✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

प्रिय राहूल देशपांडे,

व
विसोबा खेचर यांनी
Wed, 09/01/2010 - 12:30  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15868 वाचन

💬 प्रतिसाद (52)

प्रतिक्रिया

मेट्रो मर्फी ऑल इन्डिया स्पर्धा आणि महेन्द्र कपूर

इन्द्र्राज पवार
Fri, 09/03/2010 - 00:35 नवीन
"मेट्रो मर्फी ऑल इन्डिया स्पर्धेला अनिल विश्वास, सी. रामचंद्र, नौशाद, मदनमोहन आणि वसंत देसाईंसारखे महान संगीतकार परिक्षक होते आणि अर्थातच त्यांचा निर्णय अंतीम होता." ~~ नेमका हाच किस्सा त्या स्पर्धेत अंतीम विजयी ठरलेले गायक 'महेन्द्र कपूर' यानी गेल्या महिन्यात विविध भारतीच्या खास मुलाखतीत सांगितला. अंतीम फेरीत एकूण ८ स्पर्धक होते, पण वरील पाच महान संगीतकारांच्यात विजयी गायक/गायिकाबाबत एकमत होईना. वेळ होऊ लागला तसे मर्फी संयोजकांनी स्पर्धकांना आपापल्या घरी जाण्यास सांगितले व रात्री परत हे ५ दिग्गज चर्चेला बसले. शेवटी आपण सर्वच बाजूला राहू या आणि एच.एम.व्ही. चे प्रसिध्द सॉन्ग्ज रेकॉर्डिस्ट श्री.कौशिक यांना पाचारण करावे आणि या ८ स्पर्धकांची त्यांची गाठभेट न घालता पडद्यामागे त्यांना ठेवून श्री.कौशिक यांना फक्त आवाजच ऐकवायचा आणि त्या आवाजाच्या अनुषंगाने त्यांनी गुण द्यायचे. दुसर्‍या दिवशी या आठही स्पर्धकांना स्टेजच्या मागे नेण्यात आले व त्यांना विशिष्ट असे तीन आकडी क्रमांक देण्यात आले. माईकसमोर त्याने यायचे, आपला क्रमांक सांगायचा, गाणे सुरू करायचे जे स्टेजच्या दुसर्‍या बंद खोलीत बसलेल्या श्री.कौशिक यानाच फक्त ऐकू जाईल व त्यानुसार ते फक्त "क्रमांका"ला गुण देतील. (स्पर्धकानाही श्री.कौशिक दिसत नव्हते.) या अनोख्या रितीने आठ उमेदवारांनी परत संयोजक आणि ५ संगीतकारांच्यासमोर एकेक गाणे सादर केले, जी गाणी श्री.कौशिक यानी 'प्रत्यक्ष पाहिली नाहीत', मात्र त्या क्रमांकाच्या आधारे त्यांनी आपला असा गुणतक्ता तयार केला, आणि नंतर त्यांच्या दृष्टीने विजयी झालेल्या 'क्रमांका'चे कार्ड श्री.नौशाद यांच्याकडे दिले. विजेते होते श्री.महेन्द्र कपूर; ज्यांना दुसर्‍याच दिवशी श्री.नौशाद यानी "सोनी महिवाल' चित्रपटातील गाण्यासाठी करारबद्ध केले. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे

प्रतिसाद

मुक्तसुनीत
Fri, 09/03/2010 - 06:25 नवीन
सारेगम सारख्या प्रकारांमुळे त्रास होत असेल तर ते पाहू नये. मी पाहात नाही. मुलांच्या सारेगमपच्या पहिल्या सीजनची सीडी पाहतो/ऐकतो. मजा येते. राहुल देशपांडेचे गाणे ऐकावे, तो किती कुठे कसे पैसे कमावतो आहे वगैरे वगैरे भानगड कामाची नाही. तेच सचिन तेंडुलकरच्या क्रिकेटचे. तेच रहमानच्या, शंकर महादेवनच्या संगीताचे , आमीर खानच्या सिनेमाचे. मला असे वाटते, हल्ली कलाकाराची कला, क्रीडापटूची क्रीडा पहायची सोडून , त्यांना "सेलेब्रिटी" म्हणून त्यांच्या कारकीर्दीव्यतिरिक्तच्या कामगिरीकडेच बारीकसारीक लक्ष दिले जाते. आपापल्या क्षेत्रांमधे हे सर्व थोर असले तरी पैसा, प्रसिद्धी या सार्‍यांच्या संदर्भात ती माणसेच आहेत. आपापल्या कला/क्रीडेच्या संदर्भात त्यांनी खूप विचार केला असेलसुद्धा , परंतु कुठली गोष्ट जास्त श्रेयास्पद आहे , कुठली सर्वात जास्त नीतीमान आहे इत्यादि इत्यादि बाबतीतले सर्वोत्तम विवेकी मत त्यांच्याकडे असायलाच हवे ही अपेक्षा कितपत रास्त आहे ? सारेगमप मधे परीक्षक म्हणून काम करण्यापेक्षा कितीतरी वाईट दर्जाची कामे लोक करतात. राहुल देशपांडेवरचा हा हल्ला अनाठायी आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा