माझा खाद्यप्रवास
राम राम (जुने आणि नविन) मिपाकरहो,
आम्ही बिल्ला नंबर १६. मिपा सुरू झाल्यापासून आम्ही तसे वाचनमात्रच, कधीतरी प्रतिसादांच्या एखाददोन पिंका टा़कणारे, अन्यथा झाडावर बसून पॉपकॉर्नची पोती आणि कोकची पिंपे रिचवण्यात, खरडवह्या चघळण्यात आणि कधीमधी व्यनिमनीच्या गोष्टी करण्यात आम्हाला रस! पण गेल्या काही दिवसातले धागे वाचताना मचाणच बांधून बसायची वेळ आली आणि त्यामुळेच आमची कैफियत आपणासमोर आणण्यास आम्ही उद्युक्त झालो.
(हा आमचा पहिलाच प्रयत्न असल्याने चु भू द्या घ्या)
आम्ही जन्माने आणि कर्मानेही मुंबईकरच. चारचौघांसारखेच आमचेही बालपण होते पण एक मोठ्ठा फरक म्हणजे आमच्या घरात गाई म्हशी होत्या. घरात आई,आजी,काकू (अर्थातच नॉन आयटी वाल्या) असल्याने खाण्यापिण्याची नुसती रेलचेल होती. सकाळच्या नाष्ट्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत हरतर्हेचे पदार्थ आग्रहाने खाऊ घालण्यात त्या तिघींची नुसती चढाओढ लागलेली असे. मग मी पामर तरी काय करणार? बापडा खायचो आपला.. ताटातला पदार्थ संपलेला दिसला रे दिसला की मला फारच आवडलेला दिसतो आहे असे स्वतःच मानून आणखी आग्रहाने वाढत असत,तो प्रेमळ आग्रह काही मोडता येत नसे. नवे आणि जुने पदार्थ आठवून,रेशिप्या मिळवून त्या करत असत.त्यांचा मी हक्काचा गिनीपिग होतो. तेव्हा काही मिपा नव्हते आणि संगणकाशी त्यांचा दूरान्वयानेही संबंध नव्हता. त्यामुळे रुचिरावाल्या ओगलेआजी जिंदाबाद!
तेव्हा खाताना गोड वाटले परंतु काही वर्षांनी हळूहळू ते सगळं अंगावर दिसू लागले म्हणून व्यायाम सुरू केला. परिणाम काय? तर भूक वाढली! साहजिक आहार वाढला. अशा दुष्टचक्रात अजून काही वर्षे गेली. कॉलेजात इंजिनिअरींगला असताना मित्रमंडळीही आमच्या तोडीस तोड भेटली. कारण एकच WPTA & WPEA म्हणजे नुसते थिंकच अलाइक नाही तर इट अलाइक सुध्दा! हॉस्टेलवर मात्र जिभेचे चोचले पुरवणे कठिण होऊ लागले. त्यामुळे आमच्या कंपूने मेसच चालवायला घेतली. मेसमध्ये आधी आठवड्यातून एकदा गोड दिले जाई ते आमच्या जमान्यात आम्ही एक दिवसाआड केले. सामिष भोजनाचाही अंतर्भाव केला. आमच्या रुमवर काका हलवाई,चितळेबंधू इ.कडच्या मिठायांची सँपल्स असायची. कधीकधी त्यांची इतकी रेलचेल असे की मेसचे जेवण सोडून आम्ही फक्त मिठाईचेच जेवण करत असू. त्या वयात दूरगामी परिणाम कळले नाहीत.
पुढे नोकरीत आमच्या देहाकडे पाहून कँटिनच्या कुकपासून सायबाच्या सेक्रेटरीपर्यंत सगळ्यांचा आम्हालाच प्रेमळ आग्रह.. आम्ही हाणतोय मेदुवडे,डोसे, रसगुल्ले,गुलाबजाम आणि बास बास बास.... लग्न झाल्यावर तर काय विचारता? सुगरण कंपनीत दुपटीने वाढ झाली. आमची ही तर काय विचारता? तुम्हाला माहितच आहे तिची पाककला. वजनाची नव्वदी कधी पार झाली ते समजलेच नाही. कामानिमित्ताने इंदौरपासून पॅरिसपर्यंत फिरायला लागत असल्याने साहजिकच प्रत्येक प्रांतातल्या खासियतीकडे आमचे लक्ष जाऊ लागले. आग्र्याचा पेठा, इंदौरची रबडी,लखनवी बिर्याणी पासून वडोदर्यातल्या गुजराथी थाळीपर्यंत आणि इटालियन पिझ्झा,पास्ता,तिरामिसु पासून ते फ्रेंचांच्या सेवन कोर्स मेजवानीपर्यंत सर्व मंडळी आमच्या उदरात सुखेनैव नांदू लागली. आमची खाण्याची आवड एव्हाना छंदात बदललेली होती. त्यामुळे जाऊ तिथे खाऊ! हा खाक्या कायम राहिला. ट्रॅव्हल प्लान मग तो कामानिमित्त असो वा सहलीसाठी खादाडी आधी प्लान होऊ लागली. हाटेलांमधल्या किचनमध्ये घुसून रेशिप्या विचारुन त्यांचे घरी प्रयोग होऊ लागले. आमचा हा खाद्यछंद आमच्या चाणाक्ष सहकार्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. मग काय विचारता? जगभरातील विविध पदार्थांचा वर्षाव हपिसातल्या आय टी,नॉन आयटी बाया,पुरुष सर्वांनीच सुरू केला. आमच्या कँटिनचे कुकही नवनव्या रेशिप्या रेकमेंड करू लागले. मग 'शतक' गाठायला वेळ लागणार थोडाच?
भरीत भर म्हणून आमची त्सेंटा आजी आणि तिचा कंपू म्हणजेच मार्कुसातै, मार्लिसकाकू, राकलेटवाल्या काळेबाई, केकवाली बिर्गिटतै ह्या सगळ्याजणींच्या तावडीत मी एकटा सापडलो. त्सेंटा आजीचा मी गिनीपिग होतोच ,तिच्याकडून ह्या बाकीच्या साळकाया,माळकायांना कळायला काय वेळ लागतो का? ह्या सगळ्या ताया,माया,काकवा पदार्थ बनवताना बघण्यापासून बोलवायच्या कारण आमच्या हिला ते शिकायचं असायचं. मग ह्या शिकवणीची उजळणी घरी व्हायचीच. पुन्हा तावडीत मीच एकटा! मग दुसरे काय होणार? जे व्हायचे तेच झाले! आम्ही सव्वाशेचा पल्ला गाठला. हे कसे आणि का घडले याचा विचार आम्ही करू लागलो.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
मजा आली भ्रमंतीची सुरूवात
हाहाहा... खुसखुशीत लेख..
अरे वा..
यावे यावे..दिनेशशेठ...
दिनेशदा, फार मस्त लेखन! आज
वा वा वा!
मस्त मेजवानी. देव भल करो त्या
मस्त!!
छान!
छान लेख !!
जबरी !! मस्त लिहीलं आहे !!
मस्त!
हा हा हा. अजुन येउद्या, लेख
छान
+१
वाह!
छान
खुसखुशीत लेख! पुढच्या
छान लिहिलंय!
अरे वा, ह्यांना तिरामिसु
खणखणीत ...
+१
दिनेश दादा...
मस्त
एकदम वजनदार लेख!
अरे वा दिनेश दादांची जोरदार