Skip to main content

गण: वंदन करीतो गजाननास

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 07/08/2010 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
गण: वंदन करीतो गजाननास यावे गणास गणपती आज नमन करीतो आम्ही तुम्हास रसीक जमले तुमचा भास होवूद्या गौळणवग खास वंदन करीतो गजाननास ||धृ|| कार्यारंभी वंदन करूनी गणास आळवी शुभशकूनी हाती घेतली डफतुणतूणी द्यावा आशिर्वाद आम्हास वंदन करीतो गजाननास ||१|| सरस्वतीचे लेणं लिहूनी गान मंदिरी गाणं गावूनी नम्र होवूनी तिजला वंदूनी विनवितो बुद्धी देवीस वंदन करीतो गजाननास ||२|| कला आमची रसीका दाखवाया भाग्यवंत पुण्यवंत आम्ही ठराया लवकर येवूनी आम्हास पावा गणात नित भजतो तुम्हास वंदन करीतो गजाननास ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०७/०८/२०१०
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1279
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया