Skip to main content

मी अनुभवलेला कोसला...

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 23/08/2010 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दिवसांपूर्वी वाचनात भालचंद्र नेमाडेंचा कोसला आल... (तसा मी वाचन वेडा अज्जिबात नाही... मी एवढा आळशी आहे कि एखादा पुस्तक संपवायला मला महिना वगैरे लागतो.. ) तर सुरवातीला पुस्तक हे साधाच वाटल... पण जस जस वाचत गेलो तसं तसं हे पुस्तक भलतच आवडायला लागल... हे पुस्तक वाचल्यावर मी खूप अस्वस्थही झालो. हे पुस्तक १९६५ च्या काळात लिहील असल तरी आजच्या तरुणाईच्या मानसिकतेचा ठाव घेणार आहे ... पुस्तक वाचून अस्वस्थ होण्यामागच खर कारण म्हणजे ह्या पुस्तकात लेखकाने नायकाची जी तगमगीचे .. मानसिक घाल्मेलीचे वर्णन केलेले आहे ते मला माझे स्वतःचे वर्णन वाटले.. अगदी जो आत्महत्या करण्याचा विचार मनात येतो तो असो कि त्याच्या स्वकीयाच्या मृत्यूवेळी झालेली नायकाची मानसिकता असो.. सगळ जणू काही मला माझ वर्णन वाटल... ह्या पुस्तकात लेखकाने एका ग्रामीण भागातील मुलाचे शैक्षणिक जीवन जे पुण्यात घडत आणि शिक्षणोत्तर आयुष्याचे वर्णन रेखाटले आहे.. पूर्ण पुस्तकाचा विचार केला असता ह्याचे तीन मुख्य टप्पे दिसून येतील.. सुरवातीचा टप्पा म्हणजे नायकाशी करून दिलेली ओळख आणि त्याचा पुण्यातील सुरवातीचा कालखंड.. दुसरा टप्पा म्हणजे त्याचे होस्टेल मधले जीवन व शैक्षणिक जीवनातील वाटचाल... आणि तिसरा टप्पा म्हणजे शिक्षण आटोपल्यावर काहीच कामधंदा नसल्या कारणाने गावाकडे घालवलेला वेळ.. ह्या पूर्ण प्रवासात आजच्या तरुणाईचे खरे प्रश्न डोळ्यासमोर उभे राहतात.. हे पुस्तक वाचताना अजून एक गोष्ट जी मला स्वतःला खूप आवडली ती म्हणजे पूर्ण पुस्तकात लेखक हा तटस्तपणे बाजूला उभा असलेला दिसून येतो... उगाच कुठेही शब्दांचे खेळ करून नायकत गुंतलेला दिसत नाही... अगदी त्रयस्थपणे सगळ डोळ्यासमोर उभ करतो... शेवट शेवट जेव्हा नायकाला काहीच कामधंदा नसतो व तो आपल्या गावी जातो त्या वेळी त्याच्या मनस्थितीचे ज्या पद्धतीने वर्णन केलेले आहे ते भलतेच मनाला भाऊन गेले.. इथे नायकाची अगतिकता दाखवण्यासाठी पानेच्या पाने भावनिक होऊन लिहिण्याचा वाव असताना सुद्धा कुठेही न गुंतता लेखक जणू काही आपल्याला बरोबर घेऊन त्याच्या गावातून... घरातून... सगळीकडे फिरून आणतो... मनापासून आवडलेल्या पुस्तकांपैकी एक... कोसला....
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1997
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

छान ओळख. मलाही कोसला वाचून अगदी असेच मनात आले. पांडुरंगचा प्रवास हे अगदी आपलेच वर्णन वाटावे असा लिहिला आहे.

कोसला. एक मुलगा म्हनुन मोट्ठ होण किती दिव्य असत याची जाणिव आम्हा स्त्रीयांना करुन देणार लेखन. वडिलांनी रागावल्या वर इगो ला लागलेली ठेच, आई मध्ये अडकलेला जीव, बहीणीचा मृत्यु, मी दोन पुस्तकाची सर मिसळ तर नाही ना करत? भालचंद्र नेमाडे हे नाव का मोठ झाल ते जाणवल अन मला पुर्ण पणे अनद्न भिन्न असलेले एका पुरुषाच मोठ होण्याच्या प्रक्रियेचे काटे कंगोरे जाणवले. मी लागोपाठ दोन्ही पुस्तक वाचल्याने कदाचित थोडा गोंधळ असेल पण दोन्ही पुस्तकात जवळ जवळ तोच संघर्ष आहे नाही का? आपण जे कळपात मोठ्या झालेल्या नराला कशी वागणुक मिळते ते डिस्कवरी वर पहातो काहीसा तसाच संघर्ष नायक स्वतःशीच करतो आहे अस वाटल. वाचल्या नंतर या भावना कुठे तरी मांडाव्या अस प्रकर्षान वाटत होत पण त्यांच्यावर स्वतंत्र पणे लिहिण्या एव्हढी ताकद आपल्यात नाही हे माहित होत. तुम्ही लिहिलेल्या ठीकाणी थोड तरी मत मांडता आल याचा अतिशय आनंद झाला . सो झंप्याण्णा आभार!

"कोसला" बद्दल रोचक लिखाण. उगाच कुठेही शब्दांचे खेळ करून नायकत गुंतलेला दिसत नाही या बाबत उदाहरणार्थ असहमत आहे. :-)

In reply to by मुक्तसुनीत

पृष्ठसंख्या ? वाचनास लागलेला वेळ ? हा सगळा पंचनामा कुठे आहे ? आणि कथावस्तू विलोभनीय आहे का ?

In reply to by मिसळभोक्ता

उपप्रतिसाद मला असला तरी पृच्छा प्रस्तावलेखकाला असावा असे धरून चालतो.