मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सगळे बहाणे माफ आहेत प्रेमात !!

प्रकाश१११ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
व खरेच खुळावला काय आवडले मला तिचे ? डोळे? तिचे बोलणे ? नजरेतील कोवळेपणा ? काय कुणास ठाऊक ? पण माझा तर जीव जडला तिच्या साध्या साध्या संवादातून नि जीव माझा हरवून गेला !!! श्रावणातल्या सकाळी सकाळी ती आली की , किती छान दिसायची अबोली रंगाच्या साडीत ती किती मस्त वाटायची आई तिच्याशी बोलता बोलता माझ्याकडे हलकेच बघायची कुणास ठाऊक ती का अशी बघायची ?? का ती पण कोठल्या स्वप्नात हरवून जायची ? का तिला पण ती आवडायची ? नि माझ्या भावी आयुष्यचे स्वप्न बघायची ?? कुणास ठाऊक ?? तिला सोडायला म्हणून मी थोडसे अंतर जायचो तेह्वा आभाळ किती गच्च वाटायचं निळे निळे एक वेह्लाळ पाखरू कसे छान गिरकी घ्यायचे तिचा निरोप घेता घेता कसे उदास उदास वाटायचे हलकासा तिचा स्पर्श केवढा काहूर माजवायचे असे झाले काहो कधी तुमचे ? माझे तर फार झाले !! माझे पुढे काय झाले ? तुम्हीपण सांगा तुमचे काय झाले ?

वाचने 1023 वाचनखूण प्रतिक्रिया 0