रंगमहाली बसले असता अवचीत यावं कुनी
रंगमहाली बसले असता अवचीत यावं कुनी
हातामदी हात धरावा तुम्ही ||धृ||
आठवनीचे पाखरू उडती
कंटाळ्यामधी रातदिस जाती
सोबतीला कुणी असावं
"कसं चाललं तुझं" पुसावं
असं वाटत मनी ||१||
कालपासनं लवतो डावा डोळा
नजर जायी दारी कितीक वेळा
कुनीतरी भेटाया का येईल
का रात अशीच एकटी जाईल
वेडी शंका येई मनी ||२||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०४/०९/२०१०
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1204
प्रतिक्रिया
0
मिसळपाव
प्रतिक्रिया