Skip to main content

भ्रष्टाचार हाच शिष्टाचार

भ्रष्टाचार हाच शिष्टाचार

Published on 04/11/2010 - 16:19 प्रकाशित मुखपृष्ठ
आपण पिळवणूकीच्या अर्थकारणात बांधलो गेलो आहोत, तेथून जेव्हा सर्वांची सुटका होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश स्वतंत्र होईल. पिळवणुकीचे अर्थकारण राज्यकर्त्यांपासून सुरु होते. पोलिस, आयकर, अबकारी, कर, सीमाशुल्क आदी विभागात ठराविक जागी बदली होण्यासाठी लाखॊ रूपयांची राज्यकर्त्यांना लाच दिली जाते. जो पोलिस अधिकारी अथवा आयकर आधिकारी एवढा खर्च करतो, त्याला त्याची वसुली करायची असते. त्यातूनच भ्रष्टाचाराचा उगम होतो. समाजाच्या वरच्या मजल्यावरून सुरू झालेला भ्रष्टाचार हळूहळू खाली पसरतो. जेव्हा सामान्य नागरिकांचा सरकारी यंत्रणेशी संबंध येतो तेव्हा प्रत्येक कागदासाठी त्याला किंमत मोजावी लागते. शाळा, इस्पितळे, व्यापार, अशा जीवनावश्यक सेवांमध्येही नागरिकांची पिळवणूक होते. संदर्भ- एका दिशेचा शोध, लेखक- संदिप वासलेकर, प्रकाशक- राजहंस प्रकाशन, पुणे वासलेकरांनी अगदी योग्य शब्दांत भारतातील भ्रष्टाचाराचे विश्लेषण केले आहे. पिळवणुकीचे अर्थकारण राज्यकर्त्यांपासून सुरु होते, हे त्यांचे वक्तव्य अचूक आहे. सध्या राज्यातच नव्हे तर अवघ्या देशात गाजत असलेला आदर्श इमारतीचा घोटाळा याचे मूर्तीमंत उदाहरण ठरावे. एक आजी, दोन माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्य मंत्री असे कितीतरी राजकीय नेते या घॊटाळ्यात अडकले आहेत. जर मंत्री एवढे खोलवर रुतले असतील तर सनदी अधिकारी व इतर वेगवेगळ्या प्रशासकीय विभागाचे कितीतरी अधिकारी अडकले असतील. राष्ट्र वा राज्य चालविणारे प्रतिनिधी जर भ्रष्टाचारी निघाले तर अधिकारी वर्ग मागे कसा राहील? हे दुष्टचक्र खूपच दुर्दैवी आहे. भ्रष्टाचारच हा जणू शिष्टाचार झाला आहे. http://www.facebook.com/home.php?#!/pages/Eka-Dishecha-Shodh/126104087443744
लेखनप्रकार

याद्या 9461
प्रतिक्रिया 3

ओ सावंत, ३/३ वेगळे धागे काढुन दर आठवड्याला एकाच पुस्तकाची काय जाहिरात करता हो ? ह्यांना आवरा !!
प्रेषक: प्रमोद सावंत१ गुरू, 28/10/2010 - 13:13 समाज प्रतिक्रिया भारतातील दलित नेते शिक्षणात आरक्षण असावे म्हणून आंदोलने करतात. त्याचा फायदा केवळ मूठभर दलित विद्यार्थ्य़ांना होऊ शकतॊ. यातील बरेचसे विद्यार्थी सामान्य दर्जाच्या माध्यमिक शाळांतून शिकलेले असल्याने बरेचदा उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळूनही पूर्णत: फायदा घेऊ शकत नाही. मार्टीन ल्युथर किंग यांनी हार्वर्ड येथे प्रवेश मिळविण्यासाठी जाळ्पोळ केली नाही, तर संपूर्ण माध्यमिक शिक्षणपद्धती समतेच्या तत्त्वावर व उच्च दर्जाची असावी यासाठी आग्रह धरला. भारतातील सामाजिक चळवळीने असाच आग्रह धरला तरच ज्ञानगंगा तळागाळापर्यंत पोहोचू शकेल. संदर्भ- एका दिशेचा शोध, लेखक- संदिप वासलेकर, प्रकाशक- राजहंस प्रकाशन, पुणे आपणांस काय वाटते? हे शक्य आहे का?
प्रेषक: प्रमोद सावंत१ शनी, 30/10/2010 - 17:04 धोरण लेख स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाच्या विकासाठी स्वप्न प्रत्येकाने पाहिले. त्यानुसार दिशा आखण्याचा प्रयत्नदेखील नंतरच्या काळात होत गेला. पंडित नेहरूंनी धरणे, पोलाद कारखाने व उच्च अभियांत्रिकी शिक्षणसंस्थांची निर्मीती करण्यावर भर दिला. इंदिरा गांधींनीं लहान गावांपर्यंत बँका नेल्या. हरिक्रांतीचा मार्ग दाखविला. राजीव गांधीनीं संगणक, दळणवळण क्षेत्रात क्रांती केली. देश आधुनिकतेच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करू लागला. नरसिंहराव यांच्या कारकिर्दीत मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार झाला. जीवनाश्यक वस्तुंची कमी झाली. अटलबिहारी वाजपेयी यांनी ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून खेडी एकमेकांशी जोडली. गावातील शेतकऱ्याला शहरातील बाजारपेठेशी जोडले गेले. डॉ. मनमोहन सिंग यांनादेखील रोजगार हमी योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी, ग्रामीण विकासाच्या योजना आखल्या. प्रत्येक पंतप्रधानांच्या कारकिर्दीत प्रयत्न होउनही आज सहा दशकांनतरही ठराविक लोक तुपाशी खातात आणि बाकीचे उपाशी रहातात अशी परिस्थिती का यावी? संदर्भ- एका दिशेचा शोध, लेखक- संदिप वासलेकर, प्रकाशक- राजहंस प्रकाशन, पुणे २०१० वासलेकरांनी आपल्या पुस्तकातील उपरोक्त परिच्छेदात स्वातंत्र्योत्तर भारताच्या नेतृत्वाखाली झालेला विकास अगदी समर्थपणे मांडला आहे. वेगवेगळ्या पंतप्रधानांनी आपापल्या कारकिर्दीत निरनिराळ्या प्रकारे देशाला विकासाचा मार्ग दाखविला. परंतु देशापुढे असणाऱ्या समस्या मात्र बदलल्या नाहीत. आज भारत देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असला तरी कित्येक लोक मात्र उपाशीपोटी झोपतात. उदारीकरणामुळे उद्योग वाढले खरे पण कुशल कामगारांअभावी बेकारी तशीच राहिली. आजही ३० ते ४० टक्के लोक दारिद्र्यरेषेखालीच राहतात. जरी आपण लोकशाही म्हणत असलो तरीही सत्ता ही मूठभर लोकांच्या हातातच आहे. या सर्व परिस्थितीस काही घटक कारणीभूत आहे. जसे वाढती लोकसंख्या, दर्जेदार शिक्षणाचा अभाव, बेलगाम भ्रष्टाचार, मूल्यांपेक्षा व्यक्तिपूजेस आलेले महत्त्व. या व अशा अनेक कारणांमुळे ठराविक लोक तुपाशी खाऊन इतर लोक उपाशी राहतात, असे मला वाटते.

भ्रष्टाचार व वर्गविग्रह हे भांडवल शाहिचे लाडके आपत्य आहे.. भांडवल शाहि बदलणे अशक्य्..त्याला सिव्हिल युद्ध हवे.. इथे सार्या जनतेला सुख लोलुपतेची सवय.. त्या मुळे सद्ध्या तरी हे घडणे अशक्य.. व्यवस्थेशी जुळवुन घ्या व २ घास सुखाने खा व दुसर्यास हि खाऊ द्या भ्रष्टाचार हाच शिष्टाचार.हे पुस्तकाची वाचनालयात्..विनोदी ..या यादित नोद करंण्यास सांगणे ... या पुस्तकाचा ..हिंदु ...होणार...

हे परिकथेतील राजकुमारा, या पृथ्वीतलावरील जे पुस्तक मी वाचले त्यातील काही परिच्छेदाच्या अनुषंगाने मी आपल्या साऱख्या मित्रांसोबत विचार 'शेयर' करु इच्छितो.