सख्या...
सलील कुलकर्णी यांचे - 'सखे कसे सांग तुला, अगदीच नाही भय' हे ऐकले आणि त्याची धून डोक्यात चांगलीच भिनली. पुढची कविता त्याच चालीवर सुचली. ती वाचताना प्रत्येक वेळी माझ्याकडून ह्याच चालीवर म्हंटली जाते.
सख्या कशी सांगु तुला मनाची या हुर-हुर..
दाह याचा सोसु कसा ? तू ही असा दूर-दूर...
मृगजळासम भासे कधी तुझा सहवास,
तापुनही मग थंड, माझे अगतिक श्वास...
घेऊनिया पंख नवे, स्वप्नदेशी उडे मन,
एकलेच मागे फ़िरे, आणि हरवून भान...
रानातील पायवाट, करु लागे खाणा-खुणा,
देह नवा पांघरोनी, पळू लागे मी ही पुन्हा..
थकुनिया जेंव्हा मग, होते काळीज हे चूर,
भिरभिर भटकुन, अंती डोळा महापूर !!!!
चांगले आहे..
छान!
छान !
छान
मस्त!!
सख्या