चहा

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in पाककृती
4 Apr 2008 - 2:30 pm

दोस्तानो या वीकान्तासाठी
रेसीपी कोठे हे लिहायच्या हे कळाले नाही. पण मला वाटते की रेसीपी हा प्रकार आस्वादात्मक या प्रकारत मोडत असाव्यात्.म्हणुन येथे लिहीत आहे.( रसास्वाद ..........)
ललित लेख, वेगवेगळ्या विषयावरील वैचारिक लेख, कथा, समिक्षण, अनुभव आणि आस्वादात्मक लेख, इत्यादींसारखे सर्व बहुरंगी बहुढंगी लेखन या भागात करावे ही विनंती!

आपण नेहमी ऐकत असतो की "बायकानी कुंकवाला आणि पुरुषानी चहाला नाही म्हणु नये"
या वीकान्ता साठी चहा चे हे दोन वेगळे प्रकार्........पुरुषांसाठी आणि बायकांसाठी ही......
काहवा....
हा चहा कश्मिर मध्ये प्रचलीत आहे. मस्त थन्डी , मोकळी हवा , आणि सोबत निवान्त पण (गोव्याकडे "सुशेगाद" म्हणतात तेव्हढा निवान्त पणा हा चहा पिण्यासाठी अत्यावष्यक घटक. मस्त मंद आवाजात बासरी + सन्तूर अथवा शम्मी कपूर ची गाणी असतील तर सोने पे सुहागा)
हा चहा मजेत चाखत माखत प्यायचा..उगाच घिसड घाई चालत नाही.
असो. यातील घटक : ग्रीन चहा( नसल्यास काळाही चालेल) ,३ /४लवन्ग , वेल्दोडे, केसर , दालचीनी ,बारीक किसलेला बदाम,मध, मीठ,लिंबु
१) प्रथम ३ कप पाणी ; लवन्गा , दालचीनी टाकुन उकळत ठेवावे. वेलदोडे ठेचुन त्यात टाकावे
२) केसर थोडे पाण्यात भिजवुन ठेवावे.
३) पाणी उकळल्यावर त्यात गाळणीत २ चमचे चहा पत्ती आणी ठेवुन गाळण चहा भिजेल इतपत पाण्यात बुडवुन ठेवावी.
४) ३ ते ५ मिनीटानी चहाचा ( पाण्याचा)रंग सोनेरी झाल्यावर गाळण बाजुला काढावी. जास्त कडक हवा असल्यास जास्त वेळ ठेवावी
५) या सोनेरी चहामधे ४ ते ५ चमचे मध टाकावा.( गोडी वाढवु शकता)
६)किन्चीत मीठ टाकावे आवडत असल्यास थोडेसे लिंबु पिळावे
७)केसर मिश्रीत पाणी टाकावे.दोन चमचे
मस्त मोठ्या कपात गरम गरम असतानाच भरुन द्यावे
७) वाढताना त्या हवे असल्यास किसलेला बदाम वरुन टाकावा.
मस्त मंद आवाजात बासरी + सन्तूर लावुन झकास रिलॅक्स मधे काहवा प्या...
* काही जण हा चहा थंड ही पितात. त्यावेळी त्यात स्मिर्नोफ व्होडका चा एखादा चमचा टाकल्यास हरकत नाही.

आस्वादराहणी

प्रतिक्रिया

मनस्वी's picture

4 Apr 2008 - 2:40 pm | मनस्वी

नवीन चहाचा प्रकार खूपच आवडला.
फॉर अ चेंज म्हणून छान आहे. मस्त पाऊस सुरु झाल्यावर घोट - घोट यला...

बाकी सन्तूर अथवा शम्मी कपूर ची गाणी - फारच विरोधाभास वाटतोय!

प्रभाकर पेठकर's picture

4 Apr 2008 - 2:48 pm | प्रभाकर पेठकर

काहवा मुळात अरबस्थानातील कॉफी आहे. ही प्रकृतीला थंड असते.
कॉफीच्या बिया आणि वेलची एकत्र दळून पावडर बनवतात. काहवा करताना साखर घालणे अथवा न धालणे ऐच्छिक आहे.
आलेल्या पाव्हण्याचे आदरातिथ्य खजूर आणि काहवा देऊन करतात. खजूर उष्ण असतो तो बाधू नये म्हणून काहवा देतात.
पारंपारीक पद्धतीत यजमान ( Host) पाहुण्यांना काहवा एका छोट्या कपात (एक किंवा दोन घोट साईझचा कप) देतो. तेवढा पाहुण्याने प्यायला की पुन्हा तो कप भरतो. कप भरला की प्यावा लागतो. नाहीतर यजमानांचा अपमान होतो. काहवा नको असेल (म्हणजे पहिल्या कपानंतर) तर कप, आपण देवासमोर घंटा वाजवतो तसा किंचित हलवायचा आणि खाली ठेवायचा. म्हणजे यजमानास समजते की पाहुणा आदरातिथ्याने तृप्त झाला आहे. (नाहीतर तो कप भरतच राहतो.)

पुदीना चहा सुद्धा सुंदर लागतो.
उकळत्या पाण्यात चहा पावडर (थोडी कमीच) आणि साखर घालायची. आवडी प्रमाणे २-३ पाने ताजा पुदीना घालायचा आणि चांगला उकळला की २-३ थेंब लिंबू रस घालून गॅसवरून उतरवायचा. गाळून कपात घ्यायचा आणि घोट घोट घुटके घेत एन्जॉय करायचा.

स्वाती राजेश's picture

4 Apr 2008 - 5:16 pm | स्वाती राजेश

आणि गवती चहा सुद्धा छान लागतो....आलं टाकून

मान्य आहे हा विरोधाभास आहे.
पण शम्मी कपूर ची गाणी ऐकयची नसतात ती पहायची असतात (त्यातला शम्मी कपूर सोडुन.) त्यातल्या काश्मीर साठी.
मी पहिल्यांदा काहवा प्यालो तेंव्हा सगळीकडे शम्मी कपूर ची ( रफी) गाणी वाजत होती.
त्यानन्तर अनेकदा काहवा प्यालो .सन्तूर ऐकत बासरी ऐकत्..पण शम्मी कपूर ची गाणी काही डोक्यातुन गेली नाहीत.
( दिन सारा गुजारा तेरे आंगना..अब जाने दो मुझे मेरे सजना...मेरे यार शब्बा खैर..मेरे यार शब्बा खैर...मेरे यार शब्बा ...)

मनस्वी's picture

4 Apr 2008 - 3:04 pm | मनस्वी

(त्यातला शम्मी कपूर सोडुन.)

शम्मी कपूरला बघण्यासारखे दुसरे नयनसुख नाही. किती नॅचरल आणि सहजपणा असायचा त्याचा अभिनयात.. बोलण्यात.. डोळ्यांत... नाचण्यांत. मला त्याचे पिक्चर्स आणि गाणी बघायला केव्काही आवडतात.

विजुभाऊ's picture

4 Apr 2008 - 3:08 pm | विजुभाऊ

मला त्याचे पिक्चर्स आणि गाणी बघायला केव्काही आवडतात
वर दीलेल्या काहवा चहा पिताना गाणी ऐकुन बघा.......काय फीलिन्ग्स येतात ते...मग सांगा....
मस्त काश्मीरी बागेत गेल्यासारखे वाटेल........
हे करुन पाहीलेला...विजुभाऊ

प्राजु's picture

4 Apr 2008 - 7:16 pm | प्राजु

शम्मी कपूरला बघण्यासारखे दुसरे नयनसुख नाही. किती नॅचरल आणि सहजपणा असायचा त्याचा अभिनयात.. बोलण्यात.. डोळ्यांत... नाचण्यांत. मला त्याचे पिक्चर्स आणि गाणी बघायला केव्काही आवडतात.

अगदी बरोबर मनस्वी. मलाही त्याचे सगळे सिनेमे आवडतात.

विजुभाऊ,
चहा मस्त वाटतो आहे. नक्की करून बघेन. सर्दी झालेली असताना जास्ती छान वाटेल असे वाटते.
आजच करून पहाते.
- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

इनोबा म्हणे's picture

4 Apr 2008 - 3:14 pm | इनोबा म्हणे

हा चहाचा प्रकार आवडला बॉ...मस्त आयटम आहे.पण हा चहा प्यायला काश्मीरला जायचं म्हंजी परवडायचा नाय भौ...
धम्याला इचारुन बघतो.चौकात टपरी टाकावी म्हणतो पार्टनरशिपमंदी :)

पण शम्मी कपूर ची गाणी ऐकयची नसतात ती पहायची असतात (त्यातला शम्मी कपूर सोडुन.) त्यातल्या काश्मीर साठी.
हे बरुबर नाय इजूभाऊ.शम्मीभौ काय भारी नाचायचा...(याहूऽऽ)

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

"पण हा चहा प्यायला काश्मीरला जायचं म्हंजी परवडायचा नाय भौ.."
अरे ईनूभाउ, आपल्याला काय करायचयं काश्मीर ? आपल्याला "सिगारेट" फूकताना लै कोरडं कोरडं वाटूने म्हणून बरोबर कसलही गार्/गोड्/गरम पाणी चालतं...
बाय द वे, तुमच्या टपरीत "बिड्या " मिळतात ना ? नाहितर पुन्हा आम्हाला रात्रीच शि,न. ठेसनावर जायला लागेल ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

इनोबा म्हणे's picture

4 Apr 2008 - 8:04 pm | इनोबा म्हणे

बरुबर बोलला डॉन्या... च्यामारी धूर काढल्याशिवाय चहाची मजा येत नाय. नायतर धूर असेल तर कंचाबी चहा चालतूया.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

छोटा डॉन's picture

4 Apr 2008 - 8:08 pm | छोटा डॉन

अरे इनोबा तुला माहितच असेल की "तल्लफ " आली की कोनचाबी चहाच काय तर कोनतीबी "सिगारेट" पन चालती ...
मग आमचा ब्रँड "लाईट्स" आहे मला "काश्मीरीच" चहा लागतो ही सगळी नाटकं बाजूला , कसे ?

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विजुभाऊ's picture

4 Apr 2008 - 3:25 pm | विजुभाऊ

ईनोबा चहाच्या आणखी काही वेग़ळ्या नामचीन रेसीपीज तुम्हाला नन्तर सांगतो....टपरी धमाल चालेल.
बाकी पुण्यात ते अम्रुततुल्य नामक ऍल्युमिनीयमच्या हाटेलात मिळते त्या तीन चमचे पेयाला मी चहा म्हणणार नाही.
भारतात रोज एक निराळा चहा करायचे म्हंटले तर सहज दोन महीने जातील इतके प्रकार आहेत. त्यातले काही प्रकार डेक्कन वर एका हाटीलात मिळायचे..सोबत हुक्कापण असायचा.गेलं बिचारं ते हाटेल्.पार भुइसपाट केले गेल्या वर्षी..
तुळस आणि गुळ घातलेला चहा सुद्धा पिणारा........विजुभाऊ

मीनल's picture

4 Apr 2008 - 5:35 pm | मीनल

मला ही त्या टपरीत पार्टनरशीप द्या की रे लेकांनो.
मी चायनीज टी च्या रेसीपीज देईन तुम्हाला.
तिथला ` छा` ईंपोर्ट करायला सेटींग पण करेन.
मीनल.

छोटा डॉन's picture

4 Apr 2008 - 7:13 pm | छोटा डॉन

"मला ही त्या टपरीत पार्टनरशीप द्या की रे लेकांनो...."
हे बघा, तुम्ही पार्टनरशीप करा की काय अजून म्हन्तात ते करा ...
पण आपल्याला येळेत "हप्ता पोहचला " पाहिजे , हप्ता बोले तो "प्रोटेक्शन मनी " ...
और अगर पुलीस को बताने की कोशिश की तो .... हा हा हा ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मीनल's picture

4 Apr 2008 - 7:27 pm | मीनल

टपरी सुरू व्हायच्या आधीच ह्या डॉनच सुरू .
हप्ता?
आम्ही मिपाच्या पांडू हवालदार ला पार्टनर करून घेणार आहोत.
तो हप्ता घेत नाही हे आधिच सांगते.

मीनल.

छोटा डॉन's picture

4 Apr 2008 - 7:55 pm | छोटा डॉन

"आम्ही मिपाच्या पांडू हवालदार ला पार्टनर करून घेणार आहोत...."
तुम्हाला तरी गॅरेंटी आहे का की पांन्डू हवलदार तुमचे रक्षण करतील. अहो इथे मोठ्यामोठ्या "कमिशनरांच्या" बदल्या आम्ही आमच्या मनासारख्या करून घेतो तिथे "हवलदार" काय चीज आहे ?
तुम्हाला म्हणून सांगतो "डॉन का इंतजार ग्यारह मुल्कोकी पुलीस कर रही है, लेकिन दॉनको पकडना मुश्कील ही नही नामुमकीन है ..."

तेव्हा चुपचाप "प्रोटेक्शन मनी" भेज दो ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

देवदत्त's picture

4 Apr 2008 - 8:44 pm | देवदत्त

भारतात रोज एक निराळा चहा करायचे म्हंटले तर सहज दोन महीने जातील इतके प्रकार आहेत.
अहो, दोन वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात पाहिले तर एका होटेलवाल्याने सांगितले की त्यांच्याकडे ८५ प्रकारचे चहा बनविले जातात. खरंच भरपूर... :)

धमाल मुलगा's picture

4 Apr 2008 - 4:09 pm | धमाल मुलगा

धम्याला इचारुन बघतो.चौकात टपरी टाकावी म्हणतो पार्टनरशिपमंदी :)

बिन्धास चालू करु रे! तिच्याआयला निदान हलकट वि॑ग्रजी डूकरा॑ची फालतू बडबड तरी नाही ऐकावी लागणार!
हा॑ पण नळस्टॉपलाच टाकू रे. तिथ॑ पहाटे २:३० वाजता का॑देपोहेवाला बसतो त्याच्याकड॑ पोहे खाल्यावर पार स्वारगेट नायतर शिवाजीनगरला जाव॑ लागत॑ चहा प्यायला. रात्री आल्याचा चहा आणि दिवसा काहवा...दिन दुगनी रात चौगनी प्रगती करु :-)))

टपरी धमाल चालेल.

विजुभाऊ, नक्की अर्थ नाय कळ्ळा! टपरी चालेल, धमाल चालेल, धमालला टपरी चालेल, टपरीला धमाल चालेल, तुम्हाला धमाल असलेल्या टपरीवरचा काहवा चालेल, तुम्हाला टपरीवरचा धमाल काहवा चालेल...
अरे काय चालल॑य काय हे माझ॑ ???????

विजुभाई, काssहवा?, अल्ताफभाई काssहवा?

- (चालू) ध मा ल .

विजुभाऊ's picture

4 Apr 2008 - 5:31 pm | विजुभाऊ

धमाल्या तुमच्या टपरी चे मेन्यु कार्ड "रामनाथ " च्या बोर्डापेक्षा मोठे ठेवावे लागेल
मी तुम्हाला गुजराती "उकाळो", "मसालानी चा" पासुन ते बिहारी टावराणातला चहा पर्यंत सगळ्या रेसीपी देईन. तिखट चहा सुद्धा
असतो.( बाय द वे वर ऑलरेडी व्होडका टी ची रेसीपी सांगुन झाली आहे)
अवांतरः गुजरात मधे एक मजेशीर प्रथा आहे. गावात कोणी परदेशी गेलेला सुट्टीवर परत आल की गाव त्याला पारावर चहाला बोलावते.
सगळे घरुन स्वतःपुरती कपबशी घेउन येतात. जे चहा आणणार असतात ते सगळे कडीच्या डब्यात चहा घेउन येतात.
सुट्टीवर आलेला हा पाहुणा "गाव जेवण" करावे तसा सगळ्या गावासोबत"गाव चहा " पितो. वेळही वाचतो...चहापान ही होते.
आट्टल चहाबाज्...विजुभाऊ

आयला! ग॑मतच आहे!

एकूण काय, आमचे सल्लागार तुम्ही आहात आणि तुमच॑ चहा ह्यादेखील विषयातल॑ ज्ञान इतक॑ सखोल आहे म्हणल्यावर आम्हाला बहुतेक ५ मजली टपरी टाकावी लागणार अस॑ दिसत॑य!

"पुण्यामध्ये प्रथमच!
अख॑ड हि॑दुस्तानातील निरनिराळ्या प्रकारच्या चहाची लज्जत चाखण्यासाठी आता इकडे तिकडे फिरु नका!
आमच्या प्रशस्त ५ मजली 'चहा-महाल' ला भेट द्या!
खास आकर्षण॑: कहावा, मसालानी टी, व्होडका टी, आणि चीन व अमेरिकेत लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान असलेला मिनलताई स्पेशल इ॑पोर्टेड चायनिज छा

टीपः चहा-महालाचे उद्घाटन हे अनुष्कावैनीच्या हातून होईल. आणि लकी ड्रॉमध्ये विजयी ठरलेल्या निवडक विजेत्या॑सोबत वैनी चहा घेतील!!!!!

आमची कोठेही शाखा नाही!!!! "

काय इनोबा, घ्यायचा का बोर्ड करायला?

मीनल's picture

4 Apr 2008 - 6:06 pm | मीनल

अरे अनुष्कावैनी मद्रासी हायेत.
चा काय पिणार आपल्या हाटेलातली?
त्यासनी कॉपी लागेल.

आणि त्यांच्या संगती चा पियायची?
मालकाची संमती हाय काय ?अं?
नंतर आंगाशी यायचं .
जर इचार करून बोर्ड रंगवा .बरंका ?

मीनल.

धमाल मुलगा's picture

4 Apr 2008 - 6:15 pm | धमाल मुलगा

टेन्सन नको!
आपुन मालकास्नी बी बलवू की! म॑ग काय नाय म्हनत्याल व्हय?
फित कापायची कातर वैनी॑च्या हातात आन् वैनी॑चा हात मालका॑च्या हातात...क्काय मालक, म्हनचाल का न्हाई म्हून????

आन् कापीच॑ म्हनचाल तर त्याच॑ काय हो यवड॑?
सत्राशे साठ प्रकारच॑ चा करनार आपन, त्यात येकादा कोप कापी टाकायची आन् देयाची वैनी॑च्या हातात!
वर कुनाला कळ्ळ॑च तर म्हनायच॑ "ओsss भौ, त्या॑नी चा तरी किती पियाचा? परत्येकास॑ग चा पिऊन त्या पल्ड्या आजारी तर येनार का तुमी औषद-पानी कराय? "

- (चालबाज) ध मा ल चहावाले.

मीनल's picture

4 Apr 2008 - 6:23 pm | मीनल

चा पियायची रे .
पियायचा कश्या पाई बोलून -हायला ?अं?

व. के.
ठर्ल तर.
मद्राशी ण,कैची ,अन हातात हात.
आन ---
कापी
ते बी आपल्या ५ मजली हाटेलात .

आरं ,पण एक्ल का एक नविन?
तात्यांच्या हाटेलातलं मेनु ?

काय पर्धा लाविली की आपल्या संगती?

धमाल मुलगा's picture

4 Apr 2008 - 6:30 pm | धमाल मुलगा

काय पर्धा लाविली की आपल्या संगती?

डोन्ट्री..डोन्ट्री
तात्याबास॑ग सेटी॑ग करु डिस्काउ॑ट कुपन॑ एकमेका॑च्या हाटीलात ठेऊ :-))
आन् आप्ल्याकड॑ खायाला काय बी ठिवायच॑ न्हाई, आन् तात्या॑नी पियाला ठिवायच॑ न्हाई
म॑ग झाल॑ का न्हाई फुल्ल सेटी॑ग?

- (मा॑डवली बादशाह) ध मा ल.

मीनल's picture

4 Apr 2008 - 6:35 pm | मीनल

टप्रीची आयडेया इनोबाची
आपण दोघच सेटींग करून -हायले हाओत.
तो काय झोपलेला (sleeping ) हाय काय ?
कुट हाय तो कुट?

मीनल.

ब्रिटिश टिंग्या's picture

4 Apr 2008 - 7:19 pm | ब्रिटिश टिंग्या

आपण चहा-महालची इथे लंडनला एक शाखा काढू अन् उद्घाटनाला मालक अन् 'इथल्या' मालकीणबैंना (सिंडी क्रॉफर्डला) बोलवू. ;)
इथल्या हाटेलाची पेशालिटी - व्होडका स्मिरनॉफ टी.

अन् उद्घाटनाच्या दिशी ऑन दी हाउस ३० मिली व्होडका टी फुकाट.....

असो, हाटेलाची जागा वगैरे हेरून ठेवलीया......ताबा घेण्यासाठी डॉन्या अन् इनायकभौंना पाठवुन द्या इथं.

आपला,
('चहा-महाल इन युके' चा व्यवस्थापक) टिंग्या ;)

मीनल's picture

4 Apr 2008 - 7:21 pm | मीनल

अरे थोरा मोठ्यांच काम ते .
छोटीने मधेमधे करू नये.

तरी पण ईनोबाला आणि धम्याला विचार लंडन मधल्या शाखेच .
धम्याची टीप पहा-- आमची कुठेही शाखा नाही .

त्यामुळे लंडनच जरा कठिणच वाटत.
मीनल.

छोटा डॉन's picture

4 Apr 2008 - 7:22 pm | छोटा डॉन

"हाटेलाची जागा वगैरे हेरून ठेवलीया......ताबा घेण्यासाठी डॉन्या अन् इनायकभौंना पाठवुन द्या इथं..."
जरूर ...
वैसे "हॉटेलका ताबा लेके के लिये मेरा वहा होना जरूरी नही पर फिरंगी हॉटेलका ताबा लेने का मजा मै खोना नही चाहता " ... [ बावळट अभिषेक बच्चन, सरकार फेम ...]

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

धमाल मुलगा's picture

7 Apr 2008 - 12:21 pm | धमाल मुलगा

क्या बात है!
ध॑दा सुरु व्हायच्या आत शाखेसाठी प्रपोजल? ते पण डायरेक ल॑टनव्हून?

ब्येस! कराच भौ तुमी शाखा चालू तिकड॑. च्यामायला आपण आपला हितला बोर्ड ऍडजेस करुन घेऊ
'आमची कुठेही शाखा नाही' ह्याच॑ 'आमची भारतात इतरत्र कोठेही शाखा नाही' कस॑ काय?

महामहीम डॉनभौ आहेतच जागा बळकवायला.

पाटनर लोकांची एवढी गर्दी वाढाया लागली,काय सहकारी चहा चळवळ चालू करायचीय काय?जरा कमी करा की लेको...
आर॑..आर॑ इनोबा, थ॑ड घे जरा! आर॑ बाबा, ही समदी म॑डळी चा॑गली अणुभवशिद्द हायेत. आन् ल॑टनमदी पन शाखा काडायची म्ह॑जी आपली क॑पनी इ॑टरनॅशनल झाली की. म॑ग घ्येवू की त्या॑ला डायरेक्टर बोर्डावर. आन क॑पनीचा आयपीओ बी काडू, हित॑ लै जन॑ हायेत फायनान्सवाल॑.
बघ भौ इच्चार कर, मी सा॑गतो डे॑गळ्याला शेक्रेटरीला सा॑गावा धाडाय. समद॑ बैजवार करुन टाकू.

इनोबा म्हणे's picture

7 Apr 2008 - 1:59 pm | इनोबा म्हणे

आर॑..आर॑ इनोबा, थ॑ड घे जरा!
च्यामारी(इथंबी 'च्या' हायेच)... च्याचं हाटेल काढायचं म्हंतो आन थंड कशापाई घ्यायाचं रं. आता च्या घ्यायचा फकस्त.

|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे

धमाल मुलगा's picture

7 Apr 2008 - 2:05 pm | धमाल मुलगा

अर्रतिच्या...गडबड झाली कायतरी...
अरे थ॑ड म्हणजे, माझ्यावर गोरा सायेब उखडला आन् माझी चूक नसेल तर मी जो धि॑गाणा घालतो ते बघून मला 'चिल्ल चिल्ल' म्हणतो. आधी म्हणल॑, बेण॑ चिल्लर कशाला मागत॑य, न॑तर कळल॑, त्ये थ॑ड हो म्हनत॑य.
म्हनून म्हनल॑ जरा सायेबाची ऐट आपनबी दाखवावी. म॑ग आपल्या म्हराटीत 'थ॑ड' च म्हन्नार ना?

छोटा डॉन's picture

7 Apr 2008 - 11:12 pm | छोटा डॉन

आपण असताना जागेच टेन्शन काय को ...
इधर क्या हम मर्‍या है. बाद मै ऐसा बाता किया तो देखो मिया हम खफा होके अंगको राख फासके हिमालय म चले जायेंगे

कौणसी जगा मंगता, अपने पास एकसे एक आयटम है ...
बोलो "सोनिया गांधीका १० जनपथ, बेंगलोरकी विधानसौधा , काश्मीरका दल लेक, जयपूरका हवामहल का आपल्या हसमुखराय देखमुखांचा वर्षा बंगला " ... तुम सिर्फ बोलोच ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

इनोबा म्हणे's picture

4 Apr 2008 - 8:14 pm | इनोबा म्हणे

ए बया, तूला चहा बनवता येत आसंल तर ठिवतो कामाला.
पाटनर लोकांची एवढी गर्दी वाढाया लागली,काय सहकारी चहा चळवळ चालू करायचीय काय?जरा कमी करा की लेको...

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

छोटा डॉन's picture

4 Apr 2008 - 7:15 pm | छोटा डॉन

"कहावा, मसालानी टी, व्होडका टी, आणि चीन व अमेरिकेत लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान असलेला मिनलताई स्पेशल इ॑पोर्टेड चायनिज छा ..."
हे बरं नाही भाउ, आम्ही कधी काळी कालिजात असताना आमच्याकडे "थम्स्-अप टी" घ्यायची पद्धत होती ...
त्याबद्दल थोडे बघावे ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

इनोबा म्हणे's picture

4 Apr 2008 - 8:07 pm | इनोबा म्हणे

काय इनोबा, घ्यायचा का बोर्ड करायला?
आता बोर्ड रंगवतो आन टाकतो इथं...

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

स्वाती राजेश's picture

4 Apr 2008 - 4:20 pm | स्वाती राजेश

विजुभाऊ,
छान माहिती आणि रेसिपी सुद्धा.
खरे तर चहा हा माझा विक पॉइंट आहे. आमच्या घरी कोणीही (नवरा, मुलगा) चहा घेत नाही. पण मला कधीही, कुठेही चालतो, पण कसलाही चालत नाही..
चहा घेताना वाटले पाहिजे कि चहाच पित आहे म्हणून असा चहा असावा,तशी तुमची रेसिपी वाटली. नक्की करून पाहीन..

अवांतरः माझ्या नवर्‍याने टी/कॉफी मेकर आणला आहे. पण त्यामधे ही रेसिपी फिट बसत नाही. त्यात Cappuccno, Latte, Mocha, Black coffee हे छान होतात. आणि ब्लॅक टी छान होतो.

स्वाती दिनेश's picture

4 Apr 2008 - 5:36 pm | स्वाती दिनेश

तासिमोचे की क्रुप चे मशिन? अग त्यात एस्प्रेसो पण सही होते..:)

स्वाती राजेश's picture

4 Apr 2008 - 6:07 pm | स्वाती राजेश

स्वाती,माझ्याकडे DeLonghi चे आहे..
त्यात एस्पेसो पण होते..
तुझ्याकडे तासिमो चे आहे का? कसे आहे..

आपण एक नविन विषय सुरू करावा....उपकरणे
कारण आपण वस्तू विकत घेताना त्याचे फायदे/तोटे माहीत नसतात. हे जर इथे शेअर केले तर फार छान माहीती पण मिळेल आणि वस्तू विकत घेताना विचार करता येइल...

आता हेच बघ ना, माझ्या मैत्रीणीने एक कॉफी मेकर घेतला त्यात फक्त ग्रॅन्युअल असलेली कॉफी चालते, त्यात ग्राउंड कॉफी चालत नाही.
पण माझ्या कॉफी मेकर मधे दोन्ही चालते.

स्वाती दिनेश's picture

4 Apr 2008 - 6:14 pm | स्वाती दिनेश

वेगळा धागाच चालू करुया,ते जास्त बरे होईल ना..
आमच्याकडे तासिमो आहे.

मनापासुन's picture

4 Apr 2008 - 8:11 pm | मनापासुन

आमच्या घरी कोणीही (नवरा , मुलगा) चहा घेत नाही
तुमच्या कडे अजून चहा पोह्याचे कार्यक्रम होतात?
अरे हो ते स्वल्प विराम मला अगोदर दिसलेच नाही...
मनापासुन गैर समज झाला ना माझा

स्वाती राजेश's picture

4 Apr 2008 - 8:20 pm | स्वाती राजेश

आमच्याकडे अजून चहा पोह्याचे कार्यक्रम होतात पण तुमच्या अर्थाप्रमाणे, सोबत मुली पाहणे हा होत नाही.
:)))))

विजुभाऊ's picture

4 Apr 2008 - 5:22 pm | विजुभाऊ

स्वाती माझी मुलगी पण चहा घेत नाही. पण काहवा म्हंटले की लगेच तयार होते. चहा न पिणारे लोक हे त्या चहाच्या नन्तर रेंगाळणार्‍या थोड्या कडवट गोड चवीला कंटाळतात. या चहा ची खासियत ही आहे की यात मूळ चहा ची चव चहा डायरेक्ट न उकळल्या मुळे तशीच् रहाते. काश्मीर मधे पाणी उकळत असते पण चहा देतेवेळीच तो गाळणीत किंवा कापडी पुरचुंडीमधे ठेउन ती पुरचुंडी पाण्यात फिरवतात.
अवांतर : खरे तर चहा न पिणार्‍या लोकांचे मला आश्चर्य वाटते. ते कसे सामाजिकरेत्या कसे सुसंवाद करु शकतात तेच कळत नाही.
मे एकदा चहा सोडुन पाहीला होता. एक महीना. चहा हा आपल्याला लोकाशी सुसंवाद साधताना ( दूरत्व कमी करायला) किती मदत करु शकतो हे मल तेंव्हा कळाले. आपल्याकडे मिनीमम कर्टसी म्हणुन चहा देतात. एखाद्याने तेच नाकारले तर चहा ऑफर करणार्‍या माणसालाच नाकारल्यासारखे होते. उर्दूत सांगायचे तर "हमपियाला हम नीवाला " हे लोकाना जवळ आणतात.
आमच्या घरात चहाचे सगळे शौकीन आहेत. सकाळी किमान ३ कप चहाशिवाय कोणी टेबलावरुन हलत नाहीत.

स्वाती दिनेश's picture

4 Apr 2008 - 5:39 pm | स्वाती दिनेश

विजुभाऊ..चहाची चर्चा चांगली चालली आहे... 'गावचहा'ची कल्पना मस्तच!
फक्त आपल्याकडे सहज कोणी आले की आपण चहा तरी घ्या असे म्हणतो तसे.. इथे कोणी सहज आले ना घरी किवा आपण कोणाकडे गेलो तर एखादी बिअर तरी घ्या म्हणतात..
स्वाती

विजुभाऊ's picture

4 Apr 2008 - 5:50 pm | विजुभाऊ

मग मी; मग घेउन येतो तुमच्याकडे :)

स्वाती दिनेश's picture

4 Apr 2008 - 5:52 pm | स्वाती दिनेश

मग न आणता नुसते आलात तरी मिळेल हो हवे ते पेय तुम्हाला..

छोटा डॉन's picture

4 Apr 2008 - 7:25 pm | छोटा डॉन

"एखादी बिअर तरी घ्या म्हणता"..."
बरं झालं आधीच सांगितलं ते. च्यायला आपली तर लै मस्त सोय झाली ...
अवांतर : अजून २ महिन्यांनी तुम्ही म्हणताय ती पद्धत असलेल्या देशात आमची चक्कर आहे ...
तेव्हा घेऊ असला पाहूणचार ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

स्वाती दिनेश's picture

4 Apr 2008 - 7:28 pm | स्वाती दिनेश

तुम्ही म्हणताय ती पद्धत असलेल्या देशात आमची चक्कर आहे ...
तुमचे येणे नक्की झाले की टाका पोस्टकार्ड.. जर्मनीत येणार असलात तर भेटू या..

छोटा डॉन's picture

4 Apr 2008 - 7:50 pm | छोटा डॉन

जर्मनीलाच येणार आहे .... "रशेलशेम" का असेच कुठलेतरी गाव आहे ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

सूहास's picture

24 Aug 2009 - 5:06 pm | सूहास (not verified)

सू हा स...

डॉ.प्रसाद दाढे's picture

4 Apr 2008 - 5:35 pm | डॉ.प्रसाद दाढे

कृती:
-एक कप पाणी उकळावे
-त्यात दोन छोटे चमचे साखर टाकावी
-दुसर्‍या भा॑ड्यात एक चमचा चहा पत्ती घ्यावी
-उकळलेले पाणी त्या भा॑ड्यात ओतावे व वरती झाकण ठेवावे
-तीन मिनिटा॑नी हे मिश्रण गाळून त्यात गरम दूध घालून प्यावा (अथवा कुणालाही द्यावा..)
नेहमीच्या चहात आणि 'ह्या' चहा॑त फरक इतकाच आहे की चहा पत्ती उकळत्या पाण्यात न टाकता पत्तीमध्ये पाणी टाकून झाकावयाचा आहे.
करून पाहा..चहाची खरी टेस्ट कळेल. त्यात जर चहा पत्ती 'महाराष्ट्र टी डेपोची' असेल तर मग काय.. नादच खुळा!!

विजुभाऊ's picture

23 Jan 2015 - 3:52 pm | विजुभाऊ

वा दाढेसाहेब ही खरी रेशीपी म्हणायची

मदनबाण's picture

23 Jan 2015 - 3:59 pm | मदनबाण

खाणकाम करावे तर आमच्या विजुभाऊ सारखे.... बादवे... स्वतःचा धागा कसा शोधला ? आयमीन खोदलात ? *LOL*

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }

सृष्टीलावण्या's picture

4 Apr 2008 - 5:57 pm | सृष्टीलावण्या

कोकणात पूर्वी साखरेचे दुर्भिक्ष होते त्यामुळे सर्रास गुळाचा खमंग चहा व्हायचा (कारण
घाट पार केला की गूळाची निर्मिती करणारे कोल्हापूर). काय छान चव असते त्याची. (बाकी गुळाचा शिरा पण फर्मास लागतो हां). तो चहा कधीच मुंबईत बनवता येणार नाही कारण तिथल्या पाण्याची चवच न्यारी.

म्हणूनच चहा म्हटले की आठवते, कोकणातले अंधारे माजघर, मातीच्या चुली, सळपं, त्या चुलीच्या आजुबाजूला उबेला बसलेली ढीगभर मांजरं तसेच जुने चिनीमातीचे त्रिकोणी निमुळते होत जाणारे कप, चरव्या, पितळी भांड्यांमध्ये होणारा चहा, मांजरांपासून दुधाचे पदार्थ वाचवण्यासाठी खास लाकडी खिट्टी लावलेली फडताळं, शेणाने सावरलेल्या जमिनी, नऊवारी नेसलेल्या व स्वादिष्ट स्वैपाक करणार्‍या आज्ज्या आणि जमिनीवर बसायला मोठे लाकडी पाट.

खरोखरच जंगलात असलेले माझे गाव एक वीज आणि फोन सोडला तर आजही २०० वर्षापूर्वीचेच कोकण आहे.

>
>
आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना, हरिश्चंद्र ताराराणी डोम्बाघरी भरती पाणी...

वरदा's picture

4 Apr 2008 - 6:47 pm | वरदा

माझा नवरा खूप दिवस सांगतोय काश्मीरचा चहा मस्त लागतो आणि मला अजिबात माहीत नव्हता कसा करायचा..खूप खूप धन्यवाद..या विकेंडला करते आणि मस्त फोटो टाकते इथे....

प्रभाकर पेठकर's picture

4 Apr 2008 - 6:49 pm | प्रभाकर पेठकर

लडाखात चहा याकच्या (म्हणजे.....याकिणीच्या) दुधापासून बनवतात. त्यात मीठ घालतात आणि तो एका जाड बांबूत घालून खूप घुसळतात. असे टिव्हीच्या एका पर्यटन विषयक कार्यक्रमात पाहिले होते. पण असा चहा पिण्यासाठी (आवडण्यासाठी नाही) मनाची जबरदस्त तयारी असावी लागते असे त्या कार्यक्रमाच्या नांगराने सागितले होते.

चतुरंग's picture

4 Apr 2008 - 9:00 pm | चतुरंग

कार्यक्रमाच्या नांगराने
हे बाकी झकास!
चतुरंग

ऋषिकेश's picture

5 Apr 2008 - 12:07 am | ऋषिकेश

वा पेठकरकाका,
मे मधे लडाखला चाललो आहे तेव्हा हा चहा पितोच आणि सांग्तो कसा लागतो ते ;)
.. आधीच माहिती दिल्याबद्द्ल धन्यवाद!

बाकी नांगर प्रचंड आवडला.. ह. ह. पो. दु. :))

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

llपुण्याचे पेशवेll's picture

7 Apr 2008 - 11:52 pm | llपुण्याचे पेशवेll

अवांतरः मला चूकून याकिणी ही डाकिणी, शाकिणी अशा कशातली तरी वाटली.. मग तर चहा प्यायला नक्कीच जबरदस्त मनाची तयारी पाहीजे.. :)
ह.घ्या.

पुण्याचे पेशवे

विजुभाऊ's picture

4 Apr 2008 - 7:03 pm | विजुभाऊ

लडाखात चहा याकच्या (म्हणजे.....याकिणीच्या) दुधापासून बनवतात......
तिबेट मध्ये याकचे दूध चे पनीर बनवतात्.ते एका पिशवीत भरुन ठेवतात्..त्याला मीठ लावतात....
त्याचे क्युब चहाच्या पाण्यात टाकतात्. हा खूप ऊर्जादायक असतो

प्रमोद देव's picture

5 Apr 2008 - 8:56 am | प्रमोद देव

विजुभाऊ शहांचे चहापुराण वाचून आता आम्ही त्यांचे बारसे केलेले आहे. आता त्यांना विजुभाऊ शहा न म्हणता विजुभाऊ चहा म्हणून ओळखण्यात येईल.
अरे धमु जरा दवंडी पीट बरे जोरात!

मनापासुन's picture

4 Apr 2008 - 8:05 pm | मनापासुन

चॉकलेट चहा.....
कच्च्या टी लीफ चा चहा
पण सांगा

देवदत्त's picture

4 Apr 2008 - 8:40 pm | देवदत्त

नवीन प्रकार चहाचा. चाखायला पाहिजे. :)
थोडा फार मसाला चहा सारखा वाटतोय, की मेवा चहा ;)

काहवा.. मिशन काश्मीर ह्या सिनेमात ऐकले होते ह्या चहाचे नाव. त्यानंतर तो मी २००३ मध्ये अमरनाथवरून परत येताना प्यायलो होतो. पण त्यात हे सर्व काही नव्हते. अर्थात घोडेवाल्याच्या झोपडीत तेव्हा कुठे असणार मेवा. आराम करायला त्याच्या झोपडीत (तात्पुरती होती बहुधा) थांबलो होतो तेव्हा त्याने केला होता. त्यांनी आपल्याकरीता केलेला चहा वेगळा होता. तो म्हणाला की "आमचा चहा तू पिऊ शकणार नाहीस. खारट वाटेल." बनविताना पाहिले तर तो पिठासारखा पदार्थ टाकून बनवत होता. थोडाफार घट्ट होता. माझ्याकरीता बनविलेला चहा आपल्या नेहमीच्या प्रकारे बनविलेला. फक्त दूध नसलेला गवती चहा. चव छान होती पण त्याची.

(अवांतर(स्वगत): अरे, ह्या लोकांनी चहावर लेख आणि प्रतिक्रिया लिहिल्या. तू नुसता वाच. तुझा अर्धवट लेख कधी पूर्ण करणार? लगेच करावा लागेल. :) )

विजुभाऊ's picture

5 Apr 2008 - 12:55 pm | विजुभाऊ

राम्चन्द्र तात्या आपल्या अयोध्येतले मिपाकर नागरीक चहा मस्त एन्जॉय करताहेत.
त्याना किश्किन्धा नगरीचा चहा पाजायचा होता.
नव्या चहाची रेसीपी जरा सोमवारनन्तरच टाकतो.
.......................................रामसेतु बान्धणे चालु असताना सैन्याला चहा पाजणारा : विजुभाऊ चहा

लोकहो लेको हा मि पा वरचा एखद्या पेय पदार्था वरचा कदाचित पहीला लेख असेल ज्यात सगळ्यानी मझा घेतला
मी ..."मस्त मंद आवाजात बासरी + सन्तूर लावुन झकास रिलॅक्स मधे काहवा प्या...
* काही जण हा चहा थंड ही पितात. त्यावेळी त्यात स्मिर्नोफ व्होडका चा एखादा चमचा टाकल्यास हरकत नाही........... हे लिहीले होते.........पण मावळ्त्या वर्षा ला कोणी ही तसल्या मूड मधे नव्हते. दारुशिवाय एखाद्या पेय पदार्था वर ईतके प्रतिसाद पाहुन बरे वाटले.
काहवा मस्त एन्जॉय केला........
तुम्हा सर्वांस नवे वर्ष आनन्दाचे , आरोग्याचे जावो.....ही सदीच्छा
नवीन वर्षात आनन्दीत ..........विजुभाऊ

रामदास's picture

7 Apr 2008 - 6:39 pm | रामदास

दारुखान्यात काम करताना सुलेमानी म्हणजे काळा चहा प्यायचो.सोबत लिम्बाची फोड. पानी कम आणि लम्बा पानी हे शब्द तिथेच ऐकले. दारुखान्यात उरीया लेबर काळाच चहा प्यायचे. चाळीस रुपये रोजावर हाच चहा परवडायचा.मुम्बै मधली सगळ्यात वाईट दारु दारुखान्यात मिळते.

मनापासुन's picture

11 Apr 2008 - 6:30 pm | मनापासुन

काळा चहा? जरा वर्णन करुन सांगाल का?

रामदास's picture

12 Apr 2008 - 12:09 am | रामदास

दूध न घातलेला चहा. हा दारुखान्यात फेमस आहे.तरतरी जास्त येते. विषय समोर आहे म्हणून सान्गतो बिस्कीटं पण पाण्यात बुडवून खातात्.दारुखान्यात अशा बर्‍याचं प्रथा आहेत .नंतर कधीतरी.

विजुभाऊ's picture

14 Aug 2008 - 5:54 pm | विजुभाऊ

रामदास भौ प्रॉमिस पाळा की
नुस्ते पुन्हा कधीतरी म्हणुन बास केलेत
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

विजुभाऊ's picture

21 Aug 2009 - 2:42 pm | विजुभाऊ

पूर्ण खफ झालेला हा आणखी एक धागा

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

अबोल's picture

22 Aug 2009 - 8:53 pm | अबोल

काही जण हा चहा थंड ही पितात. त्यावेळी त्यात स्मिर्नोफ व्होडका चा एखादा चमचा टाकल्यास हरकत नाही

आता तर मी नेहमीच थ॑ड चहा पिणार

विजुभाऊ's picture

3 Mar 2010 - 12:19 pm | विजुभाऊ

दाढेसाहेबांची चहा करायची पद्धत
http://misalpav.com/node/11231 या धाग्या प्रीत्यर्थ

शुचि's picture

3 Mar 2010 - 8:15 pm | शुचि

मस्त बर्फाच्या ७/८ खड्यांवर आइसड टी (विथ लेमन) टाकून , रेल्वेत बसून निसर्गदृष्यांचा आस्वाद घ्यावा. बरोबर मस्त पुस्तक मधे मधे तोंडी लावायला.
स्वर्ग अजून काही वेगळा असत नाही.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

मी-सौरभ's picture

3 Feb 2012 - 8:50 pm | मी-सौरभ

'चा' च दुकान पुण्यात कधी चालू करतोयस ध.मु.?
नोकरीचा लैच कंटाळा आलायं :(

किचेन's picture

3 Feb 2012 - 10:52 pm | किचेन

करून बघायला पाहि़जे.