एच आर, प्रोसेस आणि मी
कॉसकोची वारी म्हणजे तशी म्हतली तर चंगळच असते. भरपूर रंगीबेरंगी गर्दी, हिरव्यागार भाज्या, रसरशीत फळं, मासे , चिकन, पोर्क सगळं मस्त हाताळायला मिळतं ते मिलतं वर नमुनेदेखील चापायला मिळतात. आमच्याकडे साधारण १५वड्याचं, महीनाभराचं सामान या वारीत आणलं जातं.
पण दिवाळीनंतर येतो शिमगा त्या न्यायाने कॉसकोच्या फेरीनंतर घरी आल्यावार एक-एक करत ते सामान गाडीतून उतरवायचं, नंतर जीना चढत चढत दारापर्यंत न्यायचं, तिथून पुढे फ्रीजपर्यंत नेऊन लावायचं म्हणजे जीव मेटाकुटीला येतो. ४-४ गॅलन दूध, अंडी,फळांचे भाजांचे टोप, मासे, चिकन, चिकन ब्रॉथ चे कॅन्स, केचप्स, सिरीअल्स एक ना दोन. अनंत खेपा कार ते घर कराव्या लागतात.
आता थोडी पार्श्वभूमी देते - परवा इंटर्व्ह्यू झाला त्यात एच आर नी प्रश्न केला - "ह्म्म तर मिस .... तुम्ही गेल्या प्रकल्पात कोणत्या प्रोसेसमध्ये सुधारणा घडवून आणलीत? आणि त्या सुधारणेचे फायदे लोकांना कसे पटवून दिलेत?"
आता असल्या प्रश्नांमुळे होतं काय प्रकल्पामधे माणूस फार प्रकाश पाडू नाही शकला तरी घरी दारी प्रकाश पाडायला जातो. नको तिथे असले प्रश्न आणि त्यंची उत्तरं इम्प्लिमेंट करू लागतो.
माझंही तेच झालं. यावेळी कॉसकोमधून बाहेर पडल्या पडल्या मी १ मोठ्ठा खोका घेतला. त्यात सगळं सामान भरलं, हो हो अगदी नीट रचलं. तोवर नवरा बिल देऊन आला होता. तो म्हणाला हे काय नवीन? मी म्हटलं - ही नवी प्रोसेस. आपण हा खोका आता डिकीत चढवायचा मग घरी दोघांनी एक-एक करत सामान नेण्यापेक्षा सरळ हा खोका उचलून न्यायचा. काम सोप्प! : ) रिमेंबर इफ वी मेक इट द क्रेडीट गोज टू मी. नवर्यानी त्या भल्या मोठ्ठ्या खोक्यावर नजर फिरवली आणि फक्त म्हणाला "इफ ...!!" मी हीअसल्या क्षुल्लक गोष्टींकडे विशेषतः नवर्याच्या दुर्लक्ष करायला सरावली आही आतापावेतो.
घरी आल्यावर झालं भलतच. तो खोका उचलता तर आला. पण नेताना अर्ध्या वाटेवर माझ्या पाठीत उसण भरली. जीन्यावर तो खोकातिरपा मी सोडून दिला आणि बटाटे इतस्ततः विखुरले. मागुन येणार्या गोर्या कुटुंबानी सहानुभूतीपूर्वक काही बटाटे उचलून दिले. नवर्याला एक एक करत शेवटी सर्व सामान न्यावं लागलं एवढच नाही तर मलाही उचलून न्यायची वेळ आली. आमच्या नको तिथे स्पष्ट्वक्त्या मुलीनी मुक्ताफळं उधळलीच - "आई प्रोसेसमधे सुधारणा करण्याआधी ती डुएबल आहे की नाही ते तरी पाहायचस." नवरा फक्त छद्मी हसला!
मी तर कानाला खडाच लावला - हे एच आर लोक पक्के डँबीस असतात. हायपोथेटीकल (काल्पनीक) समस्या देणं यांचं कामच असतं. परत एकाही एच आर वाल्याला सिरीयसली म्हणून घ्यायचं नाही.
प्रतिक्रिया
घराला लिफ्ट नाहीये का? एक
:-)
बरोब्बर. असल्या कार्टा अगदी
हा हा हा! यावर उपाय म्हणून
मस्त
स्वानुभव शेअर केल्याबद्दल
सुनील
बाकी कॉस्को (किंवा सॅम्स
बिब-टिब principle
अग उसणीच काय झाल? बाकि या
उसण बरी आहे. नवरा कधी कामाला
पोतं (बारदान) का नाही वापरलतं
परवा इंटर्व्ह्यू झाला त्यात
सर्रास सगळ्यांना मिस म्हणतात
परा, Ms आणि Miss मधला फरक
सर्रास सगळ्यांना मिस म्हणतात
खोक्यांचा वापर ही costco ची
शुचिताई.. चांगला लेख. तुमच्या
कॉसको तुसी ग्रेट हो
आता परा पुन्हा वैतागणार
पर्याचा अमेरिकेवरील खरा राग
अरे नायल्या
बाकी बर्याचदा जायचे आहे पण
कॉस्कोत किचन आणि बाथ टिशू,
परा कॉलींग परा..
आम्ही पूर्वी जायचो कॉस्कोत
कॉस्को किंवा सॅम्समधून विकत घेण्याची लिश्ट
अरे हाँ!गाडीचे पेट्रोल
+१
सर्व अभिप्रायाशी सहमत!
लिटर????
लिटरवारी
येस !!!
खोकी
अहो मग पाच बाटल्या घ्या की !
हाहाहा!
शिसानविवि
मग म्हणा तर, "मम, आत्मना
गरिबाला
:-)
+१
या धाग्याचे प्रायोजक....
हाहा!
हि बीजे काय भानगड आहे कोणी
बीजे'ज : होलसेल क्लब
असे आहे होय ?
ह्म्म
ईस्ट कोस्टावरचे कॉस्को किंवा सेफवे
बीजेज
असंच काय नाय. डाउन टाऊन