Skip to main content

शाही शेवया

लेखक कच्ची कैरी यांनी शनिवार, 23/10/2010 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
shevayaaसाहित्य- साजुक तूप्-पाव वाटी शेवया-पाउण वाटी साखर्-अर्धी वाटी दूध-२ ते अडीच वाटी केशर काड्या-७-८ सुका मेवा-आवडीनुसार व उपलब्धतेनुसार क्रुती- १)प्रथम एका कढईत तूप गरम करावे ,तूप गरम झाले कि त्यात शेवया लालसर रंगावर परतुन घ्याव्या.जास्त लाल होउ देउ नये. २)शेवया लालसर झाल्या कि त्यात अडीच वाटी गरम दूध घालावे व ढवळुन घ्यावे व लगेच त्यात साखर घालुन परतावे. ३)आता लगेच यात केशर घालावे म्हणजे केशरचा रंग त्यात उतरेल. ४)१०-१५ मिनीट शिजु द्यावे ,शेवया जास्त्त घट्ट वाट्ल्यास आणखी थोडे गरम दूध घालावे. ५)काजु,बदाम पिस्त्याचे काप घालुन सजवावे. shevayaa

वाचने 4619
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

शाही शेवया आवडल्या. फोटो जरा फोकसात गडबडलेत का ?

शेवयांची खीर. . :) माझी आवडती खीर. दुसरा फोटु जरा गडबडला आहे खरा पण अशी खीर समोर असताना ती न खाता केवळ फोटु घेत बसणे अवघडच आहे. गणेश शेवई उत्तम या खीरीसाठी. :)