हजार कात्र्या आम्हा परजु दे, कर्तनयोगे त्या, आम्हाला कुरतडू दे सारे,
विवस्त्र कवटी आज होवू दे, टक्कल पार्याचे, गळू दे व्यर्थ भार सारे.
तैलसुरा प्राशुन माजले , तण डोईवरचे ,
जणु की कवड्यांच्या कविता,
आणि ग्रासिले मुख दाढीने , ओठ मिश्याखाली ,
लोपला नभाआड सविता.
क्षौरवीरा तव सुसाट कर्तन असेच चालू दे,
खुलो नक्षी डोक्यावरती,
मान गळ्यातून निघो कालवे भगव्या पाण्याचे,
नापिता, कळ आली भलती.
ही कानाची पाळी ठेवा , नीट खिश्यामध्ये
शिवुन घ्या जा नाक्यावरती,
नापित आम्ही शस्त्र फिरवतो प्राणकराराने,
जराशी माफ करा गलती.
चला झाडू द्या शुभ्र कापडे, केसांनी मळली ,
आण बे, चुना नि गायपुडी.
वीस टाळकी बारा दाढ्या , म्हसबी भादरली,
करू दे आमाला बी दाढी.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3547
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
आगायायायायाया!!!!
सेकंड थॉट...
ही कानाची पाळी ठेवा , नीट
हा हा हा
डॉनरावांच्या बाबतीत विचार
In reply to हा हा हा by ३_१४ विक्षिप्त अदिती
नाही नाही!
In reply to डॉनरावांच्या बाबतीत विचार by राजेश घासकडवी
अनुल्लेख ...
In reply to नाही नाही! by चतुरंग
मस्त.
हा हा हा!! या अश्या विडम्बना
मस्तच रे अडगळा!
वा वा .. सुसाट .. विडंबन एकदम
हा हा
मला
In reply to हा हा by केशवसुमार
छान.........