सदाशिवपेठेतल्या कॅफेतुन नाहिशा झालेल्या तीस लाख नीलचित्रपट सीडीज आपल्या घराघरांत घुसणार?!
संध्याकाळी घरी जायला गाडीत बसलो कीं सेलफोनवर मी 'गॉन' हे सासवडहून प्रकाशित होणारे वृत्तपत्र वाचतो. काल "पुण्यातल्या सर्वात जास्त सुसंस्कृत लोकसंख्या असलेल्या सदाशिवपेठेतल्या सायबर कॅफेमधुन तीस लाख नीलचित्रपट सीडीज चोरीस गेल्या आहेत" ही धक्कादायक बातमी वाचायला मिळाली.
आजकाल अशा कुठल्याच बातमीबद्दल आश्चर्य वाटेनासे झाले आहे. पण ज्या घटनेमुळे आपल्यावर थेट आपत्ती कोसळू शकते अशी एकादी बातमी वाचली कीं खूप काळजी वाटू लागते!
अशा बातम्या वाचल्यावर "पुण्याची संस्कृती पहिल्यासारखी राहिली नसावी" या पहिल्यापासूनच आपल्या मनात असलेल्या शंकेची ’चुकचुकणारी पाल’ आणखीच जोरात चुकचुकू लागते. कायम संस्कृती रक्षक (हिंदू वा मुस्लिम वा अन्य) एका बाजूला, पोलिस दुसर्या बाजूला, व्यक्तिस्वातंत्र्यवादी विचारवंत तिसर्या बाजूला आणि शेवटी आपलेच मित्र आणि हितचिंतक जे या गुन्ह्यात सामिल आहेत ते चौथ्या बाजूला असा "चौरंगी सामना" नेहमीच चालू असतो!
आपल्यापुरते बोलायचे म्हणजे या चोरीला गेलेल्या सीडीजपैकी बर्याचशा सीडीज आपल्याच मित्रांच्या संगणकावर चालविल्या जातील व ती पकडून जर आपण ती चोरीची असल्याचे जगाच्या निदर्शनाला आणून दिले तर पोलीस "ती आपल्याच मित्राच्या दुकानातील सीडीजपैंकी असावीत" असे सांगून आपल्या कानावर हात ठेवील! म्हणजे सगळाच आनंदी आनंद आहे!
संपूर्ण वृत्त वाचायचे असेल इथेच देत आहे.
सदाशिवपेठेतुन ३० लाखाहुन अधिक नीलचित्रपट सीडीजची चोरी पुणे (वार्ताहर ) :- काल रात्री सदाशिवपेठेत झालेल्या जबरा चोरीत ३० लाखाहुन अधिक नीलचित्रपट सीडी चोरीस गेल्या आहेत. सदर सीडीज भक्त प्रल्हाद अशा पुराण कथेच्या आवरणाखाली एका सायबर कॅफेत विक्रीसाठी आणलेल्या होत्या. कॅफेचे मालक उन्हात वणवणकर हे फरार असुन पोलिस त्यांचा तपास करत आहेत असे समजते. याबाबत माहिती देतांना पोलिसांनी सांगितले की सदर सीडीज या बंगुळुरु मधील कुख्यात गुंड झुल्फेफार याने पुण्यात काही दिवसांपूर्वी आणल्या होत्या. झुल्फेफार हा सध्या बंगुळुरु पोलिसांनी तडीपार केल्यामुळे पुण्याच्या आसपास वास्तव्यास आला आहे असे पोलिसांनी सांगितले. सदर चोरीमागे खुडूक भुंगा नामक अल्पवयीन भुरटा मुलगा असल्याचे प्रथमदर्शनी पुराव्यात आढळले असुन पोलिस त्याचा तपास करत आहेत. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या बातमीनुसार तो आणि त्याचा साथीदार रुमाल वेगळा यांना प्रभात सिनेमाजवळ पाहिल्याचे समजते. सदर नीलचित्रपट सीडीज कुठल्या कुठल्या स्त्रोतांमार्फत विकल्या जाणार होत्या याचा अद्याप उलगडा झाला नसला तरी ठाण्यात मुख्य वितरण केंद्र असावे असा पोलिसांचा कयास आहे. त्याचप्रमाणे सदर कॅफेमधे मॉरिशसमधील योगी व्योनीबाबा यांच्या सुईत दोरा ओवा या प्रवचनाच्या सीडीजची कव्हर्स असलेल्या काही नीलचित्रपटसीडीज सापडल्याने त्यांच्या पुणे येथील आश्रमाची चौकशी चालू आहे. या खळबळजनक विषयावर आमच्या प्रतिनिधीने अनेक मान्यवरांच्या प्रतिक्रिया घेतल्या. अखिल भारतीय संस्कृतीरक्षक व प्रख्यात कर्मकांडी श्री पेठेचे कडके यांनी या सीडीजमुळे होणार्या संस्कृती हानीच्या विरोधात लवकरच आमरण उपोषण करणार असल्याचे जेवता जेवता सांगितले. नवनिर्माणासाठी मोडतोड करण्यात कुशल असलेल्या श्री आताहास यांनी आम्ही अशा विषयांवर प्रतिक्रिया देणे बंद केले असे सांगुन प्रतिक्रिया दिली नाही ही बाब विशेष बोलकी आहे. श्री रावण यांच्या मतानुसार किमान तीस लाख बालके आता मोठी होतील ही आनंदाची बाब आहे
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ही बातमी कशी वाचली नाहीं याचे मात्र आश्चर्य वाटते
फिल्टर
सहमत.
अतिशय भिकार आणि टाकाऊ..
(विषय दिलेला नाही)
तुमच्याकडून ह्याच प्रतिसादाची
रुमाल किंवा कागद मिळणार
गणपाला बहुधा हाही प्रतिसाद
ए तू लायनीप्रमाणे ये रे इना,
न्हाइ. नाय रागावत तो. सध्या
आसवांचे महापूर उन्हाळ्यात
सापडल्या एकदाच्या,
ग्रेट !
खड्डे?
पुण्यातील रस्ते, रस्ते वाटतच
पुणंच काय, वहानाचा
बापरे म्हणजे सीडीजचा
ओबामा नोवेंबर मध्ये इकडे
Czech Republic चा आयएस्डी कोड
पत्र
सहमत आहे. एक प्रत मिपावर पण
आयला, मला आजतागायत सौ. ना ४
जा जरा पूर्वेकडे ! न जमणारी
पुण्यातून माझ्या घरापासून मी
नक्की का?
हो मग, कोणत्याही राजकीय
सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी
प्रश्न चुकला. पाय उलटे आहेत
थांबा वाकून
नक्की कुठे पाहिलत?
आकाशात , आम्ही वाकलो कि
'गांधीवादी' हा माझा आयडी नाही
जाहीर खोटं बोलणार्याला..
टेक्नीकली
हिंदी पिक्चर मधला एक डायालॉक
अच्छा यांच्या टंकनिकेचं नाव
श्री. अवलिया
म्हणजे..
ठाण्यातून
परमपूज्य
+१
धोरण/प्रकटन
हे त्यांच्या वावराच्या
हॅ हॅ हॅ
एक बाराखडीचे पुस्तक विकत आना
हेच म्हणते...
अ रे रे रे
फारच संवेदनशील धागा आहे. यावर
आता प्रतिसादांना पण नाही
पुप्या