राम राम मिपाकरहो,
योगेश यांनी मिपावर लिहिलेल्या सिंहगडावरची खादाडी या लेखावर आधारीत छानसे मुखपृष्ठ बनवायचे आहे..
आपल्याकडे अनेक संगणक करामती तज्ञ आहेत, त्याच प्रमाणे शब्दप्रभूही आहेत.
मिपावरील कुणी संगणक करामती तज्ञ संकलक मला सदर लेखातील सार्या चित्रांचे छानसे एकत्रित संकलन करून देईल का? संकलन करून त्याची एकच जेपीजी बनवून द्यावी.. उदाहरणादाखल मी एक संकलन केले आहे. ते येथे पाहता येईल..
त्याच प्रमाणे मिपावरील कुणी शब्दप्रभू त्या चित्राचे ८-१० ओळीतले समर्पक, खुमासदार वर्णन करून देईल का?
योगेशने आपले काम केले आहे. आता बाकी मंडळींच्या मदतीने एक चांगलेसे मुखपृष्ठ तयार करुया.. :)
करणार का मदत? वाटल्यास ही स्पर्धा समजा..!
ज्याला/जिला चित्राचे संकलन करता येईल त्याने/तिने चित्राचे संकलन करावे. ज्यांना ते जमणार नाही त्यांनी काही खुमासदार ओळी लिहायचा प्रयत्न करावा..
जे चित्र व ज्या ओळी मला पसंत पडतील त्यानुसार मी मुखपृष्ठ बनवेन व योगेशसोबत संबंधित नावेही 'सौजन्य' अंतर्गत मुखपृष्ठावर टाकेन..
चला तर, कृपया कामाला लागा..
आपला,
(मराठी संस्थळांवर मुखपृष्ठाची कल्पना सर्वप्रथम मांडून ती राबवणारा) तात्या.
वाचने
4419
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्हाला mail करायची का ती
व्य नि ने पाठवा किंवा
In reply to तुम्हाला mail करायची का ती by स्पा
शब्दप्रभू
संकलनासाठी इतरांची मदत
In reply to शब्दप्रभू by प्रियाली
हेहेहे!
In reply to संकलनासाठी इतरांची मदत by विसोबा खेचर
>म्हणून आज मी मग यशोधराने
In reply to संकलनासाठी इतरांची मदत by विसोबा खेचर
सिंहगडावरचा रानमेवा
छान ग जाई.
In reply to सिंहगडावरचा रानमेवा by जाई अस्सल कोल्हापुरी
मस्त लिहिलं आहे.. अजून थोडं
In reply to सिंहगडावरचा रानमेवा by जाई अस्सल कोल्हापुरी
दाटलेले ढग्..ओलेता
In reply to मस्त लिहिलं आहे.. अजून थोडं by विसोबा खेचर
ओक्के..! आता चित्र
In reply to दाटलेले ढग्..ओलेता by जाई अस्सल कोल्हापुरी
चित्राचा प्रयत्न करते आहे...