइकांना दोन लाख, तर जखमींना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. २) चीन : The government would pay 960,000 yuan (144,450 U.S. dollars) in compensation and subsidies for each of those who died in the fire, Zhang added. The residents whose apartments and belonging in them were destroyed in the fire will be fully compensated for their loss of property. हा दुवा बाकी भ्रष्टाचार हा मुद्दा सध्या सोडून द्या, पण चीन सरकार त्यांच्या लोकांना इतकी किंमत देत आहे हे बघून भारावून आले. ईश्वर सर्व मृतात्म्यांना शांती देओ. ---------------------------------------------------------------------------------------------------------------------- अवांतर : मागे एक बातमी वाचली होती, चीनच्या एका शहरात एक उच्च सरकारी पोलीस पदाधिकाऱ्याच्या मुलाने दारू पिऊन गाडी चालवून झालेल्या अपघातात २ जणांना ठार झाले होते आणि अंदाजे १० जण जखमी झाले होते. 'त्या' मुलाला सहा महिन्याच्या आत फाशीची (हो हो.. ...फाशीच आणि ते सुद्धा सहा महिन्यात) शिक्षा सुनाविण्यात आली होती. परत कोणाची हिम्मत होईल का, दारू पिऊन गाडीला हात लावण्याची ?

याद्या 3395
प्रतिक्रिया 16

पहिला फरक मान्य आहे .. सगळीकडे वेगळॅए परिस्तीती असते .. परंतु दुसरा दारु पिउन गादि चालवणे तसेच कुठल्याही गुन्ह्या साठी भारतात ही कडक शिक्षा हवी असेच वाटते .. पण फक्त वाटुन आज पर्यंत काहीच झाले नाही .. हि सुद्धा एक खंत आहे

In reply to by विजुभाऊ

आज काय दारु पिऊन गाडी चालवायला बंदी, उद्या जायफळ घातलेलं दुध पिऊन गाडी चालवायला पण बंदी करतील.. तसं असेल दारु विकत घेतानच वाईन शॉप / बार मध्ये कारची चावी जमा करायची आणि नंतर ती कलेक्ट करायची सोय असायला पाहिजे.. ना रहेगी चाबी, ना चलेगी गाडी! - (सुजाण) इंटेश ड्रायव्हर.

दुवा आणि माहितीबद्दल धन्यवाद :) दुवा मजेशीर आहे. आता ह्यावर इतर 'तज्ज्ञ' आणि जाणकारांची मते वाचायला आवडतील. आम्ही पर्सनली व्यनी करुन त्यांना ह्या चर्चा दुवा देत आहोत. - छोटा डॉन

एक नुकतीच आलेली बातमी. चीनमध्ये साठ हजार अश्‍लील संकेतस्थळे बंद भारतात सुद्धा असे निर्णय घेतले जावेत हि इच्छा. योग्य वयात आल्यावर त्या बाबतीती शिक्षण जरूर दिले जावे, पण इथेसुद्धा बिबत्सपणा बंद व्हावा. हीच मनोमनी इच्छा. मुलांचे संगणक आणि मायाजाला वापरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यात अश्लील संकेत स्थळांची भर पडत असेल तर त्यांच्या वाढत्या आसक्तीवर कोण नियंत्रण ठेवणार ?

In reply to by वेताळ

७५,००० रुपयांसाठी आत्महत्या करायला लागणाऱ्या देशातील, एक सामान्य नागरिकाकडून असा प्रश्न येणे स्वाभाविक आहे. >> चीन मध्ये कायम रहाण्याचा परवाना मिळतो का ह्याची पण चौकशी करा. एक मित्राला विचारले, त्याच्या जुजबी माहितीनुसार असा परवाना मिळत नाही, जितके दिवस तिथे काम कराल तितके दिवसांचाच परवाना मिळतो. एकदा प्रवेश करून दोन-तीन वर्षे राहिल्यानंतर पुढे असे दोन-दोन वर्षाचे परवाने सहज मिळू शकतात. पण कायम स्वरूपी परवाना मिळत नाही. तज्ञांनी योग्य माहिती पुरवावी.

In reply to by गांधीवादी

भारतात जे फुकट स्वातंत्र्य मिळते ते चीन देश्यात मिळत नाही. तिथे सरकार विरुध्द बोलल्यास रणगाड्याखाली चिरडुन मारतात. तिथे मेल्यानंतर कुटुंबाला पैशे मिळुन काय फायदा. कशाचीही तुलना तुम्ही कसे करता राव.

In reply to by वेताळ

>>तिथे सरकार विरुध्द बोलल्यास रणगाड्याखाली चिरडुन मारतात. इथे मारत नाहीत असे म्हणायचे आहे का ? बर ते जाऊद्या, वेताळ भाऊ, मी चिन्यांच्या सत्तेचे समर्थन करीत नाही. त्यांचे दिसलेले काही चांगले गुण उचला.........इतकंच म्हणायचे आहे.

In reply to by गांधीवादी

भारतात जे फुकट स्वातंत्र्य मिळते ते चीन देश्यात मिळत नाही. तिथे सरकार विरुध्द बोलल्यास रणगाड्याखाली चिरडुन मारतात. तिथे मेल्यानंतर कुटुंबाला पैशे मिळुन काय फायदा. कशाचीही तुलना तुम्ही कसे करता राव.

परवाना मिळतो का ह्याची पण चौकशी करा. --------------------------------------------- दादा इथेच रहा..मी.पा चे कसे होणार आपल्या शिवाय?... त्यातुन सोंड डावि कडे कि उजवि कडे असे रहस्यमय धागे अस्ल्याने मि.पा..चिन मधे ब्यान होणार

अश्या खुपश्या अपघाती विमा पॉलिसी आहेत, त्या अपघाती मृत्यु पश्चात भरपुर रकमेची नुकसान भरपाई देतात. मग काय चंगलच चंगळ.