माझ्या घरी ( माहेरी, सासरी) सर्व शुध्द शाकाहारी. अंडे नावालाच किंवा नाहीच म्हणायचे.
त्यामुळे कधीही मांसाहार केला नाही. त्या चवीची आवडच निर्माण झाली नाही. आता इच्छा ही नाही.
माझा मुलगा हा आता पर्यंत शुध्द शाकाहारी. परंतु अमेरिकेतल्या कॉलेज डॉर्ममधे रोज रोज सॅलेड किंवा मर्यादित शाकहारी तेच तेच पदार्थ खायचे म्हणजे आव्हान. त्याने मांसाहार सुरू केला. मांसाहार म्हणजे चिकन. अजून इतर काही ही नाही. आम्ही त्याला मांसाहाराचे तोटे सांगितले. सोय सांगितली. निर्णय त्याच्यावर सोडला. प्रोत्साहन दिले नाही किंवा खाऊ नकोसच असे ही सांगितले नाही.
मांसाहार घरात आणण्यास मात्र माझी बंदी आहे.
आपन तर प्युअर वेज बुवा .....
पन मांसाहारी लोक शाकाहारी लोकांना काय घास फुस खाता असे म्हनता ते पटत नाही.
च्यायला तुम्ही लोक मांसाहारी आहे म्हनुन लै भारी झाले का रे ?
बाकी मांसाहारी असण्याला आपलाला काही अड्चन नाही.
तो ज्याचा प्रश्न आहे.
मांसाहार ठीक आहे पण त्याचे अधिक सेवन फायदेशीर नाही.
सहमत आहे. आहार कोणताही असला तरी कसे आणि किती प्रमाणात त्याचे सेवन केले जाते याला महत्व आहे.बरेचसे विकार (भारतात) जडतात त्यामागे मसाले/मीठ/साखर ह्यांचा सिंहाचा वाटा असतो असे मला वाटते. मांसाहारात मीठ्/मसाल्याचे प्रमाण जास्त असावे.
---
सगळेच लोक शाकाहारी झाले तर अन्नधान्याचा प्रश्न अजुनच बोकाळेल. त्यापेक्षा काही लोक मांसाहरी आहेत हेच उत्तम. शिवाय मांसंहारी लोकांची जगात कुठेही खाण्यापिण्याच्या बाबतित गैररसोय होणार नाही. प्रमाणात मांसाहार सुद्धा योग्यच की. शाकाहारातुन आवश्यक ती सर्व पोषणतत्वे मिळतात हे मान्य. पण मांसाहारात ती मिळत नाहीत असे थोडेच आहे? त्यातुनही आवश्यक ति प्रथिने मिळतातच. थोडक्यात काय जे आवडेल ते खावे (माणुस सोडुन. तो खायला बंदी आहे)
सगळेच लोक शाकाहारी झाले तर अन्नधान्याचा प्रश्न अजुनच बोकाळेल. त्यापेक्षा काही लोक मांसाहरी आहेत हेच उत्तम.
साफ चूक
मांसाहारी लोक जे मांस खातात, ते सर्व प्राणी शाकाहारी असून कित्येक टन शाकाहार केल्यानंतर ते कापण्याएवढे बनतात. त्यापेक्षा ते सर्व अन्नधान्य डायरेक्ट माणसांना देणे अधिक एफिशियंट आहे. मध्यंतरी अमुक एक किलो वजनाचा प्राणी वाढवायला त्याच्या वजनाच्या किती पट धान्य लागते हे वाचनात आले होते. आता तो आकडा आठवत नाही पण सारासार विवेक वापरला तरी पुरे.
जनावरांनी खाण्याचा गहू आणि माणसांनी खाण्याचा याच्यात फरक असतो म्हणे. खरे खोटे अमेरिकन सरकार जाणो.
आणि जनावरांनी धान्य खाऊ नये म्हणुन त्यांना जन्मल्याजन्मल्या मारणार की काय आणि? मारायचेच असेल तर चांगले खाऊ पिऊ घालुन मारा की. उपयोग तरी होइल. ;)
मृत्यूंजय यांच्याशी असहमत.
अहो सगळे शाकाहारी झालेतर दरवर्षी हजारो टन सडणारा गहू खाऊन संपेल. ;) शेतकर्यांना भाव वाढवून मिळेल धान्याचा. सगळे कसे गुडी गुडी होईल. त्यामुळे 'इट व्हेज फिल गुड'
-(अडवाणी )पेशवे
उद्धृत केलेली बरीचशी "माहिती" ही इ-मेल मधून फॉरवर्ड केली जाते तशी, 'अशास्त्रीय' आहे. मी प्रत्येक मुद्द्याचा इथे पाठपुरावा करू शकणार नाही (इच्छा असली तरीही तेवढा वेळ नाही म्हणून), पण चुकीची माहिती देत असेल तर चांगल्या उद्देशाचा लेख दुर्लक्षित केला जाऊ शकतो. तो तसा जाऊ नये म्हणून एक
उदाहरण: Plants do not contain cholesterol हे खरं नाही; हे , आणि हे वाचा.
दोन विनंत्या:
१) तुमच्या लिखाणाचा उद्देश मराठी वाचकांपर्यंत एक महत्वाचा विषय घेऊन जाणं हा आहे असं समजतो, तेंव्हा शक्य असेल तेंव्हा कृपया मराठी वाक्यं वापरा,
२) शास्त्रीय मुद्दे असतील तर संदर्भ (scientific references) देणं नक्कीच आवश्यक आहे.
तळटीपः मी काही काळ मांसाहार करत असे, तो शास्त्रीय (आणि भावनिकही) कारणांसाठी बंद करून शाकाहाराकडे परतलो आहे, त्यामुळे तुम्ही 'शाकाहार आधिक बरा' असं मत मांडू इच्छित असाल तर मी त्याला पाठिंबा देईन, पण कारणमीमांसा शक्य तेवढी अचूक दिली तर(च) मुद्दे पटू शकतात असा अनुभव आहे म्हणून हा प्रतिक्रियेचा प्रपंच, समजूल घ्याल ही अपेक्षा.
आम्ची कुलदेवता काळूबाई हाय. तिच्यासमोर चार पायाचा निवद द्यावा लागतु. तो दिल्यावर त्याची फुडची येवस्ता करन्याकरता आमी त्या बोकडाचं कालवन आनि भाकरी खातू. त्यो आमच्या देवीचा परसाद हाय. त्यो खान्यात कायसुदिक पाप न्हाय. परसाद खाल्लेल्या भक्तान्ना देवी वर्शभर सुखी ठेवती. झालंच तर म्हसुबा, खंडूबा, जरीआई, मरीआई, ज्योतिबा, अंबाबाई या समद्या देवास्नी असलाच निवद लागतू.
आमचे मुस्लिम भाई बकरी इदला ह्येच करत्यात. त्या दिसी कापलेलं जनावर थेट अल्लापर्यंत पोचतं आनि त्याची दुवा समद्या बंद्याना भेटते.
जर मास खाने वाईट असते तर देवाने तसे खाय्ला सांगितलं नस्तं.
तवा मांसाहार जिंदाबाद!
>>>झालंच तर म्हसुबा, खंडूबा, जरीआई, मरीआई, ज्योतिबा, अंबाबाई या समद्या देवास्नी असलाच निवद लागतू.
ए सुक्काळीच्या, कुनी दिली ही म्हायती.........???
*ड्या, म्हाईत नसलं तर बोल्तो कशाला बे........??? आम्च्या देवांची नावं घ्याचं काम न्हाय आदीच सांगतु. बाकी काय *शी करायची ती कर जा........
भोसल्यांची कुलदेवता भवानी होती अंबाबाई नाही. म्हणून वाड्यावर कापला जाणारा बकरा भवानी साठी कापतात अंबाबाई साठी नाही असे ऐकले होते एका कोल्हापूरकर मित्राकडून. बाकी अधिक माहीती नाही.
"वाड्यावर कापला जाणारा बकरा भवानी साठी कापतात"
खरंय. मी कोल्हापुरचा असल्याने भवानी मंडपात वर्षानुवर्षी चालत आलेली ही प्रथा मला माहित आहे (दसर्याच्या सुमारास... नवरात्री महोत्सव); एक दोनवेळा प्रत्यक्ष पाहिलीही आहे. अंबाबाईचे मंदिर मंडपापासून चारच पावलावर आहे. काही धार्मिक आचार आणि विचार तसेच या प्रथेविरुद्ध बोलणे कित्येकाना पसंत पडत नाही, पण तो प्रकार (बकर्याचे शीर एका घावात धडावेगळे करणे, आणि तेही सार्वजनिकरित्या, नंतर त्यातील रक्ताचा शिडकावा भवानीच्या देवळाच्या प्रथम पायरीवर करणे, इ.) बघवत नाही. असे मी बोलतो म्हणून समवयस्क मित्राकडून "च्यायला, कसला ह्यो आम्चा मराठा गडी !" असले शेलके टोमणेही खाल्ले आहेत. असो.
पु.पे.म्हणतात ती माहिती योग्य आहे. "अंबाबाई" ला असल नैवेद्य दिला जात नाही, पण "भवानी" ही दुर्गारुपातील छत्रपतींची देवता मानली जात असल्याने त्या घराण्यात "बळी" देण्याची प्रथा आहे. रोज एक दिवस याप्रमाणे नवरात्रीचे नऊ बळी ठरलेले असतात. त्या बकर्यांचे छोटे छोटे वाटे करून तो 'भवानी'चा प्रसाद म्हणून देवळाच्या सेवेत असलेल्या कामगारात वाटले जातात.
कुठे तरी ऐकलेला विनोद आठ्वला.
रामभाऊ : काय तात्या शनिवारी कोंबडीचा बेत केला व्हय्?...आमचा उपास अस्तु नव्हं का!
शामराव : त्यात काय झालं..आमिबी उपासाला चालतिल अशा कोंबड्या तयार केला हायती.
रामभाउ: म्हंजी?
शामरावः आमी कोंबड्यांना जनम्ल्यापासून फकस्त साबुदाने आनि राजगिरा खाउनच वाढवल्या हाय्त. झाल्या का न्हाय उपासाच्या कोंबड्या?
:) ;) :) ;)
jokes apart!
पण कुठेतरी वाचल्याचे आठवते.माणसाच्या दातांची रचना शाकाहारासाठी आहे.कारण ते गाय म्हैस्..घोडा उंट यांच्या दातांसारखे आहेत आणि हे सारे प्राणी शाकाहारी आहेत.
वाघ ,सिंह्..किंवा इतर कोणताही मांसाहारी प्राणी घ्या.त्याच्या दातांची रचना पहा. मांस तोडण्यासाठी,फाडण्यासाठी आवश्यक असलेले टोकदार सुळे हेच आढळतील.
आपण कच्चे मांस खाऊ शकतो का? नाही. ते शिजवून मऊ करुन चावण्यायोग्य करुनच आपण खातो.
त्यामुळे मला हे पटते कि मानव हा शाकाहारी असावा.
(पण्..पण पणहे पटतं म्हणुन तंदूरी खायचे सोडावे असे मला कधी वाटले नाही.)
पण हा ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग आहे.
माणसाला सुळे आहेत. निव्वळ पटाशीचे दात नाहीत. पूर्ण शाकाहारी प्राणी, जसे गाय, म्हैस यांना सुळे नसतात. निव्वळ पटाशीचे दात असतात. तेव्हा माणूस मिश्राहारी आहे. पण ज्या प्रमाणात सुळे विकसित आहेत ते पहाता मानवाच्या आहारात शाकाहार जास्त प्रमाणात आहे.
दुसरा मुद्दा हा की दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे शाकाहारी समजायचे का? का?
वासराकरता बनलेले दूध माणसाने आपल्या रोजच्या वापराकरता घ्यायचे हे योग्य आहे का? गवळी त्याकरता वासराला उपाशी ठेवत असेल, त्याचे दूध तोडत असेल तर ते मांसाहाराइतकेच क्रूर नाही का?
उद्धृत केलेली बरीचशी "माहिती" ही इ-मेल मधून फॉरवर्ड केली जाते तशी, 'अशास्त्रीय' आहे.
या बहुगुणींच्या मताशी सहमत. 'माझ्या मते मांसाहारी व्यक्ती हिंसेला लवकर प्रवृत्त होऊ शकेल.' असं स्वतःचं मत मांडून वर हे शास्त्रीय सत्य आहे हे कुठल्या आधारावर म्हटलेलं आहे?
माणसाच्या शरीररचनेवरून शाकाहार की मांसाहार ठरवणाऱ्यांशी असहमत. शरीररचना बघायची तर निव्वळ दात वा आतडं का बघावं? हत्यारं बनवू शकणारी बोटांची रचना, क्लुप्तिने प्राण्यांना मारू शकणारा, व मांस शिजवून खाण्याचं तंत्रज्ञान विकसित करणारा मेंदू - या सर्व त्याच शरीररचनेचा भाग आहेत.
क्षुल्लक उदाहरणं दाखवून शाकाहार चांगला की मांसाहार चांगला हे म्हणणाऱ्यांशी असहमत. आता भारतात मोठ्या प्रमाणावर शाकाहार होतो, अमेरिकेत मांसाहार अधिक प्रमाणात होतो. मग ऑलिंपिकच्या गोल्ड मेडल्सवरून शाकाहार किती वाईट हे ठरेलच का? असल्या उदाहरणांना आहारापलिकडे अनेक कारणं असतात.
चर्चा व्हावी तर योग्य की अयोग्य या काळ्यापांढऱ्या विचाराऐवजी मांसाहार कितपत केला तर उपयुक्त, किती केला तर अतिरेक; शाकाहाराचे फायदे काय; व मांसातून जी प्रथिनं वगैरे मिळतात तीच शाकाहारातून मिळवण्यासाठी काय पदार्थ अधिक खावेत - या विषयांवर व्हावी. नाहीतर पॉपकॉर्न घेऊन झाडावर बसून करमणुक होण्यापलिकडे निष्पन्न काही होणार नाही.
माणसाची विचारशक्ती अफाट आहे. बुद्धी अफाट आहे. त्याने अनेक शोध लावले आहेत. त्यामुळे त्याची नैसर्गिक प्रवृत्ती काय हे कधीकधी चटकन कळत नाही. कित्येकदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. उदा. आज धान्य, दूध, मांस अफाट प्रमाणात बनते. वाहतूकीतील प्रगतीमुळे, वातानुकुलन माहित असल्यामुळे दूरदेशातील अन्न आपल्याला मिळू शकते. ही क्रांती काही शतकात झाली आहे. मात्र मानवी शरीर हे लाखो वर्षे उत्क्रांत होत आहे. ही प्रक्रिया अत्यंत हळू आहे.
केवळ वैज्ञानिक प्रगतीमुळे अफाट अन्न बनवू शकलो तरी शरीराला ते पचवायची सवय नाही. केवळ गेली काही शतके आपण ह्या समृद्धीच्या सान्निध्यात आलो असलो तरी त्याहून कितीतरी जास्त वेळ मानवी जात ही अविकसित होती. आणि शरीराची रचना अजूनही त्या परिस्थितीकरताच योग्य आहे. उदा. मानव हा मुळात निशाचर नाही. दृष्टी, गंध, श्रवण ही इंद्रिये दिवसा वावरण्याकरताच योग्य आहेत. केवळ वीज, विजेर्या, दिवे, नाईट व्हिजन गॉगल वगैरे शोधले म्हणून मानव नैसर्गिक निशाचर बनणार नाही. बहुसंख्य मानव हे रात्रीच झोपणार आणि दिवसा नित्य व्यवहार करणार.
त्यामुळे शरीराच्या मर्यादा लक्षात घेऊन आहार ठरवला पाहिजे. साखरेचे अफाट उत्पादन झाले म्हणून लगेच मानवी शरीराचे स्वादुपिंड प्रचंड प्रमाणात साखर पचवू शकत नाही. मानवाने विचारपूर्वक साखरेचे आहारातील प्रमाण नियंत्रणात ठेवावे. तसेच मांसाहाराचे आहे. अजून एक मुद्द म्हणजे विविध भागातील वंश हे वेगळ्या आहारावर वाढले आहेत. सगळ्यांची शरीराची शक्ती सारखी नसते. त्यामुळे कुणी किती मांसाहार करावा हे ठरवताना आपण मुळात कुठले आहोत हेही विचारात घ्यावे.
काही बंधनं मानवी शरीररचनेमुळे पडतात हे आपल्या निशाचरपणाच्या उदाहरणावरून स्पष्ट होतं. नैसर्गिक बंधनं, मर्यादा लक्षात घेऊन त्यानुसार खाणं हा चांगला विचार आहे. शेवटी योग्य समतोल साधण्यासाठी मुळात गरजा काय आहेत हे पाहाणं रास्त.
मात्र कधी कधी नैसर्गिक प्रवृत्ती हा शब्द खूप ढिसाळपणे वापरला जातो. नैसर्गिक प्रवृत्ती शोधण्यात काहीतरी 'ठेविले अनंते तैसेचि राहावे' अशा विचारसरणीचा वास येतो. त्यातून मग मांसाहार मानवासाठी नैसर्गिक की शाकाहार नैसर्गिक असले पाया नसलेले वाद सुरू होतात. कच्चं मांस खूप खाण्यासाठी मानवी शरीर आदर्श नसेल. पण कच्च्याऐवजी शिजवलेलं मांस असताना ती चर्चा अर्थहीन होते.
आधी शाकाहारी आणि मांसाहारी हे एकमेकांच्या विरुद्ध का असावेत? समान संधीसाठी जेव्हा स्पर्धा निर्माण होते तेव्हा माणूस एकमेकाला विरोध करू लागतो पण इथे तर खाद्य असमान आहे म्हणजे शाकाहारी वि. मांसाहारी ही स्पर्धा माणूस, त्याची पचनशक्ती आणि आहार याबाबत नसून शाकाहारी श्रेष्ठ की मांसाहारी श्रेष्ठ याबाबत आहे.
चर्चेत एक एक गंमतीशीर मते आहेत.
मांसाहारी लोक जे मांस खातात, ते सर्व प्राणी शाकाहारी असून कित्येक टन शाकाहार केल्यानंतर ते कापण्याएवढे बनतात.
म्हणजे तो गवतपाल्याचा शाकाहार माणूस करत होता का? माणसाने शाकाहाराच्या नावाखाली वीड, डँडेलायन, काँग्रेस गवत खायला सुरुवात करावी. माझ्या फ्रंट आणि बॅकयार्डातले वीड मारण्यापेक्षा मी ते फार्मर्स मार्केटमध्ये विकायला बसेन. माणूस शाकाहार करतो म्हणजे उपलब्ध असलेली सर्व भाजी-पाला खातो असे नव्हे.
वाघ ,सिंह्..किंवा इतर कोणताही मांसाहारी प्राणी घ्या.त्याच्या दातांची रचना पहा. मांस तोडण्यासाठी,फाडण्यासाठी आवश्यक असलेले टोकदार सुळे हेच आढळतील.
आपण कच्चे मांस खाऊ शकतो का? नाही. ते शिजवून मऊ करुन चावण्यायोग्य करुनच आपण खातो.
मग बिघडले कुठे? माणसाचे मूल सुमारे वर्षभरापर्यंत चालत नाही त्याला बाबागाडीत घालायला माणूस सक्षम आहे. काही माणसांना नीट दिसत नाही. ते चष्मा लावून नीट पाहू शकतात. काहींना ऐकू येत नाही ते श्रवणयंत्र लावतात. त्याचप्रमाणे एखादे अन्न माणूस पचवू शकत नाही ते तो मऊ करून शिजवून खातो आणि यात मांसाहार आणि शाकाहार दोन्हींचा समावेश आहे. कच्चे मासे, अंडी खाणारे लोकही जगात आहेतच.
माणसाला सुळे आहेत. निव्वळ पटाशीचे दात नाहीत. पूर्ण शाकाहारी प्राणी, जसे गाय, म्हैस यांना सुळे नसतात. निव्वळ पटाशीचे दात असतात. तेव्हा माणूस मिश्राहारी आहे.
माणसाला सुळे असतात तसे सुळे हत्तीलाही असतात पण हत्ती तर शाकाहारी आहे. आता त्याचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे पण त्याला सुळे आहेत. ;)
Obesity is considered by doctors to be a disease within itself.
गलेलट्ठपणा हा शाकाहार किंवा मांसाहाराचा प्रश्न नसून आवश्यकतेपेक्षा जास्त खाणे, ते खाण्याची संधी उपलब्ध असणे, ते खाण्यासाठी उद्युक्त करणारी मार्केटींग-मॅन्युफॅक्चरींग व्यवस्था असणे हे आहे. थोडे थांबा! भारतात पेव फुटलेल्या मॉलसंस्कृती सोबत जाडेपणाही येईलच.
एकंदरीत चर्चा आणि त्यातले प्रतिसाद गंमतीशीर आहेत यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब.
>>
माणसाला सुळे असतात तसे सुळे हत्तीलाही असतात पण हत्ती तर शाकाहारी आहे. आता त्याचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे पण त्याला सुळे आहेत
<<
हत्तीच्या दाताला सुळे म्हणणे आणि कुत्र्याच्या आणि माणसाच्या तोंडातील टोकदार दातांनाही सुळे म्हणणे हे मराठीच्या मर्यादित शब्दसंपदेमुळे होते. इंग्रजीत ह्या दोन्ही प्रकारांना अगदी वेगळे शब्द आहेत. टस्क म्हणजे हत्तीचे सुळे आणि कॅनाईन्स किंवा फँग्ज म्हणजे तोंडातील सुळे. विनोदाचा भाग सोडला तरी हत्तीचे दिसणारे सुळे आणि तोंडातले टोकदार सुळे ह्यांचे कार्य फारच वेगळे आहे. त्यांची उत्क्रांतीही फार वेगळ्या प्रकारे झाली आहे त्यामुळे त्यांची तुलना होत नाही असे मला वाटते.
(तीच गोष्ट प्राण्यंच्या शरीरावरील केसांची आणि डोक्यावरील केसांची. मराठीत दोन्हीला केस म्हणतात. इंग्रजीत डोक्यावरील केसांना हेअर म्हणतात तर शरीरावरील केसाला फर म्हणतात.
मांजराच्या वा वाघसिंहांच्या मिशांना व्हिस्कर्स आणि माणसांच्या मिशांना मूस्टॅश. मराठीत मात्र दोन्हीकरता मिशाच. अगदी झुरळाच्या अँटेनाही मराठीत मिशाच! खरेतर हे सगळे अगदी वेगवेगळे अवयव आहेत. ).
गवत वगैरे प्रकार माणूस खात नाही. पण किलोभर मांस बनवायला जितकी नैसर्गिक संसाधने वापरली त्यापेक्षा कितीतरी कमी संसाधने वापरून किलोभर डाळ किंवा किलोभर गहू बनतात.
अगदी कॅलरीजच्या हिशेबात बघितले तरी अमूक एक कॅलरीज् मिळतील इतके मांस बनवायला जितका खर्च येतो त्यापेक्षा कमी खर्चात तितकयाच कॅलरिज मिळवून देणारे वनस्पतीजन्य उत्पादन बनते (धान्य, डाळ वा भाजी). हे खरे आहे. पण तरी शरीराला काय आवश्यक आहे तेही बघितले पाहिजे.
माझ्या फ्रंट आणि बॅकयार्डातले वीड मारण्यापेक्षा मी ते फार्मर्स मार्केटमध्ये विकायला बसेन.
तुमच्या राज्यात वीड वाढवायलाच नव्हे तर ते उघड उघड फार्मर्स मार्केटमध्ये विकायची परवानगी आहे? हम्म्म्म... आता काही गोष्टींचा उलगडा होतोयसं वाटतंय.
आपण कच्चे मांस खाऊ शकतो का? नाही.
टारझन खायचा. अर्थात ती काल्पनिक व्यक्तिरेखा होती. पण मी स्वतः केवळ लिंबाच्या रसात 'शिजवलेले' (उष्णता न देता, केवळ मुरवलेले - त्यामुळे शिजल्यासारखे झालेले) मासे खाल्लेले आहेत. खूप वेळा कच्चे मासेही खाल्लेले आहेत. साल्मन काय लागतो... अहाहा.
मला एक प्रश्न पडतो. शाकाहारी लोक सर्व भाज्या कच्च्या का खात नाहीत?
तुमच्या राज्यात वीड वाढवायलाच नव्हे तर ते उघड उघड फार्मर्स मार्केटमध्ये विकायची परवानगी आहे? हम्म्म्म... आता काही गोष्टींचा उलगडा होतोयसं वाटतंय.
आम्ही बापडे कोण वाढवणार. ते आम्हाला न जुमानता वाढतं. वीडचा चुकीचा अर्थ घेताय का? डँडेलायन वगैरे खाणारे लोक आहेत असे ऐकते. तसे विकताना पाहिलेले नाही पण आता मांसाहार सोडून सर्वांनी शाकाहार केला तर वीड खावे लागेल अशी आपली माझी समजूत.
खूप वेळा कच्चे मासेही खाल्लेले आहेत. साल्मन काय लागतो... अहाहा.
कच्चे मासे, अंडी खाणारे लोकही जगात आहेतच असे वर म्हटले आहेच.
शाकाहारी लोक सर्व भाज्या कच्च्या का खात नाहीत?
वाट्टेल ते प्रश्न विचारू नका बॉ! ;) उद्या विचाराल, शाकाहारी लोक वड, पिंपळ, आंब्याची पाने वगैरेंची भाजी का नाही करत?
खूप वेळा कच्चे मासेही खाल्लेले आहेत. साल्मन काय लागतो... अहाहा.
साल्मन???
मॅकरेल!!! (म्हणजे बांगडाच ना? जाऊदे... xxची भटे आम्ही, काही माहीत नसते ते नसते पण तरीही सगळे महाग करून ठेवतो झाले.)
बाय द वे, कच्चे खाणे हे सैपाकात रस नसण्याचे लक्षण असावे काय?
मानवाच्या सुरुवातीच्या उत्क्रांतीच्या काळात तो द्विपाद व वानरसदृश असताना झाडावर राहणारा व मुख्यत: झाडांची पाने व फळे खाणारा होता.
Utterly irrelevant. मध्यंतरीच्या काळात (नक्की कधी ते माहीत नाही, पण) कधीतरी टोळ्यांनी शिकारही करून खाऊ लागला असे वाटते. नंतर जे काही लोक (पुन्हा) शाकाहारी झाले, ते (उत्क्रांतिपूर्व) पूर्वजांच्या प्रथांकडे परतावे ("Getting back to one's roots") म्हणून झाले, असे वाटत नाही.
(पूर्वजांच्या प्रथांकडेच जर परतायचे झाले, तर आदिमानव उत्क्रांत होत असताना बहुधा वल्कले, झाडांच्या साली वगैरे घालून हिंडत असावा. पण त्याही अगोदर, उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात, द्विपाद व वानरसदृश असताना काही काळ तो वानरांप्रमाणे विवस्त्रही भटकत असावा. या सर्वात आदिम प्रथेकडे परतण्यास व्यक्तिशः माझी काही हरकत नाही; पण रस्त्यातून हिंडताना मी तिचे पालन करू लागल्यास आपल्याला आणि/किंवा समाजाला ते चालेल काय?)
माणूस निसर्गत: शाकाहारीच आहे
याबद्दल साशंक आहे, पण again, utterly irrelevant. आपलाच पुढील दावा उचलायचा झाल्यास मनुष्य निसर्गतः झाडावर राहणारा आहे. पण म्हणून त्याने झाडावर राहिलेच पाहिजे किंवा झाडावरच राहिले पाहिजे, असे मी तरी म्हणणार नाही.
(तसेही, पुरुष आदिमानवाच्या, आपल्याला आवडलेल्या स्त्रीच्या टाळक्यात बडगा - clubचे सुयोग्य मराठी भाषांतर आयत्या वेळी सुचले नाही - घालण्याच्या प्रणयाराधनाच्या प्रथेसही हाच न्याय लावता यावा काय? या प्रथेमागील instinctही आदिमानवात नैसर्गिक असावा. या कारणास्तव याही प्रथेचे पुनरुज्जीवन करावे काय?)
माझ्या मते भूतदयेचा संबंध मांसाहाराशी जोडणे चुकीचे ठरेल
सहमत.
सोवळं पाळण्यासाठी माणसांचा द्वेष करून पशुपक्ष्यांवर प्रेम दाखविणाऱ्या शाकाहारींपेक्षा
शाकाहाराचा सोवळ्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध (मांसाहारी पदार्थ शिजवलेली भांडीसुद्धा न चालणे वगैरे) काही (परंतु सर्वच नव्हे) शाकाहारींमध्ये जितक्या प्रमाणात पाळला जातो, आणि मांसाहार म्हणजे काहीतरी "घाण" ही कल्पना काही (पण सर्वच नव्हे) शाकाहारींमध्ये जितक्या प्रमाणात आढळते, तितक्या प्रमाणात (हिंदू शाकाहारी समाजातील) शाकाहारी कल्पनेचे मूळ (पण चालू आचारांबद्दल हे निश्चितपणे म्हणता येईलच, असे नाही.) हे सोवळ्याओवळ्याच्या, उच्चनीचतेच्या, कदाचित अस्पृश्यतेच्याही कल्पनेशी निगडित असणे हे अशक्य नाही. परंतु अशा प्रकारची संकल्पना जोपर्यंत या समीकरणात येत नाही, तोपर्यंत एक व्यक्तिगत निवड म्हणून शाकाहारात काहीच गैर नसावे. (अशा प्रकारच्या संकल्पना सर्वच शाकाहारींच्या बाबतीत - विशेषतः आजच्या जमान्यात - येत असाव्यात असे वाटत नाही. आज अनेक शाकाहारी हे निव्वळ परंपरेने किंवा सवयीने शाकाहारी असू शकतात, किंवा शाकाहार हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय असू शकतो. यात मांसाहारींबद्दल किंवा मांसाहाराबद्दल तिटकारा ही भावना असतेच, असे म्हणता येणार नाही. तसेच काहीजण हे पूर्णतया शाकाहारी नसले, तरी शक्य तोवर मांसाहार टाळण्याकडे त्यांचा कल असू शकतो. यात मला काही गैर दिसत नाही.)
बाकी उच्चनीचत्वाच्या, श्रेष्ठत्वाच्या भावनांबद्दल बोलायचे झाले, तर त्या दोन्ही बाजूंनी दिसू शकतात. स्वतःला श्रेष्ठ समजण्यासाठी दुसर्याला हीन लेखणे (आणि त्यासाठी काय वाटेल ते कारण वापरणे) ही बहुधा सर्वसाधारण मानवी प्रवृत्ती असावी. मांसाहारींकडून शाकाहारींना हिणवले जाण्याचे प्रकार (संबंधित शाकाहारी व्यक्तीने काहीही खोडी काढलेली नसली तरी) होत नाहीत असे वाटत नाही.
माझ्या मते मांसाहारी व्यक्ती हिंसेला लवकर प्रवृत्त होऊ शकेल.
हे विधान तर्कास धरून वाटत नाही. आहाराचा आणि हिंसाप्रवृत्तीचा काहीही संबंध नसावा. ओढूनताणून लावायचाच झाला, तर उलट्या बाजूने, (शिकार करून मांसाहार करणार्या) मांसाहारी व्यक्तीची हिंसाप्रवृत्ती ही खाण्यासाठी हिंसा केल्याने अगोदरच तृप्त झालेली असल्यामुळे, त्यामुळे तो विनाकारण विनाफायदा अधिक हिंसा करण्यास प्रवृत्त होणार नाही, तर शाकाहारी मनुष्याची हिंसाप्रवृत्ती ही अशा रीतीने तृप्त झालेली नसल्याने, किंबहुना दबलेली असल्याने, कधीही उफाळून येऊ शकते, असाही दावा करता येईल. अर्थात, अशा दाव्यांना काहीही अर्थ नाही.
नक्की खात्री नाही, पण फ्लोरा फाउंटनसमोरील निदर्शनांवर गोळीबार करण्याचा आदेश देणारे मोरारजीभाई हे शाकाहारी होते, असे वाटते.
प्राचीन काळात चातुर्वर्णाप्रमाणे समाजाची रचना होती.
चातुर्वर्ण्याचा (विशेषतः त्यातील स्तराच्या उच्चनीचतेच्या संकल्पनेचा) आणि आहाराचा अर्थाअर्थी काही संबंध असावा असे वाटत नाही. असलाच, तर तो नंतरच्या काळात आला असावा आणि अतिशय मर्यादित प्रमाणात लागू असावा, असे वाटते. चातुर्वर्ण्याच्या सुरुवातीच्या काळात ब्राह्मण शाकाहारी नसत (अगदी गोमांसभक्षकसुद्धा असत), असे ऐकलेले आहे. म्हणजेच, बहुतांश ब्राह्मण पोटजातींमधील आज (किंवा कालपरवापर्यंत) दिसणारी शाकाहाराची परंपरा ही नंतरची घडामोड असावी. (कारणे काहीही असू शकतील. मला कल्पना नाही.) तसेच, अनेक वैश्य जातींमध्येही आज शाकाहाराची परंपरा असते. याचा अर्थ, चातुर्वर्ण्याच्या उतरंडीमध्ये शाकाहारी ब्राह्मण हे शाकाहारी वैश्यांना आपल्या बरोबरीचे समजत किंवा शाकाहारी वैश्यांचे उतरंडीतले स्थान हे (बहुतांशी) मांसाहारी क्षत्रियांच्या स्थानापेक्षा वरचढ असे, असा जर कोणी काढला, तर तो विपर्यास ठरावा.
थोडक्यात, ज्या कोणत्याही एका गटाला स्वतःला दुसर्या कोणत्याही एका गटापेक्षा श्रेष्ठ मानण्याची प्रस्थापित समाजरचनेत टाप असे, तो गट संबंधित दुसर्या गटापेक्षा स्वतःस वरचढ समजे (शाकाहार ऑर नो शाकाहार), असे वाटते. (चूभूद्याघ्या.)
मांसाहार ठीक आहे पण त्याचे अधिक सेवन फायदेशीर नाही.
अतिसेवन कशाचेच फायदेशीर नसावे. यात मांसाहाराला वेगळे काढण्याचे प्रयोजन कळत नाही.
सदा साखरेचेच खाणार त्याला देव मधुमेहच देणार.
No deficiencies. There is no nutrient necessary for optimal human functioning which cannot be obtained from plant food.
हे खरे असल्यास (आणि बहुधा असावेही) ते 'शाकाहार वाईट नाही' याचे समर्थन होऊ शकेल. (त्याला काहीच आक्षेप नाही.) पण 'मांसाहार टाळावा' किंवा 'शाकाहारच करावा' याचे हे समर्थन होऊ शकत नाही.
High fat plus cholesterol. Animal foods are higher in fat than most plant foods, particularly saturated fats. Plants do not contain cholesterol.
संतृप्त मेदांचा (saturated fats) मुद्दा पटण्यासारखा आहे, पण प्रमाणातील मांसाहाराने फारसा फरक पडावा असे वाटत नाही. तसेही भारतीय पद्धतीच्या शाकाहारात दूध, दही, लोणी, तूप चालते. यात संतृप्त मेद आलेच. दूध, दही मेदविरहित खाणे शक्य आहे, पण भारतात हे कितीसे जण करतात / किती जणांना शक्य किंवा उपलब्ध आहे याबद्दल साशंक आहे. लोणी, तूप मेदविरहित करणे शक्य नसावे. भारतात पूर्ण व्हेगन पद्धत रुजेल काय? किती शाकाहारी भारतीयसुद्धा ही पद्धत स्वीकारतील? आणि व्हेगन होऊनसुद्धा जर डालडा वापरला, तर पुन्हा संपृक्त मेद आलेच ना?
Plants do not contain cholesterol हे जरी खरे असले, तरी it is ultimately not so much the cholesterol that you eat but the cholesterol that your body produces that matters, as far as blood cholesterol levels and heart disease are concerned. यात अनेक घटक येऊ शकतात. Heredity / Geneticsचा एक मोठा भाग असतो. आहारातील संपृक्त मेदांचे प्रमाण हाही एक घटक असतो. शरीराचे वजन हाही एक घटक असू शकतो. Sedentary lifestyle असल्यास त्याने काही प्रमाणात फरक पडावा. मधुमेहासारखे आजार असल्यास त्यानेही फरक पडावा. आणि if I am not very much mistaken, it is also intricately related to your levels of carbohydrate consumption and the levels of insulin secreted into your bloodstream thereby. (Or is it the level of fat deposits, and thereby obesity, that I am thinking about, which have a correlation with levels of carbohydrate intake? In any case, that could ultimately contribute towards cholesterol-related issues as well, or so do I suppose.) त्यात पुन्हा carbohydratesमध्येसुद्धा complex carbohydrates आणि fibersचे प्रमाण जास्त असल्यास धोका कमी, वगैरे वगैरे.
थोडक्यात, शाकाहार ही (त्यातील भारतीय शाकाहारातल्या दूधदुभत्याच्या पदार्थांना वगळल्यास इतर पदार्थांत कोलेस्टेरॉल नसले, तरीही) कोलेस्टेरॉलचा त्रास न होण्याची ग्यारंटी नव्हे.
"Carb" deficient. Meat is deficient in carbohydrates, particularly the starches which are so essential to proper health.
As far as I have observed, a meat diet is usually supplemented with some form of food containing carbohydrates, be it bread, potatoes or rice.
Vitamin deficient. Except for the b-complex, meat is largely deficient in vitamins.
"शुद्ध मांसाहार" करताना आजवर कोणाला बघितलेले नाही. "बाजूच्या पदार्थां"मधून जीवनसत्त्वे मिळवणे हे नेहमीच शक्य असते.
Agricultural Chemicals. Being higher on the food chain, animal foods contain far higher concentrations of agricultural chemicals than plant foods, including pesticides, herbicides, etc.
And, pray, where do the agricultural chemicals in the food chain originate from? Plant foods, which are treated with these, I suppose?
Disease Inducing. The correlation between meat consumption and a wide range of degenerative diseases is well founded and includes.....
ठीक. एकएक बघू.
Osteoporosis
याला टाळण्याकरिता कॅल्शियम कोठून मिळवाल? दुग्धजन्य आहारातून? म्हणजेच प्राणिजन्य आहार; "शुद्ध शाकाहार" (व्हेगनिझम) नव्हे?
Kidney Stones and Gallstones
हे शाकाहारींना होत नसावेत असे वाटत नाही. पण अधिक माहितीअभावी पास.
Diabetes
Levels of carbohydrate intake is a key factor. (Others could be heredity, obesity and so on.) Carbohydrates are essentially of plant origin.
Multiple Sclerosis
Arthritis
Gum disease
अधिक माहितीअभावी पास.
Acne. Aggravated by animal food.
याचा मांसाहारापेक्षा मेदाशी संबंध असावा काय? तेलातून मेद येऊ शकावेत.
Obesity. Studies confirm that vegetarians tend to be thinner than meat eaters.
Obesity is considered by doctors to be a disease within itself.
नुसते बटाटे आणि साबूदाणे खाऊन लठ्ठ होणे शक्य आहे. सबब, अमान्य.
Intestinal Toxemia. The condition of the intestinal flora is critical to overall health.
Not sure why a meat diet should affect the condition of intestinal flora.
Animal products putrefy the colon.
साशंक. पण अधिक माहितीअभावी पास.
Transit time. Wholesome food travels quickly through the "G.I" tract, leaving little time to spoil and incite disease within the body.
Define "wholesome foods". तरीही, पचनाचा वेळ (काही तास. काही दिवस किंवा काही महिने नव्हेत.) लक्षात घेता कितपत फरक पडेल याबाबत साशंक.
Fiber deficient. Fiber absorbs unwanted, excess fats; cleans the intestines; provides bulk and aids in peristalsis. Plant food is high in fiber content; meat, poultry and dairy products have none.
"शुद्ध मांसाहार" करताना आजवर कोणाला बघितलेले नाही. "बाजूच्या पदार्थां"मधून fiber मिळवणे हे नेहमीच शक्य असते.
Body wastes. Food from animals contain their waste, including adrenaline, uric and lactic acid, etc., Before adding ketchup, the biggest contributors to the "flavor profile" of a hamburger are the leftover blood and urine.
हा processed foods चा किंवा घाऊक भावात तयार विकल्या जाणार्या पदार्थांचा दोष असू शकतो; मांसाहाराचा नव्हे. हे असे झालेच पाहिजे असे नसावे. (महाराष्ट्रातला एक प्रथितयश पापड कोठे आणि कसा बनतो, हे पाहिलेले आहे काय? मी पाहिलेले नाही, पण जे काही ऐकलेले आहे - खरेखोटे देव जाणे - ते फारसे उत्साहवर्धक नाही. असो.)
थोडक्यात, मुद्दे पटले नाहीत.
सारांश, कोणीही हवी ती, पटेल ती आहारपद्धती आचरावी. इतरांच्या आहारपद्धतींपेक्षा आपलीच आहारपद्धती कशी चांगली, याचा विचार करू नये. ते दुसर्यावर ठसवूही नये. आणि ते ठसवण्याकरिता चित्रविचित्र क्लृप्त्या लढवू नयेत. दुसर्याच्या वैयक्तिक आहारपद्धतीवरून / पारंपरिक सामाजिक आहारपद्धतीवरून दुसर्याला हिणवू नये. बाकी, हवे ते खावे, हवे ते प्यावे आणि सर्वांनी सुखी रहावे.
माझ्यामते शरीराचा, वातावरणाचा, उपलब्धतेचा आणि आवडीचा समतोल साधला जाइल असा आहार असावा.
इंडस्ट्रीअल स्केल वर मांसाहारासाठी वापरल्या जाणार्या प्राण्यांच उत्पादन करण्यासाठी जंगलं साफ करावी लागत असावीत; पण शाकाहारींसाठी शेतजमिन तयार करण्यासाठीही असंच कराव लागत असेल. १ एकर कुरणात चरणार्या शेळ्या / मेंढ्या / गायी आणि १ एकरात उत्पन्न होणारा गहू/तांदूळ्/मका किती लोकांना पुरेसा होइल याचा तुलनात्मक विदा मला माहित नाही.
१८% ग्रीन हाउस गॅस हा ह्या पशूंची करामत आहे असं कुठसं वाचल होतं. या पशूंना कमीत कमी वेळात गलेलठ्ठ करण्यासाठी बर्याच घातक गोष्टींचा वापर केला जातो ( अर्थातच धान्य पिकवण्यासाठीही किटकनाशकं, खतं यांचाही बेसुमार वापर होतो ).
सध्या इकडे क्लोन केलेल्या गायींचं दूध बाजारात आहे आणि नुकतीच बातमी फुटल्यामुळे त्यासंबंधात बरीच गरम चर्चा सुरू आहे.
मला स्वतःला भावनात्मक दॄष्ट्या म्हणायच झालं तर मांसाहारापेक्षा दुग्धजन्य पदार्थ खाणं जास्त क्रूर वाटतं, Veal हा त्यादृष्टीनं मोठा भावनिक प्रश्न आहे .
किती वेळा या विषयावर चर्वण करणार कळत नाही.
तेच तेच मुद्दे दोन्ही पक्षां कडुन मांडले जातात.
तर तिसरी फळी दोन्ही बाजुने मत मांडणारी.
उगाच आपली मतं एक-दुसर्यावर थोपवण्याचा अट्टाहास का?
साधी गोष्ट आहे.
ज्याला जे पचत/उपलब्ध आहे ते त्यानं खाव. (आता एस्किमो रोज कुठुन भाजी-पाला आणेल?)
जे काही खायचय ते प्रमाणात खा. स्वस्थ रहा. शेवटी अती तेथे माती.
ही चौथी फळी (खा पण त्याबद्दल एकमेकांचे मतपरिवर्तन करू नका!) सुद्धा नेहमीचीच बरे का...
ह. घ्या. हे. सां. न. ल.
लेखाच्या निमित्ताने आज मी शुद्ध शाकाहार करणार आहे. फ्रीजमध्ये शाकाहार सोडून आज काहीही नाही, हे तपासून बघूनच इतके छातीठोकपणे सांगतो आहे.
बाकी फळ्या मोजणारी ही माझी फळी क्र. ५ सुद्धा नेहमीचीच हे. सां. न. ल.
प्रतिक्रिया
आहार
हा मिश्राहार कुठला?
आपन
सहमत
हत्ती शाकाहारी असतो..तर सिंह
हा युक्तीवाद चुकीचा आहे अस
+१
सोडु नका अजिबात!
सगळेच लोक शाकाहारी झाले तर
मृत्युन्जय
जनावरांनी खाण्याचा गहू आणि
मृत्यूंजय यांच्याशी
नाय बॉ. तो गहू आत्ताच
अहो पण मग दारु कशापासुन
सरसकट
लेखाचा उद्देश चांगला असला तरी...
पूर्ण सहमत
पूर्ण सहमत
चालुद्या..... "हत्ती शाकाहारी
ज्याला जे आवडत ते त्याने खाव.
गमतीदार
हीच
गंमतीदार
देवाधरमाकर्ता
अत्यंत चुकीची माहिती.
अंबाबाईला सामिष भोजन चालते
अंबाबाईला सामिष भोजन चालते
भोसल्यांची कुलदेवता भवानी
सगळे एकच
औरंगजेबाने म्हटलेच आहे 'नावात
=)) बकरा नं. @@@ जर नावात
बकर्याचा बळी
एक गंमत आठ्वली...
सुळे
..अरे हां हे तर माझ्या लक्षातच नाही आले...
उद्धृत केलेली बरीचशी "माहिती"
शरीररचना का विचारात घ्यावी?
नैसर्गिक म्हणजे काय?
हे ही बरोबर आहे...
हा पळपूटेपणा ....
शाकाहारी वि. मांसाहारी???
मराठी भाषेतील मर्यादित शब्द
वीड
वीड
साल्मन???
काही मुद्दे
माझ्यामते शरीराचा,
किती वेळा या विषयावर चर्वण
चौथी फळी
ह्या सगळ्या फळ्यांच्यावर जाउन