Skip to main content

पुणेरी आजोळ- ई-पुस्तक प्रकशित..

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 26/10/2010 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यासारखं आजोळ लाभणं म्हणजे कोणतंतरी पुण्यकर्मच म्हणायचं. पुण्याशी नातं जोडायला अनेकजण उत्सुक असतात. मग ते राजकीय असो वा सामाजिक अथवा वैयक्तिक. तिचं माहेर पुणं आहे याचा आमच्या आईला पराकोटीचा अभिमान होता. पुण्याशी नाळ जोडलेली होती ती अशी. मराठी वाचक असो वा लेखक पुण्याची हौस अन् आस सर्वांनाच. बहुतेक मराठी 'नेट'कर हे पुणेकरच आहेत. पुणे जिल्ह्याच्या हद्दी नजिक असले तरी नेटीव्ह प्लेस म्हणून पुण्याचा उल्लेख करायला कचरत नाहीत. इतका पुण्याचा सर्वांना लळा लागलेला असतांना आम्ही तर ते आजोळच्या नात्यानं पाहिलं, अनुभवलं. त्याचीच ही छोटेखानी लेख मालिका.. चोखंदळ पुणेकरांनाही ती नक्कीच भावेल अशी. माझ्या पहिल्या वहिल्या 'मिश्किली' या ई-पुस्तकाच्या यशानंतर लगेचच हे दुसरे ई-पुस्तक 'पुणेरी आजोळ' आपणापुढे झळकविण्याचे काम केल्याबद्दल मीमराठीच्या नेटवर्तुळातील उल्लेखनीय 'राजे'शाहीला मुजरांकित धन्यवाद!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1372
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया