तथास्तु !!
थांब नराधमा !! तुला माफी नाही
हे जग कदाचित तुला माफ करेलही
पण माझ्याकडून माफी नाही ॥
कोवळ्या जिवांना, उमलत्या कळ्यांना
उखडणारा तू......
भावनांचा, मनाचा
चोळामोळा करणारा तू......
पूजा करावी अशी प्रतिमा जिची
तिला पोते-यासारखा वापरणारा तू....
नात्याचा गैरवापर करून
डोळ्यात धूळ फेकणारा असा तू.........
हातात विश्वासाने दिलेला हात
त्या हातालाच तोडून, फायदा घेणारा तू........
कळीकाळ ही सोडणार नाही तुला
ध्यानी धर नराधमा........
तू हात लावलायस
एका लखलखत्या ज्वालेला
दिव्या तेजाने तळपणा-या तलवारीला
त्या परमेशाच्या लाडक्या लेकीला
आता भोग पापाची फळे तू
माझ्या शापापेक्षा उ:शाप भयंकर
तोच तू भोग आता........तोच तू भोग आता
कविता चांगली आहे. रिअलिस्टिक
देव-दानवंचं युद्ध झालं त्यात
अग्दि अस्सच म्हण्ते.......
तथास्तु
तथास्तु !
तथास्तु
तथास्तु!
तथास्तु ग