लतादिदी ची एक आठवण.
लतादिदींच्या वाढदिवसानिमित्त्य अनेक लेख वाचण्यात आले आणि अनेक गाण्यांचा आस्वादही घेण्यात आला.
१९६४ च्या सूमारास लतादिदींना गीतेच्या अध्यायावर गायन करण्यासाठी एका संगितमंडळीने सांगितले. लतादिदी आपल्या प्रघातानूसार त्यावर चिंतन, मनन आणि वाचनाची तयारी सुरु केली.
उच्चारावर लतादिदींचे खास लक्ष असते. उच्चारात कोणताही दोष असु नये यासाठी त्यांनी गोनिंदा यांना तातडिने येण्यासाठी पत्र पाठविले.
गोनिदा यांच्या देखरेखीखाली लतादिदी यांच्या सरावासाठी सुरवात झाली. लता एकनंतर एक असे अध्याय वाचत आणि गोनिंदा त्यात र्हस्व आणि दिर्घाच्या उच्चारात काही त्रुटी राहत तर नाही ना यावर लक्ष देत. थोडीजरी चूक आढळली तर अध्याय परत वाचावा लागे. गुणवत्तेला कोणतीही तडजोड नव्हती.
शेवटी ध्वनीमुद्रणही पार पडले आणि सर्वांच्या चेहर्यावर समाधान आले.
लतादिदींनी गोनिंदाना वाकुन नमस्कार केला त्यावर नकळतच गोनिंदा बोलले, हे जर गायन पाठ महाराजांनी ऐकले असते तर मी त्यांना तुम्हाला एक जहागीरी द्यावी असे शिफारस केली असती.
त्यावर लतादिदी बोलल्या की मला जहागिरी वगैरे काही नको, फक्त तुमचा आशिर्वाद तो द्या.
गोनिंदा बोलले, " तथास्तु".
अशी नम्रता असणे विरळच असते.
संदर्भ : लोकसत्ताचा रविवारचा अंक. तिथी आठवत नाही.
प्रतिक्रिया
कुठल्या ?
आरं तिच्या!!!
तसे न्हाई हो !
गायन पाठ महाराजांनी ऐकले असते
महाराज म्हणजेच
धन्यवाद
छान
उत्तम......आठवण आवडली.
सहमत...
अजुनही काही आठवणी दिदींच्या