मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव
नमस्कार मंडळी,
सध्या अच्युत गोडबोलेंच किमयागार वाचतोय. खुपच छान पुस्तक. शक्य असेल तर प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना वाचायला द्यावे. नक्कीच सायन्सची आवड निर्माण होईल. या लेखात पुस्तकाची माहीती देत नाही पण त्याच्या प्रस्तावनेत जे स्वा. सावरकर व पु ल देशपांडे यांचे विचार मांडले ते देत आहे.
प्रस्तावनाच मनाची एवढी पकड घेते की पुढील पुस्तक सोडवत नाही.
सावरकरांच्या मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव या निबंधातील उतारा आहे. त्यात सावरकर म्हणतात, "आपले चांगले ते देव करील, देव चांगले करील तर मी सत्यनारायण करीन. ही आशा, हा अवलंब अगदी खुळचट आहे! कारण तो असत्य आहे. ज्या संकटातुन आपणास सोडवले म्हणुन आपण देवाचा सत्यनारायण करतो त्या संकटात प्रथम आपणास ढकलतो कोण? तोच सत्यनारायण देव! जो प्रथम आपला गळा कापतो आणि नंतर त्यास मलम लावतो, त्याची मलम लावण्यासाठी पुजा करायची तर प्रथम गळा का कापलास म्हणुन त्याची यथेच्छ शोभाही करावयास नको काय? विश्वाच्या ठायी या दोन्हीही भावना अनाठायी नि असमंजस आहेत. ती विश्वाची आद्यशक्ती ज्या काही ठरावीक नियमांनी वर्तते आहे ते तिचे नियम समजावून घेऊन त्यातल्या त्यात आपल्या मनुष्यजातीच्या हिताला नि सुखाला पोषक होईल असा त्याचा साधेल तितका उपयोग करुन घेणे इतकेच मनुष्याच्या हातात आहे.... सारांशाने माणसाच्या सुखदु:खाचे देवास काही देणे घेणे नाही, तेव्हा सत्यनारायण, जपजाप्य, स्नानसंध्या, व्रतवैकल्ये, नवस या सार्या निरर्थक गोष्टी होत."
पुलंच लिखाण ," एक तर धर्म, ईश्वर, पूजा-अर्चा यांत मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांच कौशल्य म्हणून मला मूर्ती पाहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही. पुर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे थोंताडावर माझा विश्वास नाही. देव धर्म या कल्पना धुर्त सत्ताधार्यानी दहशतीसाठी वापरलेल्या आहेत याविषयी मला यत्किंचितही शंका नाही. आपल्या देशात इतके संत जन्माला यायच्याऐवजी निसर्गाचे रहस्य ओळखुन ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते तर हा देश अधिक सुखी झाला असता. मला कुठल्याही संतापेक्षा अॅनेस्थेशियाचा शोध लावून वैद्यकिय शस्त्रक्रिया वेदनारहित करणारा संशोधक हा अधिक मोठा वाटतो. विज्ञान जन्मजात ज्येष्ठ-कनिष्ठ मानत नाही; आणि सत्याचे दर्शन घडवण्यार्या वैज्ञानिकांचा देवाचे नाव घेणार्या धर्मगुरुंनी आणि त्यांच्या दहशतीखाली असणार्या अडाणी राजे लोकांनी सर्वात अधिक छळ केला आहे. धर्म धर्म करणार्या लोकंइतके सत्याचे आणि वास्तवाचे दुसरे शत्रु नसतील, मग ते बायकांना नवर्याच्या चितेवर जाळतील, नरबळी देऊन आपले राजमहल आणि देवळे टिकाऊ करतील, कुणाला अस्पृश्य म्हणतील, कुणाला वाळीत टाकतील आणि काय वाटेल ते करतील. धर्माच्या आणि पंथाच्या दुराभिमानातून माणसाचे रक्त सर्वाधीक सांडलेले आहे."
याद्या
4996
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
झाडे वाचवा झाडे जगवा आणि मग
>> धर्माच्या आणि पंथाच्या
घर की मुर्गी ...
धन्यवाद
उत्तम विषय...