✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रुपांगी ज्योतिष -केशसंभार

प
प्रा.विद्याधर घैसास यांनी
Wed, 09/15/2010 - 20:23  ·  लेख
लेख
लांब ,तजेलदार ,काळेभोर केस हे स्त्री सौंदर्याचे आणखी एक लक्षण आहे. लक्ष वेधणारे असे हे लक्षण. क्षणोक्षणी लक्ष देऊन जपावे लागते , जोपासावे लागते.केसांच्या मुळांनी शोषलेली पोषक द्रव्ये व डोक्याच्या कातडीचे आरोग्य यावर केसांचे सौंदर्य अवलंबून असते. केसाची मुळे शनी दर्शवतो ,तर दर्शनी केस शुक्राच्या अंमलाखाली येतात. मेष ही डोक्याची राशी (स्काल्प स्किन दर्शक) तर चंद्र व वृश्चिक रास हे पोषणदर्शक घटक आहेत. या घटकापैकी कोणता घटक बिघडला आहे हे शोधणे पत्रिकेत फारसे कठीण नसते व एकदा समस्येचे कारण समजले की प्रभावी उपाययोजना करता येते उदा: राहूमुळे केसात कोंडा होतो. व केस निस्तेज होऊ लागतात ,तर शनी-रवी यांच्या युतीमुळे केसांच्या मुळाशी उष्णता अधिक होऊन केस गळण्याची तक्रार उदभवते. हर्षलाचे शुक्राशी कुयोग केसांची टोके दुभंगीत करतात, तर नेपच्यूनच्या कुयोगांमुळे केसांमध्ये अधिक घाम साठून राहतो व डोक्याच्या कातडीचे आरोग्य व पर्यायने केसांचे सौंदर्य कालांतराने धोक्यात आणतो. केसांचा रंग हा गुरु ग्रहाच्या प्रभावाखाली येतो व म्हणूनच गुरुच्या अन्य गुणधर्मांचा (स्मरणशक्ती ,तर्कज्ञान )अतिरीक्त वापर प्रदीर्घ काळ चालू राहील्यास केस पांढरे पडू लागतात. गुरु ग्रह मुळातच दुर्बळ असणे हे ही केस लवकर पांढरे होण्याचे कारण ठरते. केसांचे सौंदर्य हे सुयोग्य आहार ,निद्रा व निगा यावर संपूर्ण अवलंबून आहे. शारीरीक तापमानाचे संतुलन .रक्ताभिसरण ,स्वच्छता व मानसिक स्वास्थ्य या सर्वांचा केसांच्या सौंदर्याशी घनिष्ठ संबंध आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने विशिष्ट व्यक्तीचा प्रकृतीधर्म ओळखून उपाय केल्यास विकृती दूर होते. केस दाट ,काळेभोर व तजेलदार रहावेत ,रसरशीत व जीवनशक्तीने परिपूर्ण व्हावेत यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. केसांमध्ये कोंडा होणार नाही ,घाम साचून रहाणार नाही यासाठी स्वच्छतेचे उपाय करायला हवेत. डोक्याच्या भागात रक्ताभिसरण उत्तम तर्‍हेने होण्यासाठी मानेला व डोक्यावरील काही भागांना प्रेरक मसाज करावा. डोक्याच्या भागाचे तापमान नियंत्रीत ठेवणे ही आवश्यक आहे . पावलांना व पाठीच्या कण्याला मसाज करून हे तापमान नियंत्रीत करता येते. मासिक पाळीच्या आधी तापमान एक ते दोन अंशाने वाढते हे लक्षात घेऊन उपाय करावेत.दिनचर्या आखावी. प्रोटीन्स हा अन्न घटक केसांच्या आरोग्याला पोषक आहे ,परंतू पत्रिकेत रविच्या (प्रोटीन्सचा कारक )स्थान व राशीवरून कोणत्या स्वरुपात प्रोटीन्स घ्यावीत हे ठरवता येते. पुढील भागात सुडौल बांध्याचा वविचार करू.

Book traversal links for रुपांगी ज्योतिष -केशसंभार

  • ‹ ते वास्तवाच्याजवळच हॉटेल.
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15369 वाचन

💬 प्रतिसाद (57)

प्रतिक्रिया

ग्रहांचा फक्त डोक्याच्या

सुहास..
गुरुवार, 09/16/2010 - 13:05 नवीन
ग्रहांचा फक्त डोक्याच्या केसावंरच परिणाम होतो का? >>> =))=)) मार डाला !! धागा वाचुन केसांत कोंडा झाला !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

मला तर अस्वलाचे कौतुक वाटते.

वेताळ
गुरुवार, 09/16/2010 - 12:14 नवीन
त्याचा गुरु किती प्रबळ आहे नाही का.
  • Log in or register to post comments

माझी रवी रास वृषभ्...चंद्र

विजुभाऊ
गुरुवार, 09/16/2010 - 13:20 नवीन
माझी रवी रास वृषभ्...चंद्र राशी सुद्धा वृषभच आहे. एस ए पी च्या व्यवसायात येई पर्यन्त डोक्यावर बर्‍यापैकी केस होते. आता मात्र परिस्थिती बदलली बरीच आहे. हे कोणत्या ग्रहांच्या प्रभावामुळे ?
  • Log in or register to post comments

ते मॉड्युलनुसार

सूड
गुरुवार, 09/16/2010 - 13:41 नवीन
विजुभाऊ, SAP मध्ये असाल तर ते मॉड्युलनुसार ठरत असावं बहुधा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

हे कोणत्या ग्रहांच्या

सुहास..
गुरुवार, 09/16/2010 - 13:21 नवीन
हे कोणत्या ग्रहांच्या प्रभावामुळे ? >> छे छे विजुभाऊ !! ऊलट आपल्या केसांमुळे ग्रहांवर काही परिणाम झाला का असे विचारायला हवे ..
  • Log in or register to post comments

गंगावन

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 09/16/2010 - 14:28 नवीन
स्त्रीचा केशसंहाराला तोडगा ग्रहशांती नसुन गंगावन हा आहे. येथे प्रकाशचे माक्याचे तेल लावुन देखील काही उपयोग होत नाही.
  • Log in or register to post comments

मनोरंजक

सुनील
Fri, 09/17/2010 - 07:07 नवीन
लेख छान. चालू द्या... (सुडौल बांध्याच्या प्रतीक्षेत) सुनील
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा