क्रॅनबेरी चटणी

Primary tabs

स्वाती२'s picture
स्वाती२ in पाककृती
21 Nov 2010 - 7:26 pm


येत्या गुरवारी इथे थॅक्सगिव्हिंग आहे. या थॅक्सगिव्हिंगच्या टेबलवर क्रॅनबेरी सॉस हवेच. आमच्या इथे मात्र या सॉस पेक्षा क्रॅनबेरीची चटणीच आवडते. जालावर शोधल्यास बर्‍याच कृती सापडतील. आमच्याकडे केला जाणारा काहीसा देशी अवतार इथे देतेय.

साहित्य :
१२ औस क्रॅनबेरीज

१/२ सफरचंद तुकडे करुन ; मी ग्रॅनी स्मिथ वापरते.
मूठभर मनुका किंवा बेदाणे (नसले तरी चालेल)
१/४ कप ब्राऊन शुगर ; नेहमीची पांढरी साखर चालेल
२ टी स्पून जीरे पावडर.
१/२ टी स्पून ऑल स्पाईस पावडर (नसल्यास १/४ टी स्पून दालचिनी पावडर + १/४ टी स्पून लवंग पावडर)
१/४ कप सायडर विनेगर, रेड वाईन, लिंबू रस या पैकी जे काही असेल ते
१ टी स्पून तिखट देशी चव हवी असल्यास

साखर, जीरे पावडर, तिखट, लवंग,दालचिनीचे प्रमाण आवडीप्रमाणे कमीजास्त करु शकता.

कृती :
क्रॅनबेरीज आणि सफरचंदाचे तुकडे फूड प्रोसेसर/ चटणीच्या भांड्यातून भरड वाटून घ्यावेत. जाड बुडाच्या पातेल्यात वाटलेले मिश्रण आणि बाकीचे सर्व जिन्नस एकत्र करुन मध्यम आचेवर शिजवत ठेवावे. अधुन मधुन ढवळावे. १५-२० मिनिटानी मिश्रणातून बुडबुडे येऊ लागले की आच मंद करुन अजुन १०-१५ मिनिटे झाकण ठेऊन शिजवावे. खाली लागू नये म्हणून अधुन मधुन ढवळावे. चव घेऊन आवडीप्रमाणे साखर, तिखट वगैरे कमी वाटल्यास घालून नीट ढवळून आचेवरुन खाली उतरवावे. गार झाले की बाटलीत भरून फ्रीज मधे ठेवावे.
१०-१२ दिवस छान राहते. आमच्या कडे २-३ दिवसात संपते.
ही चटणी खाण्यासाठी बरोबर टर्की हवीच असे काही नाही. चिकन बरोबर किंवा ब्रेड ला लावूनही छान लागते

प्रतिक्रिया

पैसा's picture

21 Nov 2010 - 10:01 pm | पैसा

ही फळं आंबट आहेत का?

प्रियाली's picture

21 Nov 2010 - 10:15 pm | प्रियाली

क्रॅनबेरीची ताजी फळे आंबट-गोड असतात. मला सुकवलेली क्रॅनबेरी फार आवडते. ती गोड लागते. बेदाण्यांपेक्षाही अधिक. सॅलडमध्ये अतिशय सुंदर लागते. मी सहसा ड्राय क्रॅनबेरी असलेले सॅलडच निवडते. सिरिअल्समध्येही मला ड्राय क्रॅनबेरी आणि थँक्स गिविंगच्या निम्मित्ताने केलेला सॉसही आवडतो. क्रॅनबेरीचा रसही आंबटसर असतो. तो ही मला आवडतो पण नेहमीच नाही.

मूत्रसंबंधी विकारांवर हे फळ अतिशय गुणकारी आहे. युरिन-इनफेक्शन वगैरे असल्यास लहानमोठ्या सर्वांना डॉक्टर आवर्जून क्रॅनबेरी रस प्यायला सांगतात.

स्वातीने सांगितलेली चटणी करून बघायलाच हवी. त्यात बेदाण्यांऐवजी सुकवलेली क्रॅनबेरीच वापरली तर?

सहज's picture

22 Nov 2010 - 6:25 am | सहज

सुकवलेली क्रॅनबेरी फार आवडते!!!!!

बाकी व्होडका कॅनबेरी मिश्रणाव्यतिरिक्त क्रॅनबेरीचा असा गैरवापर पाहून ....शरम वगैरे वगैरे.. ;-)

पर्नल नेने मराठे's picture

23 Nov 2010 - 5:08 pm | पर्नल नेने मराठे

मैत्रीणी मद्यपान करताना त्यात कॅनबेरी मिश्रण वापरतात हे माहित आहे.
आम्ही फक्त फळेच खातो.

सुनील's picture

23 Nov 2010 - 7:24 pm | सुनील

बाकी व्होडका कॅनबेरी मिश्रणाव्यतिरिक्त क्रॅनबेरीचा असा गैरवापर पाहून ....शरम वगैरे वगैरे

टर्कीचं स्टफींग वगैरे ठीक आहे पण क्रॅनबेरीचा खरा उपयोग कॉकटेलातच!

चित्रा's picture

21 Nov 2010 - 10:47 pm | चित्रा

छान, धन्यवाद, स्वाती.

रंग फारच छान आलाय.
क्रॅनबेरी सॉस माहित होते पण चटणीची कृती नविनच!

परिकथेतील राजकुमार's picture

22 Nov 2010 - 12:02 pm | परिकथेतील राजकुमार

मस्तच एकदम !

आता जेंव्हा कधी बिटाची कोशिंबीर खाल्ली जाईल तेंव्हा ह्या चटणीची आठवण हमखास येईल.

स्वाती२'s picture

23 Nov 2010 - 4:49 pm | स्वाती२

धन्यवाद!

मदनबाण's picture

23 Nov 2010 - 7:14 pm | मदनबाण

वा... एक वेगळीच पाकॄ. :)
मला ती फळे पाहिल्यावर रातांबे आठवले... ;)

स्वाती दिनेश's picture

24 Nov 2010 - 2:11 am | स्वाती दिनेश

पाकवलेल्या क्रॅनबेरीजचा आमची त्सेटा आजी फर्मास केक करते(तिच्याकडून शिकून मी ही करते.. क्यालरींचा बाँब असलेल्या ह्या केकची कृती लवकरच देईन..)
स्वाती, ही चटणी मस्त दिसते आहे, करुन पाहिन..
स्वाती

धिन्गाना's picture

25 Nov 2010 - 12:36 pm | धिन्गाना

ह्या फळाऐवजि कोणते फळ वापरता येइल?

स्वाती२'s picture

27 Nov 2010 - 5:32 pm | स्वाती२

क्रॅनबेरी ऐवजी कैरी किंवा आंबट सफरचंद वापरुन अशीच चटणी करता येते. थोडे आले किसून घालायचे आणि लवंग-दालचिनी ऐवजी थोडा गरम मसाला किंवा लोणच्याचा मसाला घालायचा. आवळा किंवा कच्ची करवंदे वापरुनही प्रयोग करायला हरकत नाही.