Skip to main content

(...लवकर ये!)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 08/04/2008 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
कवि प्रदीप यांची सुंदर कविता '....लवकर ये' ही आमची प्रेरणा:) (ग्लासातला बर्फाचा तुकडा मदिरेला विनवतोय अशी कल्पना! म्हणजे शुध्द मराठीत 'ऑन दि रॉक्स!;) रिमझिम तू माझ्यावर; लवकर ये ! हो माझी 'ग्लेनफिडिच'; लवकर ये ! थंडगार एकटाच खणखणतो... देहाची वाफ किती दवडवितो... किणकिणतो, डुचमळतो अन् म्हणतो - -`सोड सोड तू बाटली; लवकर ये `! तेच भक्त; तूच मदिरा त्यांची! पेग 'विसावा' पुन्हा 'पेटली' त्यांची! ऐक जरा; ऐक आरोळी त्यांची! पेग तो आता भर...लवकर ये ! सांग त्यांना वाट किती दावू मी? का सांग; त्यांची वाट अशी लावू मी ? वाट बघत कोरडा का राहू मी ? धारेचे ते का 'अंतर' ? लवकर ये ! * * * मिटले; सार्‍यांचे नयन मिटले... फिटले रे, जाल 'धूम्राचे' फिटले... तन आता या तहानेला विटले... ये वारुणि, ये लवकर ! लवकर ये ! .......................................... रचनाकाल ८ एप्रिल २००८ .......................................... चतुरंग
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 6321
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया