✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कावस मानेकशॉ नानावटीच्या खटल्याची गोष्ट.

ज
जयंत कुलकर्णी यांनी
गुरुवार, 11/18/2010 - 11:22  ·  लेख
लेख

Book traversal links for कावस मानेकशॉ नानावटीच्या खटल्याची गोष्ट.

  • ‹ कावस मानेकशॉ नानावटीच्या खटल्याची गोष्ट.
  • Up
  • १ विरूध्द ११ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8777 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

“एक विरूध्द अकरा” या नावाने

मृत्युन्जय
गुरुवार, 11/18/2010 - 11:38 नवीन
“एक विरूध्द अकरा” या नावाने वाचायला, अनुभवायला मिळेल एक रुका हुआ फैसला ची मूळ कथा काय? चित्रपट अफलातून आहे. कुठलाही प्रस्थापित कलाकार नसताना, कुठलीही ड्रामेबाजी न करता चित्रपट मस्त जमला आहे. बाकी ज्युरीची सीस्टिम बेकार होती यात काही वादच नाही. अमेरिकेत बहुधा अजुनही अशी व्यवस्था आहे. जाणकार यावर योग्य ते भाष्य करु शकतील. पण अनेक खटल्यांमध्ये ज्युरींना कायद्याचे व्यवस्थित ज्ञान नसल्यामुळे अथवा त्यांची दिशाभूल करणे सोपे असल्यामुळे अथवा त्यांना फितवणे किंवा धमकावणे सोपे असल्यामुळनाकिंवा त्यांचे इगो चुचकारुन अथवा भडकावून निर्णय फिरवणे सोप्पे असल्यामुळे बर्‍याच खटल्यांमध्ये चुकीचे निर्णय दिले गेले आहेत हे सिद्ध झाले आहे. बाकी सगळ्या गोष्टी कायदेतज्ञांच्या बाबतीत पण होउ शकतात. पण कायद्याची जाण नसल्यामुळे जे प्रश्न उपस्थित होतात ते गंभीरे असतात.
  • Log in or register to post comments

आवडतय

लॉरी टांगटूंगकर
गुरुवार, 11/18/2010 - 11:49 नवीन
जुरी ची निवड कशी करतात ???
  • Log in or register to post comments

वाचतोय.. १२ एंग्री मॅन आणि एक

निखिल देशपांडे
गुरुवार, 11/18/2010 - 11:56 नवीन
वाचतोय.. १२ एंग्री मॅन आणि एक रुका हुवा फैसला दोन्ही पाहिलेले आहेत. त्यामुळे पुढच्या भागाची उत्सुकता नक्कीच आहे. ज्युरीची पद्धत आपल्या कडे नाही पण पिडाकाकांचे अमेरिकेतला ज्युरी ड्युटीचा अनुभव आठवला.
  • Log in or register to post comments

+१

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 11/18/2010 - 12:46 नवीन
पिडाकाकांचा लेखच आठवला सगळ्यात आधी. तसेच मिपावरच्या देवदत्त ह्यांच्या ह्या धाग्यावरील काही प्रतिक्रीयांमधुन '१२ अँग्री मॅन' विषयी अजुन माहिती मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

रंजक

श्रावण मोडक
गुरुवार, 11/18/2010 - 12:54 नवीन
रंजक!!!
  • Log in or register to post comments

विकीपिडीयावरील या खटल्याच्या

नितिन थत्ते
Sun, 11/21/2010 - 16:24 नवीन
विकीपिडीयावरील या खटल्याच्या पानावर सुद्धा भाईप्रताप आणि कावसजीची सुटका यांचा संबंध जोडून दाखवलेला आहे. आणि विजयालक्ष्मी पंडित आणि नेहरू ही नावे घेतली गेली आहेत. पण राज्यकर्त्यांना भाई प्रतापला सोडायचे होते म्हणून नानावटीला सोडणे भाग पडले असा जो अन्वयार्थ दिसतो तो बरोबर वाटत नाही. उलट नानावटीला सोडावे असे वाटत होते म्हणून भाई प्रतापच्या खटल्याचा वापर केला होता असे वाटते. याचे मला वाटणारे कारण असे.... भाई प्रतापने दयेचा अर्ज केला होता. त्या प्रकरणाची पुनर्चौकशी होऊन त्याला उगाच दोषी ठरवले गेले आहे असा निष्कर्षही आला होता. तेव्हा भाई प्रतापला तसेच सोडणे राज्यपालांना सहज शक्य होते. त्यासाठीची पुरेशी सामग्री सरकारजवळ होतीच. नानावटीला सोडणे ही भाई प्रतापला सोडण्यासाठीची प्रीकंडिशन असण्याचे काहीच कारण नव्हते. तरीही हा फॉर्म्युला ठरवण्यामागे नानावटीला सोडण्याची इच्छा/दबाब हेच कारणीभूत असावेत. (पारशी सिंध्यांपेक्षा खूपच श्रीमंत आणि वजनदार होते)
  • Log in or register to post comments

मला वाटते, नानावटीला सोडायचे

जयंत कुलकर्णी
Sun, 11/21/2010 - 17:39 नवीन
मला वाटते, नानावटीला सोडायचे असते तर सरकारला ज्युरींच्या निर्णयानंतरच सहज शक्य होते. घटनांचा क्रम बघितला तर हे लक्षात येईल की आपण म्हणता त्याच्या बरोबर उलटे होते. पं नेहरूनी जयंती शिपींग मधे जी भुमिका घेतली होती, ती बघता हे सहज शक्य आहे असे माणण्यास जागा आहे. दुसरे म्हणजे कावस हा नेहरूंचे अतिनिकटचे सहकारी श्री कृष्ण मेनन यांच्याशी चांगला संबधीत होता. त्याला सोडायचे असते तर पं नेहरूंना आणि श्री. मेनन यांना सहज शक्य होते. पण बहुदा तसे नसावे कारण याच्यात कसलाही आर्थिक व्यवहार नव्हता. कावस मेला काय आणि जिवंत राहिला काय याचे सोयर सुतक दोघांनाही असायचे कारण नव्हते. आणि ते बरोबरही होते. तो आता सामान्य गुन्हेगार होता. पण प्रताप भाईंचे तसे नसावे राजकारणात त्यांचे चांगलेच वजन होते आणि सिंधी समाजाची एकगठ्ठा मते हे ही एक कारण होतेच. दुसरे म्हणजे ज्या दोन अधिकार्‍यांनी ती फाईल परत उघडली त्याच्यातल्या एकाचे नाव होते पेमास्टर हे बहुदा पारशी होते. त्यांच्या लक्षात काही गोष्टी आल्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे हे सगळे त्या क्षणापासून प्लॅन्ड होते असा संशय येण्यास भरपूर जागा आहे. असो हा सगळा तर्क आहे त्यामुळे त्यालाही तेवढेच महत्व द्यायला लागेल :-) आपल्याला सगळ्यांनी चांगलेच म्हणायला हवं या हट्टापोटी माणूस काहीही करू शकतो ( ते एक जबरी व्यसन आहे ) आणि पं नेहरूंना कुठल्याही प्रि-कंडिशन्ची आवश्यकता असेल असे मला वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

पंडित नेहरु यांचा उल्लेख

अप्पा जोगळेकर
Sun, 11/21/2010 - 17:00 नवीन
पंडित नेहरु यांचा उल्लेख झाल्यानंतर तुमचा प्रतिसाद अपेक्षित होताच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

शंका

नितिन थत्ते
Sun, 11/21/2010 - 19:47 नवीन
मग नको होता का द्यायला प्रतिसाद?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

नको असलेला उल्लेख....!!

इन्द्र्राज पवार
Sun, 11/21/2010 - 19:18 नवीन
"....निर्लज्जपणे सोडण्यात आले....." ~ श्री.जयंत कुलकर्णी यांच्या लागोपाठच्या दोन सुंदर धाग्यातील मला फार खटकलेले हे वाक्य....ज्याची काहीही आवश्यकता नव्हती. मूळ धाग्याचा हेतू (जो स्पष्टच आहे) एका गाजलेल्या खटल्याची, त्यामागील इतिहासासह, माहिती इथे देणे आणि घटनाक्रमाची कारणमीमांसा इतपतच अभिप्रेत होते, शिवाय सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेल्या या खटल्याच्या निकालावर मल्लीनाथी अपेक्षित नसते. [कदाचित 'निर्लज्जपणे सोडण्यात आले....' ही न्यायालयाचा अपमान ठरावा अशातर्‍हेची टिपणी आहे.] कावस्+सिल्व्हिया+प्रेम = अटळ आणि भयावह शेवट...इतके सरळधोपट हे गणित होते, जे करंजियाच्या ब्लिट्झने रस्तोरस्ती करून (पांच का दस...पांच का दस....टाईप) अकारण दोन समाजाच्या संबंधावर रान उठविले आणि अगदी उच्चपदस्थांनासुद्धा यात (कदाचित इच्छा नसतानाही.....उगाच "कावस हा मेनन यांच्या फार जवळचा आणि मेनन यांच्या शब्द नेहरू कधीही पडू देत नव्हते..." असल्या टॅब्लॉईड धाटणीच्या सवंग विधानांना काही अर्थ नसतो. कावस काय खुशवंत काय हे त्या काळातील लंडन हायकमिशनमधील अनेक सबऑर्डिनेट नोकरांपैकी एक...त्यांना मेनन यांनी तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपले असे बिलकुल नसते.) लक्ष घालावे लागले....मग पुढे जे काही घडले त्याचा उहापोह श्री.कुलकर्णी यांच्या रीपोर्टिंग मध्ये वर केला आहेच. हे प्रकरण आणि यातील घटनाक्रमाचे अक्षरनअक्षर मला त्याचप्रमाणे इथल्या अनेक सदस्यांनी माहिती असूनही चर्चेसाठी एक चांगला धागा आला म्हणून मला आनंद झाला होता आणि मी दोन्ही भाग लक्षपूर्वक वाचले...जे आवडले ते अगोदर कळविले होतेच....आणि म्हणूनच जे आवडले नाही ते इथे कळविणे मला खूप गरजेचे वाटते, ही बाब कृपया श्री.जयंतरावांनी समजून घ्यावी. कहाणी पुढे ~~ कॅनडाला स्थलांतर झाल्यावर नानावटी कुटुंबियांनी जवळपास अज्ञातवासातच राहणे पसंत केले. कावस नानावटींचा २००३ मध्ये मृत्यु झाला, वयाच्या ७८ व्या वर्षी. तत्पूर्वी काही शोधपत्रकारांनी त्यांच्याशी पत्रव्यवहाराच्या माध्यमाने संपर्क साधला असता (त्यावेळी ते ७७ वयाचे होते) त्यांनी नम्रपणे लेखी विनंती केली की, "ते प्रकरण आमच्या आयुष्यातील एक दु:खद घटना आणि जी आम्ही विसरू इच्छितो, सबब या विषयावर कृपया मी चर्चा कदापिही करू शकत नाही. क्षमस्व !" आपणही इथे ती फाईल बंद केलेलीच ठीक. इन्द्रा
  • Log in or register to post comments

जर हे सगळे खरे असेल तर, दोन

जयंत कुलकर्णी
Sun, 11/21/2010 - 19:59 नवीन
जर हे सगळे खरे असेल तर, दोन गुन्हेगारांना सोडून देण्यात आले हे खरे नाही काय ? असे सामान्य माणसाला सोडून देण्यात आले असते का ? आपण हे लक्षात घ्या की हे झाले ते न्यायालयाचा निकाल झाल्यावर ! त्यामुळे खरे तर त्या सोडून देण्यात न्यायालयाचा काहीच संबंध नाही. मी जे या बद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत याची उत्तरे आपल्याकडे असतील तर कृपया द्यावीत. ( त्या अर्थाने मी तो शब्द वापरला ). //कावस्+सिल्व्हिया+प्रेम = अटळ आणि भयावह शेवट...इतके सरळधोपट हे गणित होते, जे करंजियाच्या ब्लिट्झने रस्तोरस्ती करून (पांच का दस...पांच का दस....टाईप) अकारण दोन समाजाच्या संबंधावर रान उठवि//// बॉटम लाईन काय आहे ?..............हे आपण लिहीले आहे तेथपर्यंत सरळधोपटच होते. करंजियांनी पारशी समाजाच्या भावनेला हात घालून रान उठवले, सिंधीसमाजाने ओळखीचा फायदा करून घेतला. न्यायाची ऐसी तैशी !........ शेवटचे वाक्य आपण मला उद्देशून लिहीले आहे काय ? तसे असेल तर सांगण्यास आनंद वाटतो की अशा अनेक फायली बंदच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

संपादकाना विनंती की हा शब्द

जयंत कुलकर्णी
Sun, 11/21/2010 - 20:37 नवीन
संपादकाना विनंती की हा शब्द योग्य वाटत नसेल तर तो काढला तरी चालेल कारण त्याने काहीच काही फरक पडत नाही. कृपया योग्य तो बदल करावा ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

कदाचित 'निर्लज्जपणे सोडण्यात

अप्पा जोगळेकर
Mon, 11/22/2010 - 08:41 नवीन
कदाचित 'निर्लज्जपणे सोडण्यात आले....' ही न्यायालयाचा अपमान ठरावा अशातर्‍हेची टिपणी आहे. कोणत्याही गोष्टीचे, घटनेचे वस्तुनिष्ठ परीक्षण करत असताना असंबंधित व्यक्ती, संस्था इत्यादी बाबींवर टीका टिप्पणी करण्यात अयोग्य असे काय आहे ? तुम्हाला जर ही टीका टिप्पणी मान्य नसेल तर ती खोडून काढण्याचे स्वातत्र्य तुम्हाला आहेच आणि ते तुम्ही वेळोवेळी अतिशय चांगल्या पद्धतीने करत असताच. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की न्यायालय असो, राज्यसंस्था असो, विशिष्ट धर्म असो किंवा एखादा आदरणीय महापुरुष असो; एखादी गोष्ट स्वच्छपणे चुकीची आहे असे वाटत असेल तर तसे ठणठणीतपणे सांगितले पाहिजे. मला वाटत श्री. कुलकर्णी यांनी तेच केले आहे. आणि निर्लज्ज जा शब्द अश्लाघ्य आहे असेही वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

फाईल....!

इन्द्र्राज पवार
Sun, 11/21/2010 - 19:46 नवीन
".....आपणही इथे ती फाईल बंद केलेलीच ठीक...." ~ श्री.जयंत जी....तुमच्या प्रतिसादाला उत्तर देण्यापूर्वी 'फाईल' संदर्भातील खुलासा करणे गरजेचे वाटत आहे. वरील वाक्य फक्त "तीन वर्षानंतर सुटका" याच्याशीच संबंधित आहे. लेखातील अन्य मुद्दे आणि विचाराशी नाही. गैरसमज झाला असेल तर क्षमस्व ! इन्द्रा
  • Log in or register to post comments

नाही हो गैर समज वैगरे काही

जयंत कुलकर्णी
Sun, 11/21/2010 - 20:06 नवीन
नाही हो गैर समज वैगरे काही नाही. मला खटकणारा मुद्दा हाच आहे की समजा उद्या अशाच गुन्हेगाराला सोडले तर काय म्हणायचं ? करंजियांच्या खेळाला सरकार बळी पडले. खरे तर कावसला त्या दोघांचे संबंध होते याची पूर्ण जाणीव होती, मग त्यात एकटा प्रेम आहूजा दोषी कसा ? मग असे म्हणायच का की शिक्षा फक्त प्रेम आहूजाला मिळाली आणि ती सुध्दा मृत्यूदंडाची ? आणि याला कारण कोण ? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

ये रास्ते है प्यारके... हा

अविनाशकुलकर्णी
Sun, 11/21/2010 - 20:25 नवीन
ये रास्ते है प्यारके... हा सिनेमा निघला होता नानावटी खटल्यावर....सुनिल दत्त होता हिरो.. त्यातले..ये रास्ते है प्यारके.. ...चलना संभल संभल के...गाणे बिनाका वर हिट्ट झाले होते
  • Log in or register to post comments

भाषेचे महत्व

इन्द्र्राज पवार
Mon, 11/22/2010 - 12:38 नवीन
श्री.जयंत कुलकर्णी आणि श्री.अप्पा जोगळेकर यांनी मांडलेल्या 'निर्लज्ज' प्रयोजन मतावर एकत्रच उत्तर देत आहे. १) एक बाब स्पष्ट केली पाहिजे की, भाई प्रताप हे गुन्हेगार नव्हते तर त्यांच्यावर चुकीने लायसन्स प्रकरणात ठपका ठेवण्यात आला होता (जे पुढे उघडकीसही आले) व शिक्षा झाली होती...ती ते भोगत होते. नानावटी प्रकरण झाले नसते तरी पुढे केव्हातरी त्यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केलीच असती त्यामुळे ते गुन्हेगार या अभिनामास पात्र होत नाहीत. नानावटींच्याबाबतीत तसे म्हणता येणार नाही. कारण हाय कोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने त्यांनी भारतीय दंडविधान कलम ३०२ अंतर्गत दोषी करार केले आणि ग्राह्य असलेली शिक्षा सुनावली. इथे एक अध्याय संपतो. २) तीन वर्षाच्या कैदेनंतर त्यांना माफी मिळाली व ते लागलीच सिल्विया आणि दोन्ही मुलांसह कायमच्या वास्तव्यासाठी कॅनडाला निघून गेले व २००३ साली वयाच्या ७८ व्या वर्षी त्याच देशात निधन पावले. त्या 'माफी प्रकरणावर' जसे श्री.कुलकर्णी यानी लिहिले तद्वतच अन्य माध्यमांनीही त्या काळात केसच्या समाप्तीनंतर खूप काही लिहिले असल्याने व तीवर झालेल्या मंथनाचा आढावा घेतला असता असे दिसते की, समाजातील एक फार मोठा हिस्सा [ज्यात केवळ पारशीच नव्हे तर हिंदूही होते, राजकीयच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकही होते - असतील -] कमांडर नानावटीना थेट अर्थाने 'खूनी' मानत नव्हते....'गुन्हेगार' हे विशेषनामही त्याना लावायला कुणी धजत नव्हते. जनतेच्या नजरेत त्या त्रिकोणातील खलनायक होता 'प्रेम आहुजा' ज्याला जी शिक्षा मिळायची ती मिळाली असाच सार्वत्रिक समज होता. तसे पाहिले तर 'सिल्व्हिया' देखील न शिक्षा झालेली गुन्हेगारच. पण आय.पी. सेक्शन ४९७ नुसार "विवाहीत स्त्रीबरोबर नवर्‍याशिवाय अन्य पुरूषाने समागम केल्याचे आढळले आणि तशी तक्रार नवर्‍याकडून नोंदविण्यात आल्यास तो दुसरा इसम गुन्ह्यास पात्र मानला जाईल व त्यास ५ वर्षाची दंडासह शिक्षा होईल. मात्र तसा समागम बलात्कार व्याख्येखाली येणार नाही. त्यात सहभागी असलेल्या त्या पत्नीस शिक्षेस पात्र मानले जाणार नाही कारण तो सहसंमतीचा समागम असेल." अशी व्याख्या त्या कलमात असली तरी सामाजिक व्याख्येत सिल्व्हिया ही खर्‍या अर्थाने 'निर्लज्ज' म्हणावी लागेल....जरी ती कायद्यापासून बचावली असली तरी. ३) सुप्रीम कोर्टाने कावस नानावटी याना दोषी मानले [कायद्यातील तरतुदीनुसार] तरीदेखील अगोदरच्या कोर्टात, जिथे 'ज्युरी सिस्टीम' अस्तित्वात होती...तेथे ८ विरूद्ध १ अशा बहुमतांनी त्याना 'निर्दोष' सोडावे असाच निकाल दिला होता.....कावसने 'कोल्ड ब्लडेड मर्डर' केला आहे हे सिद्ध होऊनदेखील....मग या ८ ज्युरींनी 'निर्लज्ज' पणे त्यांची मुक्तता केला असे आपण म्हणू शकतो का? ४) तीन वर्षानंतर जे काही पोलिटिकल मशिनेशन झाले त्याचा परिपाक म्हणून दोघांनाही स्टेट गव्हर्नर यांनी माफी देऊन मुक्तता केली असली तरी कायद्याच्या भाषेत एक जबरदस्त पाचर होती जी निघाल्याशिवाय गव्हर्नरमॅडम माफीनाम्यावर सहीच करू शकत नव्हत्या....त्या पाचरीचे नाव होते "मॅमी आहुजा"....मृत प्रेम आहुजाची बहीण. केस तिच्या नावाने दाखल झाल्यामुळे तिच्या संमतीशिवाय माफी प्रस्तावालाही काही अर्थ येणार नव्हता. तीन वर्षाच्या कालावधीत पुलाखालून बरेचसे पाणीही वाहून गेल्यामुळे श्रीमती मॅमीनीही 'झाले ते पुष्कळ' समजून राम जेठमलानींच्या सल्ल्यानुसार त्या माफीनाम्यासाठी आवश्यक असणारे No Objection Certificate सही करून दिले. इतपत प्रवास झाल्यानंतर आता आपण त्या माफी प्रकरणाला 'निर्लज्जपणे सोडण्यात आले' असे म्हणू नये एवढेच माझे म्हणणे. मी असे लिहितो म्हणजे कावस नानावटी हा कुणी पंख छाटलेला देवदूत होता असे माझे बिलकुल मत नाही. पण त्याचप्रमाणे प्रेम आहुजा हा देखील एक सद्गुणाचा पुतळा होता आणि त्याच्या मृत्युने सिंधी समाजात फार मोठी पोकळी निर्माण झाली असेही नाही. हा त्रिकोणच एकमेवाद्वितीयम असा झाल्याने त्याचा रंगही वेगळाच आहे. "मिसळपाव" वरील सर्वच सदस्य रूढार्थाने सुशिक्षित आहेत, विविध पदावर, व्यवसायात कार्यरत आहेत, कायद्याची जाण असलेले आहेत, नसेल तर ते जाणून घेण्याची पात्रता बाळगून आहेत, असे असताना एखाद्या गंभीर विषयावर चर्चा करताना त्यातील भाषा संयमित असावी हीच माझी भूमिका होती आणि आहे. इन्द्रा
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

जयंत कुलकर्णी
Mon, 11/22/2010 - 13:19 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा