Skip to main content

('रेशमीया' मेल्यानी)

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 10/04/2008 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा 'ती' गाढवी आरोळी आणि अर्थातच शांताबाईंचे सुंदर गीत 'रेशमाच्या रेघांनी' (टीप - आधी प्रकाशित केलेली आवृत्ती सुधारणा करुन पुनःप्रकाशित करतो आहे.) 'रेशमीया' मेल्यानी, गाढवाच्या जोरानी पुन्हा आहे गळा आज काढीला खरारा करावा जसा घोडीला! जुनी सारी गाणी लाखमोलाची काय सांगू गोडी सूरतालाची ऐकते मी 'पंचम'दा, 'मदना'च्या जोडीला खरारा करावा जसा घोडीला! लावलेला 'किशोर' मी तोर्‍यात अवचित आले त्याच्या मार्‍यात त्यानं माझ्या कानाचा, मुडदा का पाडीला? खरारा करावा जसा घोडीला! भीड काही ठेवा 'रफी''मन्नाची' मुर्वत राखा साता सुरांची काय म्हणू बाई बाई, गाढवी ह्या खोडीला खरारा करावा जसा घोडीला! चतुरंग
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3823
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया