बापं
कधी रागाने फटकारलं,
तरी नंतर समजूत काढणाराही तोचं असतो.
त्याच्यासोबत सगळ्या गोष्टी share करता याव्या
असा best friend ही तोचं असतो.
आपल्या वाईट संगतीबद्दल
रागावणारा तोच असतो.
पण चांगल्या friends सोबत जाण्याची
मोकळीक देणाराही तोचं असतो.
अपयशात धीर देऊन
नवीन उमेद जागवणाराही तोचं असतो.
आणि यशाच्या आनंदात
आपल्या बरोबर नाचणाराही तोच असतो.
आपल्याला स्वावलंबी व सक्षम बनवण्यास
प्रयत्नशील असणाराही तोचं असतो.
स्वतः उपाशी राहून आपल्याला
जेवू घालणाराही तोचं असतो.
जरी त्याला आईसारखी माया दाखवता येत नसली
तरी मुलांच्या काळजीने पोखरला जाणाराही तोचं असतो.
मुलांकडे कुणी वाकड्या नजरेने बघितले,
तर मुलांचे संरक्षण करणाराही तोचं असतो.
मुलांची लाड पूरवण्यासाठी
स्वतःच्या इछांना मुरड घालणाराही तोचं असतो.
ज्याचा हात पकडल्यावर खुप secure वाटतं,
तो फक्त त्याचाचं हात असू शकतो.
मुलीच्या लग्नात, स्वतःचे हुंदके दाबून
मुलीचे डोळे पुसणाराही तोचं असतो.
मुलाला घरी यायला थोडा उशीर झाला की,
व्हरांड्यात अस्वस्थपणे फेर्या मारणाराही तोचं असतो.
जे आई नाही करू शकतं,
ते फक्त तोचं करू शकतो.
पिलांवर अतोनात प्रेम करणारा
हा एक 'बापचं 'असू शकतो.
dedicated to my father
this can be other way round