✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सदाशिवपेठेतल्या कॅफेतुन नाहिशा झालेल्या तीस लाख नीलचित्रपट सीडीज आपल्या घराघरांत घुसणार?!

अ
अवलिया यांनी
Wed, 10/20/2010 - 18:41  ·  लेख
लेख
संध्याकाळी घरी जायला गाडीत बसलो कीं सेलफोनवर मी 'गॉन' हे सासवडहून प्रकाशित होणारे वृत्तपत्र वाचतो. काल "पुण्यातल्या सर्वात जास्त सुसंस्कृत लोकसंख्या असलेल्या सदाशिवपेठेतल्या सायबर कॅफेमधुन तीस लाख नीलचित्रपट सीडीज चोरीस गेल्या आहेत" ही धक्कादायक बातमी वाचायला मिळाली. आजकाल अशा कुठल्याच बातमीबद्दल आश्चर्य वाटेनासे झाले आहे. पण ज्या घटनेमुळे आपल्यावर थेट आपत्ती कोसळू शकते अशी एकादी बातमी वाचली कीं खूप काळजी वाटू लागते! अशा बातम्या वाचल्यावर "पुण्याची संस्कृती पहिल्यासारखी राहिली नसावी" या पहिल्यापासूनच आपल्या मनात असलेल्या शंकेची ’चुकचुकणारी पाल’ आणखीच जोरात चुकचुकू लागते. कायम संस्कृती रक्षक (हिंदू वा मुस्लिम वा अन्य) एका बाजूला, पोलिस दुसर्‍या बाजूला, व्यक्तिस्वातंत्र्यवादी विचारवंत तिसर्‍या बाजूला आणि शेवटी आपलेच मित्र आणि हितचिंतक जे या गुन्ह्यात सामिल आहेत ते चौथ्या बाजूला असा "चौरंगी सामना" नेहमीच चालू असतो! आपल्यापुरते बोलायचे म्हणजे या चोरीला गेलेल्या सीडीजपैकी बर्‍याचशा सीडीज आपल्याच मित्रांच्या संगणकावर चालविल्या जातील व ती पकडून जर आपण ती चोरीची असल्याचे जगाच्या निदर्शनाला आणून दिले तर पोलीस "ती आपल्याच मित्राच्या दुकानातील सीडीजपैंकी असावीत" असे सांगून आपल्या कानावर हात ठेवील! म्हणजे सगळाच आनंदी आनंद आहे! संपूर्ण वृत्त वाचायचे असेल इथेच देत आहे.
सदाशिवपेठेतुन ३० लाखाहुन अधिक नीलचित्रपट सीडीजची चोरी पुणे (वार्ताहर ) :- काल रात्री सदाशिवपेठेत झालेल्या जबरा चोरीत ३० लाखाहुन अधिक नीलचित्रपट सीडी चोरीस गेल्या आहेत. सदर सीडीज भक्त प्रल्हाद अशा पुराण कथेच्या आवरणाखाली एका सायबर कॅफेत विक्रीसाठी आणलेल्या होत्या. कॅफेचे मालक उन्हात वणवणकर हे फरार असुन पोलिस त्यांचा तपास करत आहेत असे समजते. याबाबत माहिती देतांना पोलिसांनी सांगितले की सदर सीडीज या बंगुळुरु मधील कुख्यात गुंड झुल्फेफार याने पुण्यात काही दिवसांपूर्वी आणल्या होत्या. झुल्फेफार हा सध्या बंगुळुरु पोलिसांनी तडीपार केल्यामुळे पुण्याच्या आसपास वास्तव्यास आला आहे असे पोलिसांनी सांगितले. सदर चोरीमागे खुडूक भुंगा नामक अल्पवयीन भुरटा मुलगा असल्याचे प्रथमदर्शनी पुराव्यात आढळले असुन पोलिस त्याचा तपास करत आहेत. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या बातमीनुसार तो आणि त्याचा साथीदार रुमाल वेगळा यांना प्रभात सिनेमाजवळ पाहिल्याचे समजते. सदर नीलचित्रपट सीडीज कुठल्या कुठल्या स्त्रोतांमार्फत विकल्या जाणार होत्या याचा अद्याप उलगडा झाला नसला तरी ठाण्यात मुख्य वितरण केंद्र असावे असा पोलिसांचा कयास आहे. त्याचप्रमाणे सदर कॅफेमधे मॉरिशसमधील योगी व्योनीबाबा यांच्या सुईत दोरा ओवा या प्रवचनाच्या सीडीजची कव्हर्स असलेल्या काही नीलचित्रपटसीडीज सापडल्याने त्यांच्या पुणे येथील आश्रमाची चौकशी चालू आहे. या खळबळजनक विषयावर आमच्या प्रतिनिधीने अनेक मान्यवरांच्या प्रतिक्रिया घेतल्या. अखिल भारतीय संस्कृतीरक्षक व प्रख्यात कर्मकांडी श्री पेठेचे कडके यांनी या सीडीजमुळे होणार्‍या संस्कृती हानीच्या विरोधात लवकरच आमरण उपोषण करणार असल्याचे जेवता जेवता सांगितले. नवनिर्माणासाठी मोडतोड करण्यात कुशल असलेल्या श्री आताहास यांनी आम्ही अशा विषयांवर प्रतिक्रिया देणे बंद केले असे सांगुन प्रतिक्रिया दिली नाही ही बाब विशेष बोलकी आहे. श्री रावण यांच्या मतानुसार किमान तीस लाख बालके आता मोठी होतील ही आनंदाची बाब आहे
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8829 वाचन

💬 प्रतिसाद (64)

प्रतिक्रिया

शीरेस व्हा रे पोरांन्नो,

नरेशकुमार
गुरुवार, 10/21/2010 - 13:30 नवीन
शीरेस व्हा रे पोरांन्नो, शीरेस व्हा.
  • Log in or register to post comments

एक देशभक्त म्हणून चिनी

नितिन थत्ते
गुरुवार, 10/21/2010 - 14:29 नवीन
एक देशभक्त म्हणून चिनी नीलचित्रपट सीडींवर बहिष्कार घाला.
  • Log in or register to post comments

=))

अवलिया
गुरुवार, 10/21/2010 - 14:39 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

त्यातच खरी मजा आहे!

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 10/21/2010 - 16:19 नवीन
त्यातच खरी मजा आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

चीनी निलचित्रसीडी कशास

ऋषिकेश
गुरुवार, 10/21/2010 - 17:20 नवीन
चीनी निलचित्रसीडी कशास म्हणावे? चीनी अ‍ॅक्टर्स असलेली चित्रपटसीडी? चीनी निर्मात्याची चित्रपटसीडी? का चिनी क्यामेरे वापरून बनलेल्या चित्रपटाची सीडी? का चिनी 'कच्चा माल ' वापरून बनवलेली सीडी? का चीनी प्रेक्षक बघतात अशी सीडी? आणि जर उत्तर हे सर्व असेल तर हल्लीच्या ग्लोबल व्हीलेजमधे कोणताच नीलचित्रसीडी बघायला नको!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

प्रत्येकाने आपले-आपले ठरवावे.

नितिन थत्ते
गुरुवार, 10/21/2010 - 18:06 नवीन
प्रत्येकाने आपले-आपले ठरवावे. आग्रहही मुळीच नाहीं, फक्त एक सूचना (suggestion) आहे. मी Made in China पुरता हा नियम पाळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

एका सिरीयस धाग्याची अशी

नरेशकुमार
गुरुवार, 10/21/2010 - 18:15 नवीन
तुमच्याकडून असेच कांहीं तरी वाचायला मिळेल याची खात्री होतीच. ती खरी ठरली हे पाहून आनंद झाला. एका सिरीयस धाग्याची अशी उडवलेली खिल्ली बघून ड्वॉले पाणावले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

+१

क्लिंटन
गुरुवार, 10/21/2010 - 19:07 नवीन
काळेकाका ज्या तळमळीने लिहितात त्याची अशी खिल्ली उडविलेली बघून वाईट वाटले. त्यांची मते कोणाला पटोत की नकोत पण त्यांचा हेतू पूर्णपणे प्रामाणिक आहे हे त्यांचे लेख वाचून कळतेच. त्यामुळेच अशी खिल्ली उडविणे समर्थनीय नाही असे मला वैयक्तिक पातळीवर वाटते. क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

क्लिंटन भाव आन काळे काका. हा

नरेशकुमार
गुरुवार, 10/21/2010 - 19:29 नवीन
क्लिंटन भाव आन काळे काका. हा धागा आनि त्यावर भल्याभल्यांनी केलेली हुल्लडबाजी सगळं म्हंजी माणूस किती निबर झालाय ह्याचे उदाहरण आहे. तुम्ही मनावर घेऊ नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

प्रामाणीकतेची पातळी

सुहास..
गुरुवार, 10/21/2010 - 19:47 नवीन
काळेकाका ज्या तळमळीने लिहितात त्याची अशी खिल्ली उडविलेली बघून वाईट वाटले. त्यांची मते कोणाला पटोत की नकोत पण त्यांचा हेतू पूर्णपणे प्रामाणिक आहे हे त्यांचे लेख वाचून कळतेच. त्यामुळेच अशी खिल्ली उडविणे समर्थनीय नाही असे मला वैयक्तिक पातळीवर वाटते.>>>> कोणीही कोणाच्याही प्रामाणीकतेची पातळी ठरवण्यास कितपत पात्र आहे याची व्याख्या जाणुन घ्यायला आवडेल, काळेकांका विषयी आदर राखुन, एक म्हण आठवली. अति झाल आणी हसु आल ! असो .. अवांतर : आयआयएम विषयीचा दुसरा भाग लिहीणार होतात ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

>>कोणीही कोणाच्याही

गांधीवादी
Fri, 10/22/2010 - 05:55 नवीन
>>कोणीही कोणाच्याही प्रामाणीकतेची पातळी ठरवण्यास कितपत पात्र आहे याची व्याख्या जाणुन घ्यायला आवडेल, हो हो नक्की, नक्की. व्याख्या करा. आणि त्याचे एकक पण ठरवा. लागलीच हातोहात,आजचे सगळे नेते, राजे महाराजे, स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेले अनेक महान व्यक्ती ह्यांचे प्रामाणिकपणा मोजून घेऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

चिनी 'कच्चा माल ' वापरून

इंटरनेटस्नेही
Fri, 10/22/2010 - 02:23 नवीन
चिनी 'कच्चा माल ' वापरून बनवलेली सीडी... (एशियण मालाचा चाहता) इन-हुन-स्नेही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

देशी उपलब्ध आहेत. रेट जास्त

नरेशकुमार
गुरुवार, 10/21/2010 - 18:07 नवीन
देशी उपलब्ध आहेत. रेट जास्त पडेल. कोणास हवे असेल तर खासगीत व्यनी करणे. (मिपा आयडी सुद्धा विकायला आहेत. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

हल्ली परा दिसत नाहि मीपा वर..

अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 10/21/2010 - 19:53 नवीन
हल्ली परा दिसत नाहि मीपा वर..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा