सहज म्हणून एकदा एक पोस्ट लिहिली आणि मोठी लांबडी यादी झाली. म्हणजे कोकणच्या भाषेत बारीक घोण निघेल म्हणून बिळातली शेपटी धरायला जावी आणि चार हात लांबडं जनावर निघावं तसं झालं. इथे त्याविषयी लिहितोय.
...
मरणं ही फार म्हणजे फारच कंपल्सरी चीज आहे..प्रत्येकाला बाकी काही जमलं नाही तरी किमान एकदा मेलंच पाहिजे..
मरणाची बातमी सर्व संबंधित पार्ट्यांना कळवणं आणि उत्साहाने पुढची सर्व सोय करणं हा तर काही जणांचा छंद..
मेलेल्या लोकांचे आकडे देताना महिलांचा आकडा वेगळा सांगतातच.. (मृतांत १८ महिलांचा 'समावेश' आहे..)
तीन अतिरेकी ठार..दोन सैनिक शहीद..
एकाच छोट्या वाक्यात आपल्या सैनिकांचा आदर आणि अतिरेक्यांविषयी तिरस्कार..
'मरणं' या एक गोष्टीसाठी मराठीत आपण किती शब्द करून ठेवलेत??
काही सहानुभूतीवाले..काही मेल्याचाच आनंद दाखवणारे..तिरस्काराने भरलेले..(मरणानंतरही..)..
वाटतात त्यापेक्षा जास्त शब्द आहेत.. खूप जास्त..
यात काही लोकल (म्हणजे स्थानिक!!..मुंबईच्या लोकलचा मरणाशी घनिष्ठ संबंध असला तरी तो विषय इथे नाही.) संदर्भ असलेले शब्दही मी घेतले आहेत. (उदा. पुण्यात : ओंकारेश्वरावर जाणे..)
१) मेला
२) गेला
३) वारला
४) ठार
५) देवाज्ञा
६) कैलासवासी
७) गचकला
८) ग्रंथ आटोपला
९) चचला
१०) उडाला
११) संपला
१२) खपला
१३) टपकला
१४) ढगात गेला.
१५) स्वर्गवासी झाला
१६) वीरगती प्राप्त झाली
१७) धारातीर्थी पडला
१८) देह ठेवला
१९) खर्ची पडला.
२०) निजधामास गेला
२१) निवर्तला
२२) सोनं झालं
२३) डाव बास (कुठेतरी ऐकलंय..पण Citation needed हां..!!)
२४) म्युन्सिपाल्टीचा पास मिळाला
२५) सद्गती
२६) अमर झाला
२७) कै. झाला
२८) काळ आला
२९) आटोपला /ली
३०) उत्थान
३१) उत्तमगति
३२) कालग्रस्त
३३) काळझोंप
३४) काळनिद्रा
३५) देवगत किंवा देवगति
३६)देह ठेवणे
आता नंबर टाकून थकवा आला.. नुसतेच टाकतो शब्द..
समाधी घेणे
वध
खून
पैगंबरवासी
ख्रिस्तवासी
बुद्धवासी
पंचतत्वात विलीन
मोक्ष पावला
डोळे मिटले
स्वर्गारोहण
दम तोडला,
मान टाकली,
गोव-या स्मशानात जाणे (मला वाटते हा अजून जिवंत असलेल्या "वेटिंग लिस्ट" लोकांसाठी वापरतात..)
भोईवाड्याला पोचणे
सरणावर ठेवणे
नाकाला सूत लावणे
निष्प्राण होणे
गेम होणे
पाताळात धाडणे
कंठस्नान घालणे
खांदा देणे
राम म्हणणे
बॅटरी संपणे
फोटो लागणे
निजधामास जाणे
कूंकू पुसणे
बांगडी फुटणे
मसणात जाणे
सोने होणे
चंदन होणे
शटडाउन करणे (!!!!)
लॉग ऑफ होणे
exit घेणे
अखेरचा निरोप घेणे
दिवस भरणे
प्राणपक्षी उडून जाणे
गार पडणे
ढोल वाजणे
बॅण्ड वाजणे
मसाला संपणे
प्राणज्योत विझणे
उताणा पडणे
डोळे फिरणे
नाडी बंद
विकेट पडणे
दम तुटणे
घाला घालणे
हाय खाणे (याविषयी मला शंका आहे बरीच..)
मातीत मिळणे
नामशेष होणे
देवाघरी जाणे
कामी येणे
हाराकिरी
पेन्शन बंद पडणे
खाते बंद होणे
जाणे
संपणे
न उरणे
उरकणे (उरकला..!!)
मार्गस्थ होणे
निजधामास जाणे
आकाशातील तारा होणे
पडदा पडणे
भैरवी होणे
निरोप घेणे
देह सोडणे
देह टाकणे
देह ठेवणे
समाधी घेणे
मूठमाती देणे
शाई संपणे,
नेटवर्क तुटणे ! (हे काहीतरी नवीन!)
वरचा कॉल येणे
यमाचे दूत येणे
यमपाश आवळणे
रंभा उर्वशी सोबत मजा करायला जाणे.
हाकेला ओ देण्या पलीकडे जाणे !
चिरशांती मिळणे
थडग्यात जाणे,
कलेवर होणे
पार्थिव होणे
मढे पडणे
सेंड ऑफ होणे
बरेचसे विचित्र काही बाही शब्द:
६नंबर चा फ़ॊर्म भरणे.
ओंकारेश्वरावर जाणे
आहे का कोणाकडे याखेरीज शब्द..
????
वाचने
23845
प्रतिक्रिया
75
मिसळपाव
प्रतिक्रिया
महापरिनिर्वाण
काटा काढला
अनंतात विलिन होणे कार्यभाग
काही काही डबल झालेत... "कंदील
हो..
In reply to काही काही डबल झालेत... "कंदील by आंबोळी
कंदील लागणे....
In reply to हो.. by गवि
यमसदनी जाणे/पाठवणे होत्याचे
इथेच
कंपुस सामोरे जाणे
तुमच्या लेखनाचा उत्साह आणि
३१ मार्चच्या आत ३००+ टारगेट
In reply to तुमच्या लेखनाचा उत्साह आणि by परिकथेतील राजकुमार
३०० पोस्टे की ३०० शब्द? बरे..
In reply to ३१ मार्चच्या आत ३००+ टारगेट by अवलिया
सोरी बिरि कशाला? चालु द्या
In reply to ३०० पोस्टे की ३०० शब्द? बरे.. by गवि
हे माझ्याविषयी नसावे..
In reply to तुमच्या लेखनाचा उत्साह आणि by परिकथेतील राजकुमार
परा आणि नाना ह्या
In reply to तुमच्या लेखनाचा उत्साह आणि by परिकथेतील राजकुमार
बर मग?
In reply to परा आणि नाना ह्या by Nile
श्री. निळे
In reply to परा आणि नाना ह्या by Nile
तुमच्या कडुन अशाच प्रतिसादाची
In reply to श्री. निळे by परिकथेतील राजकुमार
अजुन
आमचे दोन पैसै.
वा.
मरण दर्शविणारे शब्द
अग्ग्ग्ग्ग्ग!!!! काय पण
१.इथला व्हिसा संपणे. >>गोव-या
आवडलं...
In reply to १.इथला व्हिसा संपणे. >>गोव-या by धमाल मुलगा
आणखी..
"व्हॅलिडीटी संपणे"
मजा आली वाचुन .. येव्हडे शब्द
वर
आई शप्पथ... कहर आहे.. शाई
शान्त झाले (पहिले खुप बन्ङ
हिंदीमध्ये 'खटिया खडी होना'
गेलेल्यांसाठी सगळे शब्द
In reply to हिंदीमध्ये 'खटिया खडी होना' by रेवती
किती जिवंत मराठी भाषा !
सही अविनाश..
In reply to किती जिवंत मराठी भाषा ! by अविनाश कदम
जबरदस्त! __/\__
आहे अवांतर तरी ..
चावी संपणे. (म्हणजे चावीची
आणखी एक शब्द हल्लीच्या
क्या बात है..
In reply to आणखी एक शब्द हल्लीच्या by विजुभाऊ
मी तर "ऑफ होणे" , "डिलीट
मरण झालं आता जन्मासाठी नविन शब्द शोधा
आयडिया सर जी.
In reply to मरण झालं आता जन्मासाठी नविन शब्द शोधा by पिंगू
घ्या आणखी...
In reply to आयडिया सर जी. by गवि
प्रेम वाढीस लागणे!
In reply to घ्या आणखी... by धमाल मुलगा
>>प्रेम वाढीस लागणे! =)) =))
In reply to प्रेम वाढीस लागणे! by मराठे
अग्गायायायायाया.......
In reply to प्रेम वाढीस लागणे! by मराठे
>>प्रेम वाढीस लागणे
In reply to प्रेम वाढीस लागणे! by मराठे
आणखी काही..
अजून एक
In reply to आणखी काही.. by मेघवेडा
कणा!
In reply to अजून एक by प्रभो
>>वड्यांचं पीठ मळायला
In reply to कणा! by मेघवेडा
all of these
राम नाम सत्य होणे
आमच्याकडे (मित्रमंडळ) ह्यालाच
पुण्यात : ओंकारेश्वरावर
" लग्न करणे " ते दिसत नाही
माणगये भौ !!!!
In reply to " लग्न करणे " ते दिसत नाही by टारझन
टारोबा
In reply to " लग्न करणे " ते दिसत नाही by टारझन
पालखी निघणे
खपटी होणे
मराठीच्या समृद्धीचा अजून काय
Switch off
विकेट पडणे
सत्कार करणे ( खुन करणे ह्या
In reply to विकेट पडणे by प्रसाद गोडबोले
आमच्यात 'गमला' असेही म्हणतात.
मम आत्मा गमला हा.
In reply to आमच्यात 'गमला' असेही म्हणतात. by DEADPOOL
बादलीला लाथ मारणे
जंगमाचा पाय लागला.
In reply to बादलीला लाथ मारणे by बोका-ए-आझम
काय अभ्यास काय अभ्यास!!