Skip to main content

गणेशा वंदन तुजला आता

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 13/08/2010 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
गणेशा वंदन तुजला आता गणेशा वंदन तुजला आता तुझ्या चरणी ठेवीतो माथा ||धृ|| कुशल बुद्धीचे दैवत तू रे आम्हां मुढास सुबुद्धी दे रे सुगम होवूदे गौळण वग कथा गणेशा वंदन तुजला आता ||१|| मुर्ती तुझी तुंदील तनू हासरी आनंदे भरती येई बघता नाचरी नृत्य गायने हरू दे रसीक व्यथा गणेशा वंदन तुजला आता ||२|| कला चौसष्ट चौदा विद्या पारंगत असशी विघ्नहर्ता सफल कार्य होई गण तुला अर्पीता गणेशा वंदन तुजला आता ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) १३/०८/२०१०
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 963
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया